प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात दिनांक 28 मे, 31
मे व 01 जून रोजी तूरळक ठिकाणी
वादळीवाऱ्यासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक 28 मे
रोजी कमाल तापमानात 2 ते 3 अं.से. ने वाढ होऊन त्यानंतर कमाल तापमानात फारशी तफवत
जाणवणार नाही. मराठवाडयात पुढील पाच दिवसात किमान तापमानात फारशी तफावत जाणवणार
नाही.
सामान्य सल्ला :
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस)
मराठवाडयात दिनांक 31 मे ते 06 जून दरम्यान पाऊस सरासरीएवढा, कमाल तापमान सरासरीएवढे
व किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे.
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस)
मराठवाड्यात दिनांक 02 ते 08 जून 2024 दरम्यान पाऊस सरासरी
पेक्षा कमी, कमाल तापमान व किमान तापमान सरासरीएवढे
राहण्याची शक्यता आहे.
संदेश :
सोयाबीन पिकाच्या पेरणीपूर्वी
शेतकऱ्यांनी बियाण्याची उगवण क्षमता तपासून घ्यावी. उगवण क्षमता 70 % पेक्षा जास्त असेल तरच बियाणे पेरणीसाठी वापरावे.
वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण
कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि
सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
कोरडवाहू कापूस लागवडीसाठी भारी व
काळया जमिनीमध्ये दोन-तिन वर्षानी एक वेळा खोल नांगरणी करावी. नांगरणी नंतर मोगडणी
करावी. मोगडणीनंतर दोन-तिन वखराच्या पाळया द्याव्यात. शेवटची वखरणी करण्यापूर्वी
कोरडवाहू कापूस लागवडीसाठी 5 टन व बागायती लागवडीसाठी 10 टन चांगले कुजलेले शेणखत शेतात समप्रमाणात पसरावे. तुर पिकाच्या पूर्व मशागतीसाठी एक नांगरणी व
वखराच्या 2 ते 3 पाळया द्याव्यात. शेवटच्या पाळी अगोदर चांगले कुजलेले शेणखत किंवा
कंपोस्ट खत हेक्टरी 5 टन जमिनीत मिसळून पाळी द्यावी. मुग/उडीद लागवडीसाठी एक नांगरणी व कुळवाच्या 2 पाळया द्याव्यात. शेवटच्या
कुळवणी अगोदर चांगले कुजलेले शेणखत हेक्टरी 5 टन जमिनीत मिसळून पाळी द्यावी. भुईमूगाच्या पेरणीसाठी बळीराम देशी नांगराची
एक ते दोन नांगरणीनंतर वखराच्या दोन ते तिन पाळया द्याव्यात. शेवटच्या वखरपाळी
पूर्वी प्रति हेक्टरी 10 गाडया शेणखत/कंपोस्ट खत पसरून जमिन भुसभूशीत करावी. जमिनीची
खोल नांगरट करावी. वखराच्या एक ते दोन पाळया देऊन जमिन तयार करावी.
फळबागेचे व्यवस्थापन
केळीच्या नवीन लागवडीसाठी लागवड करण्या
अगोदर हेक्टरी 90 ते 100 गाड्या चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत
लागवडीपूर्वी जमिनीत मिसळून द्यावे. नवीन लागवड केलेल्या व लहान झाडांना उन्हापासून संरक्षनासाठी सावली करावी
यामुळे कलमांची मर होणार नाही तसेच बागेत
खोडाजवळ आच्छादन करावे. केळी बागेला
पाण्याचा ताण बसणार नाही याची काळजी घ्यावी. केळी बागेत ठिंबक सिंचन पद्धतीने
सकाळी लवकर किंवा सायंकाळी पाणी व्यवस्थापन करावे. आंब्याच्या नवीन लागवडीसाठी 1X1X1 मीटर आकाराचे खड्डे घेऊन त्यात अर्धा किलो सूपर फॉस्फेट व 50 किलो शेणखत किंवा
कंपोस्ट खत टाकावे व पोयटा मातीने सर्व मिश्रणासहीत खड्डा भरून घ्यावा. नविन लागवड
केलेल्या आंबा बागेला पाण्याचा ताण बसणार
नाही याची काळजी घ्यावी. नविन लागवड केलेल्या आंबा बागेत ठिंबक सिंचन पद्धतीने
सकाळी लवकर किंवा सायंकाळी पाणी व्यवस्थापन करावे. नवीन लागवड केलेल्या व लहान
झाडांना उन्हापासून संरक्षणासाठी सावली करावी तसेच बागेत खोडाजवळ आच्छादन करावे. वेळेवर एप्रिल छाटणी केलेल्या द्राक्ष
बागेत आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. द्राक्ष बागेत अतिरिक्त फुटव्यांची विरळणी करावी. सिताफळाच्या नवीन लागवडीसाठी 45X45X45 सें.मी.
या आकाराचे खड्डे घेऊन त्यात एक ते दिड घमेले चांगले कुजलेले शेणखत अथवा कंपोस्ट
खत, अर्धा किलो सुपर फॉस्फेट, फॉलीडॉल पावडर घालून व चांगल्या मातीच्या मिश्रणाने
ते भरावे.
भाजीपाला
खरीप हंगामात भाजीपाला लागवडीसाठी
जमिनीची पूर्व मशागत करून घ्यावी. काढणीस तयार आसलेल्या भाजीपाला पिकांची तसेच
टरबूज, खरबूज इत्यादी पिकांची काढणी करावी. भाजीपाला पिकात पाण्याचा ताण बसणार
नाही याची दक्षता घ्यावी. भाजीपाला पिकास आवश्यकतेनुसार सकाळी किंवा सायंकाळी
सुक्ष्म सिंचन पध्दतीने पाणी द्यावे.
फुलशेती
खरीप हंगामात फुलपिकाच्या लागवडीसाठी
जमिनीची पूर्व मशागत करून घ्यावी. काढणीस तयार असलेल्या फुलपिकांची काढणी करून
घ्यावी. फुल पिकात पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. फुल पिकास
आवश्यकतेनुसार सकाळी किंवा सायंकाळी सुक्ष्म सिंचन पध्दतीने पाणी द्यावे.
पशुधन व्यवस्थापन
तापमानात वाढ झाल्यामूळे दूधाळ जनावरांमध्ये दुध उत्पादन कमी
होते व त्याचबरोबर दुधातील स्निग्ध पदार्थ व प्रथिने यांचे प्रमाण कमी होते. हया
पासून दुधाळ जनावरांचे संरक्षण करण्यासाठी त्यांच्या गोठ्याच्या शेड वरील छताला
स्प्रिंकलर्स किंवा फॉगर्स ने थंडावा निर्माण करावा, दुपारी जनावरांना धुवून
काढावे, जमलेच तर पंखा किंवा कुलर्सची व्यवस्था शेड मध्ये करावी, शेडच्या बाजूला
पोत्याचे पडदे बांधून त्यांना भिजवावे. गोठ्याची उंची कमीत कमी मध्यभागी 15 फुट
उंच असावी. पशुधनास पिण्यास भरपूर पाणी द्यावे.
सामुदायिक विज्ञान
उन्हाळयात वातावणातील वाढत्या
तापमानामुळे भाजीपाला लवकर सुकून जातो. अशावेळी घरात फ्रिज उपलब्ध नसल्यास
भाजीपाला ठेवण्यासाठी जुना माठ किंवा झाडाची रिकामी कुंडी घ्यावी. त्यामध्ये पाणी
घालून भाज्या ठैवलेले भांडे अशा पध्दतीने ठेवावे की जेणेकरून त्यात
माठातील/कुंडीतील पाणी जाणार नाही. भाजीपाला अशा प्रकारे ठेवल्यास माठातील
कुंडीतील तापमान कमी होऊन भाजीपाला ताजा
राहण्यास मदत होते.
ईतर
शेतात लवकरात लवकर खोल नांगरणी
करून घ्यावी. त्यामूळे जमिन तापन्यास मदत होऊन किडींचे कोष व घातक बूरशीचा नायनाट
होईल. ज्या भागात मागील वर्षी शंखी गोगलगायीचा प्रादूर्भाव आढळून आला होता अशा ठिकाणी
शंखी गोगलगायीच्या व्यवस्थापनासाठी उन्हाळ्यात (मे महिन्यात) जमिनीची खोल नांगरट करावी जेणेकरून गोगलगायीच्या सूप्तावस्था नष्ट होतील. शेतकऱ्यांनी बोर्ड,भिंती,
भेगा, दगडे, बांध इत्यादी ठिकाणी लपून बसलेल्या गोगलगायी शक्य तितक्या प्रमाणात
जमा करून प्लास्टीकच्या पोत्यात भरून त्यात कोरडे मिठ अथवा चूना टाकून नष्ट
कराव्यात.
सौजन्य
मुख्य प्रकल्प
समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला
पत्रक क्रमांक – 17/ 2024- 2025 मंगळवार, दिनांक – 28.05.2024
No comments:
Post a Comment