Friday, 30 May 2025

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 30 व 31 मे रोजी मराठवाडयात तूरळक ठिकाणी वादळीवाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या तर दिनांक 1 ते 3 जून दरम्यान तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. पुढील तीन दिवसात कमाल तापमानात हळूहळू 2 ते 4 अं.से. ने वाढ होऊन त्यानंतर फारशी तफावत जाणवनार नाही तर पुढील पाच दिवसात किमान तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही.

हवामान सारांश / चेतावनी :

सामान्य सल्ला :

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 30 मे ते 05 जून 2025 दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी, कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीपेक्षा कमी व दिनांक  06 ते 12 जून 2025 दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी, कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार मराठवाडयात बाष्पोत्सर्जनाचा वेग कमी झालेला आहे.

संदेश : प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार पुढील आठवड्यात पाऊस हा सरासरीपेक्षा कमी असल्यामूळे, शेतकरी बांधवांनी पेरणीची घाई करू नये. जमिनित वापसा असतांना पूर्व मशागतीची कामे राहिली असल्यास पूर्व मशागतीची कामे करून घ्यावीत.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

सोयाबीन पेरणीसाठी अति लवकर येणारे वाण: परभणी सोना (एमएयुएस-47), लवकर येणारे वाण: एमएयूएस-71 (समृध्दी), एमएयुएस-158, एमएयुएस-612, जवाहर (जेएस-335), शक्ती (एमएयुएस-81), मध्यम उशिरा येणारे वाण: प्रसाद (एमएयुएस-1), प्रतिकार (एमएयूएस-61), एमएयुएस-162, प्रतिष्ठा (एमएयूएस 61-2) इत्यादी वाणांचा वापर करावा. सोयाबीन पिकाच्या पेरणीपूर्वी शेतकऱ्यांनी बियाण्याची उगवण क्षमता तपासून घ्यावी. उगवण क्षमता 70 % पेक्षा जास्त असेल तरच बियाणे पेरणीसाठी वापरावे. जमिनित वापसा असतांना पूर्व मशागतीची कामे राहिली असल्यास पूर्व मशागतीची कामे करून घ्यावीत. खरीप ज्वारी पेरणीसाठी संकरीत वाण: सीएसएच-14, सीएसएच-16, सीएसएच-25 (परभणी साईनाथ), सुधारीत वाण: परभणी शक्ती, पीव्हीके-809, पीव्हीके-801 (परभणी श्वेता) इत्यादी वाणांचा वापर करावा. जमिनित वापसा असतांना पूर्व मशागतीची कामे राहिली असल्यास पूर्व मशागतीची कामे करून घ्यावीत. बाजरीच्या पेरणीसाठी संकरीत वाण: सबुरी, श्रध्दा, शांती, एएचबी-1269, एएचबी-1200 (एफई) सुधारीत वाण: आयसीटीपी, समृध्दी, परभणी संपदा या वाणांचा वापर करावा. जमिनित वापसा असतांना पूर्व मशागतीची कामे राहिली असल्यास पूर्व मशागतीची कामे करून घ्यावीत. ऊस पिकावर पांढऱ्या माशीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास, प्रादुर्भावग्रस्त पाने काढून नष्ट करावीत, पिवळ्या चिकट सापळ्यांचा पिकात वापर करावा, रासायनिक कीटकनाशकामध्ये व्यवस्थापनासाठी क्लोरोपायरीफॉस  20 टक्के 30 मिली किंवा इमिडाक्लोप्रिड 17.8 टक्के 3 मिली किंवा ॲसीफेट 75% 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे. ऊस पिकावर खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरपायरीफॉस 20 % 25 मिली किंवा क्लोरॅट्रानोलीप्रोल 18.5% 4 मिली प्रति 10 लीटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. हळद लागवडीसाठी सेलम, कृष्णा, राजापूरी, फुले स्वरुप या सुधारीत जातींची निवड करावी.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

संत्रा/मोसंबी लागवडीसाठी 1X1X1 मीटर या आकाराचे खड्डे घेऊन त्यात अर्धा किलो सुपर फॉस्फेट, 3 ते 4 घमेली शेणखत किंवा कंपोस्टखत व पोयटा माती यांनी खड्डे भरून घ्यावे. संत्रा नविन बाग लागवडीसाठी नागपूर संत्रा, किन्नो तर मोसंबी नविन बाग लागवडीसाठी न्यूसेलर, सातगुडी व फुले मोसंबी इत्यादी जातींची निवड करावी. लागवडीसाठी शासकीय नोंदणीकृत रोपवाटीकेतूनच रोपांची खरेदी करावी. अंबे बहार संत्रा/मोसंबी बागेत रोगनाशकाची फवारणी पावसाची उघाड बघून करावी. डाळिंब लागवडीसाठी घेतलेले खड्डे चांगली माती + चांगले कुजलेले व रापलेले शेणखत + 1 ते 1.5 किलो सिंगल सुपर फॉस्फेट + पालापाचोळा यांनी जमिनीपासून वर 15 ते 20 सेंमी खड्डे भरून घ्यावेत व मधोमध एक बांबूची काठी लावावी.  डाळींब नविन बाग लागवडीसाठी भगवा, फुले भगवा सुपर, गणेश, फुले आरक्ता, इत्यादी जातींची निवड करावी. लागवडीसाठी शासकीय नोंदणीकृत रोपवाटीकेतूनच रोपांची खरेदी करावी. चिकू लागवडीसाठी घेतलेले 1X1X1 मीटर आकाराचे खड्डे अर्धा किलो सुपर फॉस्फेट, 1:3 या प्रमाणात शेणखत + माती या मिश्रणाने खड्डे भरावे. चिकू नविन बाग लागवडीसाठी कालीपत्ती, क्रिकेट बॉल इत्यादी जातींची निवड करावी. लागवडीसाठी शासकीय नोंदणीकृत रोपवाटीकेतूनच रोपांची खरेदी करावी.

भाजीपाला

खरीप हंगामात भाजीपाला लागवडीसाठी रोपे तयार करण्यासाठी गादी वाफे तयार करून घ्यावेत. मिरची पिकाच्या लागवडीसाठी परभणी तेजस, पूसा ज्वाला, अग्नीरेखा, फुले ज्योती, जी-4, जी-3 इत्यादी जातींची निवड करावी. टोमॅटो पिकाच्या लागवडीसाठी देवगिरी, परभणी यशश्री, ए.टी.एच-1, पुसारूबी, धनश्री, भाग्यश्री, आर्कारक्षक इत्यादी जातींची निवड करावी. काढणीस तयार आसलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करावी.

फुलशेती

खरीप हंगामात फुलपिकांच्या लागवडीसाठी रोपे तयार करण्यासाठी गादी वाफे तयार करून घ्यावेत. गुलाब पिकाच्या लागवडीसाठी ग्लॅडीयटर, सुपर स्टार, डबल डिलाईट, रेड मास्टर पीस इत्यादी जातींची निवड करावी. काढणीस तयार असलेल्‍या फुलपिकांची काढणी करून घ्यावी.

तुती रेशीम उद्योग

तुती रोपवाटीका जुन महिन्यात एक एकर क्षेत्रासाठी 2 गुंठे क्षेत्रावर गादी वाफे करावेत. 50X3X1.5 फुट (लांबी-रुंदी-उंची) आकाराचे 3 गादी वाफे करावेत. 06 ते 08 महिने वयाचे तुती बेणे करण्यासाठी निवडावी. 3 ते 4 डोळे असलेले बेणे पेन्सील आकाराचे निवडून धारदार सिकेटरच्या साहाय्याने डोळ्याच्या लगत खालील बाजूस स्लॅटींग कट व 3 डोळ्याच्या वरच्या डोळया लगत फ्लॅट कट घेऊन बेणे तयार करावे. बेणे तयार करताना बेण्याची साल फाटणार नाही याची काळजी घ्यावी. रोगीट बेण्याची छाटणी साठी निवड करू नये. 5X3X2 किंवा 6X3X2 फुट पट्टा पध्दत लागवडीसाठी एकरी 6 हजार बेणे लागवड करावी. दोन भाग शेणखत व एक भाग माती या प्रमाणे जमीनीपासून 1.5 फुट उंचीच्या गादी वाफ्यावर 22 सेंमी लांबीचे तुती बेणे दोन ओळीत 15 सेंमी व दोन बेण्यात 10 सेंमी अंतर ठेवून लागवड करावी.

पशुधन व्यवस्थापन

अचानक वातावरणात झालेल्या बदलामूळे वातावरण ओलसर व दमट झाले असून जनावरात रोगाचा प्रादूर्भाव वाढण्याची दाट शक्यता असते त्यामूळे जनावरांचे आरोग्य उत्तम व निरोगबी ठेवण्यासाठी खालील उपाययोजना कराव्यात : 1. जनावरे निवा-याच्‍या ठिकाणी बांधावे व पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्‍यावी 2. पशूधनास खुले पाणी, तलाव किंवा नदीपासून दूर ठेवावे, ट्रक्टर आणि इतर धातूंच्या शेती अवजारांपासून दूर ठेवावे व पशुधनास झाडाखाली जमा होऊ देऊ नये.तसेच पाऊस चालू होण्याच्या वेळी झाडाच्या आडोशाला थांबू नये. 3. पावसाळ्यात गोठयत पाणी साचनार नाही व गोठा ओलसर राहणार नाही याची काळजी घ्यावी.

सौजन्‍य

मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक18/2025 - 2026         शुक्रवार, दिनांक 30.05.2025

Tuesday, 27 May 2025

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 27 मे रोजी छत्रपती संभाजी नगर, परभणी, बीड, हिंगोली व नांदेड जिल्हयात बऱ्याच ठिकाणी तर दिनांक 28 मे रोजी हिंगोली व नांदेड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 40 ते 50 कि.मी.) राहून मूसळधार पावसाची शक्यता आहे. दिनांक 27 मे रोजी लातूर, धाराशिव जिल्हयात बऱ्याच ठिकाणी तर दिनांक 28 मे रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी, बीड, लातूर जिल्हयात तर दिनांक 29 मे रोजी हिंगोली, नांदेड, छत्रपती संभाजी नगर, जालना व परभणी जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 40 ते 50 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 29 ते 31 मे दरम्यान मराठवाडयात तूरळक ठिकाणी वादळीवाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक  30 मे ते 05 जून 2025 दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त, कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार मराठवाडयात बाष्पोत्सर्जनाचा वेग कमी झालेला आहे.

संदेश : सध्याचा पाऊस हा पूर्वमोसमी असल्याने शेतकरी बांधवांनी पेरणीची घाई करू नये. काही ठिकाणी हलक्या ते जोरदार पावसाची शक्यता असल्याने पीक कापणी पुढे ढकलावी आणि कापलेले पीक सुरक्षित ठिकाणी साठवावे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

नांगरणी नंतर मोगडणी करावी. मोगडणीनंतर दोन-तिन वखराच्या पाळया द्याव्यात. शेवटची वखरणी करण्यापूर्वी कोरडवाहू कापूस लागवडीसाठी 5 टन व बागायती लागवडीसाठी 10 टन  चांगले कुजलेले शेणखत शेतात समप्रमाणात पसरावे. कापूस  पिकाच्या लागवडीसाठी वाण  निवडताना जमिन व हवामान, कोरडवाहू  किंवा बागायती, लागवडीचा प्रकार व वाणांचे गुणधर्म यांचा  विचार करून वाणांची निवड करावी. तुर पिकाच्या पूर्व मशागतीसाठी वखराच्या 2 ते 3 पाळया द्याव्यात. शेवटच्या पाळी अगोदर चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत हेक्टरी 5 टन जमिनीत मिसळून पाळी द्यावी. तुर पिकाच्या पेरणीसाठी बीडीएन-2013-41(गोदावरी), बीडीएन-711, बीएसएमआर-736, बीएसएमआर-853 (वैशाली), बीडीएन-716,  बीडीएन-2, बीडीएन-708 (अमोल), एकेटी 8811, पीकेव्ही तारा किंवा आयसीपीएल 87119 इत्यादी वाणांचा वापर करावा. पावसाळ्यात तूर पिकावरील फायटोप्थोरा करपा टाळण्यासाठी, शेताच्या चारी बाजूस तीन फूट खोल आणि दोन फूट रुंद चर काढावी जेणे करून अतिवृष्टी मध्ये शेतातील मातीची धूप होणार नाही व पिकाचे मुळे सडणार नाहीत. तसेच पुढे चरातील पाणी पाऊस ओसरल्यावर शेतातील पिकास परत कामी येईल. मुग/उडीद लागवडीसाठी कुळवाच्या 2 पाळया द्याव्यात. शेवटच्या कुळवणी अगोदर चांगले कुजलेले शेणखत हेक्टरी 5 टन जमिनीत मिसळून पाळी द्यावी. मुग पेरणीसाठी कोपरगाव, बीएम-4, बीपीएमआर-145, बीएम-2002-1, बीएम-2003-2, फुले मुग 2, पी.के.व्ही.ए.के.एम 4 इत्यादी वाणांचा वापर करावा तर उडीद  लागवडीसाठी बीडीयु-1, टीएयू-1, टीपीयू-4 इत्यादी वाणांचा वापर करावा. भुईमूगाच्या पेरणीसाठी वखराच्या दोन ते तिन पाळया द्याव्यात. शेवटच्या वखरपाळी पूर्वी प्रति हेक्टरी 10 गाडया शेणखत/कंपोस्ट खत पसरून जमिन भुसभूशीत करावी. भुईमूग  पिकाच्या लागवडीसाठी एसबी-11, जेएल-24, एलजीएन-2 (मांजरा), टीएजी-24, टीजी-26, टीएलजी-45, एलजीएन-1, एलजीएन-123  इत्यादी वाणांचा वापर करावा. वखराच्या एक ते दोन पाळया देऊन जमिन तयार करावी. मका  पिकाच्या पेरणीसाठी नवज्योत, मांजरा, डीएमएच-107, केएच-9451, एमएचएच, प्रभात, करवीर, जेके-2492, महाराजा, यूवराज इत्यादी वाणांचा वापर करावा.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

केळीच्या नवीन लागवडीसाठी लागवड करण्या अगोदर हेक्टरी 90 ते 100 गाड्या चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत लागवडीपूर्वी जमिनीत मिसळून द्यावे. नविन केळी बाग लागवडीसाठी ग्रँड नाईन, अर्धापूरी, बसराई (देशावर), श्रीमंती, फुले प्राईड इत्यादी जातींचा वापर करावा.पूर्वी लागवड केलेल्या बागेत आं मशागतीची कामे पूर्ण करून घ्यावी. लागवडीसाठी शासकीय नोंदणीकृत रोपवाटीकेतूनच रोपांची खरेदी करावी. तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज लक्षात घेता, नविन लागवड केलेल्या व लहान केळी झाडांना काठीने आधार द्यावा. आंब्याच्या नवीन लागवडीसाठी 1X1X1 मीटर आकाराचे खड्डे घेऊन त्यात अर्धा किलो सूपर फॉस्फेट व 50 किलो शेणखत ‍किंवा कंपोस्ट खत टाकावे व पोयटा मातीने सर्व मिश्रणासहीत खड्डा भरून घ्यावा. नविन आंबा बाग लागवडीसाठी केसर, पायरी, तोतापूरी, निलम, सिंधू, साईसुगंध, वनराज, लंगडा, रत्ना, परभणी भूषण, निरंजन मल्लीका, दशेहरी इत्यादी जातींचा वापर करावा. लागवडीसाठी शासकीय नोंदणीकृत रोपवाटीकेतूनच रोपांची खरेदी करावी. तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज लक्षात घेता, नविन लागवड केलेल्या व लहान आंबा झाडांना काठीने आधार द्यावा. द्राक्ष बागेतील रोगग्रस्त पाने काढून टाकावीत व रोगनाशकाची फवारणी करावी. सिताफळाच्या नवीन लागवडीसाठी 45X45X45 सें.मी. या आकाराचे खड्डे घेऊन त्यात एक ते दिड घमेले चांगले कुजलेले शेणखत अथवा कंपोस्ट खत, अर्धा किलो सुपर फॉस्फेट, फॉलीडॉल पावडर घालून व चांगल्या मातीच्या मिश्रणाने ते भरावे. नविन सिताफळ बाग लागवडीसाठी बालानगर, टिपी-7, धारुर-6, अर्कासहान इत्यादी जातींचा वापर करावा. लागवडीसाठी शासकीय नोंदणीकृत रोपवाटीकेतूनच रोपांची खरेदी करावी. तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज लक्षात घेता, नविन लागवड केलेल्या व लहान सिताफळ झाडांना काठीने आधार द्यावा.

भाजीपाला

खरीप हंगामात भाजीपाला लागवडीसाठी जमिनीची पूर्व मशागत करून घ्यावी. काढणीस तयार आसलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करावी.

फुलशेती

खरीप हंगामात फुलपिकाच्या लागवडीसाठी जमिनीची पूर्व मशागत करून घ्यावी. काढणीस तयार असलेल्‍या फुलपिकांची काढणी करून घ्यावी.

पशुधन व्यवस्थापन

तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार व हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज लक्षात घेता चेतावनीच्या काळात जनावरे शक्यतो चरावयास बाहेर नेऊ नयेत. जनावरांना उघडयावर सोडू किंवा बांधू नये, निवाऱ्याच्या ठिकाणी बांधावे व पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्यावी. जनावरांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी द्यावे.

सौजन्‍य

मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक17/2025- 2026    मंगळवार, दिनांक – 27.05.2025

Friday, 23 May 2025

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 23 मे रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी जिल्हयात बऱ्याच ठिकाणी तर दिनांक 24 मे रोजी परभणी, बीड, हिंगोली, धाराशिव जिल्हयात काही ठिकाणी तर दिनांक 25 मे रोजी छत्रपती संभाजी नगर, नांदेड, लातूर जिल्हयात बऱ्याच ठिकाणी तर दिनांक 26 मे रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड, लातूर जिल्हयात काही ठिकाणी तर दिनांक 27 मे रोजी जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर व धाराशिव जिल्हयात काहि ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 40 ते 50 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 23 मे रोजी बीड, हिंगोली, नांदेड, लातूर व धाराशिव जिल्हयात, दिनांक 24 मे रोजी लातूर व नांदेड जिल्हयात, दिनांक 25 मे रोजी बीड व धाराशिव जिल्हयात, दिनांक 26 मे रोजी धाराशिव जिल्हयात, दिनांक 27 मे रोजी छत्रपती संभाजी नगर व बीड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 40 ते 50 कि.मी.) राहून मुसळधार पावसाची शक्यता आहे. दिनांक 23 ते 27 मे दरम्यान मराठवाडयात तूरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 23 ते 29 मे 2025 दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त, कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीपेक्षा कमी व दिनांक  30 मे ते 05 जून 2025 दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त, कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार मराठवाडयात बाष्पोत्सर्जनाचा वेग किंचित कमी झालेला आहे.

संदेश : प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार मराठवाडयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग राहून मध्यम ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यामूळे काढणीस असलेल्या उन्हाळी पिकाची, फळाची व भाजीपाला पिकाची काढणी लवकरात लवकर करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

ऊस पिकावर पांढऱ्या माशीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास, प्रादुर्भावग्रस्त पाने काढून नष्ट करावीत, पिवळ्या चिकट सापळ्यांचा पिकात वापर करावा, रासायनिक कीटकनाशकामध्ये व्यवस्थापनासाठी क्लोरोपायरीफॉस  20 टक्के 30 मिली किंवा इमिडाक्लोप्रिड 17.8 टक्के 3 मिली किंवा ॲसीफेट 75% 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे. ऊस पिकावर खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरपायरीफॉस 20 % 25 मिली किंवा क्लोरॅट्रानोलीप्रोल 18.5% 4 मिली प्रति 10 लीटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. काढणीस तयार असलेल्या उन्हाळी तीळ पिकाची काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. सोयाबीन पिकाची पेरणी सर्व प्रकारच्या जमिनीत करता येते. परंतु अत्यंत हलक्या जमिनीत अपेक्षित उत्पादन मिळत नाही. जास्त आम्लयुक्त, क्षारयुक्त तथा रेताड जमिनीत सोयाबीनचे पीक घेऊ नये. सोयाबीन लागवडीसाठी मध्यम ते भारी उत्तम निचऱ्याची, सेंद्रिय कर्बाची मात्रा चांगल्या प्रमाणात असलेली जमीन निवडावी. जमिनीचा सामू 6.5 ते 7.5 च्या दरम्यान असणे गरजेचे आहे. खरीप ज्वारी पेरणीसाठी मध्यम ते भारी, उत्तम निचऱ्याची जमीन निवडावी. बाजरी या पिकाच्या पेरणीसाठी पाण्याचा उत्तम निचरा होणारी हलकी ते मध्यम जमीन निवडावी. हळद लागवडीसाठी मध्यम काळी, निचऱ्याची भुसभुशीत, भरपूर सेंद्रिय पदार्थ असलेली जमिन निवडावी, तसेच जमिनीत हराळी, कुंदा, लव्हाळा अशी बहू वार्ष‍िक तणे असू नयेत. जमिनीत पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी. जमिनीचा आम्ल विम्ल निर्देशांक 6.5 ते 7.5 असलेल्या जमिनीत हळदीचे पिक उत्तम येते.  

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

अंबे बहार संत्रा/मोसंबी बागेत 00:52:34 1.5 किलो प्रति 100 लिटर पाण्यात मिसळून फवारणी पावसाची उघाड बघून करावी. अंबे बहार संत्रा/मोसंबी बागेत रोगनाशकाची फवारणी पावसाची उघाड बघून करावी. लहान फळ झाडांना काठीने आधार द्यावा.

भाजीपाला

खरीप हंगामात मिरची, वांगी, टोमॅटो, कांदा या भाजीपाला पिकांच्या लागवडीसाठी मध्यम काळी, निचऱ्याची भुसभुशीत जमिन निवडावी. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करावी. उ भाजीपाला (मिरची, वांगे व भेंडी) पिकात रसशोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यस्थापनासाठी पायरीप्रॉक्सीफेन 5% + फेनप्रोपाथ्रीन 15% 10 मीली किंवा  डायमेथोएट 30% 13 मीली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.

फुलशेती

खुल्या शेतातील गुलाब लागवडीसाठी मध्यम ते हलकी तसेच पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमिन निवडावी. काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी करून घ्यावी.

तुती रेशीम उद्योग

बदलत्या तापमान कमी जास्त होणे व आर्द्रता वाढणे यामुळे हवामानात रेशिम किटक वाढीस समस्या निर्माण होतात संगोपनगृहात जुनी शेडनेट,रॅक, जमीन, यावर साठलेल्या धूळीमार्फत होणाऱ्या प्रादुर्भावामुळे किटकास ग्रासरी किंवा प्लॅचरी रोग प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता असते! किटकसंगोपन चालू असलेल्या शेतकऱ्यांनी 22 ते 28 अंश सेल्सिअस तापमान राहील व आर्द्रता 85 टक्क्यांपेक्षा जास्त वाढू देऊ नये! कात टाकताना चुना पावडर व कात उठताना वीजेचा पावडर चा धुरळणी साठी वापर करावा.

पशुधन व्यवस्थापन

जनावरांना सावलीत बांधावे आणि पिण्यासाठी थंड व स्वच्छ पाण्याचा पूरवठा करावा. जमल्यास पाण्यामधून क्षार द्यावेत, 5 लिटर पाण्यामध्ये चिमुटभर गुळ (25 ग्रॅम), थोडे मिठ (5-10 ग्रॅम) आणि 5 ग्रॅम क्षार मिश्रण दिल्यास उत्तम, मात्र नजीकच्या पशुवैद्यकाचा सल्ला घेऊनच व्यवस्थापन करावे.

तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या पावसाची शक्यता असल्यामूळे चेतावनीच्या काळात जनावरे शक्यतो चरावयास बाहेर नेऊ नयेत. जनावरांना उघडयावर सोडू किंवा बांधू नये, निवाऱ्याच्या ठिकाणी बांधावे व पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्यावी. पशुधनास खुले पाणी तलाव किंवा नदीपासून दुर ठेवावे, ट्रॅकटर आणि इतर धातुंच्या शेती अवजारांपासून दूर ठेवावे व पशुधनास झाडाखाली जमा होऊ देऊ नये, तसेच पाऊस चालू होण्याच्या वेळी झाडाच्या आडोश्याला थांबू नये.

सौजन्‍य

मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक16/2025 - 2026         शुक्रवार, दिनांक 23.05.2025

Tuesday, 20 May 2025

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 20 मे रोजी धाराशिव, लातूर व नांदेड जिल्हयात तर दिनांक 21 मे रोजी छत्रपती संभाजी नगर, बीड व धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 50 ते 60 कि.मी.) राहून मूसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 20 मे रोजी छत्रपती संभाजी नगर, बीड, नांदेड, परभणी, जालना व हिंगोली जिल्हयात तर दिनांक 21 मे रोजी लातूर, नांदेड, परभणी, जालना व हिंगोली जिल्हयात काही ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 40 ते 50 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 22 मे रोजी छत्रपती संभाजी नगर, बीड व जालना जिल्हयात तर दिनांक 23 मे रोजी छत्रपती संभाजी नगर जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 40 ते 50 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 22 व 23 मे रोजी मराठवाडयातील इतर जिल्हयात तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील चार ते पाच दिवसात कमाल तापमानात 2 ते 4 अं.से. ने घट होण्याची तर किमान तापमानात हळूहळू 2 ते 4 अं.से. ने घट होण्याची शक्यता आहे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 23 ते 29  मे 2025 दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त, कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार मराठवाडयात बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे.

संदेश :  प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यामूळे काढणीस असलेल्या पिक, फळाची व भाजीपाला पिकाची काढणी लवकरात लवकर करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

कापूस पिकाच्या लागवडीसाठी मध्यम ते भारी, कसदार व पाण्याचा उत्तम निचरा होणाऱ्या जमिनीची निवड करावी. हलक्या तसेच पाण्याचा निचरा न होणाऱ्या चिबड जमिनीवर कापूस पिकाची लागवड करू नये. कापूस पिकाच्या लागवडीसाठी जमिनीची खोली 60 ते 100 सेंमी असावी. तूर पिकाच्या लागवडीसासठी मध्यम ते भारी (30 ते 45 सेंमी खोल) पाण्याचा उत्तम निचरा होणाऱ्या जमिनीची निवड करावी. चोपन व क्षारयुक्त जमिनीत तूर पिकाची लागवड करू नये. तुर पिकाच्या वाढीस जमिनीचा सामु 6.5 ते 7.5 योग्य असतो. आम्लयुक्त जमिनीत पिकाच्या मुळांवरील गाठींची योग्य वाढ होत नसल्यामुळे रोपे पिवळी पडतात. मूग/उडीद पिकाच्या लागवडीसाठी मध्यम ते भारी जमिनीची निवड करावी. एकदम हलक्या प्रतिची मुरमाड जमिन या पिकास योग्य नाही. पाणी साठवूण ठेवणाऱ्या जमिनीत हे पीक घेऊ नये. काढणीस तयार असलेल्या उन्हाळी भूईमूग पिकाची काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.  भूईमूग पिकाच्या लागवडीसाठी मध्यम ते हलकी, भुसभुशीत, सेंद्रिय पदार्थ आणि कॅल्शियमचे भरपूर प्रमाण असलेल्या जमिनीची निवड करावी. भुसभुशीत जमिनीत भरपूर प्रमाणात हवा खेळती राहते यामुळे मुळांची चांगली वाढ होऊन आऱ्या सुलभरीतीने जमिनीत जाण्यास तसेच शेंगा पोसण्यासाठी मदत होते. मका पिकाच्या लागवडीसाठी मध्यम ते भारी, सुपीक, उत्तम निचऱ्याची जमिनीची निवड करावी.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

मृग बहार केळी पिकाच्या लागवडीसाठी चाऱ्या तयार करून घ्याव्यात. केळी लागवडीसाठी काळी व कसदार, भुसभुशीत गाळाची, पोयटयाची, पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीची निवड करावी. लागवडीसाठी क्षारयुक्त जमिनीची निवड करू नये. नवीन लागवड केलेल्या व लहान झाडांना उन्हापासून संरक्षनासाठी सावली करावी यामुळे कलमांची मर होणार नाही तसेच  बागेत खोडाजवळ आच्छादन करावे. केळी बागेला पाण्याचा ताण बसणार नाही याची काळजी घ्यावी. केळी बागेत ठिंबक सिंचन पद्धतीने सकाळी लवकर किंवा सायंकाळी पाणी व्यवस्थापन करावे. आंबा लागवडीसाठी मध्यम ते भारी प्रतीची पाण्याचा चांगला निचरा होणाऱ्या जमिनीची निवड करावी. चोपन व चुनखडीयुक्त जमिनीत लागवड करू नये. जमिनीची खोली कमीतकमी 1.5 ते 2 मीटर असावी. नविन लागवड केलेल्या आंबा बागेला पाण्याचा  ताण बसणार नाही याची काळजी घ्यावी. नविन लागवड केलेल्या आंबा बागेत ठिंबक सिंचन पद्धतीने सकाळी लवकर किंवा सायंकाळी पाणी व्यवस्थापन करावे. नवीन लागवड केलेल्या व लहान झाडांना उन्हापासून संरक्षनासाठी सावली करावी तसेच  बागेत खोडाजवळ आच्छादन करावे. वेळेवर एप्रिल छाटणी केलेल्या द्राक्ष बागेत आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. द्राक्ष बागेतील रोगग्रस्त पाने काढून टाकावीत व रोगनाशकाची फवारणी करावी. मुरमाड, अत्यंत हलक्या, डोंगर उताराच्या जमिनीत तसेच मध्यम खोल जमिनीत सिताफळ लागवड करावी.

भाजीपाला

खरीप हंगामात मिरची, वांगी, टोमॅटो, कांदा या भाजीपाला पिकांच्या लागवडीसाठी मध्यम काळी, निचऱ्याची भुसभुशीत जमिन निवडावी. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची काढणी करून घ्यावी. भाजीपाला पिकास आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे.

पशुधन व्यवस्थापन

जनावरांना सावलीत बांधावे आणि पिण्यासाठी थंड व स्वच्छ पाण्याचा पुरवठा करावा. पशुधनाकडुन सकाळी 11 ते दूपारी 4 या दरम्यान काम करून घेऊ नये. उष्णतेपासून पशूधनाचे संरक्षण करण्यासाठी गोठयाच्या छतावर गवताचे आच्छादन करावे. पशुधनाचे शेड पत्र्याचे किंवा सिमेंटचे असल्यास त्याला पांढरा रंग द्यावा. पशुधनास मूबलक प्रमाणात हिरवा चारा, प्रथिनेयूक्त, खनिजमिश्रण आणि मिठयूक्त खाद्य द्यावे. तिव्र उष्णतेच्या काळात पशुधनाच्या अंगावर पाणी शिंपडावे किंवा त्यांना पाणोठयावर न्यावे. पशुधनास सकाळी किंवा सायंकाळी चरण्यासाठी सोडावे.

तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार व हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज लक्षात घेता चेतावनीच्या काळात जनावरे शक्यतो चरावयास बाहेर नेऊ नयेत. जनावरांना उघडयावर सोडू किंवा बांधू नये, निवाऱ्याच्या ठिकाणी बांधावे व पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्यावी. पाऊस झालेल्या ठिकाणी पावसाचे पाणी जनावरांच्या पिण्याच्या पाण्या मध्ये मिसळू देऊ नये. जनावरांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी द्यावे.

सौजन्‍य

मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक15/2025- 2026    मंगळवार, दिनांक – 20.05.2025

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 18 जून रोजी छत्रपती संभाजी नगर व जालना जिल्हयात, दिनांक 19 जून रोजी नांदेड, परभणी, हिंगोली, छत्रपती संभाजी नगर व जालना जिल्हयात, दिनांक 20 जून रोजी नांदेड, परभणी व हिंगोली जिल्हयात, तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 40 ते 50 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक 17 ते 21 जून रोजी तूरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील तीन ते चार दिवसात कमाल व किमान तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही.

  हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या अ...