हवामान सारांश / चेतावनी :
प्रादेशिक
हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात
पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहण्याची तर दिनांक 10 एप्रिल रोजी लातूर व धाराशिव
जिल्हयात तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील
पाच दिवसात कमाल तापमानात हळूहळू वाढ होण्याची तर किमान तापमानात फारशी तफावत जाणवनार
नाही.
सामान्य सल्ला :
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस)
मराठवाडयात दिनांक 10 ते 16 एप्रिल 2026 दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी, कमाल
तापमान व किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा किंचित कमी राहण्याची व दिनांक 17
ते 23 एप्रिल 2026 दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी, कमाल तापमान सरासरीएवढे ते
सरासरीपेक्षा जास्त व किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.
संदेश : मराठवाडयात
पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता लक्षात घेता, पिकास, फळबागेस, भाजीपाला
व फुल पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे.
वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
ऊस पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. ऊस पिकात खूरपणी करून तण
नियंत्रण करावे. ऊस पिकावर खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून आल्यास याच्या
व्यवस्थापनासाठी क्लोरपायरीफॉस 20 %
25 मिली किंवा क्लोरॅट्रानोलीप्रोल 18.5% 4 मिली
प्रति 10 लीटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. ऊस पिकावर पांढऱ्या
माशीचा प्रादूर्भाव दिसून येत आहे, याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30 %
36 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ऊस पिकात काणी
रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास प्रतिबंधात्मक व्यवस्थापनासाठी बूरशीनाशकाची
फवारणी करावी किंवा प्रादर्भावग्रस्त झाडे उपटून नष्ट करावीत.
काढणीस तयार असलेल्या हळद पिकाची काढणी करून घ्यावी. सध्या हळदीची
काढणी, हळद उकडणे, वाळवणे ही कामे करून घ्यावीत.
उन्हाळी तीळ पिकास मध्यम जमिनीत 8 ते 10 दिवसांनी व भारी जमिनीत 12
ते 15 दिवसांच्या अंतराने सिंचन करावे. सिंचन हे शक्यतो तूषार सिंचन पध्दतीने
करावे.
फळबागेचे व्यवस्थापन
काढणीस तयार असलेल्या मृग बहार फळांची काढणी करून घ्यावी. फळधारणा
सुरू असलेल्या अंबे बहार संत्रा/मोसंबी बागेस आवश्यकतेनूसार सकाळी किंवा
संध्याकाळी पाणी द्यावे. अंबे बहार संत्रा/मोसंबी बागेत फळगळ दिसून येत
असल्यास एनएए 10 पीपीएम ची फवारणी करावी.
अंबे बहार डाळींब बाग फळधाराणा अवस्थेत असल्यामूळे आवश्यकतेनूसार
पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या डाळींब फळांची काढणी करून घ्यावी. अंबे बहार
डाळींब बागेत फळवाढीसाठी 00:00:50 एक किलो प्रति 100 लिटर पाण्यात मिसळून फवारणी
करावी.
चिकू बागेत आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या चिकू
फळांची काढणी करून घ्यावी.
भाजीपाला
भाजीपाला पिकास आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. काढणीस तयार
असलेल्या भाजीपाला पिकाची काढणी करून घ्यावी. भाजीपाला (मिरची, वांगे व भेंडी)
पिकात रसशोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या
व्यस्थापनासाठी पायरीप्रॉक्सीफेन
5% + फेनप्रोपाथ्रीन 15% 10 मीली किंवा डायमेथोएट 30% 13 मीली प्रती 10 लिटर
पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.
फुलशेती
फुल पिकात खूरपणी करून तण विरहीत ठेवावेत व आवश्यकतेनूसार पाटाने
पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी करून घ्यावी.
पशुधन व्यवस्थापन
कमाल तापमानात होत असलेल्या वाढीमूळे, जनावरांना सावलीत बांधावे
आणि पिण्यासाठी थंड व स्वच्छ पाण्याचा पूरवठा करावा. उष्णतेपासून पशूधनाचे संरक्षण
करण्यासाठी गोठ्याच्या छतावर गवताचे आच्छादन करावे व गोठयातील तापमाना कमी
करण्यासाठी गोठ्याच्या छतास असणारे पत्रे ओले करण्यासाठी ठिबक सिंचन पाईपचा वापर
करावा. पशुधनास मूबलक प्रमाणात हिरवा चारा, प्रथिनेयूक्त, खनिजमिश्रण आणि मिठयूक्त
खाद्य द्यावे. पशुधनास सकाळी किंवा सायंकाळी चारावयास सोडावे.
सौजन्य
मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक
मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 03/2026
- 2027 शुक्रवार, दिनांक
– 10.04.2026
No comments:
Post a Comment