हवामान सारांश / चेतावनी :
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 11 जून रोजी नांदेड व
हिंगोली जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 40 ते 50 कि.मी.) राहून मूसळधार पावसाची
शक्यता आहे. दिनांक 12 जून रोजी धाराशिव,
लातूर, नांदेड, परभणी व हिंगोली जिल्हयात, दिनांक 13 जून रोजी धाराशिव, लातूर,
नांदेड व बीड जिल्हयात, दिनांक 14 जून रोजी बीड व छत्रपती संभाजी नगर जिल्हयात तूरळक
ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 50 ते 60 कि.मी.) राहून मूसळधार पावसाची
शक्यता आहे. दिनांक 10 जून रोजी धाराशिव, लातूर, नांदेड, बीड, छत्रपती संभाजी नगर
व जालना जिल्हयात, दिनांक 11 जून रोजी धाराशिव, लातूर, परभणी, छत्रपती संभाजी नगर,
जालना व बीड जिल्हयात, दिनांक 12 जून छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड जिल्हयात,
दिनांक 13 जून रोजी परभणी, हिंगोली, छत्रपती संभाजी नगर, जालना जिल्हयात, दिनांक
14 जून रोजी जालना व धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा
वेग अधिक (ताशी 40 ते 50
कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक
10 ते 12 जून रोजी काही ठिकाणी तर दिनांक 13 व 14 जून रोजी बऱ्याच ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
मराठवाडयात पुढील तीन ते चार दिवसात कमाल तापमानात हळूहळू 2 ते 3 अं.से. ने घट
होण्याची तर पुढील तीन ते चार दिवसात किमान तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही.
सामान्य सल्ला :
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस)
मराठवाडयात दिनांक 13 ते 19 जून 2025 दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त, कमाल तापमान सरासरीएवढे व
किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे.
सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या
बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार मराठवाडयात
बाष्पोत्सर्जनाचा वेग कमी झालेला आहे.
संदेश : शेतकरी बांधवांनी
पेरणीची घाई करू नये. पेरणीयोग्य पाऊस (75 ते 100 मिमी) झाल्यानंतरच पेरणी करावी. जमिनीत
वापसा स्थिती असताना जर पूर्व मशागतीची कामे बाकी असतील, तर ती पूर्ण करून घ्यावीत.
वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण
कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि
सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
पूर्वमशागतीची कामे राहिली असल्यास पूर्वमशागतीची कामे करून
घ्यावीत. बीटी कपाशीमध्ये कापूस + तूर (4-6:1 किंवा 6-8:2), कापूस + सोयाबीन (1:1), कापूस +
मूग (1:1) रुंद ओळींमध्ये कापूस + मूग (1:2), कापूस + उडीद
(1:1) ही आंतरपीक पध्दती घेतल्यास फायदेशीर ठरते. कापूस पिकाच्या लागवडीसाठी वाण निवडताना जमिन व हवामान, कोरडवाहू किंवा बागायती, लागवडीचा प्रकार व वाणांचे
गुणधर्म यांचा विचार करून वाणांची निवड
करावी. पूर्वमशागतीची कामे राहिली असल्यास पूर्वमशागतीची कामे करून घ्यावीत.
तुरीचे उत्पादन वाढविण्यासाठी तसेचे जमिनीची उत्पादकता राखण्यासाठी तुर + बाजरी
(2:4), तुर + सोयाबीन/मुग/उडीद (1:2 किंवा 2:4) असे ओळीचे प्रमाण ठेवून फायदेशीर
आंतरपीक पध्दतीचा वापर केल्यास अधिक फायदा होतो. तुर पिकाच्या पेरणीसाठी बीडीएन-2013-41(गोदावरी),
बीडीएन-711, बीएसएमआर-736, बीएसएमआर-853 (वैशाली), बीडीएन-716, बीडीएन-2, बीडीएन-708 (अमोल), एकेटी 8811,
पीकेव्ही तारा किंवा आयसीपीएल 87119 इत्यादी वाणांचा वापर करावा. पावसाळ्यात तूर
पिकावरील फायटोप्थोरा करपा टाळण्यासाठी, शेताच्या चारी बाजूस तीन फूट खोल आणि दोन फूट
रुंद चर काढावी जेणे करून अतिवृष्टी मध्ये शेतातील मातीची धूप होणार नाही व पिकाचे
मुळे सडणार नाहीत. तसेच पुढे चरातील पाणी पाऊस ओसरल्यावर शेतातील पिकास परत कामी येईल.
पूर्वमशागतीची कामे राहिली असल्यास पूर्वमशागतीची कामे करून
घ्यावीत. आंतरपीक म्हणून मुग/उडीद या पिकांना विशेष महत्व प्राप्त आहे, ते या
पिकांच्या कालावधीमुळे, हे दोन्हीही पिके तुर, ज्वारी, कपाशीत आंतरपीक म्हणून घेता
येतात. मुग पेरणीसाठी कोपरगाव, बीएम-4,
बीपीएमआर-145, बीएम-2002-1, बीएम-2003-2, फुले मुग 2, पी.के.व्ही.ए.के.एम 4
इत्यादी वाणांचा वापर करावा तर उडीद
लागवडीसाठी बीडीयु-1, टीएयू-1, टीपीयू-4 इत्यादी वाणांचा वापर करावा. पूर्वमशागतीची
कामे राहिली असल्यास पूर्वमशागतीची कामे करून घ्यावीत. भुईमूग पिकात भूईमूग + तूर
(4:2) किंवा भुईमूग + तीळ (4:2) किंवा भूईमूग + एरंडी (4:1) याप्रमाणे आंतरपीक
घ्यावे. भुईमूग पिकाच्या लागवडीसाठी
एसबी-11, जेएल-24, एलजीएन-2 (मांजरा), टीएजी-24, टीजी-26, टीएलजी-45, एलजीएन-1, एलजीएन-123 इत्यादी वाणांचा वापर करावा. पूर्वमशागतीची
कामे राहिली असल्यास पूर्वमशागतीची कामे करून घ्यावीत. मका पिकात मका + तूर (4:2) किंवा मका + उडीद (2:1)
या प्रमाणे आंतरपीक घ्यावे. मका पिकाच्या
पेरणीसाठी नवज्योत, मांजरा, डीएमएच-107, केएच-9451, एमएचएच, प्रभात, करवीर,
जेके-2492, महाराजा, यूवराज इत्यादी वाणांचा वापर करावा.
फळबागेचे व्यवस्थापन
नवीन केळी बागेची लागवड करून घ्यावी. लागवडीसाठी शासकीय नोंदणीकृत
रोपवाटीकेतूनच रोपांची खरेदी करावी. लागवडीच्या वेळेस शेणखत तर लागवडीनंतर 30
दिवसाने रासायनिक खत व्यवस्थापन करावे. नवीन आंबा लागवडीसाठी पूर्व तयारीची कामे
केली नसल्यास लवकरात लवकर ती पूर्ण करून घ्यावीत. लागवडीसाठी शासकीय नोंदणीकृत
रोपवाटीकेतूनच रोपांची खरेदी करावी. द्राक्ष बागेतील रोगग्रस्त पाने काढून टाकावीत
व रोगनाशकाची फवारणी करावी. द्राक्ष बागेतील अतिरिक्त बगल फुटी काढून घ्याव्यात
जेणेकरून जास्तीत जास्त सूर्यप्रकाश डोळ्यावर पडलयास डोळा फुटण्यास मदत होते.
द्राक्ष बागेतील वेलीची बांधणी करावी. नवीन सिताफळ लागवडीसाठी पूर्व तयारीची कामे
केली नसल्यास लवकरात लवकर ती पूर्ण करून घ्यावीत. लागवडीसाठी शासकीय नोंदणीकृत
रोपवाटीकेतूनच रोपांची खरेदी करावी.
भाजीपाला
पाण्याची
उपलब्धता असल्यास भाजीपाला (वांगी, मिरची, टोमॅटो इत्यादी) पिकाची रोपे तयार
करण्यासाठी गादी वाफ्यावर बी टाकावे. काढणीस तयार आसलेल्या भाजीपाला पिकांची काढणी
करावी.
फुलशेती
पाण्याची
उपलब्धता असल्यास फुल पिकाची रोपे तयार करण्यासाठी गादी वाफ्यावर बी टाकावे. काढणीस
तयार असलेल्या फुलपिकांची काढणी करून घ्यावी.
पशुधन व्यवस्थापन
अचानक वातावरणात झालेल्या बदलामूळे वातावरण ओलसर व दमट झाले असून
जनावरात रोगाचा प्रादूर्भाव वाढण्याची दाट शक्यता असते त्यामूळे जनावरांचे आरोग्य
उत्तम व निरोगबी ठेवण्यासाठी खालील उपाययोजना कराव्यात : 1. जनावरे निवा-याच्या ठिकाणी
बांधावे व पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्यावी 2. पशूधनास खुले पाणी, तलाव
किंवा नदीपासून दूर ठेवावे, ट्रक्टर आणि इतर धातूंच्या शेती अवजारांपासून दूर
ठेवावे व पशुधनास झाडाखाली जमा होऊ देऊ नये.तसेच पाऊस चालू होण्याच्या वेळी
झाडाच्या आडोशाला थांबू नये. 3. पावसाळ्यात गोठयत पाणी साचनार नाही व गोठा ओलसर
राहणार नाही याची काळजी घ्यावी.
सौजन्य
मुख्य प्रकल्प
समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला
पत्रक क्रमांक – 21/2025- 2026 मंगळवार, दिनांक – 10.06.2025
No comments:
Post a Comment