हवामान सारांश / चेतावनी :
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवस हवामान स्वच्छ व
कोरडे राहण्याची शक्यता आहे.
सामान्य सल्ला :
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस)
मराठवाडयात दिनांक 07 ते 13 नोव्हेंबर, 2025 व दिनांक 14 ते 20 नोव्हेंबर, 2025दरम्यान पाऊस सरासरीएवढा, कमाल तापमान सरासरीएवढे व किमान तापमान सरासरीपेक्षा
कमी राहण्याची शक्यता आहे.
सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या
बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार मराठवाडयात
बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे.
संदेश : कापूस
पिकाची वेचणी स्वच्छ व कोरड्या हवामानात करावी व सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. रब्बी पिकाच्या पेरणीपूर्वी बियाण्यास बिजप्रक्रिया करूनच पेरणी करावी.
वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
काढणी केलेल्या सोयाबीन पिकाची मळणी करून उन्हात वाळवून सुरक्षित
ठिकाणी साठवणूक करावी.
तुर पिकात पाने गुंडाळणाऱ्या अळीच्या व्यवस्थापनासाठी 5 % निंबोळी अर्काची किंवा क्विनॉलफॉस 25% 20 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तुर पिकात फायटोप्थोरा
ब्लाईट रोगाचा प्रादूर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी ट्रायकोडर्मा 100
ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून खोडाभोवती आळवणी व खोडावर फवारणी करावी. तुर
पिकात फुलगळ दिसून येत असल्यास एनएए 3.0 मिली प्रति 10 लिटर
पाण्यात मिसळून फवारणी करावी. फुलोरा
अवस्थेत असलेल्या तूर पिकास पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. पिकास
आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे.
उस पिकात पांढरी माशीचा व पाकोळीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास
याच्या व्यवस्थापनासाठी, लिकॅनीसिलियम
लिकॅनी या जैविक बुरशीची 40 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात
मिसळून फवारणी करावी. रासायनिक कीटकनाशकामध्ये
क्लोरोपायरीफॉस 20 टक्के 30 मिली किंवा इमिडाक्लोप्रिड 17.8 टक्के 3 मिली
किंवा ॲसीफेट 75 % 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून
फवारावे. इमिडाक्लोपीड 17.8% कीटकनाशकासोबत 2 टक्के
युरिया (200 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात) मिसळून फवारणी करावी.
कंदकूजचा प्रादूर्भाव दिसून आल्यास, याच्या व्यवस्थापनासाठी जमिनीतून
कार्बेडेंझीम 50% -200 ग्रॅम (10 ग्रॅम प्रति 10 लिटर
पाण्यात) किंवा मॅन्कोझेब 75% -600 ग्रॅम (30 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात) किंवा कॉपर ऑक्झीक्लोराइड
50% -1000 ग्रॅम (50 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात) यापैकी एका बुरशीनाशकाची प्रति एकरी या प्रमाणात दरवेळी महिन्यातून
एकदा आळवणी करावी. (आळवणी करताना जमिनीमध्ये वापसा असावा. आळवणी
केल्यानंतर पिकास पाण्याचा थोडा ताण द्यावा.). हळदीवरील पानावरील ठिपके आणि करपा
याच्या व्यवस्थापनासाठी कार्बेंडेंझीम 12 % + मॅन्कोझेब 63
% डब्ल्यूपी 25 ग्रॅम प्रति प्रति 10 लिटर पाण्यात स्टीकरसह फवारणी
करावी. हळद पिकात कंदमाशीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास
याच्या व्यवस्थापनासाठी 15 दिवसांच्या अंतराने क्विनालफॉस 25% 20 मिली किंवा डायमिथोएट 30 % 15 मिली प्रति 10 लिटर
स्टिकरसह पाण्यात मिसळून आलटून-पालटून फवारणी करावी. उघडै पडलेले कंद मातीने झाकून
घ्यावेत व वेळेवर हळदीची भरणी करावी.
जोमदार वाढीसाठी हरभरा पिक सुरुवातीपासूनच तण विरहीत ठेवणे आवश्यक
आहे. पिक 20 ते 25 दिवसाचे असतांना पहिली कोळपणी करावी. हरभरा पिकाची पेरणी राहिली
असल्यास लवकरात लवकर करून घ्यावी. पेरणीपूर्वी मर रोगाच्या प्रतिबंधासाठी
कार्बेन्डाझीम 2.5 ग्रॅम किंवा ट्रायकोडर्मा 10 ग्रॅम प्रति किलो बियाण्यास
बिजप्रक्रिया करावी. तर मूळकूज या रोगाच्या प्रतिबंधासाठी ट्रायकोडर्मा 10 ग्रॅम किंवा थायरम 3 ग्रॅम प्रति किलो
बियाण्यास बिजप्रक्रिया करावी.
जोमदार वाढीसाठी करडई पिक सुरुवातीपासूनच तण विरहीत ठेवणे आवश्यक
आहे. पिक 20 ते 25 दिवसाचे असतांना पहिली कोळपणी करावी. करडई पिकाची पेरणी लवकरात
लवकर करून घ्यावी. बागायती करडई पिकाची पेरणी 15 नोव्हेंबर पर्यंत करता येते. पेरणी 45 X
20 सेंमी अंतरावर करावी. बागायती करडई साठी शिफारशीत खतमात्रा
60:40:00 पैकी पेरणीच्या वेळी 30 किलो नत्र व 40 किलो स्फुरद प्रति हेक्टरी द्यावे
व 30 किलो नत्र एक महिन्यानी द्यावे.
फळबागेचे व्यवस्थापन
संत्रा/मोंसंबी बागेत रसशोषण करणाऱ्या किडींचा प्रादूर्भाव दिसून
येत असल्यास याच व्यवस्थापनासाठी बागेत किटकनाशकाची फवारणी करावी. संत्रा/मोसंबी
बागेत आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. मृग बहार संत्रा/मोसंबी बागेत अन्नद्रव्याच्या
कमतरतेमूळे फळगळ होऊ नये म्हणून 19:19:19 1.5 किलो प्रती 100 लिटर पाण्यात मिसळून
फवारणी करावी.
काढणीस तयार असलेल्या डाळींब फळांची काढणी करून घ्यावी. डाळींब
बागेत अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे.
काढणीस तयार असलेल्या चिकू फळांची काढणी करून घ्यावी व सुरक्षित
ठिकाणी साठवणूक करावी. चिकू बागेत अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे.
भाजीपाला
पुर्नलागवडीसाठी तयार असलेल्या (टोमॅटो, कांदा, कोबी इत्यादी)
भाजीपाला पिकांची पुर्नलागवड करावी तसेच गाजर, मेथी, पालक इत्यादी पिकांची लागवड
करावी. पुर्नलागवड केलेल्या भाजीपाला पिकास आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे.
मिरची पिकावर सध्या फुलकिडींचा प्रादूर्भाव दिसून येत आहे याच्या व्यवस्थापनासाठी
ॲसिटामिप्रिड 20 % एस.पी. 100 ग्रॅम किंवा सायअँन्ट्रानिलीप्रोल 10.26 ओ.डी. 600 मिली किंवा
इमामेक्टीन बेन्झोएट 5% एस. जी. 200 ग्रॅम प्रति हेक्टर
फवारणी करावी. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी. नवीन
लागवड केलेल्या भाजीपाला पिकास खतमात्रा देण्यात यावी.
फुलशेती
आष्टूर व जिलार्डीया या फुलपिकाची लागवड करण्यासाठी गादीवाफ्यावर
रोपे तयार करण्यासाठी बी टाकावे. लांब दांड्यांच्या फुलाची (गुलाब) काढणी करतांना
कळी उमलण्याच्या अवस्थेत असतांना काढणी करावी तर झेंडू, आष्टूर या सारख्या फुलांची
काढणी पूर्ण उमलल्याच्या नंतर करावी.
पशुधन व्यवस्थापन
बदललेल्या ऋतूमानानूसार व हवामान बदलानूसार दूध उत्पादनावरील पशूधन
आणि अन्य प्राण्याच्या व्यवस्थापनावर लक्ष केंद्रीत करणे गरजेचे आहे, त्यासाठी
थंडीपासून/थंड तापमानापासून/थंड वाऱ्यापासून पशुधनाचे संरक्षणासाठी खिडकी व
दरवाज्यांना गोण्याचे पडदे लावावेत. पशुधनाला थंडीपासून संरक्षण करण्यासाठी
गोठ्याच्या बसण्याच्या ठिकाणी काड/पेंढा/मॅट वापरून जमिनीतील थंडावा कमी करावा. दिवसा
सूर्य प्रकाशात सहवास लाभणे अत्यंत गरजेचे आहे.
सौजन्य
मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक
मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 64/2025
- 2026 शुक्रवार, दिनांक
– 07.11.2025
No comments:
Post a Comment