Tuesday, 20 August 2024

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 20 ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, धाराशिव, बीड व परभणी जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 40 ते 50 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 21 ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, धाराशिव, बीड, परभणी, लातूर व नांदेड जिल्हयात तर दिनांक 22 ऑगस्ट रोजी नांदेड, लातूर, परभणी व हिंगोली जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

हवामान सारांश / चेतावनी :

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 20 ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, धाराशिव, बीड व परभणी जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 40 ते 50 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 21 ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, धाराशिव, बीड, परभणी, लातूर व नांदेड जिल्हयात तर दिनांक 22 ऑगस्ट रोजी नांदेड, लातूर, परभणी व हिंगोली  जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

सामान्य सल्ला :

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 23 ते 29 ऑगस्ट दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.

संदेश :

पिकात अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करून घ्यावे. पिकात पाण्याचा ताण बसत असल्यास 1% (100 ग्रॅम प्रति 10 लिटर) पोटॅशियम नायट्रेटची (13:00:45) फवारणी करावी. फवारणीची कामे पावसाची उघाड बघून करून घ्यावीत.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

कापूस पिकात रसशोषण करणाऱ्या किडींचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्काची किंवा डायफेनथ्युरॉन 50% डब्ल्यूपी 240 ग्रॅम किंवा फलोनिकॅमिड 50% 60 ग्रॅम प्रति एकर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. कापूस पिकात अंतरमशागतीची कामे करून पिक तण विरहीत ठेवावे. कापूस पिकात हूमणीच्या अळ्या दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी मेटाराईझीयम ॲनोसोप्ली या जैविक बूरशीचा 4 किलो (जास्त प्रादुर्भाव असल्यास 10 ‍किलो) प्रति एकर जमिनीतून वापर करावा. कापूस पिकात पाण्याचा ताण बसत असल्यास 1% (100 ग्रॅम प्रति 10 लिटर) पोटॅशियम नायट्रेटची (13:00:45) फवारणी करावी. कापूस पिकात पातेगळ व बोंडगळ दिसून येत असल्यास एनएए 2.5 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. तूर पिक 45 दिवसाचे झाले असल्यास तूरीचे शेंडे खुडावे यामूळे तूर पिकाला जास्तीत जास्त फांद्या फुटतात. तूर पिकात अंतरमशागतीची कामे करून पिक तण विरहीत ठेवावे. तूर पिकात हूमणीच्या अळ्या दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी मेटाराईझीयम ॲनोसोप्ली या जैविक बूरशीचा 4 किलो (जास्त प्रादुर्भाव असल्यास 10 ‍किलो) प्रति एकर जमिनीतून वापर करावा. तुर पिकात पाने गुंडाळणाऱ्या अळीच्या व्यवस्थापनासाठी 5 % निंबोळी अर्काची किंवा क्विनॉलफॉस 25% 20 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. तुर पिकात पाण्याचा ताण बसत असल्यास 1% (100 ग्रॅम प्रति 10 लिटर) पोटॅशियम नायट्रेटची (13:00:45) फवारणी करावी. वादी धरणे, शेंगा धरण्याच्या अवस्थेत असलेल्या मुग/उडीद पिकात भुरी रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी गंधक 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. मुग/उडीद पिकात विषाणूजन्य रोगग्रस्त झाडे दिसून येत असल्यास रोगग्रस्त उपटून नष्ट करावीत. उडदावरील मावा, तुडतुडे, फुल किडे, पांढरी माशी याच्या प्रभावी नियंत्रणाकरिता डायमेथोएट 30 इसी 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. मका पिकात लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट 5 टक्के  4 ग्रॅम किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

केळी बागेत अंतरमशागतीची कामे करून बाग तण विरहीत ठेवावी. केळी बागेतील रोगग्रस्त पाने काढून टाकावीत. केळी बागेस 50 ग्रॅम पालाश प्रति झाड खतमात्रा दिली नसल्यास देण्यात द्यावी. केळी बागेत बोधांना माती लावावी. आंबा बागेत अंतरमशागतीची कामे करून बाग तण विरहीत ठेवावी. आंबा फळ बागेत रस शोषण करणाऱ्या किडींच्या व्यवस्थापनासाठी इमिडाक्लोप्रिड 4 ते 5 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. द्राक्ष बागेत अंतरमशागतीची कामे करून बाग तण विरहीत ठेवावी. द्राक्ष बागेतील रोगग्रस्त पानाची विरळणी करून घ्यावी. द्राक्ष बागेत शेंडा खूडून घ्यावा. सिताफळ बागेत अंतरमशागतीची कामे करून बाग तण विरहीत ठेवावी.

भाजीपाला

काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी. भाजीपाला पिकात जमिनीत वापसा असतांना अंतरमशागतीची कामे करून पिक तण विरहीत ठेवावे. भेंडी पिकावर पावडरी मिल्ड्यू रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी मायक्लोब्यूटॅनिल 10% डब्ल्यूपी 10 ग्रॅम 10 लिटर पाण्यात मिसळून स्टीकरसह पावसाची उघाड बघून फवारणी करावी.

फुलशेती

काढणीस तयार असलेल्या फुलपिकाची काढणी करून घ्यावी. फुल पिकात अंतरमशागतीची कामे करून पिक तण विरहीत ठेवावे.

पशुधन व्यवस्थापन

पावसाळयात पशुचे खाद्य नियोजन व्यवस्थित ठेवावे व जनावरांच्या खाद्यामध्ये जास्तीत जास्त कोरडया चाऱ्याचा वापर करावा. शेळ्यांना पशुवैद्यकाच्या सल्ल्याने जंतनाशकाची औषधी देण्यात यावी.

 

सौजन्‍य

मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक41/ 2024- 2025    मंगळवार, दिनांक – 20.08.2024

 

 

 

No comments:

Post a Comment

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 04 एप्रिल रोजी बीड, धाराशिव, नांदेड, हिंगोली, लातूर व परभणी जिल्हयात तर दिनांक 05 एप्रिल रोजी लातूर व धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक 06 ते 08 एप्रिल दरम्यान तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. पुढील चोवीस तासात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही व त्यानंतर हळूहळू 3 ते 4 अं.से. ने वाढ होण्याची तर पुढील चोविस तासात किमान तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही व त्यानंतर हळूहळू 2 ते 3 अं.से. ने वाढ होण्याची शक्यता आहे.

    हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या...