हवामान सारांश / चेतावनी :
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई
येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 13 जानेवारी 2026 रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना व बीड जिल्हयात तूरळक
ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक 14 ते 17 जानेवारी दरम्यान
हवामान स्वच्छ व कोरडे राहण्याची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील चोविस तासात कमाल व
किमान तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही तर त्यानंतर पुढील तीन दिवसात घट
होण्याची शक्यता आहे.
सामान्य सल्ला :
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस)
मराठवाडयात दिनांक 16 ते 22 जानेवारी
2026 दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी, कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान
सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा किंचित कमी राहण्याची शक्यता आहे.
संदेश : पुढील चार
दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता लक्षात घेता पिकास, फळबागेत, भाजीपाला व फुल
पिकास आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे.
वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण
कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि
सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
कुठल्याही परिस्थितीत कापसाची फरदड (खोडवा) घेऊ नये. कापूस पिकाची
शेवटची वेचणी पूर्ण झाल्यावर कापूस पिकाचा पालापाचोळा, पराट्या जमा करून त्यांची
योग्य विल्हेवाट लावावी.
काढणीस तयार असलेल्या तूर पिकाची काढणी करून घ्यावी व वाळल्यानंतरच
मळणी करावी. काढणी केलेल्या तूर पिकची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.
रब्बी ज्वारी पिकात लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास
याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट 5 टक्के 4 ग्रॅम किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली
प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटून फवारणी करावी.
फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी. रब्बी ज्वारी
पिकास आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे.
रब्बी सूर्यफूल पिकात आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे.
गहू पिकास कांडी धरण्याच्या अवस्थेत (पेरणी नंतर 40 ते 45 दिवस) व
पिक फुलावर असतांना (पेरणीनंतर 65 ते 70 दिवस) पाणी द्यावे.
फळबागेचे व्यवस्थापन
केळी बागेस जास्त प्रमाणात पाणी देऊ नये. केळी बागेत घड निसवले
असल्यास केळीचे गुच्छ सच्छिद्र पॉलिथीन पिशव्याने झाकून (घडांना सर्क्टींग करावी).
खोडाभोवती किंवा बागेत सेंद्रिय पदार्थांचे आच्छादन करावे. केळी बागेत घडवाढीसाठी
00:52:34 विद्राव्य खताची 15 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
आंबा बागेत आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. आंबा बाग सध्या
फुलधारण अवस्थेत आहे, बागेत परागीकरण व्यवस्थीत होण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या
किटकनाशकाची फवारण करू नये.
द्राक्ष बागेत रात्री सिंचन करावे. खोडाभोवती किंवा बागेत सेंद्रिय
पदार्थांचे आच्छादन करावे. द्राक्ष बागेत पिंक बेरीची समस्या होऊ नये म्हणून,
द्राक्ष घड पेपरने किंवा पिशव्याने झाकून घ्यावेत.
सिताफळ बागेत आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे.
भाजीपाला
भाजीपाला पिकात खूरपणी करून तण विरहीत ठेवावे व आवश्यकतेनूसार
पाटाने पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची काढणी करून घ्यावी. भाजीपाला
(मिरची, वांगे व भेंडी) पिकात रसशोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत
असल्यास त्याच्या व्यस्थापनासाठी पायरीप्रॉक्सीफेन 5% + फेनप्रोपाथ्रीन 15% 10 मीली किंवा डायमेथोएट 30% 13 मीली प्रती 10 लिटर
पाण्यात मिसळून फवारणी करावी.
फुलशेती
फुल पिकात खूरपणी करून तण विरहीत ठेवावे व आवश्यकतेनूसार पाटाने
पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या फुल पिकाची काढणी करून घ्यावी.
पशुधन व्यवस्थापन
थंडीच्या दिवसात जेव्हा थंड वारे वाहू लागतात त्या वेळेस आपल्या
जनावरांचे विशेषत: शेळी आणि मेंढी यांचे थंडीपासून संरक्षण करावे. त्याकरीता
त्यांच्या निवाऱ्याच्या जागेत ऊब असावी, माफक प्रमाणात हवा खेळती असावी. नाकातून
पाणी येणे, भूक मंदावणे, चालण्याकरीता कष्ट होणे ई. लक्षणे दिसू लागताच
पशुवैद्यकाशी त्वरीत संपर्क साधावा. सर्वसाधारणपणे बकरीच्या पिल्लांना थंडीची बाधा
लवकर होते. थंडीच्या दिवसात करडांची मरतुक टाळण्यासाठी त्यांना ऊबदार जागेत
ठेवावे. मोठ्या टोपलीत कापड टाकून त्यामध्ये पिल्लांना ठेवता येऊ शकते, थंडीपासून
संरक्षण होते. गोठ्यात माफक हवा असावी. शेळीचे दुध भरपूर प्रमाणात द्यावे ज्यामूळे
पिल्लांच्या शरीरात ऊर्जा निर्माण होऊन थंडीपासून बाधा होणार नाही.
सौजन्य
मुख्य प्रकल्प
समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 83/2025-2026 मंगळवार,
दिनांक –
13.01.2026
No comments:
Post a Comment