Friday, 16 June 2023

दिनांक 17 जून रोजी उस्मानाबाद, लातूर व नांदेड जिल्हयात तर दिनांक 18 जून रोजी उस्मानाबाद, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली जिल्हयात तर दिनांक 19 जून रोजी औरंगाबाद,जालना, बीड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील चार ते पाच दिवसात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही. दिनांक 17 जून रोजी उस्मानाबाद, लातूर व नांदेड जिल्हयात तर दिनांक 18 जून रोजी उस्मानाबाद, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली जिल्हयात तर दिनांक 19 जून रोजी औरंगाबाद,जालना, बीड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

मराठवाडयात दिनांक 16 ते 22 जून 2023 दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी व दिनांक 23 ते 29 जून 2023 दरम्यान पाऊस सरासरीएवढा ते सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार मराठवाडयात बाष्पोत्सर्जनाचा वेग किंचित वाढलेला आहे तर जमिनीतील ओलावा किंचित वाढलेला आहे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 21 ते 27 जून 2023 दरम्यान कमाल तापमान सरासरीपेक्षा जास्त व किमान तापमान सरासरीएवढे व पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.

अद्याप मराठवाड्यात मान्सूनचे आगमन झाले नसून दिनांक 16 ते 22 जून, 2023 दरम्यान तूरळक ठिकाणी मान्सून पूर्व हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यामूळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

सोयाबीनची पेरणी 45X5 सें.मी. अंतरावर व 2.5 ते 3.0 सें.मी. खोलीवर करता येते. सोयाबीन पेरणीसाठी हेक्टरी 65 किलो बियाणे वापरावे. सोयाबीनची पेरणी 15 जुलै पर्यंत करता येते. सोयाबीन पिकाची पेरणी शक्यतो बी.बी.एफ (रूंद वरंबा सरी) पध्दतीने करावी ज्यामूळे मातीतील ओलावा व जमिनीची सुपिकता टिकून राहण्यास मदत होऊन अधिक उत्पादन मिळते.  खरीप ज्वारीच्या पेरणीसाठी दोन ओळीमध्ये 45 सें.मी., दोन झाडातील अंतर 12.5 सें.मी. ठेवावे व पेरणी 3 ते 4 सें.मी. खोलीवर करता येते. पेरणीसाठी हेक्टरी 7.5 किलो संकरित व 10 किलो सुधारीत वाणांचे बियाणे वापरावे. खरीप ज्वारीची पेरणी जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत करता येते. बाजरीची पेरणी 45X15 सें.मी. अंतरावर करता येते. पेरणी करतांना 4 सें.मी. पेक्षा जास्त खोल पेरू नये. बाजरी पेरणीसाठी हेक्टरी 3 ते 4 किलो बियाणे वापरावे. बाजरीची पेरणी 15 जुलै पर्यंत करता येते. ऊस पिकास पाण्याचा ताण बसणार नाही याची काळजी घ्यावी. ऊस पिकास सकाळी लवकर किंवा सायंकाळी पाणी व्यवस्थापन करावे. सुरू ऊसाची पक्की बांधणी केली नसल्यास ती करन घ्यावी व पक्की बांधणी करतांना 100 किलो नत्र, 55 किलो स्फुरद व 55 किलो पालाश प्रति हेक्टरी रासायनिक खतांची मात्रा द्यावी.  पाण्याची उपलब्धता असल्यास हळद पिकाची लागवड लवकरात लवकर करून घ्यावी. लागवडीस उशीर झाल्यास उत्पादनात घट येऊ शकते. हळदीमध्ये आंतरपीके घेताना पहिल्या तीन ते साडेतीन महिन्यापर्यंत काढणी होईल अशा प्रकारची आंतरपीके निवडावीत. यामध्ये पालेभाज्या सारख्या आंतरपिकांचा समावेश असावा.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

नवीन संत्रा/मोसंबी,डाळींब व चिकू लागवडीसाठी पूर्व तयारीची कामे केली नसल्यास लवकरात लवकर ती पूर्ण करून घ्यावीत. लागवडीसाठी शासकीय नोंदणीकृत रोपवाटीकेतूनच रोपांची खरेदी करावी. संत्रा/मोसंबी,डाळींब व चिकू बागेला पाण्याचा ताण बसणार नाही याची काळजी घ्यावी. संत्रा/मोसंबी,डाळींब व चिकू बागेत ठिंबक सिंचन पद्धतीने सकाळी लवकर किंवा सायंकाळी पाणी व्यवस्थापन करावे.

चारा पीके

मका या चारापिकाची पेरणी 30X45 सेंमी अंतरावर करावी. पेरणीसाठी प्रति हेक्टरी 40 ते 45 किलो बियाणे वापरावे.

भाजीपाला

बी टाकलेल्या गादी वाफ्यावर वेळोवेळी आवश्यकतेनूसार झाऱ्याच्या साहाय्याने पाणी द्यावे. वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यामुळे, काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची लवकरात लवकर काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. भाजीपाला पिकाच्या लहान झाडांना आधार द्यावा.

फुलशेती

बी टाकलेल्या गादी वाफ्यावर वेळोवेळी आवश्यकतेनूसार झाऱ्याच्या साहाय्याने पाणी द्यावे. तुरळक ठिकाणी वादळी वारा, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक राहून (ताशी 30-40 किलोमिटर) पावसाची शक्यता असल्यामुळे, काढणीस तयार असलेल्‍या फुलपिकांची काढणी करून घ्यावी.

पशुधन व्यवस्थापन

वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यामुळे, जनावरांना उघडयावर सोडू किंवा बांधू नये. निवा-याच्‍या ठिकाणी बांधावे व पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्‍यावी. पशूधनास खुले पाणी, तलाव किंवा नदीपासून दूर ठेवावे, ट्रक्टर आणि इतर धातूंच्या शेती अवजारांपासून दूर ठेवावे व पशुधनास झाडाखाली जमा होऊ देऊ नये.तसेच पाऊस चालू होण्याच्या वेळी झाडाच्या आडोशाला थांबू नये.  

तुती रेशीम उद्योग

तुती लागवड केल्या नंतर दूसऱ्या वर्षात जून महिन्यात आठ ते दहा महिने वयाची झाडे बेणे म्हणून छाटणी करून विक्री करता येतात, किंवा स्वत:च लागवड क्षेत्र वाढवायचे असेल तर तुती रोप वाटीका तयार करण्यासाठी वापरता येईल. छाटणी जमिनीलगत न करता 1.25 फुट  उंचीवरून करावी म्हणजे नंतर येणाऱ्या 4 ते 5 फांद्या पासून वर्षभर व पुढील 2-3 वर्षाकरिता तुती पानाचे उत्पादन मिळेल. परिपक्व तुती पाने उत्पादनासाठी हे आवश्यक आहे. त्याचबरोबर उच्च प्रतिच्या तुती पाने उत्पादनासाठी शेणखत 20 मे.टन/हे./वर्ष म्हणजे 8 टन प्रति एकर दोन समान हप्त्यात 4 टन जून व 4 टन नोव्हेंबर महिन्यात द्यावा. किंवा 5 टन गांडूळ खत / हेक्टरी म्हणजे 2 टन/प्रति एकर दोन समान हप्त्यात जुन व नोव्हेंबर महिन्यात तुती बागेस द्यावा.

सामुदायिक विज्ञान

उन्हाळ्यात शेतात काम करतांना डोक्याला संरक्षण देण्याच्या दृष्टीने सुती कपडाचा रूमाल किंवा गमछा गुंडाळणे गरजेचे असते.

ईतर

शंखी गोगलगायीच्या व्यवस्थापनासाठी हंगामातील पहिला पाऊस पडल्यानंतर सर्व शेतकऱ्यांनी सामूहिक रित्या मोहिम राबवून गोगलगायी गोळा करून प्लास्टीकच्या पोत्यात भरून त्यात कोरडे मिठ अथवा चूना टाकून नष्ट कराव्यात.

 

सौजन्‍य

मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक22/2023 - 2024      शुक्रवार, दिनांक – 16.06.2023

 


No comments:

Post a Comment

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 18 जून रोजी छत्रपती संभाजी नगर व जालना जिल्हयात, दिनांक 19 जून रोजी नांदेड, परभणी, हिंगोली, छत्रपती संभाजी नगर व जालना जिल्हयात, दिनांक 20 जून रोजी नांदेड, परभणी व हिंगोली जिल्हयात, तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 40 ते 50 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक 17 ते 21 जून रोजी तूरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील तीन ते चार दिवसात कमाल व किमान तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही.

  हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या अ...