Thursday 23 November 2023

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 25 नोव्हेंबर रोजी छत्रपती संभाजी नगर, बीड, धाराशिव, जालना जिल्हयात काही ठिकाणी, दिनांक 26 नोव्हेंबर रोजी बीड, धाराशिव, जालना, परभणी, हिंगोली जिल्हयात बऱ्याच ठिकाणी, दिनांक 27 नोव्हेंबर रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्हयात काही ठिकाणी, दिनांक 28 नोव्हेंबर रोजी परभणी,‍ हिंगोली व नांदेड जिल्हयात काही ठिकाणी वादळीवाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 26 नोव्हेंबर रोजी छत्रपती संभाजी नगर जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची तसेच तूरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे.

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 25 नोव्हेंबर रोजी छत्रपती संभाजी नगर, बीड, धाराशिव, जालना जिल्हयात काही ठिकाणी, दिनांक 26 नोव्हेंबर रोजी बीड, धाराशिव, जालना, परभणी, हिंगोली जिल्हयात बऱ्याच ठिकाणी, दिनांक 27 नोव्हेंबर रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्हयात काही ठिकाणी, दिनांक 28 नोव्हेंबर रोजी परभणी,‍ हिंगोली व नांदेड जिल्हयात काही ठिकाणी वादळीवाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 26 नोव्हेंबर रोजी छत्रपती संभाजी नगर जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची तसेच तूरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे.

मराठवाडयात पुढील दोन दिवसात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही व त्यानंतर कमाल तापमानात 3 ते 4 अं.से. ने घट होण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवसात किमान तापमानात हळूहळू 2 ते 3 अं.से. ने वाढ होऊन त्यानंतर किमान तापमानात हळूहळू 3 ते 4 अं.से. ने घट होण्याची शक्यता आहे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 24 ते 30 नोव्हेंबर दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त, कमाल तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा जास्त तर दिनांक 01 ते 07 डिसेंबर दरम्यान पाऊस सरासरीएवढा ते सरासरीपेक्षा किंचित जास्त, कमाल तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 29 नोव्हेंबर ते 05 डिसेंबर 2023 दरम्यान कमाल तापमान मध्यमप्रमाणात सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार मराठवाडयात बाष्पोत्सर्जनाचा वेग कमी झालेला आहे तर जमिनीतील ओलावा वाढलेला आहे.

तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज लक्षात घेता शेतकऱ्यांनी पिकास पाणी देणे, वर खताची मात्रा देणे, किटकनाशक फवारणे, रोगनाशक फवारणे ही कामे पुढे ढकलावी.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज लक्षात घेता काढणी करून ढिग केलेले सोयाबीन ताडपत्रीने/पॉलिथीनने झाकून ठेवावे. मळणी केलेल्या सोयाबीन पिकाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.  तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज लक्षात घेता, वेचणीस तयार असलेल्या कापूस पिकात वेचणी लवकरात लवकर करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.  पाणी ‍दिलेल्या हरभरा, करडई, ज्वारी, सूर्यफुल, भूईमूग पिकात पाऊस झाल्यानंतर पाणी साठून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. पिकात साचलेल्या अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज लक्षात घेता काढणीस तयार असलेल्या सिताफळांची, संत्रा/मोसंबी, डाळींब फळांची तसेच केळींची लवकरात लवकर काढणी करून घ्यावी व काढणी केलेली फळे सुरक्षित ठिकाणी ठेवावी. नविन लागवड केलेल्या व लहान झाडांना काठीने आधार द्यावा.

चारा पीके

तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज लक्षात घेता काढणी केलेल्या सोयाबीन, मूग, उडीद पिकाचे काड (गुळी), खरीप ज्वारीचा कडबा सुरक्षित ठिकाणी साठवावा किंवा तो गोळा करून ताडपत्रीने झाकून ठेवावा.

भाजीपाला

तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज लक्षात घेता काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची काढणी लवकरात लवकर करून घ्यावी. नविन लागवड केलेल्या व लहान वेलवर्गीय झाडांना काठीने आधार द्यावा.

फुलशेती

तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज लक्षात घेता काढणीस तयार असलेल्या फुल पिकाची काढणी लवकरात लवकर करून घ्यावी. नविन लागवड केलेल्या व लहान फुल झाडांना काठीने आधार द्यावा.

तुती रेशीम उद्योग

लहान व मध्यम भुधारक शेतकऱ्यांनी संसाधन उपलब्धतेनुसार शेतीचे नियोजन व त्याची आमलबजावणी योग्य करावी. शेती पडीत ठेवू नये, अर्धा किंवा एक ते दीड एकर तुती पट्टा पध्दतीने लागवड केली तर वर्षासाठी बऱ्यापैकी उत्पन्न मिळते. कृषि विज्ञान केंद्र, कृषि विद्यापीठातील रेशीम संशोधन योजनेत माहिती घेऊन जिल्हा रेशीम कार्यालयात या महीण्यात आपली नोंदणी करावी व जानेवारी महिण्यापर्यंत तुती रोपवाटीका लागवड करावी जेणेकरून जुन महिण्या पर्यंत रोपे 3.5 ते 4 महिण्याचे झाल्यानंतर शेतात लागवड करता येतील. जमीन तयार करून एकरी 8 टन शेणखत दोन हप्त्यात जुन व नोव्हेंबर महिण्यात 4 ते 8 टन प्रत्येकी या प्रमाणे द्यावे.

पशुधन व्यवस्थापन

तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज लक्षात घेता चेतावनीच्या काळात जनावरे शक्यतो चरावयास बाहेर नेऊ नयेत. जनावरांना उघडयावर सोडू किंवा बांधू नये, निवाऱ्याच्या ठिकाणी बांधावे व पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्यावी.

कुक्कुट पालन

तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज लक्षात घेता कोंबडया व लहान पिल्ले सुरक्षित ठिकाणी ठेवावेत.

 

सौजन्‍य

मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक68/2023 - 2024      शुक्रवार, दिनांक – 24.11.2023

 

 

 

No comments:

Post a Comment

मराठवाडयात पुढील पाच दिवस दूपारच्या वेळी आकाश अंशत: ढगाळ राहून तूरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 17 मे रोजी नांदेड, लातूर, परभणी, धाराशिव व हिंगोली जिल्हयात बऱ्याच ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 40 ते 50 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 18 मे रोजी लातूर, नांदेड, परभणी,‍ हिंगोली व बीड जिल्हयात तर दिनांक 19 मे रोजी लातूर, नांदेड, धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवस दूपारच्या वेळी आकाश...