हवामान सारांश / चेतावनी :
प्रादेशिक हवामान केंद्र,
मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 27 जून रोजी छत्रपती संभाजी नगर, व जालना जिल्हयात तर दिनांक 01 जुलै रोजी परभणी हिंगोली व नांदेड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा
वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची
शक्यता आहे. मराठवाडयात पुढील पाच दिवसात तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या
पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील पाच दिवस कमाल तापमानात फारशी तफावत जाणवनार
नाही तर पुढील चार ते पाच दिवसात किमान तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही.
सामान्य सल्ला :
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस)
मराठवाडयात दिनांक 27 जून ते 03 जुलै, 2025 दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा
कमी,, कमाल
तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे व दिनांक 04 ते 10 जुलै 2025 दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा
जास्त,, कमाल
तापमान व किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे.
मराठवाडयात ज्या तालूक्यात पेरणी
योग्य पाऊस (75-100 मिमी) झाला आहे (छ. संभाजीनगर जिल्हा : खुलताबाद, कन्नड, सोयगाव,
सिल्लोड व फुलंब्री तालुका; जालना जिल्हा : भोकरधन व जाफ्राबाद तालुका; नांदेड जिल्हा: नांदेड,
बिलोली, हदगाव, किनवट, मुदखेड, हिमायतनगर व माहूर तालुका;
हिंगोली जिल्ह्यात : हिंगोली,कळमनुरी व वसमत तालुका) या
जिल्हयातील तालूक्यात वापसा असतांना पेरणी करण्यास हरकत नाही. इतर तालूक्यायत
शेतकरी बांधवांनी पेरणीची घाई करू नये पेरणीयोग्य पाऊस (75-100 मिमी) झाल्यानंतरच
पेरणी करावी.
संदेश : शेतकरी बांधवांनी पेरणीची घाई करू नये. पेरणीयोग्य पाऊस (75-100 मिमी)
झाल्यानंतरच पेरणी करावी, पेरणी करण्यापूर्वी बियाण्यास बिजप्रक्रिया करूनच पेरणी
करावी. सर्वसाधारणपणे 15 जूलै पर्यंत सर्व खरीप पिकांची (मूग, उडीद, भुईमूग सोडून)
पेरणी करता येते.
वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
पेरणी न केलेल्या भागात पेरणीयोग्य पाऊस
(75-100 मिमी) झाल्यानंतर बिजप्रक्रिया करूनच सोयाबीन पिकाची पेरणी करावी. सोयाबीन पिकाची पेरणी 15 जुलैपर्यंत करता येते. सोयाबीन पिकाची पेरणी शक्यतो बी.बी.एफ (रूंद वरंबा सरी) पध्दतीने
करावी ज्यामूळे मातीतील ओलावा व जमिनीची सुपिकता टिकून राहण्यास मदत होऊन अधिक
उत्पादन मिळते. पेरणी
केलेल्या सोयाबीन पिकात अंतरमशागतीची कामे करून पिक तण विरहीत ठेवावे. सोयाबीन
पिकात पाण्याचा ताण बसत असल्यास 0.5% (50 ग्रॅम प्रति 10 लिटर) पोटॅशियम नायट्रेटची (13:00:45) फवारणी करावी.पेरणी न केलेल्या
भागात पेरणीयोग्य पाऊस (75-100 मिमी) झाल्यानंतर बिजप्रक्रिया करूनच खरीप ज्वारी
पिकाची पेरणी करावी. खरीप ज्वारी
पिकाची पेरणी 07 जुलैपर्यंत करता येते. पेरणी केलेल्या खरीप ज्वारी पिकात
अंतरमशागतीची कामे करून पिक तण विरहीत ठेवावे. खरीप ज्वारी पिकात पाण्याचा ताण बसत
असल्यास 0.5% (50 ग्रॅम प्रति 10 लिटर) पोटॅशियम नायट्रेटची (13:00:45) फवारणी करावी. पेरणी न
केलेल्या भागात पेरणीयोग्य पाऊस (75-100 मिमी) झाल्यानंतर बिजप्रक्रिया करूनच
बाजरी पिकाची पेरणी करावी. बाजरी पिकाची
पेरणी 30 जुलैपर्यंत
करता येते. पेरणी केलेल्या बाजरी पिकात अंतरमशागतीची कामे करून पिक तण विरहीत
ठेवावे. बाजरी पिकात पाण्याचा ताण बसत असल्यास 0.5% (50 ग्रॅम प्रति
10 लिटर) पोटॅशियम नायट्रेटची (13:00:45) फवारणी करावी. ऊस पिकास पाण्याचा ताण बसणार नाही याची काळजी घ्यावी. ऊस पिकास
सकाळी लवकर किंवा सायंकाळी पाणी व्यवस्थापन करावे. सुरू ऊसाची पक्की बांधणी केली नसल्यास ती करन घ्यावी व पक्की
बांधणी करतांना 100 किलो नत्र, 55 किलो स्फुरद व 55 किलो पालाश प्रति हेक्टरी रासायनिक
खतांची मात्रा द्यावी. हळदीमध्ये आंतरपीके घेताना पहिल्या तीन ते साडेतीन
महिन्यापर्यंत काढणी होईल अशा प्रकारची आंतरपीके निवडावीत. यामध्ये पालेभाज्या
सारख्या आंतरपिकांचा समावेश असावा.
फळबागेचे व्यवस्थापन
संत्रा नविन बाग लागवडीसाठी नागपूर
संत्रा, किन्नो तर मोसंबी नविन बाग लागवडीसाठी न्यूसेलर, सातगुडी व फुले मोसंबी इत्यादी जातींची निवड करावी. लागवडीसाठी शासकीय
नोंदणीकृत रोपवाटीकेतूनच रोपांची खरेदी करावी. अंबे बहार संत्रा/मोसंबी बागेत कीटकनाशकाची फवारणी पावसाची उघाड
बघून करावी. संत्रा/मोसंबी
बागेत मृगबहारासाठी खत मात्रा दिली नसल्यास मोसंबीसाठी 400:400:400 व
संत्र्यासाठी 500:500:500 ग्राम प्रति झाड नत्र : स्फुरद : पालाश खत मात्रा
द्यावी. डाळींब नविन बाग लागवडीसाठी भगवा, फुले भगवा सुपर, गणेश, फुले
आरक्ता, इत्यादी जातींची निवड करावी. लागवडीसाठी शासकीय नोंदणीकृत रोपवाटीकेतूनच
रोपांची खरेदी करावी. डाळिंब बागेत
मृगबहारासाठी खत मात्रा दिली नसल्यास डाळींबासाठी 300:250:250 ग्राम प्रति झाड नत्र : स्फुरद : पालाश खत मात्रा द्यावी. चिकू नविन बाग
लागवडीसाठी कालीपत्ती, क्रिकेट बॉल इत्यादी जातींची निवड करावी. लागवडीसाठी शासकीय
नोंदणीकृत रोपवाटीकेतूनच रोपांची खरेदी करावी. चिकू बागेत खत मात्रा दिली नसल्यास 500:500:500 ग्राम प्रति झाड
नत्र : स्फुरद : पालाश खत मात्रा द्यावी.
भाजीपाला
पाण्याची उपलब्धता असल्यास
भाजीपाला (वांगी, मिरची, टोमॅटो इत्यादी) पिकाची रोपे तयार करण्यासाठी गादी
वाफ्यावर बी टाकावे. भाजीपाल्याचे बी टाकलेल्या गादी वाफ्यावरील तणांचे नियंत्रण
करावे आवश्यकतेनूसार झाऱ्याच्या साहाय्याने पाणी द्यावे. गादीवाफ्यावर तयार केलेल्या
भाजीपाला पिकांच्या रोपांना 45 दिवस झाले असल्यास पाऊस झालेल्या ठिकाणी जमिनीत
ओलावा बघून भाजीपाला पिकांची (वांगी, मिरची, टोमॅटो इ.) पूर्नलागवड करावी. पाऊस झालेल्या ठिकाणी जमिनीत ओलावा बघून बियाद्वारे लागवड केल्या जाणाऱ्या
भाज्या उदा. भेंडी, कारले, भोपळा, दोडका ईत्यादी भाजीपाला पिकांची लागवड करावी. काढणीस
तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी.
फुलशेती
पाण्याची उपलब्धता असल्यास फुल पिकाची
रोपे तयार करण्यासाठी गादी वाफ्यावर बी टाकावे. फुलपिकाचे बी टाकलेल्या गादी
वाफ्यावरील तणांचे नियंत्रण करावे आवश्यकतेनूसार झाऱ्याच्या साहाय्याने पाणी
द्यावे. पाउस झालेल्या ठिकाणी जमिनीत
ओलावा असल्याची खात्री करून फुल पिकाची पूर्नलागवड करावी. काढणीस तयार असलेल्या फुलपिकाची काढणी करून
घ्यावी. काढणीस तयार
असलेल्या फुलपिकांची काढणी करून घ्यावी.
तुती रेशीम उद्योग
ढगाळ हवामानात संगोपन गृहात तापमान २२ तते
२८ अं. सें आणि आर्दता ८५% पर्यंत असावी. पाऊसात किंवा पाऊस चालू असताना आर्दता १००%
असते. अशा वेळी कीटकांनी पाने खाल्यानंतर अळ्यावर पांढरा चुना धुरळणी करावी. १०० अंडी
पुंजासाठी १२ ते १५ किलो ग्रॅम पांढरा चुना धुरळणी लागतो आणि निर्जंतुक पावडर म्हणून
विजेता किंवा अंकुश पावडर या ४. ते ५. किलो ग्रॅम १०० अंडीपुंजासाठी वापर करावा. सतत
पाऊस पडत असेल तर पाण्यानी भिजलेली तुती पाने खाद्य म्हणून चालतात पण त्याच्यासोबत
माती किंवा धूळ येत कामा नये.
पशुधन व्यवस्थापन
पावसाळ्याच्या सुरुवातीच्या काळात वातावरणातील
आर्दता, तापमानातील बदल, पाणी साचणे, चिखल होणे, माश्या व इतर कीटकाचा प्रादुर्भाव दिसून येतो, या कारणाने पशुधनाचे आरोग्य बिघडते, त्यासाठी खालील उपाययोजना करणे गरजेचे आहे. पशुधनासाठी सुरक्षित व स्वच्छ
निवाऱ्याची व्यवस्था करणे, गोठ्याच्या परिसरात
पाऊसाचे पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी, दर 15 दिवसाने गोठ्याचे
पोटॅशियम परमॅंगनेटच्या द्रावणाने निर्जंतुकिकरण करावे.
सौजन्य
मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक
मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 26/2025
- 2026 शुक्रवार, दिनांक
– 27.06.2025
No comments:
Post a Comment