Monday 22 January 2024

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील तीन दिवसात कमाल व किमान तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही व त्यानंतर कमाल व किमान तापमानात हळुहळु किंचित वाढ होण्याची शक्यता आहे.

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील तीन दिवसात कमाल व किमान तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही व त्यानंतर कमाल व किमान तापमानात हळुहळु किंचित वाढ होण्याची शक्यता आहे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 26 जानेवारी ते 02 फेब्रुवारी दरम्यान पाऊस सरासरीएवढा, कमाल तापमान सरासरीएवढे व किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 28 जानेवारी ते 03 फेब्रुवारी 2024 दरम्यान पाऊस सरासरी पेक्षा कमी, कमाल तापमान व किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार मराठवाडयात बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

मागील आठवडयातील कमाल तापमान व पुढील पाच  दिवसाच्या कोरडया हवामानाचा अंदाज लक्षात घेता, रब्बी ज्वारी पिकास फुलोरा येण्याच्या अवस्थेत (पेरणी नंतर 70 ते 75 दिवस) व कणसात दाणे भरण्याच्या अवस्थेत (पेरणी नंतर 90 ते 95 दिवस) पाणी द्यावे. दाणे भरण्याच्या अवस्थेत असलेल्या रब्बी ज्वारी पिकाचे पक्षांपासून संरक्षणासाठी उपाय योजना कराव्यात. मागील आठवडयातील कमाल तापमान व पुढील पाच  दिवसाच्या कोरडया हवामानाचा अंदाज लक्षात घेता, गहू पिकास कांडी धरण्याच्या अवस्थेत (पेरणी नंतर 40 ते 45 दिवस) व पिक फुलावर असतांना (पेरणीनंतर 65 ते 70 दिवस) पाणी द्यावे.  उन्हाळी भुईमूग पिकाच्या पेरणीसाठी एस.बी.11, टीएजी 24, एलजीएन-1, टीएलजी-45, टीजी 26, जेएल 24, जेएल 220 या वाणांपैकी वाणाची निवड करावी.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

मागील आठवडयातील कमाल तापमान व पुढील पाच दिवसाच्या कोरडया हवामानाचा अंदाज लक्षात घेता, केळी, आंबा व द्राक्ष बागेत आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. केळी बागेत फळांचा आकार वाढवण्यासाठी 00:52:34 1.5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

भाजीपाला

भाजीपाला पिकात अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. मागील आठवडयातील कमाल तापमान व पुढील पाच दिवसाच्या कोरडया हवामानाचा अंदाज लक्षात घेता, भाजीपाला पिकात आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी.

फुलशेती

काढणीस तयार असलेल्या (शेवंती, निशीगंध, ग्लॅडिओलस) फुलपिकांची काढणी करून घ्यावी. मागील आठवडयातील कमाल तापमान व पुढील पाच दिवसाच्या कोरडया हवामानाचा अंदाज लक्षात घेता, फुल पिकात आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे.

पशुधन व्यवस्थापन

पशुप्रजननाची क्रिया कालवडी, वगारीत सुरू होणे म्हणजेच जनावर माजावर येणे वयात येणे किंवा प्रजन सक्षम होणे. पशु प्रजनन संस्थेची वाढ जन्मानंतर वासराच्या वाढीशी संबंधीत असते. ज्या वासरात शरिरीक वाढीचा वेग जास्त ती वासरे लवकर वयात येतात कारण त्यांच्या प्रजनन संस्थेची वाढ ही लवकर पुर्ण होते. या उलट ज्या वासरात वाढीचा दर कमी असतो त्यांची प्रजनन संस्था लवकर तयार होत नाही व ते उशीरा माजावर येतात.

सामुदायिक विज्ञान

लोहसमृध्द तिळाची वडी 100 ग्रॅम तिळाच्या वडीमध्ये प्रथिने 20.34 ग्रॅम, स्निग्धे 42.93 ग्रॅम, उर्जा 593 कि.कॅ. आणि लोह 14.7मि. ग्रॅम मिळते. 65 ते 100 ग्रॅम तिळा वडया प्रति दिन सलग 90 दिवस सेवन केल्यास रक्तातील  हिमोग्लोबीन आणि प्रथिनांचे प्रमाण वाढण्यास मदत होते.

 

सौजन्‍य

मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक85/ 2023 - 2024      मंगळवार, दिनांक – 23.01.2024

 

 

 

No comments:

Post a Comment

मराठवाडयात पुढील पाच दिवस दूपारच्या वेळी आकाश अंशत: ढगाळ राहून तूरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 17 मे रोजी नांदेड, लातूर, परभणी, धाराशिव व हिंगोली जिल्हयात बऱ्याच ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 40 ते 50 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 18 मे रोजी लातूर, नांदेड, परभणी,‍ हिंगोली व बीड जिल्हयात तर दिनांक 19 मे रोजी लातूर, नांदेड, धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवस दूपारच्या वेळी आकाश...