Monday, 13 March 2023

दिनांक 13 मार्च 2023 रोजी देण्यात आलेल्या मराठवाडयासाठी तुरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची पूर्वकल्पना व कृषि हवामान सल्ला

दिनांक

चेतावनी

13 मार्च 2023

जालना जिल्हयात तुरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

बीड जिल्हयात तुरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

14 मार्च 2023

जालना व बीड जिल्हयात तुरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

परभणी, हिंगोली, नांदेड व लातूर जिल्हयात तुरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

15 मार्च 2023

लातूर जिल्हयात तुरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

15 मार्च 2023

जालना, परभणी, बीड, हिंगोली व नांदेड जिल्हयात तुरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

16 मार्च 2023

जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड व लातूर जिल्हयात तुरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

17 मार्च 2023

बीड, नांदेड व लातूर जिल्हयात तुरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

17 मार्च 2023

जालना जिल्हयात तुरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

परभणी व हिंगोली जिल्हयात तुरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

काढणीस तयार असलेल्या हरभरा, रब्बी ज्वारी, करडई व गहू पिकाची लवकरात लवकर काढणी व मळणी करून घ्यावी व सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. मळणी केलेल्या मालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. मळणी करणे शक्य नसल्यास काढणी केलेला माल ताडपत्रीने झाकून ठेवावा. मळणी करणे शक्य नसल्यास खुडलेली कणसे ताडपत्रीने झाकून ठेवावीत. सध्या हळदीची काढणी, हळद उकडणे, वाळवणे, पॉलिश करणे ही कामे सुरू आहेत.  हळदीची उघडयावर साठवण करू नये. काढणी केलेल्या मालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

काढणीस तयार असलेल्या द्राक्ष, संत्रा/मोसंबी फळांची काढणी करून घ्यावी व सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. नविन लागवड केलेल्या व लहान फळझाडांना काठीने आधार द्यावा.

चारा पिके

काढणी केलेला ज्वारीचा कडबा सुरक्षित ठिकाणी साठवावा किंवा तो गोळा करून ताडपत्रीने झाकून ठेवावा.

भाजीपाला

काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची, टरबूज, खरबूज पिकाची काढणी लवकरात लवकर करून घ्यावी. नविन लागवड केलेल्या व लहान वेलवर्गीय झाडांना काठीने आधार द्यावा.

 

फुलशेती

काढणीस तयार असलेल्या फुल पिकाची काढणी लवकरात लवकर करून घ्यावी.  नविन लागवड केलेल्या व लहान फुल झाडांना काठीने आधार द्यावा.

पशुधन व्यवस्थापन

जनावरांना उघडयावर सोडू किंवा बांधू नये. निवा-याच्‍या ठिकाणी बांधावे व पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्‍यावी. पशूधनास खुले पाणी, तलाव किंवा नदीपासून दूर ठेवावे, ट्रक्टर आणि इतर धातूंच्या शेती अवजारांपासून दूर ठेवावे व पशुधनास झाडाखाली जमा होऊ देऊ नये. तसेच पाऊस चालू होण्‍याच्‍या  वेळी झाडाच्‍या आडोशाला थांबु नये.

कुक्कुट पालन

कोंबडया व लहान पिल्ले सुरक्षित ठिकाणी ठेवावेत.

 

सौजन्‍य

डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

 

दिनांक 13 मार्च 2023 रोजी देण्यात आलेल्या मराठवाडयासाठी तुरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची पूर्वकल्पना व कृषि हवामान सल्ला 

  

No comments:

Post a Comment

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 19 ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजी नगर, बीड, जालना, परभणी,नांदेड व हिंगोली जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून मूसळधार पावसाची शक्यता आहे तर लातूर जिल्हयात वादळी वारासह मूसळधार पावसाची शक्यता आहे. दिनांक 20 ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजी नगर, बीड, जालना, परभणी व धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे तर इतर जिल्ह्यात हलक्या पाऊसाची शक्यता आहे. दिनांक 21 ते 23 ऑगस्ट कालावधीत मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या पाऊसाची शक्यता आहे.

  हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या अ...