हवामान सारांश / चेतावनी :
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 21 एप्रिल रोजी लातूर
जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 40 ते 50 कि.मी.) राहून मध्यम पावसाची
शक्यता आहे. दिनांक 21 एप्रिल रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली,
नांदेड, धाराशिव जिल्हयात तर दिनांक 22 एप्रिल रोजी छत्रपती संभाजी नगर, लातूर, धाराशिव
जिल्हयात तर दिनांक 23 एप्रिल रोजी नांदेड, लातूर, धाराशिव जिल्हयात तर दिनांक 24
एप्रिल रोजी बीड, लातूर, धाराशिव जिल्हयात तर दिनांक 25 एप्रिल रोजी परभणी, हिंगोली,
नांदेड व लातूर जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक
(ताशी 30 ते 40
कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक 22 ते 25 एप्रिल
दरम्यान तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
सामान्य सल्ला :
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस)
मराठवाडयात दिनांक 24 ते 30 एप्रिल 2026 दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी, कमाल तापमान
व किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.
संदेश : मराठवाडयात
पुढील पाच दिवस तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्य ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा
अंदाज पाहता, काढणी व मळणी केलेल्या पिकाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.
वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण
कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि
सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
उन्हाळी भुईमूग पिकात आवश्यकतेनूसार तुषार सिंचन पध्दतीने पाणी
व्यवस्थापन करावे.
उन्हाळी भुईमूग पिकात रसशोषण करणाऱ्या (मावा, तुडतुडे, फुलकीडे व
पांढरी माशी) कीडींना आकर्षीत करण्यासाठी एकरी 10 ते 12 पिवळे व निळे चिकट सापळे
लावावेत व तंबाखूवरील पाने खाणाऱ्या अळीचे व लाल केसाळ अळीचे समूहातील अंडी लहान
अळ्या हाताने वेचून नष्ट कराव्यात. उन्हाळी भुईमूग पिकात रसशोषण करणाऱ्या किडींचा
प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी
अर्काची किंवा ॲझाडिरेक्टिन (30 पीपीएम) 3 मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून पावसाची
उघाड बघून फवारणी करावी.
मका पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. मका पिकात लष्करी अळीचा
प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोऐट 5
टक्के 4 ग्रॅम किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी
4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात पावसाची उघाड बघून मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटून
फवारणी करावी. फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी
करावी. काढणीस तयार असलेल्या मका पिकाची काढणी करून घ्यावी.
फळबागेचे व्यवस्थापन
केळी बागेस आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. काढणीस तयार
असलेल्या केळी घडांची काढणी करून घ्यावी. नविन लागवड केलेल्या केळी झाडांना काठीने
आधार द्यावा. जमिनीतील ओलावा टिकून राहण्यासाठी व जमिनीचे तापमान संतुलित
राहण्यासाठी केळी फळझाडाच्या आळयात आच्छादन करावे. केळी बागेतील अतिरिक्त फुटवे
काढावेत.
वादळी वारा, पाऊस झाल्यास फळबागेत पडलेली फळे गोळा करून नष्टी
करावीत तसेच मोडलेल्या फांद्यांची छाटणी करावी. जमिनीतील ओलावा टिकून राहण्यासाठी
व जमिनीचे तापमान संतुलित राहण्यासाठी आंबा फळझाडाच्या आळयात आच्छादन करावे. बागेस
सकाळी किंवा संध्याकाळी पाणी द्यावे पाणी देण्यासाठी ठिबक सिंचन पध्दतीचा अवलंब
करावा. आंबा बागेत 0.1 % बावीस्टीनची पावसाची उघाड बघून फवारणी करावी.
द्राक्ष बागेमध्ये एप्रिल छाटणी ही घड निर्मितीसाठी केली जाते.
द्राक्ष बागेत एप्रिल छाटणीची पुर्व तयारी करून घ्यावी. वादळी वारा व पाऊस यामूळे
फळबागेत पडलेली फळे गोळा करून नष्ट करावीत.
सिताफळ बागेत आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. जमिनीतील ओलावा
टिकून राहण्यासाठी व जमिनीचे तापमान संतुलित राहण्यासाठी सिताफळ फळझाडाच्या आळयात
आच्छादन करावे.
भाजीपाला
भाजीपाला पिकात खूरपणी करून तण विरहीत ठेवावे. काढणीस तयार
असलेल्या भाजीपाला पिकाची काढणी करून घ्यावी. नविन लागवड व पूर्नलागवड केलेल्या
रोपांना आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. भाजीपाला (मिरची, वांगे व भेंडी)
पिकात रसशोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या
व्यस्थापनासाठी पायरीप्रॉक्सीफेन
5% + फेनप्रोपाथ्रीन 15% 10 मीली किंवा डायमेथोएट 30% 13 मीली प्रती 10 लिटर
पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.
फुलशेती
फुल पिकात खूरपणी करून तण विरहीत ठेवावे व आवश्यकतेनूसार पाटाने
पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या फुल पिकाची काढणी करून घ्यावी.
पशुधन व्यवस्थापन
तूरळक ठिकाणी वादळी वारा, विजांच्या कडकडाट व वाऱ्याचा वेग अधिक
राहून हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज लक्षात घेता, जनावरांना उघडयावर सोडू किंवा बांधू नये. निवा-याच्या ठिकाणी बांधावे व पावसात भिजणार
नाहीत याची काळजी घ्यावी.
सौजन्य
मुख्य प्रकल्प
समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 06/2026-2027 मंगळवार,
दिनांक –
21.04.2026
No comments:
Post a Comment