हवामान सारांश / चेतावनी :
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई
येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील चार ते पाच दिवस हवामान
स्वच्छ व कोरडे राहण्याची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील तीन दिवसात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवना नाही व त्यानंतर
1 ते 2 अं.सें. ने घट होण्याची तर पुढील चार दिवसात किमान तापमानात हळूहळू 2 ते 3
अं.से. ने वाढ होण्याची शक्यता आहे.
सामान्य सल्ला :
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस)
मराठवाडयात दिनांक 28 नोव्हेंबर ते 04 डिसेंबर, 2025दरम्यान पाऊस सरासरीएवढा, कमाल तापमान सरासरीएवढे व किमान
तापमान सरासरीपेक्षा कमी ते सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे.
सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या
बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार मराठवाडयात बाष्पोत्सर्जनाचा
वेग किंचित वाढलेला आहे.
संदेश : पुढील पाच
दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता लक्षात घेता पिकास, फळबागेत, भाजीपाला व फुल
पिकास आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे.
वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण
कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि
सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
वेचणीस तयार असलेल्या कापूस पिकात वेचणी करून घ्यावी. वेचणी केलेला
कापूस साठवणूकीपूर्वी उन्हात वाळवून साठवणूक करावी जेणेकरून कापसाची प्रत खालावणार
नाही.
तुर पिकात शेंगा पोखरणाऱ्या अळीच्या व्यवस्थापनासाठी 5 % निंबोळी अर्काची किंवा क्विनॉलफॉस 25% 20 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% 4.5 ग्रॅम प्रति
10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. फुलोरा व शेंगा धरण्याच्या अवस्थेत असलेल्या
तूर पिकास पाण्याचा ताण बसत असल्यास पिकास आवश्यकतेनूसार हलके पाणी द्यावे.
रब्बी ज्वारी पिकात पेरणी नंतर 15 ते 20 दिवसांनी पहिली कोळपणी
करावी. लवकर पेरणी केलेल्या रब्बी ज्वारी पिकात लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून
येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट 5 टक्के 4 ग्रॅम किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली
प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटून पावसाची उघाड बघून
फवारणी करावी. फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी
करावी.
रब्बी सूर्यफूल पिकाची पेरणी करून 20 दिवस झाले असल्यास पहिली
कोळपणी करावी.
गहू पिकस आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. बागायती गहू उशीरा
पेरणी 15 डिसेंबर पर्यंत करता येते. उशीरा पेरणीसाठी 125 ते 150 किलो प्रति
हेक्टरी बियाणे वापरावे. गव्हाची पेरणी करतांना 154 किलो 10:26:26 + युरिया 54
किलो किंवा 87 किलो डायअमोनियम फॉस्फेट + युरिया 53 किलो + 67 किलो म्युरेट ऑफ
पोटॅश किंवा 87 किलो युरिया + सिंगल सुपर फॉस्फेट 250 किलो + 67 किलो म्युरेट ऑफ
पोटॅश प्रति हेक्टरी खतमात्रा द्यावी. राहिलेले अर्धे नत्र 87 किलो यूरिया प्रति
हेक्टरी पेरणीनंतर 25 ते 30 दिवसांनी द्यावे.
फळबागेचे व्यवस्थापन
केळी बागेचे थंडीपासून संरक्षण करण्यासाठी बागेस पहाटे मोकाट पध्दतीने
पाणी द्यावे. किमान तापमानात झालेल्या घटीमूळे केळी बागेत घड निसवले असल्यास
केळीचे गुच्छ सच्छिद्र पॉलिथीन पिशव्याने झाकून (घडांना सर्क्टींग करावी).
खोडाभोवती किंवा बागेत सेंद्रिय पदार्थांचे आच्छादन करावे.
आंबा फळबागेत चांगला मोहोर लागण्यासाठी बागेस पाणी देऊ नये. आंबा
बागेत माल फार्मेशनचा प्रादूर्भाव होऊ नये म्हणून एनएए 4 मिली प्रति 10 लिटर
पाण्यात मिसळून फवारणी करावी. आंबा बागेत फुलधारणा व्यवस्थित होण्यासाठी 00:52:34
विद्राव्य खताची 15 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
द्राक्ष बागेत जिब्रलिक ॲसिड 20 पीपीएमची फवारणी करावी.
काढणीस तयार असलेल्या सिताफळांची काढणी करून सूरक्षित ठिकाणी
साठवणूक करावी.
भाजीपाला
पुर्नलागवडीसाठी तयार असलेल्या (टोमॅटो, कांदा, कोबी इत्यादी)
भाजीपाला पिकांची पुर्नलागवड करावी तसेच गाजर, मेथी, पालक इत्यादी पिकांची लागवड
करावी. पुर्नलागवड केलेल्या भाजीपाला पिकास आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे.
मिरची पिकावर सध्या फुलकिडींचा प्रादूर्भाव दिसून येत आहे याच्या व्यवस्थापनासाठी
ॲसिटामिप्रिड 20 % एस.पी. 100 ग्रॅम किंवा सायअँन्ट्रानिलीप्रोल 10.26 ओ.डी. 600 मिली किंवा
इमामेक्टीन बेन्झोएट 5% एस. जी. 200 ग्रॅम प्रति हेक्टर
फवारणी करावी. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी. नवीन
लागवड केलेल्या भाजीपाला पिकास खतमात्रा देण्यात यावी.
फुलशेती
आष्टूर व जिलार्डीया या फुलपिकाची लागवड करण्यासाठी गादीवाफ्यावर
रोपे तयार करण्यासाठी बी टाकावे. लांब दांड्यांच्या फुलाची (गुलाब) काढणी करतांना
कळी उमलण्याच्या अवस्थेत असतांना काढणी करावी तर झेंडू, आष्टूर या सारख्या फुलांची
काढणी पूर्ण उमलल्याच्या नंतर करावी.
पशुधन व्यवस्थापन
बदललेल्या ऋतूमानानूसार व हवामान बदलानूसार दूध उत्पादनावरील पशूधन
आणि अन्य प्राण्याच्या व्यवस्थापनावर लक्ष केंद्रीत करणे गरजेचे आहे, त्यासाठी
थंडीपासून/थंड तापमानापासून/थंड वाऱ्यापासून पशुधनाचे संरक्षणासाठी खिडकी व
दरवाज्यांना गोण्याचे पडदे लावावेत. पशुधनाला थंडीपासून संरक्षण करण्यासाठी
गोठ्याच्या बसण्याच्या ठिकाणी काड/पेंढा/मॅट वापरून जमिनीतील थंडावा कमी करावा.
दिवसा सूर्य प्रकाशात सहवास लाभणे अत्यंत गरजेचे आहे. त्याचबरोबर आहारात ओला व
सूका चारा (कमीत कमी 30 %) संतूलित प्रमाणात द्यावा.
सौजन्य
मुख्य प्रकल्प
समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 69/2025-2026 मंगळवार,
दिनांक –
25.11.2025
No comments:
Post a Comment