Friday, 20 March 2026

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 20 मार्च रोजी जालना, परभणी, हिंगोली व नांदेड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 50 ते 60 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम पावसासह गारपीटीची शक्यता आहे. दिनांक 20 मार्च रोजी छत्रपती संभाजी नगर, बीड, लातूर, धाराशिव जिल्हयात तर दिनांक 21 व 23 मार्च रोजी धाराशिव, लातूर जिल्हयात तर दिनांक 24 मार्च रोजी नांदेड, लातूर व धाराशिव जिल्हयात जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक 20 ते 24 मार्च दरम्यान तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील पाच दिवसात कमाल तापमानात 2 ते 4 अं.से. ने वाढ होण्याची तर पुढील चार ते पाच दिवसात किमान तापमानात 2 ते 3 अं.से. ने वाढ होण्याची शक्यता आहे.

हवामान सारांश / चेतावनी :

सामान्य सल्ला :

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 20 ते 26 मार्च मार्च 2026 दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी, कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीपेक्षा कमी व दिनांक 27 मार्च ते 02 एप्रिल 2026 दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी, कमाल तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे.

संदेश : मराठवाडयात पुढील पाच दिवस तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची तसेच गारपीटीची शक्यता लक्षात घेता, काढणी व मळणी केलेल्य पिकाची सूरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

ऊस पिकात आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. ऊस पिकावर खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरपायरीफॉस 20 % 25 मिली किंवा क्लोरॅट्रानोलीप्रोल 18.5% 4 मिली प्रति 10 लीटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.

हळद पिकाची पाने पिवळी पडून जमिनीवर लोळतात तेव्हा हळदीची काढणी करावी. सध्या हळदीची काढणी, हळद उकडणे, वाळवणे, पॉलिश करणे ही कामे सुरू असून पावसाचा अंदाज बघून करावीत व सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.

काढणी केलेल्या हरभरा पिकाची मळणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.

काढणी केलेल्या करडई पिकाची मळणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.

उन्हाळी तीळ पिकास मध्यम जमिनीत 8 ते 10 दिवसांनी व भारी जमिनीत 12 ते 15 दिवसांच्या अंतराने सिंचन करावे. सिंचन हे शक्यतो तूषार सिंचन पध्दतीने करावे. उन्हाळी तीळ पिकास खताची दूसरी मात्रा देतांना त्यासोबत गंधक 20 किलो प्रति हेक्टरी देण्यात यावे.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

काढणीस तयार असलेल्या मृग बहार फळांची काढणी करून घ्यावी. फळधारणा सुरू असलेल्या अंबे बहार संत्रा/मोसंबी बागेस आवश्यकतेनूसार सकाळी किंवा संध्याकाळी पाणी द्यावे. जमिनीतील ओलावा टिकून राहण्यासाठी व जमिनीचे तापमान संतुलित राहण्यासाठी संत्रा/मोसंबी फळझाडाच्या आळयात आच्छादन करावे. वादळी वारा व पाऊस यामूळे फळबागेत पडलेली फळे गोळा करून नष्ट करावीत. तसेच मोडलेल्या फांद्यांची छाटणी करून त्यावर 1% बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी.

अंबे बहार डाळींब बाग फळधाराणा अवस्थेत असल्यामूळे आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. जमिनीतील ओलावा टिकून राहण्यासाठी व जमिनीचे तापमान संतुलित राहण्यासाठी डाळींब फळझाडाच्या आळयात आच्छादन करावे. काढणीस तयार असलेल्या डाळींब फळांची काढणी करून घ्यावी. ढगाळ वातावरणामूळे डाळींब बागेत तेल्या रोगाचा प्रादूर्भाव होण्याची शक्यता असते त्यामूळे बगेत तेल्या रोगाचे नियंत्रण करावे.

चिकू बागेत आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. जमिनीतील ओलावा टिकून राहण्यासाठी व जमिनीचे तापमान संतुलित राहण्यासाठी  चिकू फळझाडाच्या आळयात आच्छादन करावे. काढणीस तयार असलेल्या चिकू फळांची काढणी करून घ्यावी.

भाजीपाला

भाजीपाला पिकास आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची काढणी करून घ्यावी. भाजीपाला (मिरची, वांगे व भेंडी) पिकात रसशोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यस्थापनासाठी पायरीप्रॉक्सीफेन 5% + फेनप्रोपाथ्रीन 15% 10 मीली किंवा  डायमेथोएट 30% 13 मीली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.

फुलशेती

फुल पिकात खूरपणी करून तण विरहीत ठेवावेत व आवश्यकतेनूसार पाटाने पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी करून घ्यावी.

पशुधन व्यवस्थापन

तूरळक ठिकाणी वादळी वारा, विजांच्या कडकडाट व वाऱ्याचा वेग अधिक राहून हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज लक्षात घेता,  जनावरांना उघडयावर सोडू किंवा बांधू नये. निवा-याच्‍या ठिकाणी बांधावे व पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्‍यावी. आपल्या पशुंना उन्हामध्ये बांधु नका (निदान तिव्र उन्हाच्या कालावधीमध्ये त्यांना झाडाखाली/सावलीमध्ये किंवा शेड/गोठ्यामध्येच बांधणे चांगले). पशुंना शक्यतो थंड/स्वच्छ/मुबलक पाणी दोन-तिन वेळेस पाजावे. पाण्यामुळे पशुंच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी (डीहायड्रोजन) होणार नाही. जमल्यास पाण्यामधून क्षार द्यावेत, 5 लिटर पाण्यामध्ये चिमुटभर गुळ (25 ग्रॅम), थोडे मिठ (5-10 ग्रॅम) आणि 5 ग्रॅम क्षार मिश्रण दिल्यास उत्तम, मात्र नजीकच्या पशुवैद्यकाचा सल्ला घेऊनच व्यवस्थापन करावे.

सौजन्‍य

मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक102/2025 - 2026         शुक्रवार, दिनांक 20.03.2026

No comments:

Post a Comment

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 20 मार्च रोजी जालना, परभणी, हिंगोली व नांदेड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 50 ते 60 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम पावसासह गारपीटीची शक्यता आहे. दिनांक 20 मार्च रोजी छत्रपती संभाजी नगर, बीड, लातूर, धाराशिव जिल्हयात तर दिनांक 21 व 23 मार्च रोजी धाराशिव, लातूर जिल्हयात तर दिनांक 24 मार्च रोजी नांदेड, लातूर व धाराशिव जिल्हयात जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक 20 ते 24 मार्च दरम्यान तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील पाच दिवसात कमाल तापमानात 2 ते 4 अं.से. ने वाढ होण्याची तर पुढील चार ते पाच दिवसात किमान तापमानात 2 ते 3 अं.से. ने वाढ होण्याची शक्यता आहे.

  हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र ,   मुंबई येथून प्राप्त झालेल्या...