प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवस आकाश
स्वच्छ व हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील दोन दिवसात कमाल
तापमानात 1 ते 2 अं.से. वाढ होऊन त्यानंतर 1 ते 2 अं.से. ने घट होण्याची तर पुढील
तीन ते चार दिवसात किमान तापमानात 2 ते 3 अं.से. ने घट होऊन त्यानंतर हळूहळू 2 ते
3 अं.से. ने वाढ होण्याची शक्यता आहे.
सामान्य सल्ला :
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस)
मराठवाडयात दिनांक 24 ते 30 जानेवारी 2025 दरम्यान पाऊस
नाही, कमाल तापमान सरासरीएवढे व किमान तापमान सरासरीएवढे व दिनांक 31 जानेवारी ते
06 फेब्रुवारी 2025 दरम्यान पाऊस नाही, कमाल तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा
जास्त व किमान तापमान छत्रपती संभाजी नगर व जालना जिल्हयात सरासरीपेक्षा जास्त तर
इतर जिल्हयात सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.
संदेश : पिकास,
फळबागेस, भाजीपाला व फुल पिकास आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे.
वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
ऊस पिकास आवश्यकतेनूसार पाणी
द्यावे. ऊस पिकात खूरपणी करून तण नियंत्रण करावे. हंगामी/सुरू ऊस पिकाची लागवड करावी. हंगामी ऊसाची लागवड 15 फेब्रूवारी पर्यंत
करता येते. हळद
पिकात आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. हळद पिकाच्या काढणीस साधारणत:
फेब्रूवारी महिन्या सूरूवात होते काढणी करण्यापूर्वी पंधरा दिवस आधी पिकाला पाणी देणे बंद करावे. हरभरा पिकास आवश्यकतेनूसार तूषार सिंचन
पध्दतीने पाणी द्यावे. हरभरा पिकात पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी. ढगाळ
वातावरणामूळे हरभरा पिकात घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या
व्यवस्थानासाठी शेतामध्ये इंग्रजी T आकाराचे प्रति एकर 20 पक्षी थांबे लावावेत व घाटेअळीच्या
सर्वेक्षणासाठी प्रति एकरी 2 कामगंध सापळे लावावेत. हरभरा पिकात घाटे अळीच्या
व्यवस्थानासाठी हरभरा पीक फुलोरा अवस्थेत असतांना
5 %
निंबोळी अर्काची किंवा 300 पीपीएम अझाडीरेकटीन 50 मिली प्रति 10 लिटर पाणी याप्रमाणे फवारणी घ्यावी. अळी अवस्था लहान असताना
एच.ए.एन.पी.व्ही 500 एल.ई. विषाणूची 10 मिली प्रति 10 लिटर पाणी (200 मिली प्रति एकर) याप्रमाणे फवारणी करावी. तर किडीने आर्थिक नुकसानीची
पातळी ओलांडल्यानंतर इमामेक्टिन बेंझोएट 5 % - 4.5 ग्रॅम प्रती 10 लिटर पाणी याप्रमाणे (प्रती एकर 88 ग्रॅम) किंवा क्लोरॅट्रानिलीप्रोल 18.5 % - 3 मिली प्रती 10 लिटर पाणी याप्रमाणे (प्रती
एकर 60 मिली)
किंवा फ्लुबेंडामाईड 20 % - 5 ग्रॅम
प्रती 10 लिटर
पाणी याप्रमाणे (प्रती एकर 125 ग्रॅम) फवारावे. करडई पिकात माव्याचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या
व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30% 13 मिली किंवा असिफेट 75% 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. करडई
पिकात आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. उन्हाळी तीळ पिकाच्या पेरणीसाठी
पूर्वमशागतीची कामे केली नसल्यास लवकरात लवकर करून घ्यावीत. उन्हाळी तीळ पिकाच्या पेरणीसाठी
एकेटी-101, एकेटी-103, जेएलटी-408, एकेटी-64, एनटी-11-91 या वाणांपैकी वाणाची निवड
करावी. उन्हाळी तीळ पिकाची पेरणी फेब्रुवारीच्या दूसऱ्या आठवड्या पर्यंत करता
येते.
फळबागेचे व्यवस्थापन
संत्रा/मोसंबी बागेत
आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. संत्रा/मोसंबी बागेत अन्नद्रव्याची कमतरता
दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 00:52:34 15 ग्रॅम प्रति 10 लिटर
पाण्यात मिसळून फवारणी करावी. काढणीस असलेल्या डाळींब फळांची काढणी करून
घ्यावी. डाळींब फळांची काढणी झाल्यानंतर बागेतील वाळलेल्या व रोगग्रस्त फांद्या काढून
टाकाव्यात व बाग स्वच्छ करावी. डाळींब बागेस आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. चिकू बागेत अंतरमशागतीची कामे करून तण
नियंत्रण करावे व आवश्यकतेनूसार पाणी द्यावे.
भाजीपाला
वांगे भाजीपाला पिकात शेंडा आणि
फळ पोखरणाऱ्या अळीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास प्रादूर्भाव ग्रस्त शेंडे व
फळे गोळा करून नष्ट करावेत व त्याच्या व्यवस्थापनासाठी शेतात एकरी 2 कामगंध सापळे
लावावेत किंवा क्लोरँट्रानिलीप्रोल 18.5% एससी 4 मिली किंवा क्लोरपायरीफॉस 20% एससी 20 मिली किंवा सायपरमेथ्रीन 10% ईसी 11 मिली प्रति 10 लिटर
पाण्यात मिसळून फवारणी करावी. भाजीपाला पिकात खूरपणी करून भाजीपाला पिक तण विरहीत
ठेवावे व आवश्यकतेनूसार पाटाने पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची
पिकाची काढणी करून घ्यावी. उन्हाळी हंगामासाठी (टोमॅटो, वांगे, मिरची) भाजीपाला
पिकाची रोपे तयार करण्यासाठी गादी वाफ्यावर बी टाकावे तर वेलवर्गीय व भेंडी पिकाची
लागवड करावी.
फुलशेती
फुल पिकात खूरपणी करून फुल पिक
तण विरहीत ठेवावेत व आवश्यकतेनूसार पाटाने पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या
फुलांची काढणी करून घ्यावी.
तुती रेशीम उद्योग
भारत देशात 6 ते 7 प्रकारचे कोळी
किटकांचा तुती बागेवर प्रादूर्भाव होतो त्यात टेट्रानायचस इक्विटो रोस व
टेट्रानायचस लूडिनी हृया होत. कुन्नूर तमिळनाडू येथे प्रथम इयूटेट्रानायचस
अरीयंटलीस या कोळी किटकाचा तुती बागेवर प्रादुर्भाव दिसून आला. पिवळे ब्रॉड माइट
या बहुभक्षी कोळी किटकाचा पॉली फॅगोटेट्रानिमस लॅटस कुन्नूर तमीळनाडू येथे तुती
बागेत प्रादूर्भाव आढळुन प्रथम हा दुर्मीळ प्रादूर्भाव करणारा कोळी किटक मोठ्या
प्रमाणावर तुती बागेवर प्रादूर्भाव करत आहे. सन 2019-20 मध्ये कर्नाटक व तमिळनाडू
राज्यातील तुती बागेचे नुकसान करत असून सन 2022-23 मध्ये महाराष्ट्र राज्यातील
तुती बागेत दिसून आला आहे. तुतीची नविन वाढ जळाल्यासारखे पिवळे पडताव व वाळतात.
बागेवर 80 टक्के गंधक 3 ग्रॅम प्रति लिटर फवारणी करावी नंतर 5 दिवसांनी तुती पाने
खाऊ खालावेत.
पशुधन व्यवस्थापन
जनावरे आजारी पडू नयेत म्हणून
पशुवैद्यकाच्या सल्ल्याने जनावरांना जंतनाशक पाजावेत व लसीकरण करून घ्यावे. दूध व्यवसाय करताना आपल्या शंकांच्या
निरसनासाठी अनुक्रमे 18002330418 आणि 18002333268 या टोल फ्रि क्रमांकावर कॉल करून
पशुसंवर्धन खाते व पशुवैद्यक विद्यापीठाशी संपर्क करा.
सौजन्य
मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक
मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 86/2024
- 2025 शुक्रवार, दिनांक
– 24.01.2025
No comments:
Post a Comment