Thursday, 5 March 2026

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहण्याची तर दिनांक 06 ते 08 फेब्रुवारी रोजी आकाश स्वच्छ तर दिनांक 09 व 10 फेब्रुवारी रोजी दूपारनंतर आकाश अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील पाच दिवसात कमाल तापमानात 2 ते 3 अं.से. ने वाढ होण्याची तर पुढील तीन दिवसात किमान तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही व त्यानंतर 1 ते 2 अं.से. ने वाढ होण्याची शक्यता आहे.

 


हवामान सारांश / चेतावनी :

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहण्याची तर दिनांक 06 ते 08 फेब्रुवारी रोजी आकाश स्वच्छ तर दिनांक 09 व 10 फेब्रुवारी रोजी दूपारनंतर आकाश अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील पाच दिवसात कमाल तापमानात 2 ते 3 अं.से. ने वाढ होण्याची तर पुढील तीन दिवसात किमान तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही व त्यानंतर 1 ते 2 अं.से. ने वाढ होण्याची शक्यता आहे.

सामान्य सल्ला :

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 06 ते 12 मार्च 2026 दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी, कमाल तापमान सरासरीएवढे व किमान तापमान सरासरीएवढे व दिनांक 13 ते 19 मार्च 2026 दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी, कमाल तापमान सरासरीपेक्षा जास्त व किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.

संदेश : पिकास, फळबागेस, भाजीपाला व फुल पिकास आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. रब्बी हंगामातील काढणीस तयार असलेल्या पिकाची काढणी करून मळणी करून घ्यावी.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

 

पीक व्‍यवस्‍थापन

ऊस पिकात आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. ऊस पिकावर खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरपायरीफॉस 20 % 25 मिली किंवा क्लोरॅट्रानोलीप्रोल 18.5% 4 मिली प्रति 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

हळद पिकात हळद काढणी करण्यापूर्वी पंधरा दिवस आधी  पिकाला पाणी देणे बंद करावे. हळद पिकाची पाने पिवळी पडून जमिनीवर लोळतात तेव्हा हळदीची काढणी करावी. कंद काढणीपूर्वी संपूर्ण पाने जमिनीलगत कापून घ्यावी.

काढणीस तयार असलेल्या हरभरा पिकाची काढणी व मळणी करून घ्यावी.

काढणीस तयार असलेल्या करडई पिकाची काढणी व मळणी करून घ्यावी.

उन्हाळी तीळ पिकास मध्यम जमिनीत 8 ते 10 दिवसांनी व भारी जमिनीत 12 ते 15 दिवसांच्या अंतराने सिंचन करावे. सिंचन हे शक्यतो तूषार सिंचन पध्दतीने करावे. उन्हाळी तीळ पिकास खताची दूसरी मात्रा देतांना त्यासोबत गंधक 20 किलो प्रति हेक्टरी देण्यात यावे.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

संत्रा/मोसंबी बागेत फळगळ दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी जिब्रॅलिक ॲसिड 1.5 ग्रॅम + चिलेटेड झिंक 500 ग्रॅम प्रति 100 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. काढणीस तयार असलेल्या संत्रा/मोसंबी फळांची काढणी करून घ्यावी. संत्रा/मोसंबी बागेस आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. जमिनीतील ओलावा टिकून राहण्यासाठी व जमिनीचे तापमान संतुलित राहण्यासाठी संत्रा/मोसंबी फळझाडाच्या आळयात आच्छादन करावे.

अंबे बहार डाळींब बाग फळधाराणा अवस्थेत असल्यामूळे आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. जमिनीतील ओलावा टिकून राहण्यासाठी व जमिनीचे तापमान संतुलित राहण्यासाठी डाळींब फळझाडाच्या आळयात आच्छादन करावे. काढणीस तयार असलेल्या डाळींब फळांची काढणी करून घ्यावी.

चिकू बागेत आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. जमिनीतील ओलावा टिकून राहण्यासाठी व जमिनीचे तापमान संतुलित राहण्यासाठी  चिकू फळझाडाच्या आळयात आच्छादन करावे. काढणीस तयार असलेल्या चिकू फळांची काढणी करून घ्यावी.

भाजीपाला

नविन लागवड व पूर्नलागवड केलेल्या रोपांना आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची काढणी करून घ्यावी. टोमॅटो पिकावर नागअळीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास, याच्या व्यवस्थापनासाठी ब्रॉफ्लॅनिलाईड 20 % एससी 25 मिली किंवा सायन्ट्रानिलिप्रोल 10.26 % ओडी 360 मिली किंवा स्पायनेटोरम 11.70 % एससी 180 मिली प्रति एकर याप्रमाणे वरीलपैकी एका किटकनाशकाची 150-200 लिटर पाण्यात मिसळून प्रति एकर फवारणी करावी.

फुलशेती

फुल पिकात खूरपणी करून तण विरहीत ठेवावेत व आवश्यकतेनूसार पाटाने पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी करून घ्यावी.

पशुधन व्यवस्थापन

आपल्या पशुंना उन्हामध्ये बांधु नका (निदान तिव्र उन्हाच्या कालावधीमध्ये त्यांना झाडाखाली/सावलीमध्ये किंवा शेड/गोठ्यामध्येच बांधणे चांगले). पशुंना शक्यतो थंड/स्वच्छ/मुबलक पाणी दोन-तिन वेळेस पाजावे. पाण्यामुळे पशुंच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी (डीहायड्रोजन) होणार नाही. जमल्यास पाण्यामधून क्षार द्यावेत, 5 लिटर पाण्यामध्ये चिमुटभर गुळ (25 ग्रॅम), थोडे मिठ (5-10 ग्रॅम) आणि 5 ग्रॅम क्षार मिश्रण दिल्यास उत्तम, मात्र नजीकच्या पशुवैद्यकाचा सल्ला घेऊनच व्यवस्थापन करावे.

 

सौजन्‍य

मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक98/2025 - 2026         शुक्रवार, दिनांक 06.03.2026

 

No comments:

Post a Comment