हवामान सारांश / चेतावनी :
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवस
हवामान कोरडे राहण्याची शक्यता असून दिनांक 22 व 23 जानेवारी रोजी मराठवाडयाच्या उत्तर भागात सकाळी धुके राहण्याची शक्यता
आहे. मराठवाडयात पुढील चोवीस तासात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही तर
दिनांक 22 व 23 जानेवारी रोजी किंचित घट होऊन त्यानंतर वाढ होण्याची शक्यता आहे.
पुढील दोन ते तीन दिवसात किमान तापमानात हळूहळू वाढ होऊन त्यानंतर किंचित घट
होण्याची शक्यता आहे.
सामान्य सल्ला :
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस)
मराठवाडयात दिनांक 24 ते 30 जानेवारी 2025 दरम्यान पाऊस
सरासरीपेक्षा कमी, कमाल तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान
सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे.
संदेश :
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवस
हवामान कोरडे राहण्याची शक्यता लक्षात घेता पिकास, फळबागेस, भाजीपाला व फुल पिकास
आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे.
वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण
कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि
सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
कुठल्याही परिस्थितीत कापसाची फरदड (खोडवा) घेऊ नये. कापूस पिकाची
शेवटची वेचणी पूर्ण झाल्यावर कापूस पिकाचा पालापाचोळा, पराट्या जमा करून त्यांची
योग्य विल्हेवाट लावावी. काढणीस तयार असलेल्या तूर पिकाची काढणी करावी व मळणी करून
सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. रब्बी ज्वारी पिकात लष्करी अळीचा प्रादुर्भाव
दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट 5 टक्के 4 ग्रॅम किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली
प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटून फवारणी करावी.
फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी. रब्बी ज्वारी
पिकात आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. गहू पिकास कांडी धरण्याच्या अवस्थेत
(पेरणी नंतर 40 ते 45 दिवस) व पिक फुलावर असतांना (पेरणीनंतर 65 ते 70 दिवस) पाणी
द्यावे. उन्हाळी भुईमूग पिकाची पेरणी 8
फेब्रुवारी पर्यंत करता येते. उन्हाळी भुईमूग पिकाच्या पेरणीसाठी एस.बी.11, टीएजी
24, एलजीएन-1, टीएलजी-45, टीजी 26, जेएल 24, जेएल 220 या वाणांपैकी वाणाची निवड
करावी. वेळेवर पेरणी केलेल्या मका पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. वेळेवर पेरणी
केलेल्या मका पिकात लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी
इमामेक्टीन बेन्झोऐट 5 टक्के 4 ग्रॅम
किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वरील
किटकनाशकांची आलटून पालटून फवारणी करावी. फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात
पडेल अशाप्रकारे फवारणी करावी.
फळबागेचे व्यवस्थापन
केळी बागेस आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. केळी बागेत
फळांचा आकार वाढवण्यासाठी 00:52:34 1.5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी
करावी. केळी बागेत करपा (सिगाटोका) रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास, याच्या
व्यवस्थापनासाठी प्रोपिकोनॅझोल 10% ईसी 10 मिली किंवा मेटीराम 55% + पायरॅक्लोस्ट्रोबीन
5% डब्ल्यू जी 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी
करावी. केळी बागेत तण व्यवस्थापन करावे व बोधांना माती लावावी. आंबा बागेत
आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. आंबा बाग सध्या फुलधारण अवस्थेत आहे, बागेत
परागीकरण व्यवस्थीत होण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या किटकनाशकाची फवारणी करू नये. द्राक्ष
बागेस आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे.
भाजीपाला
भाजीपाला (मिरची, वांगे व भेंडी) पिकात रसशोषण करणाऱ्या किडीचा
प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यस्थापनासाठी पायरीप्रॉक्सीफेन 5% + फेनप्रोपाथ्रीन 15% 10 मीली किंवा डायमेथोएट 30% 13 मीली प्रती 10 लिटर
पाण्यात मिसळून फवारणी करावी. वांगे भाजीपाला पिकात शेंडा
आणि फळ पोखरणाऱ्या अळीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास प्रादूर्भाव ग्रस्त शेंडे
व फळे गोळा करून नष्ट करावेत व त्याच्या व्यवस्थापनासाठी शेतात एकरी 2 कामगंध
सापळे लावावेत किंवा क्लोरँट्रानिलीप्रोल 18.5% एससी 4 मिली
किंवा क्लोरपायरीफॉस 20% एससी 20 मिली किंवा सायपरमेथ्रीन 10%
ईसी 11 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. भाजीपाला
पिकात खूरपणी करून भाजीपाला पिक तण विरहीत ठेवावे व आवश्यकतेनूसार पाटाने पाणी
द्यावे. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची पिकाची काढणी करून घ्यावी.
फुलशेती
फुल पिकात खूरपणी करून फुल पिक तण विरहीत ठेवावेत व आवश्यकतेनूसार
पाटाने पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी करून घ्यावी.
पशुधन व्यवस्थापन
जनावरे आजारी पडू नयेत म्हणून पशुवैद्यकाच्या सल्ल्याने जनावरांना
जंतनाशक पाजावेत व लसीकरण करून घ्यावे.
दूध व्यवसाय करताना आपल्या शंकांच्या निरसनासाठी अनुक्रमे 18002330418 आणि
1800233 3268 या टोल फ्रि क्रमांकावर कॉल करून पशुसंवर्धन खाते व पशुवैद्यक
विद्यापीठाशी संपर्क करा.
सौजन्य
मुख्य प्रकल्प
समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक
क्रमांक – 85/
2024- 2025 मंगळवार,
दिनांक – 21.01.2025
No comments:
Post a Comment