हवामान सारांश / चेतावनी :
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवस
हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील पाच दिवसाम कमाल तापमानात हळूहळू
3 ते 4 अं.से. ने वाढ होण्याची तर पुढील 24 ते 48 तासात किमान तापमानात हळूहळू घट
होऊन त्यानंतर वाढ होण्याची शक्यता आहे.
सामान्य सल्ला :
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस)
मराठवाडयात दिनांक 27 फेब्रूवारी ते 05 मार्च 2026 दरम्यान पाऊस सरासरीएवढा, कमाल
तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा किंचित कमी व किमान तापमान सरासरीएवढे ते
सरासरीपेक्षा कमी व दिनांक 06 ते 12 मार्च 2026 दरम्यान पाऊस सरासरीएवढा, कमाल
तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा किंचित जास्त व किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची
शक्यता आहे.
संदेश : मराठवाडयात
पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता लक्षात घेता, पिकास, फळबागेस, भाजीपाला
व फुल पिकास आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे.
वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
ऊस पिकात आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. ऊस पिकावर खोड
किडीचा प्रादूर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरपायरीफॉस 20 % 25 मिली किंवा क्लोरॅट्रानोलीप्रोल 18.5% 4 मिली प्रति 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
हळद पिकात हळद काढणी करण्यापूर्वी पंधरा दिवस आधी पिकाला पाणी देणे बंद करावे. हळद पिकाची पाने
पिवळी पडून जमिनीवर लोळतात तेव्हा हळदीची काढणी करावी. कंद काढणीपूर्वी संपूर्ण
पाने जमिनीलगत कापून घ्यावी.
काढणीस तयार असलेल्या हरभरा पिकाची काढणी करून घ्यावी.
काढणीस तयार असलेल्या करडई पिकाची काढणी करून घ्यावी.
उन्हाळी तीळ पिकास मध्यम जमिनीत 8 ते 10 दिवसांनी व भारी जमिनीत 12
ते 15 दिवसांच्या अंतराने सिंचन करावे. सिंचन हे शक्यतो तूषार सिंचन पध्दतीने
करावे.
फळबागेचे व्यवस्थापन
संत्रा/मोसंबी बागेत फळगळ दिसून येत असल्यास याच्या
व्यवस्थापनासाठी जिब्रॅलिक ॲसिड 1.5 ग्रॅम + चिलेटेड झिंक 500 ग्रॅम प्रति 100
लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. संत्रा/मोसंबी बागेत आवश्यकतेनूसार पाणी
द्यावे. काढणीस तयार असलेल्या संत्रा/मोसंबी फळांची काढणी करून घ्यावी.
अंबे बहार डाळींब बाग फळधाराणा अवस्थेत असल्यामूळे आवश्यकतेनूसार
पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या डाळींब फळांची काढणी करून घ्यावी.
चिकू बागेत आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या चिकू फळांची
काढणी करून घ्यावी.
भाजीपाला
भाजीपाला पिकात खूरपणी करून भाजीपाला पिक तण विरहीत ठेवावे. काढणीस
तयार असलेल्या भाजीपाला पिकाची पिकाची काढणी करून घ्यावी. नविन लागवड केलेल्या व
गादी वाफ्यावरील रोपांना आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. मिरची पिकावरील फुल
किडींच्या व्यवस्थापनासाठी ॲसिटामेप्रिड 20% एसपी 2 ग्रॅम किंवा सायअँट्रानिलीप्रोल 10.26 ओडी
12 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% एसजी 4 ग्रॅम प्रति 10
लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
फुलशेती
फुल पिकात खूरपणी करून तण विरहीत ठेवावेत व आवश्यकतेनूसार पाटाने
पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी करून घ्यावी.
पशुधन व्यवस्थापन
आपल्या पशुंना उन्हामध्ये बांधु नका (निदान तिव्र उन्हाच्या
कालावधीमध्ये त्यांना झाडाखाली/सावलीमध्ये किंवा शेड/गोठ्यामध्येच बांधणे चांगले).
पशुंना शक्यतो थंड/स्वच्छ/मुबलक पाणी दोन-तिन वेळेस पाजावे. पाण्यामुळे पशुंच्या
शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी (डीहायड्रोजन) होणार नाही. जमल्यास पाण्यामधून क्षार
द्यावेत, 5 लिटर पाण्यामध्ये चिमुटभर गुळ (25 ग्रॅम), थोडे मिठ (5-10 ग्रॅम) आणि 5 ग्रॅम क्षार मिश्रण दिल्यास उत्तम, मात्र नजीकच्या
पशुवैद्यकाचा सल्ला घेऊनच व्यवस्थापन करावे.
सौजन्य
मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा
कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 96/2025
- 2026 शुक्रवार, दिनांक
– 27.02.2026
No comments:
Post a Comment