हवामान सारांश / चेतावनी :
प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार पुढील पाच दिवस आकाश अंशत: ढगाळ
ते ढगाळ राहून, दिनांक 24 सप्टेंबर रोजी नांदेड, हिंगोली, परभणी व बीड जिल्हयात वादळी वारा,
मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 40 ते 50 कि.मी.) राहून तूरळक
ठिकाणी मुसळधार ते खूप मुसळधार तर जालना, छत्रपती संभाजी नगर व धाराशिव जिल्हयात
वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.)
राहून तूरळक ठिकाणी मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 25 सप्टेंबर
रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी व हिंगोली जिल्हयात वादळी वारा, मेघगर्जना,
विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 40 ते 50 कि.मी.) राहून तूरळक ठिकाणी
मुसळधार तर नांदेड, लातूर, बीड व धाराशिव जिल्हयात वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा
कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तूरळक ठिकाणी हलक्या ते
मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 26 सप्टेंबर रोजी जालना व छत्रपती
संभाजी नगर जिल्हयात वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक
(ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तूरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची
शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक 27 सप्टेंबर रोजी हलक्या ते मध्यम तर दिनांक 28
सप्टेंबर रोजी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील दोन ते
तीन दिवसात कमाल तापमानात 2 ते 3 अं.से. ने घट होऊन त्यानंतर 3 ते 4 अं.से. ने वाढ
होण्याची शक्यता आहे तर पुढील चोवीस तासात किमान तापमानात फारशी तफावत जाणवणार
नाही व त्यानंतर 2 ते 3 अं.से. ने घट होण्याची शक्यता आहे
सामान्य सल्ला :
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस)
मराठवाडयात दिनांक 27 सप्टेंबर ते 03 ऑक्टोबर दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त,
कमाल तापमान सरासरीएवढे व किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.
संदेश :
प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेला पावसाच्या अंदाज पाहता ज्या शेतकऱ्यांनी
पिकाची काढणी केली असल्यास काढणी केलेल्या पिकाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.
काढणी न केलेल्या पिकाची काढणी पुढे ढकलावी, फवारणीची कामे दोन दिवस पुढे ढकलावीत
किंवा पावसाची उघाड बघून करावीत.
वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण
कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि
सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
मागील काही दिवसात झालेला पाऊस व पूढील पावसाच्या अंदाजानूसार पाऊस
झालेल्या ठिकाणी कापूस, तूर व मका पिकात अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते शेता
बाहेर काढण्याची व्यवस्था करावी व पिकात पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी.
कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी हेक्टरी 5 गुलाबी
बोंडअळीसाठीचे कामगंध सापळे लावावेत. कापूस पिकातील डोमकळ्या वेचून नष्ट कराव्यात.
कापूस पिकात बोंडसड दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी, पायराक्लोस्ट्रोबीन
20% - 10 ग्रॅम किंवा मेटीराम 55% + पायराक्लोस्ट्रोबीन 5% (पूर्व मिश्रित
बुरशीनाशक)- 20 ग्रॅम किंवा प्रोपीकोनॅझोल 25% - 10 मिली किंवा ॲझोक्सिस्ट्रॉबीन
18.2% + डायफेनोकोनॅझोल 11.4% (पूर्व मिश्रित बुरशीनाशक) - 10 मिली किंवा
प्रोपीनेब 70% - 25 ते 30 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून
फवारणी करावी. कापूस पिकात मॅग्नेशियम सल्फेट 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून
पावसाची उघाड बघून फवारणी करावी. कापूस पिकात पातेगळ व बोंडगळ दिसून येत असल्यास एनएए
4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. तुर पिकात
पाने गुंडाळणाऱ्या अळीच्या व्यवस्थापनासाठी 5 % निंबोळी
अर्काची किंवा क्विनॉलफॉस 25% 20 मिली प्रति 10 लिटर पाण्यात
मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. काढणीस तयार असलेल्या मधु मका पिकाची
काढणी करून घ्यावी. रब्बी ज्वारीची लागवड मध्यम ते भारी पाण्याचा निचरा होणाऱ्या
जमिनीत करावी. हलकी जमिन शक्यतो टाळावी कारण अशा जमिनीत पाणी धरून ठेवण्याची
क्षमता राहत नाही मग पिकाच्या संवेदनशील काळात पाणी कमी पडते. रब्बी सूर्यफुलाची
लागवड मध्यम ते भारी ओलावा टिकवून ठेवणाऱ्या, उत्तम निचरा असणाऱ्या व जमिनीचा सामू
6.5 ते 8 असणाऱ्या जमिनीत करावी. पाणथळ किंवा आम्लयूक्त जमिन लागवडीसाठी टाळावी.
फळबागेचे व्यवस्थापन
मागील काही दिवसात झालेला पाऊस व पूढील पावसाच्या अंदाजानूसार पाऊस
झालेल्या ठिकाणी केळी, आंबा, द्राक्ष व सिताफळ बागेत अतिरिक्त पाणी साचले असल्यास
ते बागे बाहेर काढण्याची व्यवस्था करावी व बागेत पाणी साचणार नाही याची दक्षता
घ्यावी. पावसाचा अंदाज लक्षात घेऊन केळी
बागेत 50 ग्रॅम नत्र प्रति झाड देण्यात यावे.
आंबा बागेत सध्याच्या ढगाळ
वातावरणामूळे किडींचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास, बागेत किटकनाशकाची पावसाची
उघाड बघून फवारणी करावी. पावसाचा अंदाज पाहता, द्राक्ष बागेत पूर्व छाटणीची कामे पुढे
ढकलावीत. द्राक्ष बागेत रोगग्रस्त पानांची विरळणी करावी. सिताफळ बागेत पिठया ढेकून
किडीचा प्रादूर्भाव दिसून आल्यास निंबोळी तेल 50 मिली किंवा लिकॅनिसिलीयम लिकॅनी 40 ग्राम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड
बघून फवारणी करावी. सिताफळ बागेतील वाळलेल्या फांद्याची
छाटणी करावी.
भाजीपाला
काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी. मागील
काही दिवसात झालेला पाऊस व पूढील पावसाच्या अंदाजानूसार पाऊस झालेल्या ठिकाणी
भाजीपाला पिकात अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते शेता बाहेर काढण्याची व्यवस्था
करावी व शेतात पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी.
फुलशेती
काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी करून घ्यावी. मागील काही
दिवसात झालेला पाऊस व पूढील पावसाच्या अंदाजानूसार पाऊस झालेल्या ठिकाणी फुल पिकात
अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते शेता बाहेर काढण्याची व्यवस्था करावी व शेतात पाणी
साचणार नाही याची दक्षता घ्यावी.
पशुधन व्यवस्थापन
तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज लक्षात घेता, जनावरांना उघडयावर सोडू किंवा बांधू नये. निवा-याच्या ठिकाणी बांधावे व पावसात भिजणार
नाहीत याची काळजी घ्यावी.
सौजन्य
मुख्य प्रकल्प
समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक
क्रमांक – 51/
2024- 2025 मंगळवार,
दिनांक – 24.09.2024
No comments:
Post a Comment