Tuesday 21 March 2023

दिनांक 24 व 25 मार्च रोजी धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली व परभणी जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 24 व 25 मार्च  रोजी धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली व परभणी जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील चार ते पाच दिवसात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही.

मराठवाडयात दिनांक 24 ते 30 मार्च 2023 दरम्यान पाऊस सरासरीएवढा ते सरासरीपेक्षा जास्त, कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग कमी झालेला आहे तर जमिनीतील ओलावा किंचित वाढलेला आहे. 

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 26 मार्च ते 01 एप्रिल 2023 दरम्यान कमाल तापमान मध्यम प्रमाणात सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीपेक्षा कमी तर पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

काढणीस तयार असलेल्या करडई, रब्बी ज्वार, गहू पिकाची लवकरात लवकर काढणी करावी. काढणी करून मळणी करावी. मळणी केलेल्या मालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. तूरळक ठिकाणी झालेल्या गारपीट व पावसामूळे काढणी केलेले पिक भिजले असल्यास वाळल्यानंतर मळणी करावी.  काढणीस तयार असलेल्या व काढणी न केलेल्या हळद पिकाची काढणी लवकरात लवकर करावी. काढणी केलेल्या हळदीची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.सध्या हळदीची काढणी, हळद उकडणे, वाळवणे, पॉलिश करणे ही कामे करून घ्यावी. तूरळक ठिकाणी झालेल्या गारपीट व पावसामूळे काढणी केलेली हळद भिजली असल्यास वाळल्यानंतर साठवणूक करावी.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

काढणीस तयार असलेल्या मृग बहार फळांची काढणी करून घ्यावी. तूरळक ठिकाणी झालेल्या वादळी वारा, गारपीट व पाऊस यामूळे फळबागेत पडलेली फळे गोळा करून नष्ट करावीत. तसेच मोडलेल्या फांद्यांची छाटणी करून संत्रा/मोसंबी बागेत 1% बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी. तूरळक ठिकाणी झालेला पाऊस व ढगाळ वातावरणामूळे आंबा बागेत रोगाचा प्रादूर्भाव होऊ नये म्हणून कार्बेन्डाझीम 30 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तूरळक ठिकाणी झालेला पाऊस व ढगाळ वातावरणामूळे डाळींब बागेत रोगाचा प्रादूर्भाव होऊ नये म्हणून कार्बेन्डाझीम 30 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

चारा पीके

तूरळक ठिकाणी झालेल्या वादळी वारा, गारपीट व पाऊस यामूळे भिजलेला कडबा वाळल्यानंतर साठवणूक करावी.

भाजीपाला

काढणीस तयार आसलेल्या भाजीपाला पिकांची तसेच टरबूज, खरबूज इत्यादी पिकांची काढणी करावी. तूरळक ठिकाणी झालेल्या वादळी वारा, गारपीट व पाऊस यामूळे नूकसान झालेल्या भाजीपाला पिके, टरबूज, खरबूज गोळा करून नष्ट करावीत. तूरळक ठिकाणी झालेला पाऊस व ढगाळ वातावरणामूळे भाजीपाला पिकात रोगाचा प्रादूर्भाव होऊ नये म्हणून कार्बेन्डाझीम 30 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून आळवणी करावी.

फुलशेती

काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी करून बाजार पेठेत पाठवावी.

पशुधन व्यवस्थापन

आपल्या पशुंना उन्हामध्ये बांधु नका (निदान तिव्र उन्हाच्या कालावधीमध्ये त्यांना झाडाखाली/सावलीमध्ये किंवा शेड/गोठ्यामध्येच बांधणे चांगले). पशुंना शक्यतो थंड/स्वच्छ/मुबलक पाणी दोन-तिन वेळेस पाजावे. पाण्यामुळे पशुंच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी (डीहायड्रोजन) होणार नाही. जमल्यास पाण्यामधून क्षार द्यावेत, 5 लिटर पाण्यामध्ये चिमुटभर गुळ (25 ग्रॅम), थोडे मिठ (5-10 ग्रॅम) आणि 5 ग्रॅम क्षार मिश्रण दिल्यास उत्तम, मात्र नजीकच्या पशुवैद्यकाचा सल्ला घेऊनच व्यवस्थापन करावे. अति उष्ण काळामध्ये जनावरांच्या पाठीवर पोते टाकून ते पाण्याने  भिजवून ठेवावे.

दि. 24 व 25 मार्च रोजी तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्यामूळे जनावरांना उघडयावर सोडू किंवा बांधू नये. निवा-याच्‍या ठिकाणी बांधावे व पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्‍यावी. पशूधनास खुले पाणी, तलाव किंवा नदीपासून दूर ठेवावे, ट्रक्टर आणि इतर धातूंच्या शेती अवजारांपासून दूर ठेवावे व पशुधनास झाडाखाली जमा होऊ देऊ नये. तसेच पाऊस चालू होण्‍याच्‍या  वेळी झाडाच्‍या आडोशाला थांबु नये.

सामुदायिक विज्ञान

नवजात शिशूची दररोज स्वच्छ व चांगल्या प्रतीच्या खोबरेल तेलाने मालीश करावी. मालीश करतांना हाताची हालचाल एकाच दिशेने म्हणजे ह्रदयाकडे जाणारी असावी. बाळाच्या ज्ञानेंद्रियात जसे-नाक व कान या सारख्या अवयवांमध्ये तेल टाकणे टाळावे. बाळाच्या बेंबीचा भाग कोरडा व स्वच्छ ठेवावा. बाळाच्या स्नानासाठी कोमट पाणी वापरावे. बाळाच्या संपूर्ण शरीरास पावडर लावण्याकरीता पफचा (गादीचा) वापर करावा. बाळासाठी बेबी पावडरच वापरावे. बाळास पुरळ येऊ नये म्हणून बाळाचे शौचास/लघवी केलेले कपडे त्वरील बदलावे. बाळाच्या कमरेपासून खालच्या भागास पावडर लावून दूसरा स्वच्छ लंगोट बांधावा. बाळास झोपी घालतांना व्यवस्थित गुंडाळून घ्यावे. बाळास काजळ, सुरमा, नख पॉलिश, टिकली इ. लावणे टाळावे.

सौजन्‍य

डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक102/ 2022 - 2023      मंगळवार, दिनांक – 21.03.2023

 

 

No comments:

Post a Comment

मराठवाडयात पुढील पाच दिवस दूपारच्या वेळी आकाश अंशत: ढगाळ राहून तूरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 17 मे रोजी नांदेड, लातूर, परभणी, धाराशिव व हिंगोली जिल्हयात बऱ्याच ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 40 ते 50 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 18 मे रोजी लातूर, नांदेड, परभणी,‍ हिंगोली व बीड जिल्हयात तर दिनांक 19 मे रोजी लातूर, नांदेड, धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवस दूपारच्या वेळी आकाश...