Tuesday, 19 May 2026

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात दिनांक 21 ते 23 मे दरम्यान हवामान कोरडे राण्याची शक्यता आहे. दिनांक 19 मे रोजी परभणी, हिंगोली जिल्हयात तर दिनांक 20 मे रोजी हिंगोली व नांदेड जिल्हयात तूरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे. दिनांक 19 मे रोजी बीड, नांदेड, लातूर, धाराशिव जिल्हयात तर दिनांक 20 मे रोजी लातूर व धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

 


हवामान सारांश / चेतावनी :

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात दिनांक 21 ते 23 मे दरम्यान हवामान कोरडे राण्याची शक्यता आहे. दिनांक 19 मे रोजी परभणी, हिंगोली जिल्हयात तर दिनांक 20 मे रोजी हिंगोली व नांदेड जिल्हयात तूरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे. दिनांक 19 मे रोजी बीड, नांदेड, लातूर, धाराशिव जिल्हयात तर दिनांक 20 मे रोजी लातूर व धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

सामान्य सल्ला :

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 22 ते 28 मे 2026 दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त, कमाल तापमान सरासरीएवढे ते सररासरीपेक्षा किंचित कमी व किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.

संदेश :

मराठवाडयात दिनांक 19 व 20 मे रोजी तूरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता लक्षात घेता पिकास, फळबागेस, भाजीपाला व फुल पिकास आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे व पशुधनाची काळजी घ्यावी. सोयाबीन पिकाच्या पेरणीपूर्वी शेतकऱ्यांनी बियाण्याची उगवण क्षमता तपासून घ्यावी. उगवण क्षमता 70 % पेक्षा जास्त असेल तरच बियाणे पेरणीसाठी वापरावे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

मध्यम ते भारी, कसदार व पाण्याचा उत्तम निचरा होणाऱ्या जमिनीमध्ये कापूस पिकाची लागवड करावी. हलक्या तसेच पाण्याचा निचरा न होणाऱ्या चिबड जमिनीवर कापूस पिकाची लागवड करू नये. कापूस पिकाच्या लागवडीसाठी जमिनीची खोली 60 ते 100 सेंमी असावी.

मध्यम ते भारी (30 ते 45 सेंमी खोल) पाण्याचा उत्तम निचरा होणाऱ्या जमिनीत तूर पिकाची लागवड करावी. चोपन व क्षारयुक्त जमिनीत तूर पिकाची लागवड करू नये. तुर पिकाच्या वाढीस जमिनीचा सामु 6.5 ते 7.5 योग्य असतो. आम्लयुक्त जमिनीत पिकाच्या मुळांवरील गाठींची योग्य वाढ होत नसल्यामुळे रोपे पिवळी पडतात.

योग्य निचऱ्याच्या मध्यम ते भारी जमिनीत मुग/उडीद या पिकांच्या लागवड करावी. एकदम हलक्या प्रतिची मुरमाड जमिन या पिकास योग्य नाही. पाणी साठवूण ठेवणाऱ्या जमिनीत हे पीक घेऊ नये.

काढणी केलेल्या उन्हाळी भुईमूग पिकाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. मध्यम ते हलकी, भुसभुशीत, सेंद्रिय पदार्थ आणि कॅल्शियमचे भरपूर प्रमाण असलेल्या जमिनीत भुईमूग  पिकाची लागवड करावी. भुसभुशीत जमिनीत भरपूर प्रमाणात हवा खेळती राहते यामुळे मुळांची चांगली वाढ होऊन आऱ्या सुलभरीतीने जमिनीत जाण्यास तसेच शेंगा पोसण्यासाठी मदत होते.

मका पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. मका पिकात लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोऐट 5 टक्के  4 ग्रॅम किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटून फवारणी करावी. फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी. काढणीस तयार असलेल्या मका पिकाची काढणी करून घ्यावी. मध्यम ते भारी, सुपीक, उत्तम निचऱ्याची जमिनी मका पिकाची लागव करावी.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

काळी व कसदार, भुसभुशीत गाळाची, पोयटयाची, पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत केळीची मृग बाग लागवड करावी. लागवडीसाठी क्षारयुक्त जमिनीची निवड करू नये. नवीन लागवड केलेल्या व लहान झाडांना उन्हापासून संरक्षनासाठी सावली करावी यामुळे कलमांची मर होणार नाही तसेच  बागेत खोडाजवळ आच्छादन करावे. केळी बागेला पाण्याचा ताण बसणार नाही याची काळजी घ्यावी. केळी बागेत ठिंबक सिंचन पद्धतीने सकाळी लवकर किंवा सायंकाळी पाणी व्यवस्थापन करावे.

काढणीस तयार असलेल्या आंबा फळांची काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. मध्यम ते भारी प्रतीची पाण्याचा चांगला निचरा होणारी, थोडीशी आम्लयुक्त जमिनीत आंबा पिकाची लागवड करावी. चोपन व चुनखडीयुक्त जमिनीत लागवड करू नये. जमिनीची खोली कमीतकमी 1.5 ते 2 मीटर असावी. नविन लागवड केलेल्या आंबा बागेला पाण्याचा  ताण बसणार नाही याची काळजी घ्यावी. नविन लागवड केलेल्या आंबा बागेत ठिंबक सिंचन पद्धतीने सकाळी लवकर किंवा सायंकाळी पाणी व्यवस्थापन करावे.

वेळेवर एप्रिल छाटणी केलेल्या द्राक्ष बागेत आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. द्राक्ष बागेत अतिरिक्त फुटव्यांची विरळणी करावी. द्राक्ष बागेत छाटणी केल्यानंतर द्राक्ष बागेत हायड्रोजन सायनामाईड पेस्ट लावावी.

मुरमाड, अत्यंत हलक्या, डोंगर उताराच्या जमिनीत तसेच मध्यम खोल जमिनीत सिताफळ लागवड करावी.

भाजीपाला

खरीप हंगामात मिरची, वांगी, टोमॅटो, कांदा या भाजीपाला पिकांच्या लागवडीसाठी मध्यम काळी, निचऱ्याची भुसभुशीत जमिन निवडावी. भाजीपाला पिकास आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची काढणी करून घ्यावी. मिरची पिकावरील फुल किडींच्या व्यवस्थापनासाठी ॲसिटामेप्रिड 20% एसपी 2 ग्रॅम किंवा सायअँट्रानिलीप्रोल 10.26 ओडी 12 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% एसजी 4 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

पशुधन व्यवस्थापन

कमाल तापमानात होत असलेल्या वाढीमूळे, जनावरांना सावलीत बांधावे आणि पिण्यासाठी थंड व स्वच्छ पाण्याचा पूरवठा करावा. उष्णतेपासून पशूधनाचे संरक्षण करण्यासाठी गोठ्याच्या छतावर गवताचे आच्छादन करावे व गोठ्यातील तापमान कमी करण्यासाठी गोठ्याच्या छतास असणारे पत्रे ओले करण्यासाठी ठिबक सिंचन पाईपचा वापर करावा. पशुधनास मुबलक प्रमाणात हिरवा चारा, प्रथिनेयूक्त, खनिज मिश्रण आणि मिठयुक्त खाद्य द्यावे. पशुधनास सकाळी किंवा सायंकाळी चारावयास सोडावे.

कुकुटपालन

उन्हाळयात वाढलेल्या तापमानामुळे कोंबड्यांना उष्माघाताचा त्रास होतो कोंबड्यांना उष्माघाताच्या त्रासापासून वाचवण्यासाठी कोंबड्यांच्या शेडवर वाळलेले गवत टाकावे शेडच्या छतावर स्प्रिंकलर किंवा तुषार बसवावेत. दुपारच्या उष्ण वातावरणात पक्षांना हाताळू नये कोंबड्यांना अविरत थंड पाण्याचा पुरवठा करणे आवश्यक आहे तसेच पिण्याच्या पाण्यातून जीवनसत्व क, इ आणि अ यांचा समावेश करावा.

 

 

सौजन्‍य

मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक14/2026-2027    मंगळवार, दिनांक – 19.05.2026

 

No comments:

Post a Comment