प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 16 ऑगस्ट रोजी नांदेड, लातूर, धाराशिव, बीड, परभणी व हिंगोली
जिल्हयात तर दिनांक 17 व 18 ऑगस्ट रोजी नांदेड, लातूर, धाराशिव, बीड, परभणी,
हिंगोली, छत्रपती संभाजी नगर व जालना जिल्हयात तर दिनांक 19 ऑगस्ट रोजी छत्रपती
संभाजी नगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड व बीड जिलहयात तर दिनांक 20 ऑगस्ट रोजी
छत्रपती संभाजी नगर व जालना जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा
कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम
स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात काही ठिकाणी पुढील तीन
दिवसात कमाल तापमानात 1 ते 2 अं.से. ने वाढ होऊन तीन दिवसातनंतर कमाल तापमानात किंचित घट होण्याची शक्यता आहे.
सामान्य सल्ला :
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस)
मराठवाडयात दिनांक 16 ते 22 ऑगस्ट दरम्यान व 23 ते 29 ऑगस्ट दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा
जास्त राहण्याची शक्यता आहे.
संदेश :
प्रादेशिक
हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार पुढील पाच दिवसा
तूरळक ठिकाणी वादळी वारा व विजांचा कडकडाट राहण्याची शक्यता असल्यामूळे शेतकरी
बांधवांनी विजांच्या माहितीसाठी दामिनी ॲपचा वापर करावा.
वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
सोयाबीन पिकात पिवळा मोझॅक
प्रादूर्भाव ग्रस्त झाडे उपटून नष्ट करावीत. सोयाबीन पिकावरील पिवळा मोझॅकच्या
व्यवस्थापनासाठी थायमिथोक्झाम 12.6% + लॅम्बडा सिहॅलोथ्रीन 9.6% झेड सी 50 मिली किंवा ॲसिटामिप्रिड 25% + बाइफेन्थ्रीन 25% डब्ल्यू जी 100 ग्रॅम किंवा
बीटा साइफ्लुथ्रीन 8.49% + इमिडाक्लोप्रीड 19.81% ओडी 140 मिली प्रति एकर यापैकी एका किटकनाशकाची कोणत्याही प्रकारचे तणनाशक
न मिसळता पावसाची उघाड बघून याप्रमाणे फवारणी करावी. सोयाबीन पिकात पाने खाणाऱ्या
अळीचा व खोड
किडीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास, याच्या व्यवस्थापनासाठी प्रोफेनोफॉस 50% 400 मिली किंवा इथिऑन 50% 600मिली किंवा थायामिथॉक्झाम 12.6% + लॅम्बडा सायहॅलोथ्रीन 9.5% (पूर्वमिश्रित किटकनाशक) 50 मिली किंवा प्रादूर्भाव खूप जास्त असल्यास क्लोरँट्रानिलीप्रोल
18.5% 60 मिली
प्रति एकर यापैकी कुठलेही एक किटकनाशक पावसाची उघाड बघून फवारणी करावी. खरीप
ज्वारी पिकात लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी
इमामेक्टीन बेन्झोएट 5 टक्के 4 ग्रॅम
किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वरील
किटकनाशकांची आलटून पालटून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. फवारणी करत असतांना
किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी. खरीप ज्वारी पिकात जमिनीत वापसा
असतांना अंतरमशागतीची कामे करून पिक तण विरहीत ठेवावे. बाजरी पिकात जमिनीत वापसा असतांना अंतरमशागतीची
कामे करून पिक तण विरहीत ठेवावे. ऊस पिकात हूमणीच्या अळ्या दिसून येत असल्यास
याच्या व्यवस्थापनासाठी मेटाराईझीयम ॲनोसोप्ली या जैविक बूरशीचा 4 किलो (जास्त प्रादुर्भाव असल्यास 10
किलो) प्रति एकर जमिनीतून वापर करावा.
ऊस पिकावर खोड किडीचा
प्रादूर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरपायरीफॉस 20 %
25 मिली किंवा
क्लोरॅट्रानोलीप्रोल 18.5% 4 मिली प्रति 10 लीटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. ऊस
पिकात पोक्का बोइंग या रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या
व्यवस्थापनासाठी कार्बेन्डाझिम 12% + मॅन्कोझेब 63% डब्ल्यूपी 50 ग्रॅम किंवा कॉपर ऑक्सीक्लोराइड 50%
डब्ल्यू पी 20 ग्रॅम प्रति
10 लिटर पाण्यात मिसळून स्टीकरसह पावसाची उघाड बघून 10 ते 12 दिवसाच्या अंतराने 2
ते 3 फवारण्या कराव्यात. हळद पिकात कंदमाशीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास
याच्या व्यवस्थापनासाठी 15 दिवसांच्या अंतराने क्विनालफॉस 25% 20 मिली किंवा डायमिथोएट 30 %
10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून आलटून-पालटून पावसाची उघाड बघून फवारणी
करावी. (हळद पिकावर केंद्रीय किटकनाशक मंडळातर्फे लेबल क्लेम नसल्यामूळे विद्यापिठ
शिफारशीत संशोधनाचे निष्कर्ष दिले आहेत). हळद पिकात जमिनीत वापसा असतांना
अंतरमशागतीची कामे करून पिक तण विरहीत ठेवावे.
फळबागेचे व्यवस्थापन
संत्रा/मोसंबी बागेत फळधारणेसाठी
चिलेटेड झिंक 5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.
संत्रा/मोसंबी बागेत 00:52:34 खत 15 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड
बघून फवारणी करावी. मृग बहार संत्रा/मोसंबी बागेत किडींचा प्रादुर्भाव दिसून
आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी डायकोफॉल 25-30 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून
पावसाची उघाड बघून फवारणी करावी. संत्रा/मोसंबी बागेत फळगळ दिसून येत असल्यास एनएए 15 पीपीएम ची पावसाची उघाड बघून फवारणी
करावी. डाळींब बागेतील अतिरिक्त फुटवे काढून टाकावेत. डाळींब बागेत 00:52:34 खत 15
ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. डाळींब बागेत किडींचा प्रादुर्भाव दिसून आल्यास याच्या
व्यवस्थापनासाठी डायकोफॉल 25-30 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड
बघून फवारणी करावी. डाळींब बागेत अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. चिकू
बागेत अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे.
भाजीपाला
काढणीस तयार असलेल्या भाजीपाला
पिकांची काढणी करून घ्यावी. भाजीपाला
पिकात जमिनीत वापसा असतांना अंतरमशागतीची कामे करून पिक तण विरहीत ठेवावे. भेंडी
पिकावर पावडरी मिल्ड्यू रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या
व्यवस्थापनासाठी मायक्लोब्यूटॅनिल 10% डब्ल्यूपी 10 ग्रॅम 10 लिटर पाण्यात मिसळून स्टीकरसह पावसाची उघाड बघून
फवारणी करावी.
फुलशेती
काढणीस तयार असलेल्या फुलपिकाची
काढणी करून घ्यावी. फुल पिकात जमिनीत वापसा असतांना अंतरमशागतीची कामे करून पिक तण
विरहीत ठेवावे.
चारा पिके
बहुवार्षिक चारा पिकाला खताचा
दूसरा हप्ता देण्यात यावा. बहुवार्षिक चारा पिकाची पहिली कापणी ऑगस्ट महिन्याच्या
शेवटी करावी.
पशुधन व्यवस्थापन
पावसाळयात पशुचे खाद्य नियोजन
व्यवस्थित ठेवावे व जनावरांचे खाद्य स्वच्छ व कोरडे असावे. शेळ्यांना
पशुवैद्यकाच्या सल्ल्याने जंतनाशकाची औषधी देण्यात यावी.
तुती रेशीम उद्योग
भाजीपाला उत्पादक शेतकरी 1 ते
1.5 एकर क्षेत्रावर रेशीम उद्योगाकडे वळू लागले आहेत. महाराष्ट्र राज्यात तुती
लागवड केलेल्या 100 शेतकऱ्यांपैकी चौथ्या वर्षापर्यंत 40 टक्के रेशी उद्योगाकडे
पाठ फिरवताना दिसत आहेत. ज्या शेतामध्ये पुर्वी तंबाखू, मिरची सारखी पीके किंवा
भाजीपाला घेत असेल अशा ठिकाणी किटकनाशकाचे अंश जमिनीत राहतात. तेथे तुती ची लागवड
करू नये. अतंरप्रवाहि किटकनाशके तुतीच्या पानातून रेशीम किटकाच्या पोटात प्रवेश
करतात व रेशीम किटक मृत पावतात. नविन शेतकऱ्यांनी एक एकर क्षेत्रासाठी 8 टन शेणखत
कुजलेले किंवा 2 टन गांडूळ खत घालणे
आवश्यक आहे. किटकनाशक, बुरशीनाशक, तणनाशक किंवा रासायनीक खत हे सर्व रसायणेच आहेत.
त्याचा वापर कमी केला तरच रेशीम उद्योग होऊ शकतो.
सौजन्य
मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक
मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 40/2024
- 2025 शुक्रवार, दिनांक
– 16.08.2024
No comments:
Post a Comment