हवामान सारांश / चेतावनी :
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई
येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील तीन दिवस हवामान कोरडे
राहण्याची तर दिनांक 13 मार्च रोजी लातूर व धाराशिव जिल्हयात तसेच मराठवाडयातील
दक्षिण भागात तर दिनांक 14 मार्च रोजी लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी व हिंगोली
जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, विजांचा कडकडाट व वाऱ्याचा वेग अधिक राहून
हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील तीन ते चार दिवसात कमाल
तापमानात वाढ होण्याची तर पुढील पाच दिवसात किमान तापमानात फारशी तफावत जाणवनार
नाही.
सामान्य सल्ला :
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस)
मराठवाडयात दिनांक 13 ते 19 मार्च 2026 दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी, कमाल
तापमान सरासरीपेक्षा जास्त व किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता
आहे.
संदेश : मराठवाडयात
पाच दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता लक्षात घेता पिकास, फळबागेस, भाजीपाला व
फुल पिकास आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. दिनांक 13 व 14 मार्च रोजी तूरळक
ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता लक्षात घेता, काढणीस तयार असलेल्या
पिकाची काढणी व मळणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.
वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि
मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे
कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
कापणीस तयार असलेल्या रब्बी ज्वारी पिकाची कापणी करून सुरक्षित
ठिकाणी साठवणूक करावी.
वेळेवर पेरणी केलेल्या व काढणीस तयार असलेल्या गहू पिकाची काढणी
करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. गव्हाच्या पिकात उंदरांचा प्रादुर्भाव दिसून असल्यास
याच्या व्यवस्थापनासाठी झिंक फॉस्फाईड 1
भाग + गुळ 1 भाग + 50 भाग गव्हाचा भरडा व थोडसे गोडतेल मिसळून हे मिश्रण उंदराच्या
बिळात टाकुन बिळे बंद करावीत. उशीरा पेरणी केलेल्या गहू पिकास आवश्यकतेनूसार पाणी
द्यावे.
उन्हाळी भुईमूग पिकात आवश्यकतेनूसार तुषार सिंचन पध्दतीने पाणी
व्यवस्थापन करावे.
मका पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. उशीरा पेरणी केलेल्या मका
पिकात लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी
इमामेक्टीन बेन्झोऐट 5 टक्के 4 ग्रॅम
किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वरील
किटकनाशकांची आलटून पालटून फवारणी करावी. फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात
पडेल अशाप्रकारे फवारणी करावी. वेळेवर पेरणी केलेल्या व काढणीस तयार असलेल्या मका
पिकाची काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.
फळबागेचे व्यवस्थापन
केळी बागेस आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. जमिनीतील ओलावा
टिकून राहण्यासाठी व जमिनीचे तापमान संतुलित राहण्यासाठी केळी फळझाडाच्या आळयात
आच्छादन करावे. केळी बागेतील अतिरिक्त फुटवे काढावेत.
आंबा बागेत आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. जमिनीतील ओलावा
टिकून राहण्यासाठी व जमिनीचे तापमान संतुलित राहण्यासाठी आंबा फळझाडाच्या आळयात
आच्छादन करावे. आंबा बागेत वटाणा व सुपारीच्या आकाराच्या आंबा फळांची गळ दिसून
आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी बागेत जिब्रलिक ॲसिड 1.5 ग्रॅम प्रति 100 लिटर
पाण्यात मिसळून फवारणी करावी.
द्राक्ष बागेस आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. काढणीस तयार
असलेल्या द्राक्ष घडांची काढणी करून घ्यावी.
सिताफळ बागेत आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. जमिनीतील ओलावा
टिकून राहण्यासाठी व जमिनीचे तापमान संतुलित राहण्यासाठी सिताफळ फळझाडाच्या आळयात
आच्छादन करावे.
भाजीपाला
नविन लागवड व पूर्नलागवड केलेल्या रोपांना आवश्यकतेनूसार पाणी
व्यवस्थापन करावे. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची काढणी करून घ्यावी. टोमॅटो
पिकावर नागअळीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास, याच्या व्यवस्थापनासाठी
ब्रॉफ्लॅनिलाईड 20 % एससी 25 मिली किंवा सायन्ट्रानिलिप्रोल 10.26 % ओडी
360 मिली किंवा स्पायनेटोरम 11.70 % एससी 180 मिली प्रति एकर
याप्रमाणे वरीलपैकी एका किटकनाशकाची 150-200 लिटर पाण्यात मिसळून प्रति एकर फवारणी
करावी.
फुलशेती
फुल पिकात खूरपणी करून तण विरहीत ठेवावे व आवश्यकतेनूसार पाटाने
पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या फुल पिकाची काढणी करून घ्यावी. फुल पिकाची
लागवड करून घ्यावी.
पशुधन व्यवस्थापन
कमाल तापमानात होत असलेल्या वाढीमूळे, जनावरांना सावलीत बांधावे
आणि पिण्यासाठी थंड व स्वच्छ पाण्याचा पूरवठा करावा. उष्णतेपासून पशूधनाचे संरक्षण
करण्यासाठी गोठ्याच्या छतावर गवताचे आच्छादन करावे व गोठयातील तापमाना कमी
करण्यासाठी गोठ्याच्या छतास असणारे पत्रे ओले करण्यासाठी ठिबक सिंचन पाईपचा वापर
करावा. पशुधनास मूबलक प्रमाणात हिरवा चारा, प्रथिनेयूक्त, खनिजमिश्रण आणि मिठयूक्त
खाद्य द्यावे. पशुधनास सकाळी किंवा सायंकाळी चारावयास सोडावे.
सौजन्य
मुख्य प्रकल्प
समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 99/2025-2026 मंगळवार,
दिनांक –
10.03.2026
No comments:
Post a Comment