Tuesday, 27 May 2025

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 27 मे रोजी छत्रपती संभाजी नगर, परभणी, बीड, हिंगोली व नांदेड जिल्हयात बऱ्याच ठिकाणी तर दिनांक 28 मे रोजी हिंगोली व नांदेड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 40 ते 50 कि.मी.) राहून मूसळधार पावसाची शक्यता आहे. दिनांक 27 मे रोजी लातूर, धाराशिव जिल्हयात बऱ्याच ठिकाणी तर दिनांक 28 मे रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी, बीड, लातूर जिल्हयात तर दिनांक 29 मे रोजी हिंगोली, नांदेड, छत्रपती संभाजी नगर, जालना व परभणी जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 40 ते 50 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 29 ते 31 मे दरम्यान मराठवाडयात तूरळक ठिकाणी वादळीवाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

 


हवामान सारांश / चेतावनी :

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 27 मे रोजी छत्रपती संभाजी नगर, परभणी, बीड, हिंगोली व नांदेड जिल्हयात बऱ्याच ठिकाणी तर दिनांक 28 मे रोजी हिंगोली  व नांदेड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 40 ते  50 कि.मी.) राहून मूसळधार पावसाची शक्यता आहे. दिनांक 27 मे रोजी लातूर, धाराशिव जिल्हयात बऱ्याच ठिकाणी तर दिनांक 28 मे रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी, बीड, लातूर जिल्हयात तर दिनांक 29 मे रोजी हिंगोली, नांदेड, छत्रपती संभाजी नगर, जालना व परभणी जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 40 ते  50 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 29 ते 31 मे दरम्यान मराठवाडयात तूरळक ठिकाणी वादळीवाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

सामान्य सल्ला :

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक  30 मे ते 05 जून 2025 दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त, कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार मराठवाडयात बाष्पोत्सर्जनाचा वेग कमी झालेला आहे.

संदेश : सध्याचा पाऊस हा पूर्वमोसमी असल्याने शेतकरी बांधवांनी पेरणीची घाई करू नये. काही ठिकाणी हलक्या ते जोरदार पावसाची शक्यता असल्याने पीक कापणी पुढे ढकलावी आणि कापलेले पीक सुरक्षित ठिकाणी साठवावे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

नांगरणी नंतर मोगडणी करावी. मोगडणीनंतर दोन-तिन वखराच्या पाळया द्याव्यात. शेवटची वखरणी करण्यापूर्वी कोरडवाहू कापूस लागवडीसाठी 5 टन व बागायती लागवडीसाठी 10 टन  चांगले कुजलेले शेणखत शेतात समप्रमाणात पसरावे. कापूस  पिकाच्या लागवडीसाठी वाण  निवडताना जमिन व हवामान, कोरडवाहू  किंवा बागायती, लागवडीचा प्रकार व वाणांचे गुणधर्म यांचा  विचार करून वाणांची निवड करावी. तुर पिकाच्या पूर्व मशागतीसाठी वखराच्या 2 ते 3 पाळया द्याव्यात. शेवटच्या पाळी अगोदर चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत हेक्टरी 5 टन जमिनीत मिसळून पाळी द्यावी. तुर पिकाच्या पेरणीसाठी बीडीएन-2013-41(गोदावरी), बीडीएन-711, बीएसएमआर-736, बीएसएमआर-853 (वैशाली), बीडीएन-716,  बीडीएन-2, बीडीएन-708 (अमोल), एकेटी 8811, पीकेव्ही तारा किंवा आयसीपीएल 87119 इत्यादी वाणांचा वापर करावा. पावसाळ्यात तूर पिकावरील फायटोप्थोरा करपा टाळण्यासाठी, शेताच्या चारी बाजूस तीन फूट खोल आणि दोन फूट रुंद चर काढावी जेणे करून अतिवृष्टी मध्ये शेतातील मातीची धूप होणार नाही व पिकाचे मुळे सडणार नाहीत. तसेच पुढे चरातील पाणी पाऊस ओसरल्यावर शेतातील पिकास परत कामी येईल. मुग/उडीद लागवडीसाठी कुळवाच्या 2 पाळया द्याव्यात. शेवटच्या कुळवणी अगोदर चांगले कुजलेले शेणखत हेक्टरी 5 टन जमिनीत मिसळून पाळी द्यावी. मुग पेरणीसाठी कोपरगाव, बीएम-4, बीपीएमआर-145, बीएम-2002-1, बीएम-2003-2, फुले मुग 2, पी.के.व्ही.ए.के.एम 4 इत्यादी वाणांचा वापर करावा तर उडीद  लागवडीसाठी बीडीयु-1, टीएयू-1, टीपीयू-4 इत्यादी वाणांचा वापर करावा. भुईमूगाच्या पेरणीसाठी वखराच्या दोन ते तिन पाळया द्याव्यात. शेवटच्या वखरपाळी पूर्वी प्रति हेक्टरी 10 गाडया शेणखत/कंपोस्ट खत पसरून जमिन भुसभूशीत करावी. भुईमूग  पिकाच्या लागवडीसाठी एसबी-11, जेएल-24, एलजीएन-2 (मांजरा), टीएजी-24, टीजी-26, टीएलजी-45, एलजीएन-1, एलजीएन-123  इत्यादी वाणांचा वापर करावा. वखराच्या एक ते दोन पाळया देऊन जमिन तयार करावी. मका  पिकाच्या पेरणीसाठी नवज्योत, मांजरा, डीएमएच-107, केएच-9451, एमएचएच, प्रभात, करवीर, जेके-2492, महाराजा, यूवराज इत्यादी वाणांचा वापर करावा.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

केळीच्या नवीन लागवडीसाठी लागवड करण्या अगोदर हेक्टरी 90 ते 100 गाड्या चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत लागवडीपूर्वी जमिनीत मिसळून द्यावे. नविन केळी बाग लागवडीसाठी ग्रँड नाईन, अर्धापूरी, बसराई (देशावर), श्रीमंती, फुले प्राईड इत्यादी जातींचा वापर करावा.पूर्वी लागवड केलेल्या बागेत आं मशागतीची कामे पूर्ण करून घ्यावी. लागवडीसाठी शासकीय नोंदणीकृत रोपवाटीकेतूनच रोपांची खरेदी करावी. तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज लक्षात घेता, नविन लागवड केलेल्या व लहान केळी झाडांना काठीने आधार द्यावा. आंब्याच्या नवीन लागवडीसाठी 1X1X1 मीटर आकाराचे खड्डे घेऊन त्यात अर्धा किलो सूपर फॉस्फेट व 50 किलो शेणखत ‍किंवा कंपोस्ट खत टाकावे व पोयटा मातीने सर्व मिश्रणासहीत खड्डा भरून घ्यावा. नविन आंबा बाग लागवडीसाठी केसर, पायरी, तोतापूरी, निलम, सिंधू, साईसुगंध, वनराज, लंगडा, रत्ना, परभणी भूषण, निरंजन मल्लीका, दशेहरी इत्यादी जातींचा वापर करावा. लागवडीसाठी शासकीय नोंदणीकृत रोपवाटीकेतूनच रोपांची खरेदी करावी. तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज लक्षात घेता, नविन लागवड केलेल्या व लहान आंबा झाडांना काठीने आधार द्यावा. द्राक्ष बागेतील रोगग्रस्त पाने काढून टाकावीत व रोगनाशकाची फवारणी करावी. सिताफळाच्या नवीन लागवडीसाठी 45X45X45 सें.मी. या आकाराचे खड्डे घेऊन त्यात एक ते दिड घमेले चांगले कुजलेले शेणखत अथवा कंपोस्ट खत, अर्धा किलो सुपर फॉस्फेट, फॉलीडॉल पावडर घालून व चांगल्या मातीच्या मिश्रणाने ते भरावे. नविन सिताफळ बाग लागवडीसाठी बालानगर, टिपी-7, धारुर-6, अर्कासहान इत्यादी जातींचा वापर करावा. लागवडीसाठी शासकीय नोंदणीकृत रोपवाटीकेतूनच रोपांची खरेदी करावी. तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज लक्षात घेता, नविन लागवड केलेल्या व लहान सिताफळ झाडांना काठीने आधार द्यावा.

भाजीपाला

खरीप हंगामात भाजीपाला लागवडीसाठी जमिनीची पूर्व मशागत करून घ्यावी. काढणीस तयार आसलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करावी.

फुलशेती

खरीप हंगामात फुलपिकाच्या लागवडीसाठी जमिनीची पूर्व मशागत करून घ्यावी. काढणीस तयार असलेल्‍या फुलपिकांची काढणी करून घ्यावी.

पशुधन व्यवस्थापन

तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार व हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज लक्षात घेता चेतावनीच्या काळात जनावरे शक्यतो चरावयास बाहेर नेऊ नयेत. जनावरांना उघडयावर सोडू किंवा बांधू नये, निवाऱ्याच्या ठिकाणी बांधावे व पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्यावी. जनावरांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी द्यावे.

 

सौजन्‍य

मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक17/2025- 2026    मंगळवार, दिनांक – 27.05.2025

 

 

 

 

 

 

No comments:

Post a Comment

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 03 ऑक्टोबर रोजी बीड, नांदेड, लातूर व धाराशिव जिल्हयात तर दिनांक 04 ऑक्टोबर रोजी परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर व धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक 03 व 04 ऑक्टोबर रोजी काही ठिकाणी तर दिनांक 05 ते 07 ऑक्टोबर रोजी तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील दोन ते तीन दिवसात कमाल तापमानात हळूहळू वाढ होऊन त्यानंतर फारशी तफावत जाणवनार नाही व पुढील चार ते पाच दिवसात किमान तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही.

  हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या अ...