हवामान सारांश / चेतावनी :
प्रादेशिक
हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक
17 एप्रिल रोजी छत्रपती संभाजी
नगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड जिल्हयात तर दिनांक 18 एप्रिल रोजी छत्रपती
संभाजी नगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्हयात तूरळक ठिकाणी उष्णतेची लाट
राहण्याची शक्यता आहे. दिनांक 18 एप्रिल रोजी धाराशिव जिल्हयात तर दिनांक 19
एप्रिल रोजी परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर जिल्हयात तर दिनांक 20 एप्रिल रोजी
परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर जिल्हयात तर दिनांक 21 एप्रिल रोजी लातूर व धाराशिव
जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते
मध्यम पावसाची शक्यता आहे. दिनांक 18 एप्रिल रोजी हिंगोली व नांदेड जिल्हयात तूरळक
ठिकाणी दूपारी किंवा सायंकाळी वादळीवाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता
आहे. दिनांक 18 एप्रिल रोजी बीड, लातूर जिल्हयात तर दिनांक 19 एप्रिल रोजी छत्रपती
संभाजी नगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली जिल्हयात तर दिनांक 20 एप्रिल रोजी छत्रपती
संभाजी नगर, जालना, बीड, धाराशिव जिल्हयात तर दिनांक 21 एप्रिल रोजी छत्रपती संभाजी
नगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली व नांदेड जिल्हयात हलक्या स्वरूपाच्या पावसाची
शक्यता आहे.मराठवाडयात पुढील दोन दिवसात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही व
त्यानंतर 2 ते 3 अं.से. ने घट होण्याची शक्यता आहे.
सामान्य सल्ला :
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस)
मराठवाडयात दिनांक 17 ते 23 एप्रिल 2026 दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त, कमाल
तापमान व किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची व दिनांक 24 ते 30 एप्रिल 2026
दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी, कमाल तापमान व किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची
शक्यता आहे.
संदेश : मराठवाडयात
दिनांक 18 ते 21 एप्रिल दरम्यान तूरळक ठिकाणी वादळीवाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या
पावसाची शक्यता लक्षात घेता, काढणी केलेल्या पिकाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक
करावी.
वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
ऊस पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. ऊस पिकात खूरपणी करून तण
नियंत्रण करावे. ऊस पिकात काणी रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास प्रतिबंधात्मक
व्यवस्थापनासाठी बूरशीनाशकाची फवारणी करावी किंवा प्रादर्भावग्रस्त झाडे उपटून
नष्ट करावीत.
काढणीस तयार असलेल्या हळद पिकाची काढणी करून सुरक्षित ठिकाणी
साठवणूक करावी. सध्या हळदीची काढणी, हळद उकडणे, वाळवणे ही कामे करून घ्यावीत.
उन्हाळी तीळ पिकास मध्यम जमिनीत 8 ते 10 दिवसांनी व भारी जमिनीत 12
ते 15 दिवसांच्या अंतराने सिंचन करावे. सिंचन हे शक्यतो तूषार सिंचन पध्दतीने
करावे.
फळबागेचे व्यवस्थापन
काढणीस तयार असलेल्या मृग बहार फळांची काढणी करून घ्यावी. फळधारणा
सुरू असलेल्या अंबे बहार संत्रा/मोसंबी बागेस आवश्यकतेनूसार सकाळी किंवा
संध्याकाळी पाणी द्यावे. अंबे बहार संत्रा/मोसंबी बागेत फळगळ दिसून येत
असल्यास एनएए 10 पीपीएम ची फवारणी करावी.
अंबे बहार संत्रा/मोसंबी बागेत फळवाढीसाठी 00:00:50 1.5 किलो प्रति 100 लिटर
पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.
अंबे बहार डाळींब बाग फळधाराणा अवस्थेत असल्यामूळे आवश्यकतेनूसार
पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या डाळींब फळांची काढणी करून घ्यावी. अंबे बहार
डाळींब बागेत फळवाढीसाठी 00:00:50 1.5 किलो प्रति 100 लिटर पाण्यात मिसळून पावसाची
उघाड बघून फवारणी करावी.
चिकू बागेत आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या चिकू
फळांची काढणी करून घ्यावी.
भाजीपाला
भाजीपाला पिकास आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. काढणीस तयार
असलेल्या भाजीपाला पिकाची काढणी करून घ्यावी. भाजीपाला (मिरची, वांगे व भेंडी) पिकात
रसशोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यस्थापनासाठी
पायरीप्रॉक्सीफेन 5% + फेनप्रोपाथ्रीन 15% 10
मीली किंवा डायमेथोएट 30% 13 मीली प्रती 10 लिटर
पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.
फुलशेती
फुल पिकात खूरपणी करून तण विरहीत ठेवावेत व आवश्यकतेनूसार पाटाने
पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी करून घ्यावी.
पशुधन व्यवस्थापन
तूरळक ठिकाणी वादळी वारा, विजांच्या कडकडाट व वाऱ्याचा वेग अधिक
राहून हलक्या ते मध्यम पावसाचा व गारपीटीचा अंदाज लक्षात घेता, जनावरांना उघडयावर सोडू किंवा बांधू नये. निवा-याच्या ठिकाणी बांधावे व पावसात भिजणार
नाहीत याची काळजी घ्यावी. कमाल तापमानात होत असलेल्या वाढीमूळे, जनावरांना सावलीत
बांधावे आणि पिण्यासाठी थंड व स्वच्छ पाण्याचा पूरवठा करावा. उष्णतेपासून पशूधनाचे संरक्षण करण्यासाठी
गोठ्याच्या छतावर गवताचे आच्छादन करावे
व गोठयातील तापमाना कमी करण्यासाठी गोठ्याच्या छतास असणारे पत्रे ओले करण्यासाठी
ठिबक सिंचन पाईपचा वापर करावा. पशुधनास मूबलक प्रमाणात हिरवा चारा, प्रथिनेयूक्त, खनिजमिश्रण आणि मिठयूक्त खाद्य द्यावे. पशुधनास सकाळी किंवा सायंकाळी चारावयास सोडावे.
सौजन्य
मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक
मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 05/2026
- 2027 शुक्रवार, दिनांक
– 17.04.2026
No comments:
Post a Comment