हवामान सारांश / चेतावनी :
प्रादेशिक
हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 05 जून रोजी बीड,
लातूर व धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक
(ताशी 40 ते 50
कि.मी.) राहून मध्यम पावसाची शक्यता आहे. दिनांक 05 जून रोजी छत्रपती संभाजी नगर,
जालना, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्हयात तर दिनांक 06 जून रोजी छत्रपती संभाजी
नगर, बीड जिल्हयात तर दिनांक 07 जून रोजी बीड, लातूर, धाराशिव जिल्हयात तर दिनांक
08 जून रोजी बीड, नांदेड, लातूर, धाराशिव जिल्हयात तर दिनांक 09 जून रोजी लातूर व
धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30
ते 40 कि.मी.) राहून
हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक 05 जून रोजी काही ठिकाणी तर
दिनांक 06 ते 08
जून दरम्यान तूरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील तीन दिवसात
कमाल तापमानात हळूहळू घट होण्याची शक्यता आहे.
सामान्य सल्ला :
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस)
मराठवाडयात दिनांक 05 ते 11 जून 2026 दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी, कमाल तापमान व
किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा किंचित कमी राहण्याची व दिनांक 12 ते 18
जून 2026 दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त, कमाल तापमान व किमान तापमान सरासरीएवढे
ते सरासरीपेक्षा किंचित जास्त राहण्याची शक्यता आहे.
संदेश : सध्याचा
होणारा पाऊस हा पूर्व मौसमी पाऊस असल्यामूळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. जमिनित
वापसा असतांना पूर्व मशागतीची कामे राहिली असल्यास पूर्व मशागतीची कामे करून
घ्यावीत.
वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
सोयाबीन पेरणीसाठी लवकर येणारे वाण: एमएयूएस-71 (समृध्दी),
एमएयुएस-158, एमएयुएस-612, जवाहर (जेएस-335), एमएयूएस 725, एमएयूएस 731, मध्यम
उशिरा येणारे वाण: प्रसाद (एमएयुएस-1), प्रतिकार (एमएयूएस-61), एमएयुएस-162,
प्रतिष्ठा (एमएयूएस 61-2) इत्यादी वाणांचा वापर करावा. सोयाबीन पिकाच्या
पेरणीपूर्वी शेतकऱ्यांनी बियाण्याची उगवण क्षमता तपासून घ्यावी. उगवण क्षमता 70 % पेक्षा जास्त असेल तरच बियाणे पेरणीसाठी वापरावे. कोरडवाहू
परिस्थितीत सोयाबीन + तुर हे आंतरपीक 2:1 किंवा 4:2 या प्रमाणात घ्यावे.
खरीप ज्वारी पेरणीसाठी संकरीत वाण: सीएसएच-14, सीएसएच-16, सीएसएच-25
(परभणी साईनाथ), सुधारीत वाण: परभणी शक्ती, पीव्हीके-809, पीव्हीके-801 (परभणी
श्वेता) इत्यादी वाणांचा वापर करावा.
बाजरीच्या पेरणीसाठी संकरीत वाण: सबुरी, श्रध्दा, शांती, एएचबी-1269, एएचबी-1200 (एफई) सुधारीत वाण: आयसीटीपी,
समृध्दी, परभणी संपदा या वाणांचा वापर करावा. बाजरी पिकामध्ये बाजरी + तुर हे
आंतरपीक 2:1, 3:3 किंवा 4:2 या प्रमाणात घ्यावे.
ऊस पिकावर पांढऱ्या माशीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास,
प्रादुर्भावग्रस्त पाने काढून नष्ट करावीत, पिवळ्या चिकट सापळ्यांचा पिकात वापर करावा,
रासायनिक कीटकनाशकामध्ये व्यवस्थापनासाठी क्लोरोपायरीफॉस 20 टक्के 30 मिली किंवा इमिडाक्लोप्रिड 17.8 टक्के 3 मिली किंवा ॲसीफेट 75% 20 ग्रॅम
प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे. ऊस पिकावर खोड किडीचा
प्रादूर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरपायरीफॉस 20 % 25 मिली किंवा क्लोरॅट्रानोलीप्रोल 18.5% 4 मिली प्रति
10 लीटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.
पाण्याची उपलब्धता असल्यास हळद पिकाची लागवड करून घ्यावी.
हळदीमध्ये आंतरपीके घेताना पहिल्या तीन ते साडेतीन महिन्यापर्यंत काढणी होईल अशा
प्रकारची आंतरपीके निवडावीत. यामध्ये पालेभाज्या सारख्या आंतरपिकांचा समावेश
असावा.
फळबागेचे व्यवस्थापन
संत्रा नविन बाग लागवडीसाठी नागपूर संत्रा, किन्नो तर मोसंबी नविन
बाग लागवडीसाठी न्यूसेलर, सातगुडी व फुले मोसंबी इत्यादी जातींची निवड करावी.
लागवडीसाठी शासकीय नोंदणीकृत रोपवाटीकेतूनच रोपांची खरेदी करावी. तूरळक ठिकाणी
वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज लक्षात घेता, नविन लागवड केलेल्या व लहान संत्रा/मोसंबी
झाडांना काठीने आधार द्यावा.
नवीन लागवड केलेल्या व लहान झाडांना उन्हापासून संरक्षनासाठी सावली
करावी तसेच बागेत खोडाजवळ आच्छादन करावे. डाळींब
नविन बाग लागवडीसाठी भगवा, फुले भगवा सुपर, गणेश, फुले आरक्ता, इत्यादी जातींची
निवड करावी. लागवडीसाठी शासकीय नोंदणीकृत रोपवाटीकेतूनच रोपांची खरेदी करावी. तूरळक
ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज लक्षात घेता, नविन लागवड केलेल्या व लहान डाळींब
झाडांना काठीने आधार द्यावा.
चिकू नविन बाग लागवडीसाठी कालीपत्ती, क्रिकेट बॉल इत्यादी जातींची
निवड करावी. लागवडीसाठी शासकीय नोंदणीकृत रोपवाटीकेतूनच रोपांची खरेदी करावी. तूरळक
ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज लक्षात घेता, नविन लागवड केलेल्या व लहान चिकू
झाडांना काठीने आधार द्यावा.
भाजीपाला
काढणीस तयार आसलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करावी. भाजीपाला
पिकास आवश्यकतेनुसार सुक्ष्म सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. खरीप हंगामात भाजीपाला
लागवडीसाठी रोपे तयार करण्यासाठी गादी वाफे तयार करून घ्यावेत. मिरची पिकाच्या
लागवडीसाठी परभणी तेजस, पूसा ज्वाला, अग्नीरेखा, फुले ज्योती, जी-4, जी-3 इत्यादी
जातींची निवड करावी. टोमॅटो पिकाच्या लागवडीसाठी देवगिरी, परभणी यशश्री,
ए.टी.एच-1, पुसारूबी, धनश्री, भाग्यश्री, आर्कारक्षक इत्यादी जातींची निवड करावी.
फुलशेती
काढणीस तयार असलेल्या फुलपिकाची काढणी करून घ्यावी. फुल पिकास
आवश्यकतेनुसार सुक्ष्म सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. खरीप हंगामात फुलपिकांच्या
लागवडीसाठी रोपे तयार करण्यासाठी गादी वाफे तयार करून घ्यावेत. गुलाब पिकाच्या
लागवडीसाठी ग्लॅडीयटर, सुपर स्टार, डबल डिलाईट, रेड मास्टर पीस इत्यादी जातींची
निवड करावी.
पशुधन व्यवस्थापन
तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या पावसाची शक्यता असल्यामूळे
चेतावनीच्या काळात जनावरे शक्यतो चरावयास बाहेर नेऊ नयेत. जनावरांना उघडयावर सोडू
किंवा बांधू नये, निवाऱ्याच्या ठिकाणी बांधावे व पावसात भिजणार नाहीत याची काळजी
घ्यावी. पशुधनास खुले पाणी तलाव किंवा नदीपासून दुर ठेवावे, ट्रॅकटर आणि इतर
धातुंच्या शेती अवजारांपासून दूर ठेवावे व पशुधनास झाडाखाली जमा होऊ देऊ नये, तसेच
पाऊस चालू होण्याच्या वेळी झाडाच्या आडोश्याला थांबू नये.
सौजन्य
मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक
मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 19/2026-2027 शुक्रवार,
दिनांक –
05.06.2026
No comments:
Post a Comment