Tuesday, 14 March 2023

दिनांक 14, 15 व 16 मार्च रोजी छत्रपती संभाजी नगर जिल्हयात तर दिनांक 15 मार्च रोजी जालना जिल्हयात तूरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील चार ते पाच दिवसात कमाल तापमानात हळूहळू 2 ते 4 अं.से. ने घट होण्याची शक्यता आहे.

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 14 मार्च रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना व बीड जिल्हयात तर दिनांक 15 मार्च रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर व धाराशिव जिल्हयात तर दिनांक 16 मार्च रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी व हिंगोली जिल्हयात तर दिनांक 17 मार्च रोजी लातूर, धाराशिव, नांदेड, बीड, परभणी व हिंगोली जिल्हयात तर दिनांक 18 मार्च रोजी लातूर, धाराशिव व नांदेड जिल्हयात तुरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 14, 15 व 16 मार्च रोजी छत्रपती संभाजी नगर जिल्हयात तर दिनांक 15 मार्च रोजी जालना जिल्हयात तूरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील चार ते पाच दिवसात कमाल तापमानात हळूहळू 2 ते 4 अं.से. ने घट होण्याची शक्यता आहे.

मराठवाडयात दिनांक 17 ते 23 मार्च 2023 दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त, कमाल तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा किंचित कमी तर किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 19 ते 25 मार्च 2023 दरम्यान कमाल तापमान मध्यम प्रमाणात सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीपेक्षा कमी तर पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.

शेतकरी बांधवांनी हवामान आधारित शेतीविषयक सल्ला आपल्या अँड्रॉइड मोबाईलवर मिळविण्यासाठी गुगल प्ले स्टोअर वरून अँड्रॉइड मेघदूत ॲप्लिकेशन तर मेघगर्जना व विजांचा कडकडाटाच्या  अंदाजासाठी अँड्रॉइड ॲप्लिकेशन दामिनी या ॲपचा वापर करावा.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

काढणीस तयार असलेल्या हरभरा, रब्बी जवारी, करडई व गहू पिकाची लवकरात लवकर काढणी व मळणी करून घ्यावी. मळणी केलेल्या मालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. मळणी करणे शक्य नसल्यास काढणी केलेला माल ताडपत्रीने झाकून ठेवावा. मळणी करणे शक्य नसल्यास खुडलेली कणसे ताडपत्रीने झाकून ठेवावीत. सध्या हळदीची काढणी, हळद उकडणे, वाळवणे, पॉलिश करणे ही कामे सुरू आहेत.  हळदीची उघडयावर साठवण करू नये. काढणी केलेल्या मालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

काढणीस तयार असलेल्या द्राक्ष फळांची काढणी करून घ्यावी व सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. काढणीस तयार असलेल्या संत्रा/मोसंबी फळांची काढणी करून घ्यावी व सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. नविन लागवड केलेल्या व लहान फळझाडांना काठीने आधार द्यावा.

भाजीपाला

काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची, टरबूज, खरबूज पिकाची काढणी लवकरात लवकर करून घ्यावी. नविन लागवड केलेल्या व लहान वेलवर्गीय झाडांना काठीने आधार द्यावा.

 

 

 

फुलशेती

काढणीस तयार असलेल्या फुल पिकाची काढणी लवकरात लवकर करून घ्यावी. नविन लागवड केलेल्या व लहान फुल झाडांना काठीने आधार द्यावा.

चारा पीके

काढणी केलेल्‍या ज्‍वारीचा कडबा पावसात भिजणार नाही याची दक्षता घ्‍यावी. कारण पावसात भिजल्‍यास त्‍याची प्रत खालावून साठवण क्षमता कमी होते व भिजलेला कडबा जनावरे खात नाहीत.

पशुधन व्यवस्थापन

जनावरांना उघडयावर सोडू किंवा बांधू नये. निवा-याच्‍या ठिकाणी बांधावे व पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्‍यावी. पशूधनास खुले पाणी, तलाव किंवा नदीपासून दूर ठेवावे, ट्रक्टर आणि इतर धातूंच्या शेती अवजारांपासून दूर ठेवावे व पशुधनास झाडाखाली जमा होऊ देऊ नये. तसेच पाऊस चालू होण्‍याच्‍या  वेळी झाडाच्‍या आडोशाला थांबु नये.

सामुदायिक विज्ञान

स्वस्थ जीवनासाठी आश्यक बाबी : दररोज संतुलीत आहार घ्या. दिवसभरात 8 ते 10 ग्लास पाणी प्या. आहारात  साखर आणि मीठाचा वापर कमी करा. तेल आणि मसालेदार पदार्थांचा वापर कमी करा. सकाळची न्याहरी करण्यास कधीच टाळाटाळ करु नका. जेवणाच्या वेळा नियमितपणे पाळा.

सौजन्‍य

डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक100/ 2022 - 2023      मंगळवार, दिनांक – 14.03.2023

 

 

No comments:

Post a Comment

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 18 जून रोजी छत्रपती संभाजी नगर व जालना जिल्हयात, दिनांक 19 जून रोजी नांदेड, परभणी, हिंगोली, छत्रपती संभाजी नगर व जालना जिल्हयात, दिनांक 20 जून रोजी नांदेड, परभणी व हिंगोली जिल्हयात, तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 40 ते 50 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक 17 ते 21 जून रोजी तूरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील तीन ते चार दिवसात कमाल व किमान तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही.

  हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या अ...