प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील चोविस तासात कमाल तापमानात हळूहळू 1 ते 2 अं.से. ने घट होऊन, त्यानंतर पुढील चार दिवसात कमाल तापमानात हळूहळू 2 ते 3 अं.से. ने. वाढ होण्याची शक्यता आहे.
मराठवाडयात दिनांक 19 ते 21 मे 2023 दरम्यान कमाल
तापमान सराएवढे ते सरापेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.
सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या
बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे तर
जमिनीतील ओलाव्याचे प्रमाण कमी झालेले आहे.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापिठाच्या 51 व्या वर्धापन दिनानिमित्त
दिनांक 18 मे 2023 रोजी सकाळी 11:00 वाजता सूवर्ण जयंती दिक्षांत सभागृह, विद्यार्थी कल्याण अधिकारी
कार्यालयाजवळ, वनामकृवि, परभणी येथे खरीप पीक परिसंवाद आयोजन करण्यात आला आहे तरी
सर्व शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा.
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस)
मराठवाड्यात दिनांक 21 ते 27 मे 2023 दरम्यान कमाल तापमान
सरासरीपेक्षा कमी, किमान
तापमान सरासरीएवढे व पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.
वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि
सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
वेळेवर
लागवड केलेल्या व काढणीस तयार असलेल्या उन्हाळी भुईमूग पिकाची काढणी करून घ्यावी.
उशीरा लागवड केलेल्या उन्हाळी भुईमूग पिकाला पाण्याचा ताण बसणार नाही याची काळजी
घ्यावी. पिकाच्या आवश्यकतेनुसार व उपलब्धतेनुसार पिकाला सकाळी लवकर किंवा
सायंकाळी पाणी व्यवस्थापन करावे. हळद उकडणे, वाळवणे, पॉलिश करणे ही कामे करून
घ्यावीत.
फळबागेचे व्यवस्थापन
नवीन
लागवड केलेल्या व लहान झाडांना उन्हापासून संरक्षनासाठी सावली करावी यामुळे
कलमांची मर होणार नाही तसेच बागेत खोडाजवळ
आच्छादन करावे. केळी बागेला पाण्याचा ताण बसणार नाही याची काळजी घ्यावी. केळी
बागेत ठिंबक सिंचन पद्धतीने सकाळी लवकर किंवा सायंकाळी पाणी व्यवस्थापन करावे. नविन
लागवड केलेल्या आंबा, सीताफळ, बागेला पाण्याचा
ताण बसणार नाही याची काळजी घ्यावी. नविन लागवड केलेल्या आंबा बागेत ठिंबक
सिंचन पद्धतीने सकाळी लवकर किंवा सायंकाळी पाणी व्यवस्थापन करावे. नवीन लागवड
केलेल्या व लहान झाडांना उन्हापासून संरक्षनासाठी सावली करावी तसेच बागेत खोडाजवळ आच्छादन करावे. द्राक्ष बागेमध्ये
एप्रिल छाटणी ही घड निर्मितीसाठी केली जाते. द्राक्ष बागेत एप्रिल छाटणी केली नसल्यास लवकरात लवकर पूर्ण करावी. सीताफळ बागेत ठिंबक सिंचन पद्धतीने सकाळी लवकर
किंवा सायंकाळी पाणी व्यवस्थापन करावे. नवीन लागवड केलेल्या व लहान झाडांना
उन्हापासून संरक्षणासाठी सावली करावी तसेच बागेत खोडाजवळ आच्छादन करावे.
भाजीपाला
भाजीपाला
पिकात पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. भाजीपाला पिकास आवश्यकतेनुसार
सकाळी किंवा सायंकाळी सुक्ष्म सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या
भाजीपाला, टरबूज व खरबूज पिकाची काढणी सकाळी लवकर करावी.
फुलशेती
फुल पिकास
पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. फुल पिकास आवश्यकतेनुसार सकाळी किंवा
सायंकाळी सुक्ष्म सिंचन पध्दतीने पाणी द्यावे.
काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी सकाळी लवकर करावी.
पशुधन व्यवस्थापन
जनावरांना
सावलीत बांधावे आणि पिण्यासाठी थंड व स्वच्छ पाण्याचा पूरवठा करावा. पशुधनाकडून सकाळी
11 ते दूपारी 4 यादरम्यान काम करून घेऊ नये. उष्णतेपासून पशूधनाचे संरक्षण करण्यासाठी
गोठ्याच्या छतावर गवताचे आच्छादन करावे. पशुधनाचे शेड पत्र्याचे किंवा सिमेंटचे असल्यास
त्याला पांढरा रंग द्यावा. पशुधनास मूबलक प्रमाणात हिरवा चारा, प्रथिनेयूक्त, खनिजमिश्रण
आणि मिठयूक्त खाद्य द्यावे. तिव्र उष्णतेच्या काळात पशुधनाच्या अंगावर पाणी शिंपडावे किंवा त्यांना पाणोठ्यावर न्यावे. पशुधनास
सकाळी किंवा सायंकाळी चारावयास सोडावे.
सामुदायिक विज्ञान
संग्रहीत
कपडे नेहमी वर्तमानपत्रात गुंडाळून ठेवावे. वर्तमान पत्राच्या शाईमूळे कपडयांना
कसर लागत नाही.
कृषि अभियांत्रिकी
रब्बी
पिकांची काढणी झाल्यानंतर शेतात लवकरात लवकर खोल नांगरणी करून घ्यावी. त्यामूळे
जमिन तापन्यास मदत होऊन किडींचे कोष व घातक बूरशीचा नायनाट होईल. शेतकऱ्यांनी
आपल्या शेतामधील मातीचे माती परिक्षण करून घ्यावे.
सौजन्य
मुख्य प्रकल्प
समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम
सेवा,वसंतराव नाईक
मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला
पत्रक क्रमांक – 13/ 2023 - 2024 मंगळवार, दिनांक – 16.05.2023
No comments:
Post a Comment