Friday, 28 July 2023
प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 28 जूलै रोजी उसमानाबाद, परभणी, हिंगोली व लातूर जिल्हयात तर दिनांक 31 जूलै रोजी नांदेड व हिंगोली जिल्हयात तर 01 ऑगस्ट रोजी नांदेड, हिंगोली, परभणी जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 28 जुलै रोजी नांदेड जिल्हयात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक 28 जुलै रोजी बहुतांश ठिकाणी व दिनांक 29 जुलै रोजी बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 30 व 31 जुलै रोजी काही ठिकाणी व 01 ऑगस्ट रोजी बऱ्याच ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 28 जूलै रोजी उसमानाबाद, परभणी, हिंगोली व लातूर जिल्हयात तर दिनांक 31 जूलै रोजी नांदेड व हिंगोली जिल्हयात तर 01 ऑगस्ट रोजी नांदेड, हिंगोली, परभणी जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 28 जुलै रोजी नांदेड जिल्हयात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे.
मराठवाडयात दिनांक 28 जुलै रोजी
बहुतांश ठिकाणी व दिनांक 29 जुलै रोजी बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या
पावसाची शक्यता आहे. दिनांक 30 व 31 जुलै रोजी काही ठिकाणी व 01 ऑगस्ट रोजी बऱ्याच
ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात
दिनांक 28 जूलै ते 03 ऑगस्ट 2023 दरम्यान पाऊस सरासरीएवढा ते सरासरीपेक्षा जास्त व दिनांक 04
ते 10 ऑगस्ट
दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.
सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या
बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा
दर कमी झालेला आहे तर जमिनीतील ओलाव्याचे प्रमाण वाढलेले आहे.
पेरणी न झालेल्या ठिकाणी पेरणी
योग्य पाऊस (75 ते 100 मिमी)
झाला असल्यास सूर्यफुल, तूर, संकरीत बाजरी, सोयाबीन + तूर (4:2), बाजरी + तूर
(3:3), एरंडी, कारळ आणि तिळ, एरंडी + धने, एरंडी + तूर ही पिके घ्यावीत.
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस)
मराठवाड्यात दिनांक 02 ते 08 ऑगस्ट 2023 दरम्यान कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान
तापमान सरासरीएवढे व पाऊस सरासरीपेक्षा
कमी राहण्याची शक्यता आहे.
पुढील पावसाचा अंदाज लक्षात घेता
शेतकऱ्यांनी खत देणे किंवा फवारणी करणे टाळावे.
वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण
कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि
सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
मागील काही दिवसात झालेला पाऊस, जास्त पाऊस झालेल्या भागातील
सोयाबीन, खरीप ज्वारी, बाजरी, ऊस व हळद पिकात वापसा स्थिती निर्माण होण्यासाठी
शेतात अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते शेताबाहेर काढण्याची व्यवस्था करावी. सोयाबीन
पिकामध्ये शंखी गोगलगायीच्या व्यवस्थापनासाठी सर्व शेतकऱ्यांनी सामूहिक रित्या
मोहिम राबवून गोगलगायी गोळा करून प्लास्टीकच्या पोत्यात भरून त्यात कोरडे मिठ अथवा
चूना टाकून नष्ट कराव्यात किंवा पावसाची उघाड बघून दाणेदार मेटाल्डिहाईड 2 किलो
प्रति एकर या प्रमाणात शेतात पसरून द्यावे. सोयाबीन पिकात जमिनीत वापसा असतांना
अंतरमशागतीची कामे करून पिक तण विरहीत ठेवावे. तणांच्या व्यवस्थापनासाठी सोयाबीन
पिकात 20 दिवस झाले असल्यास इमॅझोमॅक्स 35% + इमीझीथीपायर 35% 2 ग्रॅम
प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारवे. पेरणी न झालेल्या भागात
पेरणी योग्य पाऊस (75 ते 100 मिमी) झाला असल्यास जमिनीत वापसा येताच सोयाबीन + तूर
(4:2) या अंतरपिक पध्दतीचा अवलंब करावा.
फळबागेचे व्यवस्थापन
मागील काही दिवसात झालेला पाऊस, जास्त
पाऊस झालेल्या भागातील संत्रा/मोसंबी,
डाळींब व चिकू बागेत अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते बागेबाहेर काढण्याची व्यवस्था
करावी. फळ बागेत शंखी गोगलगायीच्या व्यवस्थापनासाठी सर्व शेतकऱ्यांनी सामूहिक
रित्या मोहिम राबवून गोगलगायी गोळा करून प्लास्टीकच्या पोत्यात भरून त्यात कोरडे
मिठ अथवा चूना टाकून नष्ट कराव्यात किंवा पावसाची उघाड बघून झाडाखाली दाणेदार
मेटाल्डिहाईड प्रति झाड 100 ग्रॅम पसरून टाकावे. संत्रा/मोसंबी, डाळींब व चिकू
बागेत जमिनीत वापसा असतांना अंतरमशागतीची कामे करून बाग तण विरहीत ठेवावी.
भाजीपाला
मागील काही दिवसात झालेला पाऊस, जास्त
पाऊस झालेल्या भागात भाजीपाला पिकात साचलेले अतिरिक्त पाणी शेताबाहेर काढण्याची
व्यवस्था करावी. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी. भाजीपाला पिकात
जमिनीत वापसा असतांना अंतरमशागतीची कामे करून पिक तण विरहीत ठेवावे. भाजीपाला
पिकामध्ये शंखी गोगलगायीच्या व्यवस्थापनासाठी सर्व शेतकऱ्यांनी सामूहिक रित्या
मोहिम राबवून गोगलगायी गोळा करून प्लास्टीकच्या पोत्यात भरून त्यात कोरडे मिठ अथवा
चूना टाकून नष्ट कराव्यात किंवा पावसाची उघाड बघून दाणेदार मेटाल्डिहाईड 2 किलो
प्रति एकर या प्रमाणात शेतात पसरून द्यावे.
फुलशेती
मागील काही दिवसात झालेला पाऊस, जास्त
पाऊस झालेल्या भागातील फुल पिकात अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते
शेताबाहेर काढण्याची व्यवस्था करावी. काढणीस तयार असलेल्या फुल
पिकांची काढणी करून घ्यावी. फुल पिकात जमिनीत वापसा असतांना अंतरमशागतीची कामे
करून पिक तण विरहीत ठेवावे.
चारा पिके
मागील काही दिवसात झालेला पाऊस, जास्त
पाऊस झालेल्या भागातील चारा पिकात वापसा स्थिती निर्माण होण्यासाठी शेतात अतिरिक्त
पाणी साचले असल्यास ते शेताबाहेर काढण्याची व्यवस्था करावी. चारा पिकात जमिनीत वापसा असतांना अंतरमशागतीची
कामे करून पिक तण विरहीत ठेवावे.
तुती रेशीम उद्योग
ढगाळ हवामानात पाऊस झाला तर रेशीम किटक
संगोनपनगृहात 99 टक्के आर्द्रता राहते. अशा वेळी तुती पाने खाद्य द्यायला हरकत
नाही पण सोबत माती किंवा धुळ जाणर नाही याची काळजी घ्यावी. अशा वेळेस कोष काढणी
करायची असेल तर संगोपन गृहात हवा खेळती 1 मी/सेकंदाच्या प्रमाणात राहणे आवश्यक
असून कोष सुकण्यासाठी आवश्यक आहे. संगोपन गृहात झरोखे (ढक्झास्ट फॅन) असतील तर ते
चालू करावेत. कोष काढणीच्या वेळी एक कोष निमुळत्या बाजूने कापून लाल रंगाचा झाला
आहे याची खात्री करून कोष काढणी करावी. काढलेले कोष ढिग स्वरूपात न साठवता रॅक
किंवा प्लास्टीक ट्रे मध्ये पसरून ठेवावेत. बाजारात नेताना सच्छिद्र गोणपाट किंवा
कांद्याच्या बारदाण्यात कोष हवेशिर स्थलांतरित करावेत. कोषाच्या आत जास्त पाण्यात
प्रमाण किंवा जास्त आर्द्रता राहिली तर कोषाला बाजार पेठेत जाई पर्यंत पाणी
सुटण्याची भीती असते व भाव कमी लागतो. रेशीम धाग्याची प्रत खराब होते.
पशुधन
व्यवस्थापन
पावसामूळे चरण्यासाठी गवत सर्वत्र
उपलब्ध होत आहे. कोवळे गवत प्रमाणापेक्षा जास्त खाल्ल्यामूळे रवंथ करणाऱ्या
पशुधनामध्ये “पोटफुगी” संभवते. यासाठी टरपेंटाईन तेल 50 मिली + गोडतेल 200 मिली
गाय व म्हशींमध्ये तोंडाद्वारे पाजावे. शेळी व मेंढीमध्ये याचे प्रमाण 25 मिली + 100 मिली एवढे असावे.
सामुदायिक
विज्ञान
पावसाळयामध्ये पाणी दूषित झालेले असते.
अशा पाण्याचा वापर केल्याने, अतिसार, उलटया, गॅस्ट्रो, कावीळ, टायफाईड असे आजार
होण्याची शक्यता असते. त्यामूळे असे घातक आजार टाळण्यासाठी पिण्याच्या पाण्यात
तूरटी फिरवून पाणी उकळून, गाळून आणि थंड करून त्याचा वापर करावा.
ईतर
शंखी गोगलगायीच्या व्यवस्थापनासाठी पाऊस
पडल्यानंतर सर्व शेतकऱ्यांनी सामूहिक रित्या मोहिम राबवून गोगलगायी गोळा करून
प्लास्टीकच्या पोत्यात भरून त्यात कोरडे मिठ अथवा चूना टाकून नष्ट कराव्यात. कापूस
व सोयाबीन या सारख्या पिकामध्ये शंखी गोगलगायीच्या व्यवस्थापनासाठी पावसाची उघाड
बघून दाणेदार मेटाल्डिहाईड 2 किलो प्रति एकर या प्रमाणात शेतात पसरून द्यावे.
केळी, आंबा, द्राक्ष व सिताफळ बागेत शंखी गोगलगायीच्या व्यवस्थापनासाठी पावसाची
उघाड बघून झाडाखाली दाणेदार मेटाल्डिहाईड प्रति झाड 100 ग्रॅम पसरून टाकावे.
सौजन्य
मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक
मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 34/2023 - 2024 शुक्रवार, दिनांक – 28.07.2023
विस्तारीत
अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 07 ते 13 जूलै 2023 दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त व
दिनांक 14 ते 20 जूलै दरम्यान पाऊस सरासरीएवढा
राहण्याची शक्यता आहे.
Tuesday, 25 July 2023
प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 25 जूलै रोजी उस्मानाबाद, लातूर, नांदेड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची तर हिंगोली, परभणी, औरंगाबाद, जालना, बीड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 26 जुलै रोजी नांदेड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार ते खूप मुसळधार पावसाची तर हिंगोली, परभणी, लातूर, उस्मानाबाद जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची तर औरंगाबाद, जालना व बीड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 27 जूलै रोजी नांदेड, लातूर, हिंगोली जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक 25 व 26 जुलै रोजी बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची तर दिनांक 27 व 28 जुलै रोजी बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची तर दिनांक 29 ते 31 जुलै दरम्यान काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील चार ते पाच दिवसात कमाल तापमानात फारशी
तफावत जाणवणार नाही. दिनांक 25 जूलै
रोजी उस्मानाबाद, लातूर, नांदेड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार
पावसाची तर हिंगोली, परभणी, औरंगाबाद, जालना, बीड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी
वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 26 जुलै रोजी
नांदेड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार ते खूप मुसळधार पावसाची तर
हिंगोली, परभणी, लातूर, उस्मानाबाद जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार
पावसाची तर औरंगाबाद, जालना व बीड
जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता
आहे. दिनांक 27 जूलै रोजी नांदेड, लातूर, हिंगोली जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी
वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
मराठवाडयात दिनांक 25 व 26 जुलै रोजी बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या
पावसाची तर दिनांक 27 व 28 जुलै रोजी बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या
पावसाची तर दिनांक 29 ते 31 जुलै दरम्यान काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या
पावसाची शक्यता आहे.
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात
दिनांक 28 जूलै ते 04
ऑगस्ट दरम्यान पाऊस
सरासरीएवढा ते सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस)
मराठवाड्यात दिनांक 30 जूलै ते 05 ऑगस्ट 2023
दरम्यान कमाल तापमान, किमान तापमान व पाऊस सरासरीएवढा राहण्याची शक्यता आहे.
सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या
बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा
वेग कमी झालेला आहे तर जमिनीतील ओलाव्याचे प्रमाण वाढलेले आहे.
पेरणी न झालेल्या ठिकाणी पेरणी
योग्य पाऊस (75 ते 100 मिमी)
झाल्यास सूर्यफुल, तूर, संकरीत बाजरी, सोयाबीन + तूर (4:2), बाजरी + तूर (3:3),
एरंडी, कारळ आणि तिळ, एरंडी + धने, एरंडी + तूर ही पिके घ्यावीत.
पुढील पावसाचा अंदाज लक्षात घेता
शेतकऱ्यांनी खत देणे किंवा फवारणी करणे टाळावे.
वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण
कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि
सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
मागील
काही दिवसात झालेला पाऊस व पुढील पावसाच्या अंदाजानूसार, जास्त पाऊस झालेल्या
भागातील कापूस, तूर, मुग/उडीद, भुईमूग व मका पिकात वापसा स्थिती निर्माण
होण्यासाठी शेतात अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते शेताबाहेर काढण्याची व्यवस्था
करावी. शंखी गोगलगायीच्या व्यवस्थापनासाठी पाऊस पडल्यानंतर सर्व शेतकऱ्यांनी
सामूहिक रित्या मोहिम राबवून गोगलगायी गोळा करून प्लास्टीकच्या पोत्यात भरून त्यात
कोरडे मिठ अथवा चूना टाकून नष्ट कराव्यात
फळबागेचे व्यवस्थापन
मागील
काही दिवसात झालेला पाऊस व पुढील पावसाच्या अंदाजानूसार, जास्त पाऊस झालेल्या
भागातील केळी, आंबा, द्राक्ष व सिताफळ बागेत अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते
बागेबाहेर काढण्याची व्यवस्था करावी.
भाजीपाला
मागील
काही दिवसात झालेला पाऊस व पुढील पावसाच्या अंदाजानूसार, जास्त पाऊस झालेल्या
भागात भाजीपाला पिकात साचलेले अतिरिक्त पाणी शेताबाहेर काढण्याची व्यवस्था करावी. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी.
फुलशेती
मागील
काही दिवसात झालेला पाऊस व पुढील पावसाच्या अंदाजानूसार, जास्त पाऊस झालेल्या
भागातील फुल पिकात
अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते शेताबाहेर काढण्याची
व्यवस्था करावी.
पशुधन व्यवस्थापन
तूरळक
ठिकाणी वादळी वाऱ्यासह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता असल्यामूळे, जनावरांना
उघडयावर सोडू किंवा बांधू नये. निवा-याच्या ठिकाणी
बांधावे व पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्यावी. पावसाचे वाहत येणारे पाणी जनावरांच्या
पिण्याच्या पाण्यामध्ये मिसळू देऊ नये. जनावरांना पिण्यास शुध्द व स्वच्द पाणी
द्यावे. पावसामूळे चरण्यासाठी गवत सर्वत्र उपलब्ध होत आहे. गवत प्रमाणापेक्षा
जास्त खाल्ल्यामूळे रवंथ करणाऱ्या पशुधनामध्ये “पोटफुगी” संभवते. यासाठी टरपेंटाईन
तेल 50 मिली + गोडतेल 200 मिली गाय व म्हशींमध्ये तोंडाद्वारे पाजावे. शेळी व
मेंढीमध्ये याचे प्रमाण 25 मिली + 100
मिली एवढे असावे.
सामुदायिक विज्ञान
पावसाळयामध्ये
पाणी दूषित झालेले असते. अशा पाण्याचा वापर केल्याने, अतिसार, उलटया, गॅस्ट्रो,
कावीळ, टायफाईड असे आजार होण्याची शक्यता असते. त्यामूळे असे घातक आजार
टाळण्यासाठी पिण्याच्या पाण्यात तूरटी फिरवून पाणी उकळून, गाळून आणि थंड करून
त्याचा वापर करावा.
ईतर
शंखी
गोगलगायीच्या व्यवस्थापनासाठी पाऊस पडल्यानंतर सर्व शेतकऱ्यांनी सामूहिक रित्या
मोहिम राबवून गोगलगायी गोळा करून प्लास्टीकच्या पोत्यात भरून त्यात कोरडे मिठ अथवा
चूना टाकून नष्ट कराव्यात.
सौजन्य
मुख्य प्रकल्प
समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम
सेवा,वसंतराव नाईक
मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला
पत्रक क्रमांक – 33/ 2023 - 2024 मंगळवार, दिनांक – 25.07.2023
Friday, 21 July 2023
प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 21 जूलै रोजी नांदेड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार ते खूप मुसळधार पावसाची तर हिंगोली व परभणी जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची तर औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद व लातूर जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 22 जुलै रोजी औरंगाबाद व जालना जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची तर बीड व परभणी जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 23 जूलै रोजी नांदेड, हिंगोली व परभणी तसेच दिनांक 24 जूलै रोजी नांदेड, हिंगोली, परभणी व लातूर जिल्हयात तर दिनांक 25 जुलै रोजी नांदेड व लातूर जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक 21 व 22 जुलै रोजी बहुतांश ठिकाणी, दिनांक 23 ते 27 जुलै दरम्यान बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे.
प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 21 जूलै रोजी नांदेड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार ते खूप मुसळधार पावसाची तर हिंगोली व परभणी जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची तर औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद व लातूर जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 22 जुलै रोजी औरंगाबाद व जालना जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची तर बीड व परभणी जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 23 जूलै रोजी नांदेड, हिंगोली व परभणी तसेच दिनांक 24 जूलै रोजी नांदेड, हिंगोली, परभणी व लातूर जिल्हयात तर दिनांक 25 जुलै रोजी नांदेड व लातूर जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
मराठवाडयात दिनांक 21 व 22 जुलै रोजी बहुतांश ठिकाणी, दिनांक 23 ते 27 जुलै दरम्यान
बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे.
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात
दिनांक 21 ते 27 जूलै 2023 दरम्यान व दिनांक 28 जूलै ते 04 ऑगस्ट दरम्यान पाऊस सरासरीएवढा
ते सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस)
मराठवाड्यात दिनांक 26 जूलै ते
01 ऑगस्ट 2023 दरम्यान कमाल व किमान तापमान
सरासरीएवढे व पाऊस सरासरीपेक्षा जास्त
राहण्याची शक्यता आहे.
सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या
बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा
दर कमी झालेला आहे तर जमिनीतील ओलाव्याचे प्रमाण वाढलेले आहे.
पुढील पावसाचा अंदाज लक्षात घेता
शेतकऱ्यांनी खत देणे किंवा फवारणी करणे टाळावे.
मराठवाडयात मागील 15 दिवसात ज्या तालूक्यात पेरणी योग्य पाऊस (75-100 मिमी) झाला नसल्यास (जालना
जिल्हा : बदनापूर ; बीड जिल्हा : धारूर, परळी वैजनाथ, पाटोदा, वडवणी)
शेतकऱ्यांनी दोन दिवसानंतर वापसा आल्यास पेरणी करावी.
पेरणी न झालेल्या ठिकाणी पेरणी
योग्य पाऊस (75 ते 100 मिमी)
झाला असल्यास सूर्यफुल, तूर, संकरीत बाजरी, सोयाबीन + तूर (4:2), बाजरी + तूर
(3:3), एरंडी, कारळ आणि तिळ, एरंडी + धने, एरंडी + तूर ही पिके घ्यावीत.
वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण
कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि
सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
मागील काही दिवसात झालेला पाऊस व पुढील
पावसाच्या अंदाजानूसार, जास्त पाऊस झालेल्या भागातील सोयाबीन, खरीप ज्वारी, बाजरी,
ऊस व हळद पिकात वापसा स्थिती निर्माण होण्यासाठी शेतात अतिरिक्त पाणी साचले
असल्यास ते शेताबाहेर काढण्याची व्यवस्था करावी. सोयाबीन पिकामध्ये शंखी
गोगलगायीच्या व्यवस्थापनासाठी दाणेदार मेटाल्डिहाईड 2 किलो प्रति एकर या प्रमाणात
शेतात पसरून द्यावे.
फळबागेचे व्यवस्थापन
मागील काही दिवसात झालेला पाऊस व पुढील
पावसाच्या अंदाजानूसार, जास्त पाऊस झालेल्या भागातील संत्रा/मोसंबी, डाळींब व चिकू बागेत अतिरिक्त
पाणी साचले असल्यास ते बागेबाहेर काढण्याची व्यवस्था करावी. फळ बागेत शंखी गोगलगायीच्या व्यवस्थापनासाठी
झाडाखाली दाणेदार मेटाल्डिहाईड प्रति झाड 100 ग्रॅम पसरून टाकावे.
भाजीपाला
मागील काही दिवसात झालेला पाऊस व पुढील
पावसाच्या अंदाजानूसार, जास्त पाऊस झालेल्या भागात भाजीपाला पिकात साचलेले
अतिरिक्त पाणी शेताबाहेर काढण्याची व्यवस्था करावी. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून
घ्यावी.
फुलशेती
मागील काही दिवसात झालेला पाऊस व पुढील
पावसाच्या अंदाजानूसार, जास्त पाऊस झालेल्या भागातील फुल पिकात अतिरिक्त
पाणी साचले असल्यास ते शेताबाहेर काढण्याची व्यवस्था करावी.
चारा पिके
मागील काही दिवसात झालेला पाऊस व पुढील
पावसाच्या अंदाजानूसार, जास्त पाऊस झालेल्या भागातील चारा पिकात वापसा स्थिती निर्माण
होण्यासाठी शेतात अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते शेताबाहेर काढण्याची व्यवस्था
करावी.
तुती रेशीम उद्योग
पावसाळयात ढगाळ हवामानात रेशीम कीटक
संगोपन ग्रहातील आर्द्रता 95 ते 99 टक्के पर्यंत राहते. अशा वेळी बाल्य तथा प्रोढ
कीटक संगोपन क्रहात अनुक्रमे तापमान 28 ते 26 अं.से. व आर्द्रता 85 ते 65 टक्के
च्या वर गेली तर ग्रासरी रोगाची व फ्लॅचरी रोगाची बाधा कीटकांना होते. त्यामूळे
संगोपन ग्रहात स्वच्छता राखणे, आजूबाजूला शेडनेटच्या दरवाजा तेथे 0.3 % चुना + 2% ब्लीचींग पावडर
द्रावण पाण्यात तयार करून शिंपडावे. संगोपन साहित्य ट्रे स्वच्छता जाळया, अच्छादन
जाळया 2% फॉर मॅलीन मध्ये निर्जंतूक करून कडक उन्हात वाळवून
पुन्हा वापराव्यात.
पशुधन
व्यवस्थापन
पावसाळयात ढगाळ व दमट वातावरणामूळे
बाह्य परोपजिवी उदा. माशा, पिसवा, डास यांचा प्रादूर्भाव वाढतो. याच्या
व्यवस्थापनासाठी पशुवैद्यकीय अधिकाऱ्याच्या साहाय्याने उपाययोजना कराव्यात.
तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मध्यम ते
मुसळधार पावसाची शक्यता असल्यामूळे, जनावरांना उघडयावर सोडू किंवा बांधू नये. निवा-याच्या ठिकाणी बांधावे व पावसात भिजणार
नाहीत याची काळजी घ्यावी.
सामुदायिक
विज्ञान
पावसाळयात पचनक्रिया मंदावल्याने
अन्नाचे पचन योग्य प्रकारे होत नाही.
यासाठी यासाठी पावसाळयात पचनास हलका, ताजा आणि
गरम आहार घ्यावा.
ईतर
शंखी गोगलगायीच्या व्यवस्थापनासाठी पाऊस
पडल्यानंतर सर्व शेतकऱ्यांनी सामूहिक रित्या मोहिम राबवून गोगलगायी गोळा करून
प्लास्टीकच्या पोत्यात भरून त्यात कोरडे मिठ अथवा चूना टाकून नष्ट कराव्यात. कापूस
व सोयाबीन या सारख्या पिकामध्ये शंखी गोगलगायीच्या व्यवस्थापनासाठी दाणेदार
मेटाल्डिहाईड 2 किलो प्रति एकर या प्रमाणात शेतात पसरून द्यावे. केळी, आंबा,
द्राक्ष व सिताफळ बागेत शंखी गोगलगायीच्या व्यवस्थापनासाठी झाडाखाली दाणेदार
मेटाल्डिहाईड प्रति झाड 100 ग्रॅम पसरून टाकावे.
सौजन्य
मुख्य प्रकल्प
समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम
सेवा,वसंतराव नाईक
मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 32/2023 - 2024 शुक्रवार, दिनांक – 21.07.2023
Tuesday, 18 July 2023
दिनांक 18 जूलै रोजी जालना, औरंगाबाद, उस्मानाबाद व बीड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे, तर नांदेड, परभणी, हिंगोली व लातूर जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. दिनांक 19 जूलै रोजी औरंगाबाद जिल्हयात तूरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक 18 व 19 जुलै रोजी बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची तर दिनांक 20 ते 24 जुलै रोजी बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील तीन ते चार दिवसात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही. दिनांक 18 जूलै रोजी जालना, औरंगाबाद, उस्मानाबाद व बीड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे, तर नांदेड, परभणी, हिंगोली व लातूर जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. दिनांक 19 जूलै रोजी औरंगाबाद जिल्हयात तूरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
मराठवाडयात दिनांक 18 व 19 जुलै रोजी बहुतांश
ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची तर दिनांक 20 ते 24 जुलै रोजी बऱ्याच ठिकाणी
हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात
दिनांक 21 ते 27 जूलै दरम्यान पाऊस
सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस)
मराठवाड्यात दिनांक 23 ते 29 जूलै 2023
दरम्यान कमाल तापमान सरासरी पेक्षा कमी, किमान तापमान सरासरीएवढे व पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहण्याची
शक्यता आहे.
सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या
बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा
वेग कमी झालेला आहे तर जमिनीतील ओलाव्याचे प्रमाण वाढलेले आहे.
मराठवाडयात मागील 16 दिवसात ज्या तालूक्यात पेरणी योग्य पाऊस (75-100 मिमी) झाला नसल्यास
(परभणी जिल्हा : गंगाखेड, सेलू ; जालना जिल्हा :
बदनापूर, मंठा ; हिंगोली जिल्हा : औंढा नागनाथ,हिंगोली ; बीड जिल्हा : धारूर, परळी वैजनाथ, पाटोदा, वडवणी)
शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये.
पेरणी न झालेल्या ठिकाणी पेरणी योग्य पाऊस (75 ते 100 मिमी) झाला असल्यास सूर्यफुल, तूर, संकरीत बाजरी, सोयाबीन + तूर (4:2), बाजरी + तूर (3:3), एरंडी, कारळ आणि तिळ, एरंडी + धने, एरंडी + तूर ही पिके घ्यावीत.
वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण
कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि
सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
पाऊस
झालेल्या ठिकाणी उगवून आलेल्या कापूस पिकात विरळणी व तूट भरून काढणे ही कामे करून
घ्यावीत. कापूस पिकामध्ये शंखी गोगलगायीच्या व्यवस्थापनासाठी दाणेदार मेटाल्डिहाईड
2 किलो प्रति एकर या प्रमाणात शेतात पसरून द्यावे. पाऊस झालेल्या ठिकाणी उगवून
आलेल्या तूर, मुग/उडीद, भूईमूग व मका पिकात
विरळणी व नांग्या भरणे ही कामे करून घ्यावीत.
ळबागेचे व्यवस्थापन
नवीन
केळी, आंबा, सिताफळ लागवडीसाठी शासकीय नोंदणीकृत रोपवाटीकेतूनच रोपांची खरेदी
करावी. केळी, आंबा, सिताफळ व द्राक्ष बागेत शंखी गोगलगायीच्या व्यवस्थापनासाठी
झाडाखाली दाणेदार मेटाल्डिहाईड प्रति झाड 100 ग्रॅम पसरून टाकावे. द्राक्ष बागेतील
फुटवे काढावेत. बागेत पानांची विरळणी करावी. बागेत आर्द्रता वाढणार नाही याची
दक्षता घ्यावी.
भाजीपाला
पाऊस
झालेल्या ठिकाणी जमिनीत ओलावा बघून बियाद्वारे लागवड केल्या जाणाऱ्या भाज्या उदा.
भेंडी, कारले, भोपळा, दोडका ईत्यादी भाजीपाला पिकांची लागवड करावी. गादीवाफ्यावर
तयार केलेल्या भाजीपाला पिकांच्या रोपांना 45 दिवस झाले असल्यास पाऊस झालेल्या
ठिकाणी जमिनीत ओलावा बघून भाजीपाला पिकांची (वांगी, मिरची, टोमॅटो इ.) पूर्नलागवड
करावी. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी.
फुलशेती
पाउस
झालेल्या ठिकाणी जमिनीत ओलावा असल्याची
खात्री करून फुल पिकाची पूर्नलागवड करावी.
काढणीस तयार असलेल्या फुलपिकाची काढणी करून घ्यावी.
पशुधन व्यवस्थापन
पावसाळयात
ढगाळ व दमट वातावरणामूळे बाह्य परोपजिवी उदा. माशा, पिसवा, डास यांचा प्रादूर्भाव
वाढतो. याच्या व्यवस्थापनासाठी पशुवैद्यकीय अधिकाऱ्याच्या साहाय्याने उपाययोजना
कराव्यात. वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते
40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता
असल्यामुळे, जनावरांना उघडयावर सोडू किंवा बांधू नये. निवा-याच्या ठिकाणी बांधावे व पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्यावी. पशूधनास
खुले पाणी, तलाव किंवा नदीपासून दूर ठेवावे, ट्रक्टर आणि इतर धातूंच्या शेती
अवजारांपासून दूर ठेवावे व पशुधनास झाडाखाली जमा होऊ देऊ नये.तसेच पाऊस चालू
होण्याच्या वेळी झाडाच्या आडोशाला थांबू नये.
सामुदायिक विज्ञान
पावसाळयात
हिरव्या भाजी-पाल्याचा, स्वच्छ धूवून कमी प्रमाणात वापर करावा. याशिवाय फळभाज्या,
जसे की कारले, दोडके, दिलपसंद, दुधीभोपळा, बटाटा, शेंगा यांचा जास्त वापर करावा.
ईतर
शंखी
गोगलगायीच्या व्यवस्थापनासाठी पाऊस पडल्यानंतर सर्व शेतकऱ्यांनी सामूहिक रित्या
मोहिम राबवून गोगलगायी गोळा करून प्लास्टीकच्या पोत्यात भरून त्यात कोरडे मिठ अथवा
चूना टाकून नष्ट कराव्यात. कापूस व सोयाबीन या सारख्या पिकामध्ये शंखी
गोगलगायीच्या व्यवस्थापनासाठी दाणेदार मेटाल्डिहाईड 2 किलो प्रति एकर या प्रमाणात
शेतात पसरून द्यावे. केळी, आंबा, द्राक्ष व सिताफळ बागेत शंखी गोगलगायीच्या
व्यवस्थापनासाठी झाडाखाली दाणेदार मेटाल्डिहाईड प्रति झाड 100 ग्रॅम पसरून टाकावे.
सौजन्य
मुख्य प्रकल्प
समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम
सेवा,वसंतराव नाईक
मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला
पत्रक क्रमांक – 31/ 2023 - 2024 मंगळवार, दिनांक – 18.07.2023
-
हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 14 जून रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना...
-
हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात दिनांक 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान तूरळ...
-
हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 23 जून रोजी छत्रपती संभाजी नगर व जालन...