Friday, 22 May 2026

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 22 मे रोजी बीड, लातूर व धाराशिव जिल्हयात तर दिनांक 23 मे रोजी लातूर व धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. दिनांक 22 मे रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना जिल्हयात तर दिनांक 23 मे रोजी परभणी, बीड, नांदेड जिल्हयात तर दिनांक 24 मे रोजी बीड, नांदेड, लातूर, धाराशिव जिल्हयात तर दिनांक 25 मे रोजी धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील तिन दिवसात कमाल तापमानात 1 ते 3 अं.से. ने घट होऊन त्यानंतर 1 ते 2 अं.से. ने वाढ होण्याची तर पुढील तीन दिवसात किमान तापमानात 1 ते 2 अं.से. ने वाढ होऊन त्यानंतर 1 ते 2 अं.से. ने घट होण्याची शक्यता आहे.

 


हवामान सारांश / चेतावनी :

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसा दिनांक 22 मे रोजी बीड, लातूर व धाराशिव जिल्हयात तर दिनांक 23 मे रोजी लातूर व धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. दिनांक 22 मे रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना जिल्हयात तर दिनांक 23 मे रोजी परभणी, बीड, नांदेड जिल्हयात तर दिनांक 24 मे रोजी बीड, नांदेड, लातूर, धाराशिव जिल्हयात तर दिनांक 25 मे रोजी धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील तिन दिवसात कमाल तापमानात 1 ते 3 अं.से. ने घट होऊन त्यानंतर 1 ते 2 अं.से. ने वाढ होण्याची तर पुढील तीन दिवसात किमान तापमानात 1 ते 2 अं.से. ने वाढ होऊन त्यानंतर 1 ते 2 अं.से. ने घट होण्याची शक्यता आहे.

सामान्य सल्ला :

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 22 ते 28 मे 2026 दरम्यान पाऊस सरासरीएवढा, कमाल तापमान व किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची व दिनांक 29 मे ते 04 जून 2026 दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त, कमाल तापमान सररासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे.

संदेश : मराठवाडयात दिनांक 22 व 23 मे रोजी तूरळक ठिकाणी वादळीवाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यला लक्षात घेता, काढणी केलेल्या पिकाची, फळांची काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. पिकास, फळबागेस, भाजीपाला व फुल पिकास आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

 

पीक व्‍यवस्‍थापन

ऊस पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. ऊस पिकात खूरपणी करून तण नियंत्रण करावे. अडसाली ऊस लागवडीसाठी मध्यम काळी व उत्तम निचऱ्याची, खोल (60 ते 120 से. मी.) जमिन निवडावी.

सोयाबीन पिकाची पेरणी सर्व प्रकारच्या जमिनीत करता येते. परंतु अत्यंत हलक्या जमिनीत अपेक्षित उत्पादन मिळत नाही. जास्त आम्लयुक्त, क्षारयुक्त तथा रेताड जमिनीत सोयाबीनचे पीक घेऊ नये. सोयाबीन लागवडीसाठी मध्यम ते भारी उत्तम निचऱ्याची, सेंद्रिय कर्बाची मात्रा चांगल्या प्रमाणात असलेली जमीन निवडावी. जमिनीचा सामू 6.5 ते 7.5 च्या दरम्यान असणे गरजेचे आहे.

खरीप ज्वारी पेरणीसाठी मध्यम ते भारी, उत्तम निचऱ्याची जमीन निवडावी.

बाजरी या पिकाच्या पेरणीसाठी पाण्याचा उत्तम निचरा होणारी हलकी ते मध्यम जमीन निवडावी.

हळद लागवडीसाठी मध्यम काळी, निचऱ्याची भुसभुशीत, भरपूर सेंद्रिय पदार्थ असलेली जमिन निवडावी, तसेच जमिनीत हराळी, कुंदा, लव्हाळा अशी बहू वार्ष‍िक तणे असू नयेत. जमिनीत पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी. जमिनीचा आम्ल विम्ल निर्देशांक 6.5 ते 7.5 असलेल्या जमिनीत हळदीचे पिक उत्तम येते. 

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

संत्रा/मोसंबी बागेस आवश्यकतेनूसार सकाळी किंवा संध्याकाळी पाणी द्यावे. मृग बहार व्यवस्थापनासाठी संत्रा/मोसंबी बागेत पूर्व तयारी करावी. संत्रा/मोसंबी लागवडीसाठी मध्यम ते खोल भारी उत्तम निचऱ्याची व 1 मी. खोलीची चांगली जमिन निवडावी.  अतिआम्ल तथा क्षारयूक्त, चुनखडीयुक्त जमिन निवडू नये. नवीन लागवड केलेल्या व लहान झाडांना उन्हापासून संरक्षणासाठी सावली करावी तसेच खोडाभोवती आच्छादन करावे यामुळे कलमांची मर होणार नाही.

डाळींब बागेस आवश्यकतेनूसार सकाळी किंवा संध्याकाळी पाणी द्यावे. मृग बहार व्यवस्थापनासाठी डाळींब बागेत पूर्व तयारी करावी. डाळींब लागवडीसाठी पाण्याचा उत्तम निचरा होणारी हलकी ते मध्यम जमिन निवडावी. जमिनीचा सामू 6.5 ते 7.5 च्या दरम्यान असावा. नवीन लागवड केलेल्या व लहान झाडांना उन्हापासून संरक्षणासाठी सावली करावी तसेच खोडाभोवती आच्छादन करावे यामुळे कलमांची मर होणार नाही.

चिकू बागेस आवश्यकतेनूसार सकाळी किंवा संध्याकाळी पाणी द्यावे. चिकूच्या लागवडीसाठी उत्तम निचऱ्याची खोल, मध्यम काळी जमिन निवडावी, चुनखडीयुक्त जमिनीची निवड करू नये. नवीन लागवड केलेल्या व लहान झाडांना उन्हापासून संरक्षणासाठी सावली करावी तसेच खोडाभोवती आच्छादन करावे यामुळे कलमांची मर होणार नाही.

भाजीपाला

भाजीपाला पिकात अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची काढणी करून घ्यावी. खरीप हंगामात मिरची, वांगी, टोमॅटो, कांदा या भाजीपाला पिकांच्या लागवडीसाठी मध्यम काळी, निचऱ्याची भुसभुशीत जमिन निवडावी. भाजीपाला पिकास आवश्यकतेनुसार सकाळी किंवा सायंकाळी सुक्ष्म सिंचन पध्दतीने पाणी द्यावे.

फुलशेती

फुल पिकात खूरपणी करून तण विरहीत ठेवावेत व आवश्यकतेनूसार पाटाने पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी करून घ्यावी. खुल्या शेतातील गुलाब लागवडीसाठी मध्यम ते हलकी तसेच पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमिन निवडावी.

पशुधन व्यवस्थापन

तापमानात वाढ झाल्यामूळे दूधाळ जनावरांमध्ये दुध उत्पादन कमी होते व त्याचबरोबर दुधातील स्निग्ध पदार्थ व प्रथिने यांचे प्रमाण कमी होते. हया पासून दुधाळ जनावरांचे संरक्षण करण्यासाठी त्यांच्या गोठ्याच्या शेड वरील छताला स्प्रिंकलर्स किंवा फॉगर्स ने थंडावा निर्माण करावा, दुपारी जनावरांना धुवून काढावे, जमलेच तर पंखा किंवा कुलर्सची व्यवस्था शेड मध्ये करावी, शेडच्या बाजूला पोत्याचे पडदे बांधून त्यांना भिजवावे. गोठ्याची उंची कमीत कमी मध्यभागी 15 फुट उंच असावी. पशुधनास पिण्यास भरपूर पाणी द्यावे.

 

सौजन्‍य

मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक15/2026-2027    शुक्रवार, दिनांक – 22.05.2026

 

No comments:

Post a Comment

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 09 जून रोजी परभणी, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव जिल्हयात तर दिनांक 10 जून रोजी बीड, लातूर,धाराशिव जिल्हयात तर दिनांक 11 जून रोजी बीड, धाराशिव जिल्हयात तर दिनांक 12 जून रोजी बीड, लातूर व धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील चार दिवसात तूरळक ठिकाणी वादळीवाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील दोन दिवसात कमाल तापमानात 1 ते 2 अं.से. ने घट होऊन त्यानंतर फारशी तफावत जाणवनार नाही.

  हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या अ...