Monday 29 January 2024

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील सात दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक 01 व 02 फेब्रुवारी रोजी किमान तापमानात किंचित घट होऊन त्यानंतर किमान तापमानात किंचित वाढ होण्याची शक्यता आहे.

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील सात दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक 01 व 02 फेब्रुवारी रोजी किमान तापमानात किंचित घट होऊन त्यानंतर किमान तापमानात किंचित वाढ होण्याची शक्यता आहे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 03 ते 09 फेब्रुवारी दरम्यान पाऊस सरासरीएवढा, कमाल तापमान व किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 04 ते 10 फेब्रुवारी 2024 दरम्यान पाऊस सरासरी पेक्षा कमी, कमाल तापमान व किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार मराठवाडयात बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

मागील पाच दिवसात किमान तापमानात  झालेल्या घटीमुळे उशीरा पेरणी केलेल्या रब्बी ज्वारी पिकावरील चिकटा व्यवस्थापनासाठी कार्बेंडाझीम 10 ग्रॅम प्रति 10 ‍लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. मागील तीन दिवसातील कमाल तापमान व पुढील सात  दिवसाच्या कोरडया हवामानाचा अंदाज लक्षात घेता, रब्बी ज्वारी पिकास फुलोरा येण्याच्या अवस्थेत (पेरणी नंतर 70 ते 75 दिवस) व कणसात दाणे भरण्याच्या अवस्थेत (पेरणी नंतर 90 ते 95 दिवस) पाणी द्यावे. दाणे भरण्याच्या अवस्थेत असलेल्या रब्बी ज्वारी पिकाचे पक्षांपासून संरक्षणासाठी उपाय योजना कराव्यात. मागील तीन दिवसातील कमाल तापमान व पुढील सात  दिवसाच्या कोरडया हवामानाचा अंदाज लक्षात घेता, गहू पिकास दाण्यात दुधाळ पीक अवस्था (पेरणी नंतर 80 ते 85 दिवस) व दाणे भरताना (पेरणीनंतर 90 ते 95 दिवस) पाणी द्यावे. गव्हाच्या पिकात उंदरांचा प्रादुर्भाव दिसून असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी  झिंक फॉस्फाईड 1 भाग + गुळ 1 भाग + 50 भाग गव्हाचा भरडा व थोडसे गोडतेल मिसळून हे मिश्रण उंदराच्या बिळात टाकुन बिळे बंद करावीत. उन्हाळी भुईमूग पिकात पेरणी पूर्वी पुढील प्रमाणे बीजप्रक्रिया करावी. i. थायरम 3 ग्रॅम किंवा बाविस्टीन 2 ग्रॅम किंवा ट्रायकोडर्मा  5 ग्रॅम प्रति किलो बियाणे. ii. प्रति 10 किलो बियाण्यास रायझोबियम व पी.एस.बी. प्रतयेकी 250 ग्राम किंवा द्रव स्वरूपात असेल तर प्रतयेकी 60 मिली.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

मागील तीन दिवसातील कमाल तापमान व पुढील सात दिवसाच्या कोरडया हवामानाचा अंदाज लक्षात घेता, केळी, आंबा व द्राक्ष बागेत आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. केळी बागेत पोटॅशियम 50 ग्रॅम प्रति झाड खतमात्रा द्यावी. द्राक्ष बागेत फळांचा आकार वाढण्यासाठी द्राक्ष घड जिब्रॅलिक ॲसिड 200 मिली ग्रॅम प्रति 10 लिटर द्रावणात बूडवावे.

भाजीपाला

भाजीपाला पिकात अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. मागील तीन दिवसातील कमाल तापमान व पुढील सात दिवसाच्या कोरडया हवामानाचा अंदाज लक्षात घेता, भाजीपाला पिकात आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी.

फुलशेती

काढणीस तयार असलेल्या (शेवंती, निशीगंध, ग्लॅडिओलस) फुलपिकांची काढणी करून घ्यावी. मागील तीन दिवसातील कमाल तापमान व पुढील सात दिवसाच्या कोरडया हवामानाचा अंदाज लक्षात घेता, फुल पिकात आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे.

 

पशुधन व्यवस्थापन

थंडीच्या दिवसात जेव्हा थंड वारे वाहू लागतात त्या वेळेस आपल्या जनावरांचे विशेषत: शेळी आणि मेंढी यांचे थंडीपासून संरक्षण करावे. त्याकरीता त्यांच्या निवाऱ्याच्या जागेत ऊब असावी, माफक प्रमाणात हवा खेळती असावी. नाकातून पाणी येणे, भूक मंदावणे, चालण्याकरीता कष्ट होणे ई. लक्षणे दिसू लागताच पशुवैद्यकाशी त्वरीत संपर्क साधावा. सर्वसाधारणपणे बकरीच्या पिल्लांना थंडीची बाधा लवकर होते. थंडीच्या दिवसात करडांची मरतुक टाळण्यासाठी त्यांना ऊबदार जागेत ठेवावे. मोठ्या टोपलीत कापड टाकून त्यामध्ये पिल्लांना ठेवता येऊ शकते, थंडीपासून संरक्षण होते. गोठ्यात माफक हवा असावी. शेळीचे दुध भरपूर प्रमाणात द्यावे ज्यामूळे पिल्लांच्या शरीरात ऊर्जा निर्माण होऊन थंडीपासून बाधा होणार नाही.

सामुदायिक विज्ञान

लोहसमृध्द तिळाची वडी 100 ग्रॅम तिळाच्या वडीमध्ये प्रथिने 20.34 ग्रॅम, स्निग्धे 42.93 ग्रॅम, उर्जा 593 कि.कॅ. आणि लोह 14.7मि. ग्रॅम मिळते. 65 ते 100 ग्रॅम तिळा वडया प्रति दिन सलग 90 दिवस सेवन केल्यास रक्तातील  हिमोग्लोबीन आणि प्रथिनांचे प्रमाण वाढण्यास मदत होते.

 

सौजन्‍य

मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक87/ 2023 - 2024      मंगळवार, दिनांक – 30.01.2024

 

 

 

No comments:

Post a Comment

मराठवाडयात पुढील पाच दिवस दूपारच्या वेळी आकाश अंशत: ढगाळ राहून तूरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 17 मे रोजी नांदेड, लातूर, परभणी, धाराशिव व हिंगोली जिल्हयात बऱ्याच ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 40 ते 50 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 18 मे रोजी लातूर, नांदेड, परभणी,‍ हिंगोली व बीड जिल्हयात तर दिनांक 19 मे रोजी लातूर, नांदेड, धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवस दूपारच्या वेळी आकाश...