प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील चोविस तासात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही व त्यानंतर पुढील दोन ते तिन दिवसात कमाल तापमानात हळूहळू 2 ते 3 अं.से. ने घट होण्याची शक्यता आहे. दिनांक 06 एप्रिल रोजी नांदेड, लातूर, धाराशिव, बीड, परभणी व हिंगोली जिल्हयात तर दिनांक 07 एप्रिल रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड, हिंगोली, लातूर, नांदेड, परभणी व धाराशिव जिल्हयात तर दिनांक 08 एप्रिल रोजी छत्रपती संभाजी नगर, बीड, जालना, परभणी, हिंगोली जिल्हयात तर दिनांक 09 एप्रिल रोजी छत्रपती संभाजी नगर, बीड व जालना जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 07 एप्रिल रोजी नांदेड, लातूर व धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता आहे.
मराठवाडयात दिनांक 07 ते 13 एप्रिल 2023 दरम्यान व दिनांक 14 ते 20 एप्रिल 2023 दरम्यान पाऊस सरासरीएवढा ते सरासरीपेक्षा जास्त कमाल व किमान तापमान सरासरीपेक्षा
कमी राहण्याची शक्यता आहे.
सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या
जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे तर
जमिनीतील ओलावा किंचित कमी झालेला आहे.
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 09 ते 15 एप्रिल 2023
दरम्यान कमाल व किमान तापमान मध्यम प्रमाणात सरासरीपेक्षा कमी तर पाऊस
सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.
शेतकरी बांधवांनी हवामान आधारित शेतीविषयक
सल्ला आपल्या अँड्रॉइड मोबईलवर
मिळविण्यासाठी गुगल प्ले स्टोअर वरून "मेघदूत" अँड्रॉइड
अॅप्लिकेशन तर मेघगर्जना व विजांचा कडकडाट इ.च्या
अंदाजासाठी "दामिनी" अँड्रॉइड
अॅप्लिकेशन डाउनलोड करावे व त्याचा वापर करावा.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण
कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे
कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची
तसेच तुरळक ठिकाणी गारपीटीची शक्यता असल्यामूळे काढणी केलेल्या गहू,करडई,रब्बी
ज्वारी,मका पिकाची लवकरात लवकर मळणी करून घ्यावी व मळणी केलेल्या मालाची सुरक्षित ठिकाणी
(गोदामात) साठवणूक करावी. तूरळक
ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची तसेच तुरळक ठिकाणी गारपीटीची शक्यता असल्यामूळे काढणी
न केलेल्या हळद पिकाची काढणी पुढे ढकलावी. सध्या हळदीची काढणी, हळद उकडणे, वाळवणे, पॉलिश करणे ही कामे सुरू आहेत. हळदीची उघडयावर साठवण करू
नये. काढणी केलेल्या मालाची सुरक्षित ठिकाणी (गोदामात)
साठवणूक करावी.
फळबागेचे व्यवस्थापन
तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची
तसेच तुरळक ठिकाणी गारपीटीची शक्यता असल्यामूळे काढणीस तयार असलेल्या चिकू,
संत्रा/मोसंबी व द्राक्ष फळांची लवकरात लवकर काढणी करून घ्यावी व काढणी केलेल्या
मालाची सुरक्षित ठिकाणी (गोदामात) साठवणूक करावी. तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची
तसेच तुरळक ठिकाणी गारपीटीची शक्यता असल्यामूळे नविन लागवड केलेल्या व लहान आंबा झाडांना
काठीने आधार द्यावा. तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची तसेच तुरळक ठिकाणी गारपीटीची
शक्यता असल्यामूळे नविन
लागवड केलेल्या व लहान केळी झाडांना काठीने आधार द्यावा.
काढणीस तयार असलेल्या केळीच्या घडांची काढणी लवकरात लवकर करून घ्यावी.
चारा पीके
तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची
तसेच तुरळक ठिकाणी गारपीटीची शक्यता असल्यामूळे काढणी केलेला ज्वारीचा कडबा
सुरक्षित ठिकाणी साठवावा किंवा तो गोळा करून ताडपत्रीने झाकून ठेवावा.
भाजीपाला
तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची
तसेच तुरळक ठिकाणी गारपीटीची शक्यता असल्यामूळे काढणीस तयार असलेल्या भाजीपाला
पिकाची, टरबूज, खरबूज पिकाची काढणी लवकरात लवकर करून घ्यावी. नविन लागवड केलेल्या
व लहान वेलवर्गीय झाडांना काठीने आधार द्यावा.
फुलशेती
तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची
तसेच तुरळक ठिकाणी गारपीटीची शक्यता असल्यामूळे काढणीस तयार असलेल्या फुल पिकाची
काढणी लवकरात लवकर करून घ्यावी. नविन लागवड केलेल्या व लहान फुल झाडांना काठीने
आधार द्यावा.
पशुधन व्यवस्थापन
तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची
तसेच तुरळक ठिकाणी गारपीटीची शक्यता असल्यामूळे चेतावनीच्या काळात जनावरे शक्यतो
चरावयास बाहेर नेऊ नयेत. जनावरांना उघडयावर सोडू किंवा बांधू नये. निवा-याच्या ठिकाणी
बांधावे व पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्यावी. पशूधनास खुले पाणी, तलाव किंवा
नदीपासून दूर ठेवावे, ट्रक्टर आणि इतर धातूंच्या शेती अवजारांपासून दूर ठेवावे व
पशुधनास झाडाखाली जमा होऊ देऊ नये. तसेच पाऊस चालू होण्याच्या वेळी झाडाच्या आडोशाला थांबु नये.
कुक्कुट पालन
तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची
तसेच तुरळक ठिकाणी गारपीटीची शक्यता असल्यामूळे कोंबडया व लहान पिल्ले सुरक्षित
ठिकाणी ठेवावेत.
सौजन्य
डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक
मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 02/2023
- 2024 गुरूवार,
दिनांक –
06.04.2023
No comments:
Post a Comment