हवामान सारांश / चेतावनी :
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 01 जुलै रोजी छत्रपती संभाजी नगर,
जालना, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्हयात तर दिनांक 02 व 05 जूलै रोजी छत्रपती संभाजी
नगर, जालना जिल्हयात तर दिनांक 04 जुलै रोजी हिंगोली व नांदेड जिल्हयात तूरळक
ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते
मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक 01 जुलै रोजी बऱ्याच ठिकाणी तर दिनांक
02 व 05 जुलै रोजी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम तर दिनांक 03 व 04 जुलै रोजी तूरळक
ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
सामान्य सल्ला :
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस)
मराठवाडयात दिनांक 04 ते 10 जुलै
2025 दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त,, कमाल तापमान व किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता
आहे.
मराठवाडयात ज्या तालूक्यात पेरणी
योग्य पाऊस (75-100 मिमी) झाला आहे (छ. संभाजीनगर जिल्हा : कन्नड, सोयगाव, सिल्लोड व फुलंब्री तालुका; जालना जिल्हा : जाफ्राबाद तालुका; नांदेड जिल्हा: नांदेड, बिलोली, हदगाव, भोकर,
किनवट, मुदखेड, हिमायत नगर व माहूर तालुका; हिंगोली जिल्ह्यात : हिंगोली व कळमनुरी तालुका) या
जिल्हयातील तालूक्यात वापसा असतांना पेरणी करण्यास हरकत नाही. इतर तालूक्यायत
शेतकरी बांधवांनी पेरणीची घाई करू नये पेरणीयोग्य पाऊस (75-100 मिमी) झाल्यानंतरच
पेरणी करावी.
संदेश : सध्या
पेरणीयोग्य पाऊस न झाल्यामूळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. पेरणीयोग्य पाऊस (75 ते 100 मिमी) झाल्यानंतरच खरीप पिकांची बिजप्रक्रिया
करूनच पेरणी करावी. सर्वसाधारणपणे 15
जूलै पर्यंत सर्व खरीप पिकांची (मूग, उडीद, भुईमूग सोडून) पेरणी करता येते.
वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण
कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि
सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
पेरणी न केलेल्या भागात पेरणीयोग्य पाऊस
(75-100 मिमी) झाल्यानंतर बिजप्रक्रिया करूनच कापूस पिकाची लागवड करावी. कापूस पिकाची
लागवड 15 जूलै पर्यंत करता येते. कापूस पिकास पाण्याचा ताण बसत असल्यास उपलब्धतेनूसार सूक्ष्म सिंचन
पध्दतीने पाणी द्यावे. लागवड केलेल्या कापूस पिकात अंतरमशागतीची कामे करून पिक
तण विरहीत ठेवावे. कापूस पिकात पाण्याचा ताण बसत असल्यास 0.5% (50 ग्रॅम प्रति
10 लिटर) पोटॅशियम नायट्रेटची (13:00:45) फवारणी करावी. पेरणी न
केलेल्या भागात पेरणीयोग्य पाऊस (75-100 मिमी) झाल्यानंतर बिजप्रक्रिया करूनच तुर पिकाची
पेरणी करावी. तुर पिकाची लागवड 15 जूलै पर्यंत करता येते. पिकास
पाण्याचा ताण बसत असल्यास उपलब्धतेनूसार सूक्ष्म सिंचन
पध्दतीने पाणी द्यावे. पेरणी केलेल्या तुर पिकात अंतरमशागतीची कामे करून पिक
तण विरहीत ठेवावे. तूर पिकात पाण्याचा ताण बसत असल्यास 0.5% (50 ग्रॅम प्रति
10 लिटर) पोटॅशियम नायट्रेटची (13:00:45) फवारणी करावी. पेरणी न
केलेल्या भागात पेरणीयोग्य पाऊस (75-100 मिमी) झाल्यानंतर बिजप्रक्रिया करूनच
मूग/उडीद पिकाची पेरणी करावी. मूग/उडीद पिकाची पेरणी जूलैच्या पहिल्या आठवडयापर्यंत
करता येते. पिकास पाण्याचा ताण बसत असल्यास उपलब्धतेनूसार सूक्ष्म सिंचन
पध्दतीने पाणी द्यावे. पेरणी केलेल्या मूग/उडीद पिकात अंतरमशागतीची कामे करून
पिक तण विरहीत ठेवावे. मुग/उडीद पिकात पाण्याचा ताण बसत असल्यास 0.5% (50 ग्रॅम प्रति
10 लिटर) पोटॅशियम नायट्रेटची (13:00:45) फवारणी करावी. पेरणी न
केलेल्या भागात पेरणीयोग्य पाऊस (75-100 मिमी) झाल्यानंतर बिजप्रक्रिया करूनच
भुईमूग पिकाची पेरणी करावी. भुईमूग पिकाची पेरणी 7 जूलै पर्यंत करता येते. पिकास
पाण्याचा ताण बसत असल्यास उपलब्धतेनूसार सूक्ष्म सिंचन
पध्दतीने पाणी द्यावे. पेरणी केलेल्या भुईमूग पिकात अंतरमशागतीची कामे करून
पिक तण विरहीत ठेवावे. भुईमूग पिकात पाण्याचा ताण बसत असल्यास 0.5% (50 ग्रॅम प्रति
10 लिटर) पोटॅशियम नायट्रेटची (13:00:45) फवारणी करावी. पेरणी न
केलेल्या भागात पेरणीयोग्य पाऊस (75-100 मिमी) झाल्यानंतर बिजप्रक्रिया करूनच मका पिकाची
पेरणी करावी. मका पिकाची पेरणी जूलै अखेर पर्यंत करता येते. पिकास
पाण्याचा ताण बसत असल्यास उपलब्धतेनूसार सूक्ष्म सिंचन
पध्दतीने पाणी द्यावे. पेरणी केलेल्या मका पिकात अंतरमशागतीची कामे करून पिक
तण विरहीत ठेवावे. मका पिकात पाण्याचा ताण बसत असल्यास 0.5% (50 ग्रॅम प्रति
10 लिटर) पोटॅशियम नायट्रेटची (13:00:45) फवारणी करावी.
फळबागेचे व्यवस्थापन
नवीन केळी बागेची लागवड करून घ्यावी.
लागवडीसाठी शासकीय नोंदणीकृत रोपवाटीकेतूनच रोपांची खरेदी करावी. लागवडीच्या वेळेस
शेणखत तर लागवडीनंतर 30 दिवसाने रासायनिक खत व्यवस्थापन करावे. केळी बागेत उपलब्धतेनूसार ठिबक सिंचन
पध्दतीने पाणी द्यावे. नवीन लागवड केलेल्या केळी बागेस 50 ग्रॅम नत्र व 200
ग्रॅम स्फुरद प्रति झाड खतामात्रा द्यावी.
नवीन आंबा लागवडीसाठी शासकीय नोंदणीकृत रोपवाटीकेतूनच रोपांची खरेदी करावी. आंबा बागेत उपलब्धतेनूसार ठिबक सिंचन
पध्दतीने पाणी द्यावे. आंबा फळ बागेस 10 ते 15 वर्ष वयाच्या झाडास 500:500:500
ग्रॅम नत्र, स्फुरद व पालाश खतमात्रा द्यावी, तसेच प्रति झाड 50 किलो शेणखत
टाकावे. द्राक्ष बागेतील रोगग्रस्त पाने काढून टाकावीत व रोगनाशकाची फवारणी करावी.
द्राक्ष बागेतील अतिरिक्त बगल फुटी काढून घ्याव्यात जेणेकरून जास्तीत जास्त
सूर्यप्रकाश डोळ्यावर पडलयास डोळा फुटण्यास मदत होते. द्राक्ष बागेतील वेलीची
बांधणी करावी. द्राक्ष बागेत उपलब्धतेनूसार ठिबक सिंचन
पध्दतीने पाणी द्यावे. नवीन सिताफळ लागवडीसाठी शासकीय नोंदणीकृत रोपवाटीकेतूनच
रोपांची खरेदी करावी. सिताफळ बागेत उपलब्धतेनूसार ठिबक सिंचन
पध्दतीने पाणी द्यावे.
भाजीपाला
पाण्याची उपलब्धता असल्यास
भाजीपाला (वांगी, मिरची, टोमॅटो इत्यादी) पिकाची रोपे तयार करण्यासाठी गादी
वाफ्यावर बी टाकावे. भाजीपाल्याचे बी टाकलेल्या गादी वाफ्यावरील तणांचे नियंत्रण
करावे आवश्यकतेनूसार झाऱ्याच्या साहाय्याने पाणी द्यावे. गादीवाफ्यावर तयार
केलेल्या भाजीपाला पिकांच्या रोपांना 45 दिवस झाले असल्यास पाऊस झालेल्या ठिकाणी
जमिनीत ओलावा बघून भाजीपाला पिकांची (वांगी, मिरची, टोमॅटो इ.) पूर्नलागवड करावी. पाऊस झालेल्या ठिकाणी जमिनीत ओलावा बघून बियाद्वारे लागवड केल्या जाणाऱ्या
भाज्या उदा. भेंडी, कारले, भोपळा, दोडका ईत्यादी भाजीपाला पिकांची लागवड करावी. काढणीस
तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी.
फुलशेती
पाण्याची उपलब्धता असल्यास फुल
पिकाची रोपे तयार करण्यासाठी गादी वाफ्यावर बी टाकावे. फुलपिकाचे बी टाकलेल्या
गादी वाफ्यावरील तणांचे नियंत्रण करावे आवश्यकतेनूसार झाऱ्याच्या साहाय्याने पाणी
द्यावे. पाउस झालेल्या ठिकाणी जमिनीत
ओलावा असल्याची खात्री करून फुल पिकाची पूर्नलागवड करावी. काढणीस तयार असलेल्या फुलपिकाची काढणी करून
घ्यावी. काढणीस तयार असलेल्या फुलपिकांची
काढणी करून घ्यावी.
पशुधन व्यवस्थापन
पावसाळ्याच्या सुरुवातीला आर्द्रता, तापमानात बदल, पाणी साचणे, चिखल आणि माश्या आणि इतर कीटकांचा प्रादुर्भाव दिसून येतो, ज्यामुळे पशुधनाचे आरोग्य बिघडते.
यासाठी खालील उपाययोजना कराव्यात. पशुधनासाठी सुरक्षित आणि स्वच्छ निवाऱ्याची व्यवस्था
करा, गोठ्याच्या
परिसरात पावसाचे पाणी साचणार नाही याची खात्री करा आणि दर 15 दिवसांनी पोटॅशियम परमॅंगनेट द्रावणाने
गोठा निर्जंतुक करा.
सौजन्य
मुख्य प्रकल्प
समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 27/2025- 2026 मंगळवार,
दिनांक –
01.07.2025
No comments:
Post a Comment