प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 10 ते 14 आक्टोबर दरम्यान हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील तीन ते चार दिवसात कमाल तापमानात हळूहळू 1 ते 2 अं.से. ने वाढ होण्याची शक्यता आहे.
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात
दिनांक 13 ते 19 ऑक्टोबर दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान
सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस)
मराठवाड्यात दिनांक 15 ते 21 ऑक्टोबर 2023 दरम्यान कमाल तापमान व किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे.
सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या
बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार मराठवाडयात
बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे तर
जमिनीतील ओलावा कमी झालेला आहे.
प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार पुढील
काळात परतीच्या पावसाची शक्यता नसल्यामूळे शेतकऱ्यांनी खरीप पिकांची काढणी
केल्यानंतर लगेच उपलब्ध जमिनीतील ओलाव्यावर
लवकरात लवकर रब्बी पिकांची पेरणी करावी.
वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण
कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि
सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
कापूस पिकात रसशोषण करणाऱ्या
किडींच्या व्यवस्थापनासाठी, फ्लोनिकॅमिड 50% डब्ल्यूजी 60 ग्रॅम किंवा बुप्रोफेंझिन 25% एससी 400 मिली किंवा
डायनोटेफ्युरॉन 20% डब्ल्यूजी 60 ग्रॅम किंवा डायफेनथ्यूरॉन 50% डब्ल्यूपी 240 ग्रॅम प्रति एकर
फवारणी करावी. कापूस पिकात बाह्य बोंड सड
दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी प्रोपिकोनॅझोल 25% ईसी 200 मिली किंवा प्रोपीनेब 70% डब्ल्यूपी 500 ग्रॅम किंवा
पायरॅक्लोस्ट्रोबीन 20 % डब्ल्यूजी 200 ग्रॅम प्रति एकर फवारणी करावी. कापूस पिकात अंतर्गत बोंड सड
दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी कॉपर ऑक्सीक्लोराईड 50% डब्ल्यूपी 500 ग्रॅम प्रति
एकर फवारणी करावी. कापूस पिकावरील गुलाबी
बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी हेक्टरी 5 गुलाबी बोंडअळीसाठीचे कामगंध सापळे
लावावेत. कापूस पिकातील डोमकळ्या वेचून नष्ट कराव्यात. प्रादूर्भाव जास्त आढळून आल्यास
प्रोफेनोफॉस 50% 400 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% 88 ग्रॅम किंवा प्रोफेनोफॉस 40% + सायपरमेथ्रीन 4%
400 मिली (पूर्वमिश्रीत
किटकनाशक) प्रति एकर आलटून पालटून
फवारावे. कापूस
पिकात पातेगळ व बोंडगळ दिसून येत असल्यास एनएए 2.5 मिली प्रति 10 लिटर पाण्यात
मिसळून फवारणी करावी. तूर पिकात
फायटोप्थोरा ब्लाइट रोगाच्या व्यवस्थापनासाठी ट्रायकोडर्मा किंवा बायोमिक्सची 200
ग्रॅम/200 मिली प्रति 10 लिटर पाणी याप्रमाणे रोगग्रस्त भागामध्ये आळवणी करावी.
उशीरा पेरणी केलेल्या भूईमूग पिकात
मावा, फुलकिडे याच्या व्यवस्थापनासाठी इमिडाक्लोप्रिड 17.8 एस एल 2 मिली किंवा
क्विनॉलफॉस 25 ईसी 20 मिली किंवा लॅमडा सायहॅलोथ्रीन 5 ईसी 6 मिली प्रति 10 लिटर
पाण्यात मिसळून फवारणी करावी. काढणीस तयार असलेल्या मधु मका पिकाची काढणी करून घ्यावी. रब्बी ज्वारीच्या पेरणीसाठी
परभणी सुपर मोती (एसपीव्ही-2407), परभणी शक्ती (पीव्हीके-1009), परभणी मोती (एसपीव्ही-1411), परभणी ज्योती
(एसपीव्ही-1595/सीएसव्ही-18), पीकेव्ही क्रांती, फुले यशोदा, सीएसव्ही-22 आर,
सीएसव्ही-29आर (एसपीव्ही-2033), मालदांडी (एम35-1), फुल रेवती (एसपीव्ही-2048),
फुले सुचित्रा इत्यादी वाणांपैकी निवड करावी. रब्बी सुर्यफुल पेरणीसाठी एल.एस.एफ.एच-171, एल.एस.एफ.एच-35,
के.बी.एस.एच-44, डी.आर.एस.एच-1, एल.एस.एफ-8, एल.एस-11, एल.एस-2038 इत्यादी
वाणापैकी वाणाची निवड करावी.
फळबागेचे व्यवस्थापन
पुढील पाच दिवस कोरडे हवामान व
कमाल तापमानात 1 ते 2 अ.से. ने वाढ होण्याची शक्यता लक्षात घेता नविन लागवड
केलेल्या केळी व सिताफळ बागेस आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या केळी घडांची काढणी करून
घ्यावी. नवीन लागवड केलेल्या केळी बागेत कुकुम्बर मोझॅक विषाणू ग्रस्त रोपे दिसून
आल्यास उपटून नष्ट करावीत. पुढील पाच दिवस कोरडे हवामान व कमाल तापमानात
1 ते 2 अ.से. ने वाढ होण्याची शक्यता लक्षात घेता छाटणी केल्यानंतर द्राक्ष बागेस
आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. द्राक्ष बागेत
ऑक्टोबर छाटणीचे नियोजन करावे. द्राक्ष
छाटणीच्या पंधरा ते वीस दिवस आधी जमिनीत कॅल्शियम कार्बोनेट किंवा सोडियम किती प्रमाणात आहे यावर अवलंबून, सल्फर/जिप्सम,
शेणखत/कम्पोस्ट खत ईत्यादींसह माती दुरूस्ती म्हणून वापरावे. ते जमिनीवर न सोडता
जमिनीत मिसळावे. पूर्ण वाढलेल्या व
काढणीस तयार असलेल्या सिताफळ फळांची काढणी करावी व प्रतवारी करून बाजारपेठेत
पाठवावी.
भाजीपाला
पुढील पाच दिवस कोरडे हवामान व
कमाल तापमानात 1 ते 2 अ.से. ने वाढ होण्याची शक्यता लक्षात घेता भाजीपाला पिकास
आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून
घ्यावी. भाजीपाला ( मिरची, वांगे व भेंडी)
पिकात रसशोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या
व्यस्थापनासाठी पायरीप्रॉक्सीफेन 5% + फेनप्रोपाथ्रीन 15% 10
मीली किंवा डायमेथोएट 30% 13 मीली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
फुलशेती
पुढील पाच दिवस कोरडे हवामान व
कमाल तापमानात 1 ते 2 अ.से. ने वाढ होण्याची शक्यता लक्षात घेता फुल पिकास
आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. काढणीस तयार
असलेल्या फुलांची काढणी टप्प्याटप्प्याने करावी व प्रतवारी करून बाजारपेठेत
पाठवावी.
पशुधन व्यवस्थापन
पशुसाठी चारा व्यवस्थापन :
मराठवाडयाच्या अनेक भागामध्ये कमी पाऊस झाल्यामूळे भविष्यामध्ये पशुधनासाठी चारा
टंचाई भासू शकते. यासाठी असलेल्या पडकातील गवत, द्विदल व तत्सम पशुची चारा पीके
याचे सायलेज (मूरघास) स्वरूपामध्ये जतन, तसेच रब्बी हंगामामध्ये ज्वारीसारखे पीक
घेऊन कडबा उत्पादन करणे, ईतर पीकांचे काड घेऊन त्यावर युरीया-मोलॅसेस यांची
ट्रीटमेंट करून वापरणे. ईत्यादी उपाय अमलात आणण्याची गरज आहे व त्यासाठी सर्वांनी
तयारी केली पाहिजे.
सामुदायिक विज्ञान
उत्तम मानसिक स्वास्थ्य असणे हा प्रत्येक
व्यक्तीचा मुलभूत अधिकार आहे. त्यामुळे प्रत्येकाने
स्वतःच्या मानसिक स्वास्थ्याच्या जपणुकीसाठी
आपल्या जीवनात व्यायाम, योग ध्यान ,संतुलित आहार ,शारीरिक काम , खेळ ,इतरांशी परस्पर जिव्हाळ्याचे संबंध,दयाळूपणा, कृतज्ञतेची भावना, सकारात्मक वृत्ती, नवीन गोष्टी शिकण्याची इच्छा,ध्येय ,विधायक कार्यात सहभाग,संगीत-कला या सारख्या क्षेत्रात
आवड , छंद जोपासना ,विनोदबुद्धी ,पुरेशी विश्रांती व
झोप अशा निरोगी जीवनशैलीचा अवश्य अंगीकार करावा.
सौजन्य
मुख्य प्रकल्प
समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम
सेवा,वसंतराव नाईक
मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला
पत्रक क्रमांक – 55/ 2023 - 2024 मंगळवार, दिनांक – 10.10.2023
No comments:
Post a Comment