प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील सात दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवस कमाल तापमानात हळूहळू 1 ते 2 अं.से. ने वाढ होऊन त्यानंतर कमाल तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही. पुढील दोन दिवस किमान तापमानात हळूहळू 1 ते 2 अं.से. ने घट होऊन त्यानंतर किमान तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही.
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात
दिनांक 20 ते 26 ऑक्टोबर दरम्यान पाऊस सरासरीएवढा राहण्याची शक्यता आहे.
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस)
मराठवाड्यात दिनांक 22 ते 28 ऑक्टोबर 2023 दरम्यान कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे.
सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या
बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार मराठवाडयात
बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे तर
जमिनीतील ओलावा कमी झालेला आहे.
प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार पुढील
काळात परतीच्या पावसाची शक्यता नसल्यामूळे शेतकऱ्यांनी खरीप पिकांची काढणी
केल्यानंतर लगेच उपलब्ध जमिनीतील ओलाव्यावर
लवकरात लवकर रब्बी पिकांची पेरणी करावी.
वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण
कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि
सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
कापूस पिकात रसशोषण करणाऱ्या
किडींच्या व्यवस्थापनासाठी, फ्लोनिकॅमिड 50% डब्ल्यूजी 60 ग्रॅम किंवा बुप्रोफेंझिन 25% एससी 400 मिली किंवा डायनोटेफ्युरॉन
20% डब्ल्यूजी
60 ग्रॅम किंवा डायफेनथ्यूरॉन 50% डब्ल्यूपी 240 ग्रॅम प्रति एकर फवारणी करावी. कापूस पिकात बाह्य बोंड सड दिसून
आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी प्रोपिकोनॅझोल 25% ईसी 200 मिली किंवा
प्रोपीनेब 70% डब्ल्यूपी
500 ग्रॅम किंवा पायरॅक्लोस्ट्रोबीन 20 % डब्ल्यूजी 200
ग्रॅम प्रति एकर फवारणी करावी. कापूस
पिकात अंतर्गत बोंड सड दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी कॉपर ऑक्सीक्लोराईड 50%
डब्ल्यूपी 500 ग्रॅम प्रति
एकर फवारणी करावी. कापूस पिकावरील गुलाबी
बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी हेक्टरी 5 गुलाबी बोंडअळीसाठीचे कामगंध सापळे
लावावेत. कापूस पिकातील डोमकळ्या वेचून नष्ट कराव्यात. प्रादूर्भाव जास्त आढळून
आल्यास प्रोफेनोफॉस 50% 400 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% 88 ग्रॅम किंवा प्रोफेनोफॉस 40% + सायपरमेथ्रीन 4%
400 मिली (पूर्वमिश्रीत
किटकनाशक) प्रति एकर आलटून पालटून
फवारावे. कापूस
पिकात पातेगळ व बोंडगळ दिसून येत असल्यास एनएए 2.5 मिली प्रति 10 लिटर पाण्यात
मिसळून फवारणी करावी. तूर
पिकात फायटोप्थोरा ब्लाइट रोगाच्या व्यवस्थापनासाठी ट्रायकोडर्मा किंवा
बायोमिक्सची 200 ग्रॅम/200 मिली प्रति 10 लिटर पाणी याप्रमाणे रोगग्रस्त भागामध्ये
आळवणी करावी. फुलोरा अवस्थेत असलेल्या
तूर पिकास पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. पिकास आवश्यकतेनूसार पाणी
व्यवस्थापन करावे. काढणीस तयार
असलेल्या खरीप भुईमूग पिकाची काढणी करून घ्यावी. खरीप
पिकांची काढणी केल्यानंतर पाण्याची उपलब्धता असल्यास किंवा जमिनीत ओलावा असल्यास मका
पिकाची पेरणी ऑक्टोबर ते नोव्हेंबर या कालावधीत करता येते. पेरणी 60X30
सेंमी अंतरावर करावी.
पेरणीसाठी हेक्टरी 15 किलो बियाणे वापरावे. पेरणीपूर्वी बियाण्यास बिजप्रक्रिया
करावी. खरीप
पिकांची काढणी केल्यानंतर पाण्याची उपलब्धता असल्यास किंवा जमिनीत ओलावा असल्यास रब्बी
ज्वारी पिकाची पेरणी लवकरात लवकर करून घ्यावी. पेरणी 45X15 सेंमी अंतरावर करावी.
पेरणीसाठी हेक्टरी 10 किलो बियाणे वापरावे. परेणीपूर्वी काणी रोग प्रतिबंधासाठी
300 मेश गंधक 4 ग्रॅम प्रति किलो बियाणे याप्रमाणे बिजप्रक्रिया करावी. पोंगेमर व
खोडमाशीच्या व्यवस्थापनासाठी थायामिथॉक्झाम 70% 4 ग्रॅम किंवा इमिडाक्लोप्रिड 48% 14 मिली प्रति किलो बियाण्यास
बिजप्रक्रिया करूनच पेरणी करावी. खरीप पिकांची काढणी केल्यानंतर पाण्याची उपलब्धता असल्यास किंवा जमिनीत
ओलावा असल्यास रब्बी सुर्यफुलाची पेरणी लवकरात लवकर करून घ्यावी. भारी जमिनीत पेरणी
60X30 सेंमी तर मध्यम
जमिनीत 45X30 सेंमी अंतरावर करावी. पेरणीसाठी
हेक्टरी 8 ते 10 किलो बियाणे वापरावे.
फळबागेचे व्यवस्थापन
पुढील सात दिवस कोरडे हवामान व
कमाल तापमानात 1 ते 2 अ.से. ने वाढ होण्याची शक्यता लक्षात घेता नविन लागवड
केलेल्या केळी बागेत तण व्यवस्थापन करून आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. केळी बागेत
प्रति झाड 50 ग्रॅम पोटॅश खत मात्रा द्यावी. नवीन लागवड केलेल्या केळी बागेत
कुकुम्बर मोझॅक विषाणू ग्रस्त रोपे दिसून आल्यास उपटून नष्ट करावीत. पुढील सात
दिवस कोरडे हवामान व कमाल तापमानात 1 ते 2 अ.से. ने वाढ होण्याची शक्यता लक्षात
घेता छाटणी केल्यानंतर द्राक्ष बागेत 1% बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी व आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. छाटणी केली नसल्यास द्राक्ष बागेत ऑक्टोबर
छाटणीचे नियोजन करावे. पुढील सात
दिवस कोरडे हवामान व कमाल तापमानात 1 ते 2 अ.से. ने वाढ होण्याची शक्यता लक्षात
घेता नविन लागवड केलेल्या सिताफळ बागेस आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. पूर्ण
वाढलेल्या व काढणीस तयार असलेल्या सिताफळ फळांची काढणी करावी व प्रतवारी करून
बाजारपेठेत पाठवावी.
भाजीपाला
पुढील सात दिवस कोरडे हवामान व
कमाल तापमानात 1 ते 2 अ.से. ने वाढ होण्याची शक्यता लक्षात घेता भाजीपाला पिकात तण
व्यवस्थापन करून आवश्यकतेनूसार पाणी
द्यावे. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी. भाजीपाला (
मिरची, वांगे व भेंडी) पिकात रसशोषण
करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यस्थापनासाठी
पायरीप्रॉक्सीफेन 5% + फेनप्रोपाथ्रीन
15% 10 मीली किंवा डायमेथोएट 30% 13 मीली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी
करावी.
फुलशेती
पुढील सात दिवस कोरडे हवामान व
कमाल तापमानात 1 ते 2 अ.से. ने वाढ होण्याची शक्यता लक्षात घेता फुल पिकास
आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. नवरात्री व
दसरा उत्सवामूळे बाजारपेठेत फुलांना अधिक मागणी असते. काढणीस तयार असलेल्या
फुलांची काढणी टप्प्याटप्प्याने करावी व प्रतवारी करून बाजारपेठेत पाठवावी.
पशुधन व्यवस्थापन
पशुसाठी चारा व्यवस्थापन :
मराठवाडयाच्या अनेक भागामध्ये कमी पाऊस झाल्यामूळे भविष्यामध्ये पशुधनासाठी चारा
टंचाई भासू शकते. यासाठी असलेल्या पडकातील गवत, द्विदल व तत्सम पशुची चारा पीके
याचे सायलेज (मूरघास) स्वरूपामध्ये जतन, तसेच रब्बी हंगामामध्ये ज्वारीसारखे पीक
घेऊन कडबा उत्पादन करणे, ईतर पीकांचे काड घेऊन त्यावर युरीया-मोलॅसेस यांची
ट्रीटमेंट करून वापरणे. ईत्यादी उपाय अमलात आणण्याची गरज आहे व त्यासाठी सर्वांनी
तयारी केली पाहिजे.
सामुदायिक विज्ञान
पीक कापणी आणि मळणी करतांना
शेतकऱ्यांना अनेक शारीरिक समस्यांना तोंड द्यावे लागते जसेकी, हाताला कापणे, जखमा
होणे, हाताला अथवा शरीराच्या इतर अवयवांना खाज येणे, खोकला, नाक गळणे,
श्वासासंबंधित तक्रारी, उन लागणे, इत्यादी पीक कापणी आणि मळणी करतांना सुरक्षात्मक
वस्त्रांचा संच ज्यामध्ये लांब बाहीचा टोपीसह सदरा, हातमोजे, पायमोजे, चष्मा,
कापडी अवगुंठन आणि बुट इत्यादींचा वापर करावा.
सौजन्य
मुख्य प्रकल्प
समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम
सेवा,वसंतराव नाईक
मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला
पत्रक क्रमांक – 57/ 2023 - 2024 मंगळवार, दिनांक – 17.10.2023
No comments:
Post a Comment