प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील चोविस तासात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही व त्यानंतर पुढील तिन ते चार दिवसात कमाल तापमानात हळूहळू 2 ते 3 अं.से. ने वाढ होण्याची शक्यता आहे. दिनांक 02 मे रोजी उस्मानाबाद, बीड, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, औरंगाबाद व जालना जिल्हयात तर दिनांक 03 मे रोजी परभणी, लातूर, उस्मानाबाद, बीड, नांदेड व हिंगोली जिल्हयात तर दिनांक 04 मे रोजी नांदेड, लातूर, औरंगाबाद, जालना, परभणी, उस्मानाबाद, बीड, हिंगोली जिल्हयात तर दिनांक 05 मे रोजी औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 02 व 04 मे रोजी नांदेड व लातूर जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता आहे.
मराठवाडयात दिनांक 05 ते 11 मे 2023 दरम्यान पाऊस सरासरीएवढा
ते सरासरीपेक्षा जास्त तर कमाल तापमान
सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.
सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या
जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग कमी झालेला
आहे तर
जमिनीतील ओलाव्याचे प्रमाण वाढलेले आहे.
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 07 ते 13 मे 2023 दरम्यान कमाल तापमान मध्यम प्रमाणात सरासरीपेक्षा कमी, किमान
तापमान सरासरीपेक्षा कमी तर पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण
कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे
कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
सध्या हळदीची काढणी, हळद उकडणे,
वाळवणे, पॉलिश करणे ही कामे सुरु आहेत. तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची तसेच तुरळक
ठिकाणी गारपीटीची शक्यता असल्यामूळे हळदीची उघड्यावर साठवण करू नये. काढणी
केलेल्या मालाची सुरक्षित ठिकाणी (गोदामात) साठवणूक करावी.
फळबागेचे व्यवस्थापन
काढणीस तयार असलेल्या आंबा फळांची
काढणी लवकरात लवकर करून घ्यावी व काढणी केलेली फळे सुरक्षित ठिकाणी ठेवावी. तूरळक
ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची तसेच तुरळक ठिकाणी गारपीटीची शक्यता असल्यामूळे नविन लागवड केलेल्या व
लहान आंबा झाडांना काठीने आधार द्यावा. वादळी वारा,
पाऊस व गारपीट झालेल्या फळबागेत पडलेली फळे गोळा करून नष्ट करावीत तसेच मोडलेल्या
फांद्यांची छाटणी करावी. बागेत रोगाचा प्रादूर्भाव होऊ नये म्हणून मॅन्कोझेब 25
ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून संरक्षणात्मक फवारणी घ्यावी. तूरळक ठिकाणी वादळी
वाऱ्यासह पावसाची तसेच तुरळक ठिकाणी गारपीटीची शक्यता असल्यामूळे नविन लागवड केलेल्या व लहान केळी झाडांना
काठीने आधार द्यावा. काढणीस तयार असलेल्या केळीच्या घडांची काढणी
लवकरात लवकर करून घ्यावी. वादळी वारा, पाऊस व गारपीट झालेल्या फळबागेत पडलेली फळे
गोळा करून नष्ट करावीत. मोडलेली झाडे बागेबाहेर काढावी. बागेत रोगाचा प्रादूर्भाव
होऊ नये म्हणून मॅन्कोझेब 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून संरक्षणात्मक
फवारणी घ्यावी. तूरळक ठिकाणी सतत होत असलेल्या पाऊस व गारपीटीमूळे द्राक्ष बागेत
रोगाचा प्रादूर्भाव होण्याची शक्यता आहे, एप्रिल छाटणी झालेल्या द्राक्ष
बागांमध्ये 1% बोर्डो मिश्रणाच्या एक किंवा दोन फवारण्या कराव्यात. जेणेकरून रोगाचा
प्रादूर्भाव टाळण्यास मदत होईल. तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची तसेच तुरळक
ठिकाणी गारपीटीची शक्यता असल्यामूळे काढणीस तयार असलेल्या डाळींब फळांची लवकरात लवकर काढणी
करून घ्यावी व काढणी केलेली फळे सुरक्षित ठिकाणी ठेवावी. वादळी वारा, पाऊस व
गारपीट झालेल्या फळबागेत सर्व नुकसानग्रस्त फळे काढून, तुटलेल्या आणि चिरलेल्या
फांद्या छाटाव्यात आणि बागेबाहेर खड्डयामध्ये कुजण्यासाठी टाकाव्यात. छाटलेल्या
फांद्यांवर व खोडावर 10 % बोर्डो पेस्ट लावावी. त्यानंतर 1%
बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी. खतांचा हलका डोस देऊन बागेला
विश्रांती अवस्थेत ठेवावे व पुढच्या बहाराची तयारी करावी. गारपीट व पावसामूळे ईजा
झालेल्या फळांची काढणी करावी आणि फळे कुजलेली दिसत नसल्यास त्यांची तत्काळ विक्री
करावी. चिरलेली व नुकसानग्रस्त फळे एकत्रित करून कंपोस्ट खड्डयात टाकावीत.
फळांच्या काढणीपूर्वी बोरीक ॲसिड 2 ग्रॅम प्रति लिटरची संरक्षणात्मक फवारणी घ्यावी
जेणेकरून ईजा झालेल्या फळांमध्ये कुज टाळण्यास मदत होईल. वादळी वारा, पाऊस व गारपीट झालेल्या अंबे बहार
धरलेल्या संत्रा/मोसंबी बागेत पडलेली फळे गोळा करून नष्ट करावीत तसेच मोडलेल्या
फांद्यांची छाटणी करावी. बागेत रोगाचा प्रादूर्भाव होऊ नये म्हणून मॅन्कोझेब 25
ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून संरक्षणात्मक फवारणी घ्यावी. मृग बहार
व्यवस्थापनासाठी संत्रा/मोसंबी बागेस ताण देण्यासाठी पाणी देणे बंद करावे व खोडास
बोर्डो पेस्ट लावावी. नविन लागवड केलेल्या व लहान संत्रा/मोसंबी झाडांना काठीने
आधार द्यावा.
चारा पीके
तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची
तसेच तुरळक ठिकाणी गारपीटीची शक्यता असल्यामूळे काढणी केलेला ज्वारीचा कडबा
सुरक्षित ठिकाणी साठवावा किंवा तो गोळा करून ताडपत्रीने झाकून ठेवावा.
भाजीपाला
तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची
तसेच तुरळक ठिकाणी गारपीटीची शक्यता असल्यामूळे काढणीस तयार असलेल्या भाजीपाला,
कांदा, टोमॅटो, टरबूज, खरबूज पिकाची काढणी लवकरात लवकर करून घ्यावी. नविन लागवड
केलेल्या व लहान वेलवर्गीय झाडांना काठीने आधार द्यावा. वादळी वारा, पाऊस व गारपीट
झालेल्या ठिकाणी प्रादूर्भाव ग्रस्त भाजीपाला पिके, टरबूज, खरबूज गोळा करून नष्ट
करावीत. भाजीपाला पिकात रोगाचा प्रादूर्भाव होऊ नये म्हणून मॅन्कोझेब 25 ग्रॅम
प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून संरक्षणात्मक फवारणी घ्यावी.
फुलशेती
तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची
तसेच तूरळक ठिकाणी गारपीटीची शक्यता असल्यामूळे काढणीस तयार असलेल्या फुल पिकाची
काढणी लवकरात लवकर करून घ्यावी. नविन लागवड केलेल्या व लहान फुल झाडांना काठीने
आधार द्यावा. फुल पिकास आवश्यकतेनूसार व जमिनीतील ओलाव्यानूसार पाणी द्यावे.
पशुधन व्यवस्थापन
तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची
तसेच तुरळक ठिकाणी गारपीटीची शक्यता असल्यामूळे चेतावनीच्या काळात जनावरे शक्यतो
चरावयास बाहेर नेऊ नयेत. जनावरांना उघडयावर सोडू किंवा बांधू नये, निवाऱ्याच्या
ठिकाणी बांधावे व पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्यावी. पशुधनास खुले पाणी तलाव
किंवा नदीपासून दुर ठेवावे, ट्रॅकटर आणि इतर धातुंच्या शेती अवजारांपासून दूर
ठेवावे व पशुधनास झाडाखाली जमा होऊ देऊ नये, तसेच पाऊस चालू होण्याच्या वेळी
झाडाच्या आडोश्याला थांबू नये.
कुक्कुट पालन
तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची
तसेच तुरळक ठिकाणी गारपीटीची शक्यता असल्यामूळे कोंबडया व लहान पिल्ले सुरक्षित
ठिकाणी ठेवावेत.
सौजन्य
मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 09/
2023 - 2024 मंगळवार,
दिनांक –
02.05.2023
No comments:
Post a Comment