Tuesday, 7 April 2026

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहण्याची तर दिनांक 09 एप्रिल रोजी लातूर व धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळीवाऱ्यासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील 24 ते 48 तासात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही व त्यानंतर हळूहळू वाढ होण्याची तर पुढील पाच दिवसात किमान तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही.

 


हवामान सारांश / चेतावनी :

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहण्याची तर दिनांक  09 एप्रिल रोजी लातूर व धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळीवाऱ्यासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील 24 ते 48 तासात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही व त्यानंतर हळूहळू वाढ होण्याची तर पुढील पाच दिवसात किमान तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही.

सामान्य सल्ला :

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 10 ते 16 एप्रिल 2026 दरम्यान पाऊस सरासरीएवढा, कमाल तापमान व किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे.

संदेश : मराठवाडयात पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता लक्षात घेता  पिकास, फळबागेस, भाजीपाला व फुल पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

काढणी केलेल्या रब्बी ज्वारी पिकाची मळणी करून घ्यावी.

काढणी केलेल्या गहू पिकाची मळणी करून घ्यावी.

उन्हाळी भुईमूग पिकात आवश्यकतेनूसार तुषार सिंचन पध्दतीने पाणी व्यवस्थापन करावे.

मका पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. उशीरा पेरणी केलेल्या मका पिकात लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोऐट 5 टक्के  4 ग्रॅम किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटून फवारणी करावी. फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी. वेळेवर पेरणी केलेल्या व काढणीस तयार असलेल्या मका पिकाची काढणी करून घ्यावी.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

केळी बागेस आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. काढणीस तयार असलेल्या केळी घडांची काढणी करून घ्यावी. नविन लागवड केलेल्या केळी झाडांना काठीने आधार द्यावा. जमिनीतील ओलावा टिकून राहण्यासाठी व जमिनीचे तापमान संतुलित राहण्यासाठी केळी फळझाडाच्या आळयात आच्छादन करावे. केळी बागेतील अतिरिक्त फुटवे काढावेत. मागील आठवड्यातील ढगाळ वातावरणामूळे केळी बागेत रोगांचा प्रादूर्भाव होऊ नये म्हणून बागेत रोगनाशकाची फवारणी करावी.

जमिनीतील ओलावा टिकून राहण्यासाठी व जमिनीचे तापमान संतुलित राहण्यासाठी आंबा फळझाडाच्या आळयात आच्छादन करावे. बागेस सकाळी किंवा संध्याकाळी पाणी द्यावे पाणी देण्यासाठी ठिबक सिंचन पध्दतीचा अवलंब करावा. आंबा बागेत फळगळ दिसून येत असल्यास  एनएए 15 पीपीएम ची फवारणी करावी. नविन लागवड केलेल्या फळबागेमध्ये रोपांना शेडनेटच्या साहाय्याने सावली करावी जेणेकरून लहान रोपांचे प्रखर उन्हापासून संरक्षण होईल. मागील आठवड्यातील ढगाळ वातावरणामूळे आंबा बागेत रोगांचा प्रादूर्भाव होऊ नये म्हणून बागेत रोगनाशकाची फवारणी करावी.

द्राक्ष बागेस आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. काढणीस तयार असलेल्या द्राक्ष घडांची काढणी करून घ्यावी.

सिताफळ बागेत आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. जमिनीतील ओलावा टिकून राहण्यासाठी व जमिनीचे तापमान संतुलित राहण्यासाठी सिताफळ फळझाडाच्या आळयात आच्छादन करावे.

भाजीपाला

भाजीपाला पिकात खूरपणी करून तण विरहीत ठेवावे व आवश्यकतेनूसार पाटाने पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची काढणी करून घ्यावी. भाजीपाला (मिरची, वांगे व भेंडी) पिकात रसशोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यस्थापनासाठी पायरीप्रॉक्सीफेन 5% + फेनप्रोपाथ्रीन 15% 10 मीली किंवा  डायमेथोएट 30% 13 मीली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

फुलशेती

फुल पिकात खूरपणी करून तण विरहीत ठेवावे व आवश्यकतेनूसार पाटाने पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या फुल पिकाची काढणी करून घ्यावी. फुल पिकाची लागवड करून घ्यावी.

पशुधन व्यवस्थापन

कमाल तापमानात होत असलेल्या वाढीमूळे, जनावरांना सावलीत बांधावे आणि पिण्यासाठी थंड व स्वच्छ पाण्याचा पूरवठा करावा. उष्णतेपासून पशूधनाचे संरक्षण करण्यासाठी गोठ्याच्या छतावर गवताचे आच्छादन करावे व गोठयातील तापमाना कमी करण्यासाठी गोठ्याच्या छतास असणारे पत्रे ओले करण्यासाठी ठिबक सिंचन पाईपचा वापर करावा. पशुधनास मूबलक प्रमाणात हिरवा चारा, प्रथिनेयूक्त, खनिजमिश्रण आणि मिठयूक्त खाद्य द्यावे. पशुधनास सकाळी किंवा सायंकाळी चारावयास सोडावे.

सौजन्‍य

मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक02/2026-2027    मंगळवार, दिनांक 07.04.2026

 

No comments:

Post a Comment

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 22 मे रोजी बीड, लातूर व धाराशिव जिल्हयात तर दिनांक 23 मे रोजी लातूर व धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. दिनांक 22 मे रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना जिल्हयात तर दिनांक 23 मे रोजी परभणी, बीड, नांदेड जिल्हयात तर दिनांक 24 मे रोजी बीड, नांदेड, लातूर, धाराशिव जिल्हयात तर दिनांक 25 मे रोजी धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील तिन दिवसात कमाल तापमानात 1 ते 3 अं.से. ने घट होऊन त्यानंतर 1 ते 2 अं.से. ने वाढ होण्याची तर पुढील तीन दिवसात किमान तापमानात 1 ते 2 अं.से. ने वाढ होऊन त्यानंतर 1 ते 2 अं.से. ने घट होण्याची शक्यता आहे.

  हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र ,   मुंबई येथून प्राप्त झालेल्या...