Tuesday, 17 March 2026

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 18 मार्च रोजी हिंगोली, नांदेड जिल्हयात तर दिनांक 19 मार्च रोजी परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर व धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 40 ते 50 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. दिनांक 17 मार्च रोजी नांदेड, लातूर, धाराशिव जिल्हयात तर दिनांक 18 मार्च रोजी परभणी, बीड, लातूर, धाराशिव जिल्हयात तर दिनांक 19 मार्च रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक 17 व 18 मार्च रोजी तूरळक ठिकाणी हलक्या तर दिनांक 20 मार्च रोजी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील चोविस तासात कमाल तापमानाता फारशी तफावत जाणवनार नाही व त्यानंतर पुढील दोन दिवसात हळूहळू घट होण्याची तर पुढील पाच दिवसात किमान तापमानात 1 ते 2 अं.से. ने हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे.

हवामान सारांश / चेतावनी :

सामान्य सल्ला :

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 20 ते 26 मार्च 2026 दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी, कमाल तापमान सरासरीएवढे व किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.

संदेश : दिनांक 17 व 20 मार्च रोजी तूरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता लक्षात घेता, काढणीस तयार असलेल्या पिकाची काढणी व मळणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

काढणीस तयार असलेल्या रब्बी ज्वारी पिकाची काढणी करावी व काढणी केलेल्या पिकाची मळणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.

वेळेवर पेरणी केलेल्या व काढणीस तयार असलेल्या गहू पिकाची काढणी व मळणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.

उन्हाळी भुईमूग पिकात आवश्यकतेनूसार तुषार सिंचन पध्दतीने पाणी व्यवस्थापन करावे.

मका पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. उशीरा पेरणी केलेल्या मका पिकात लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोऐट 5 टक्के  4 ग्रॅम किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून वरील किटकनाशकांची आलटून पालटून फवारणी करावी. फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी. वेळेवर पेरणी केलेल्या व काढणीस तयार असलेल्या मका पिकाची काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

केळी बागेस आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. जमिनीतील ओलावा टिकून राहण्यासाठी व जमिनीचे तापमान संतुलित राहण्यासाठी केळी फळझाडाच्या आळयात आच्छादन करावे. केळी बागेतील अतिरिक्त फुटवे काढावेत.

आंबा बागेत आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. जमिनीतील ओलावा टिकून राहण्यासाठी व जमिनीचे तापमान संतुलित राहण्यासाठी आंबा फळझाडाच्या आळयात आच्छादन करावे. आंबा बागेत वटाणा व सुपारीच्या आकाराच्या आंबा फळांची गळ दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी बागेत जिब्रलिक ॲसिड 1.5 ग्रॅम प्रति 100 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.

द्राक्ष बागेस आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. काढणीस तयार असलेल्या द्राक्ष घडांची काढणी करून घ्यावी.

सिताफळ बागेत आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. जमिनीतील ओलावा टिकून राहण्यासाठी व जमिनीचे तापमान संतुलित राहण्यासाठी सिताफळ फळझाडाच्या आळयात आच्छादन करावे.

भाजीपाला

नविन लागवड व पूर्नलागवड केलेल्या रोपांना आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची काढणी करून घ्यावी. भाजीपाला (मिरची, वांगे व भेंडी) पिकात रसशोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यस्थापनासाठी पायरीप्रॉक्सीफेन 5% + फेनप्रोपाथ्रीन 15% 10 मीली किंवा  डायमेथोएट 30% 13 मीली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.

फुलशेती

फुल पिकात खूरपणी करून तण विरहीत ठेवावे व आवश्यकतेनूसार पाटाने पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या फुल पिकाची काढणी करून घ्यावी. फुल पिकाची लागवड करून घ्यावी.

पशुधन व्यवस्थापन

तूरळक ठिकाणी वादळी वारा, विजांच्या कडकडाट व वाऱ्याचा वेग अधिक राहून हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज लक्षात घेता,  जनावरांना उघडयावर सोडू किंवा बांधू नये. निवा-याच्‍या ठिकाणी बांधावे व पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्‍यावी. कमाल तापमानात होत असलेल्या वाढीमूळे, जनावरांना सावलीत बांधावे आणि पिण्यासाठी थंड व स्वच्छ पाण्याचा पूरवठा करावा. उष्णतेपासून पशूधनाचे संरक्षण करण्यासाठी गोठ्याच्या छतावर गवताचे आच्छादन करावे व गोठयातील तापमाना कमी करण्यासाठी गोठ्याच्या छतास असणारे पत्रे ओले करण्यासाठी ठिबक सिंचन पाईपचा वापर करावा. पशुधनास मूबलक प्रमाणात हिरवा चारा, प्रथिनेयूक्त, खनिजमिश्रण आणि मिठयूक्त खाद्य द्यावे. पशुधनास सकाळी किंवा सायंकाळी चारावयास सोडावे.

सौजन्‍य

मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक101/2025-2026    मंगळवार, दिनांक 17.03.2026

No comments:

Post a Comment

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 18 मार्च रोजी हिंगोली, नांदेड जिल्हयात तर दिनांक 19 मार्च रोजी परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर व धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 40 ते 50 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. दिनांक 17 मार्च रोजी नांदेड, लातूर, धाराशिव जिल्हयात तर दिनांक 18 मार्च रोजी परभणी, बीड, लातूर, धाराशिव जिल्हयात तर दिनांक 19 मार्च रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक 17 व 18 मार्च रोजी तूरळक ठिकाणी हलक्या तर दिनांक 20 मार्च रोजी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील चोविस तासात कमाल तापमानाता फारशी तफावत जाणवनार नाही व त्यानंतर पुढील दोन दिवसात हळूहळू घट होण्याची तर पुढील पाच दिवसात किमान तापमानात 1 ते 2 अं.से. ने हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे.

  हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र ,   मुंबई येथून प्राप्त झालेल्या...