Tuesday, 2 June 2026

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 02 जून रोजी छत्रपती संभाजी नगर व जालना जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 50 ते 60 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. दिनांक 02 जून रोजी नांदेड, लातूर व धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 40 ते 50 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. दिनांक 02 जून रोजी परभणी, बीड, हिंगोली जिल्हयात तर दिनांक 03 जून रोजी छत्रपती संभाजी नगर, बीड, लातूर व धाराशिव जिल्हयात तर दिनांक 04 जून रोजी नांदेड, लातूर व धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील पाच दिवसात तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील चोविस तासात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही व त्यानंतर पुढील तिन दिवसात घट होण्याची तर पुढील पाच दिवसात किमान तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही.

हवामान सारांश / चेतावनी :

सामान्य सल्ला :

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 05 ते 11 जून 2026 दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी, कमाल तापमान सररासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे.

संदेश :

मराठवाडयात दिनांक 02 ते 04 जून दरम्यान तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता लक्षात घेता, काढणी केलेल्या फळांची व भाजीपाला पिकांची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

कापूस  पिकाच्या लागवडीसाठी वाण  निवडताना जमिन व हवामान, कोरडवाहू  किंवा बागायती, लागवडीचा प्रकार व वाणांचे गुणधर्म यांचा  विचार करून वाणांची निवड करावी. बीटी कपाशीमध्ये कापूस + तूर (4-6:1 किंवा 6-8:2), कापूस + सोयाबीन (1:1), कापूस + मूग (1:1) रुंद ओळींमध्ये कापूस + मूग (1:2), कापूस + उडीद (1:1) ही आंतरपीक पध्दती घेतल्यास फायदेशीर ठरते.

तुर पिकाच्या पेरणीसाठी बीडीएन-711, बीडीएन-716, बीडीएन-2013-41 (गोदावरी), बीडीएन-2013-2 बीएसएमआर-736, बीएसएमआर-853 (वैशाली), बीडीएन-2, बीडीएन-708 (अमोल), पीकेव्ही तारा इत्यादी वाणांचा वापर करावा. तुरीचे उत्पादन वाढविण्यासाठी तसेचे जमिनीची उत्पादकता राखण्यासाठी तुर + बाजरी (2:4), तुर + सोयाबीन/मुग/उडीद (1:2 किंवा 2:4) असे ओळीचे प्रमाण ठेवून फायदेशीर आंतरपीक पध्दतीचा वापर केल्यास अधिक फायदा होतो.

मुग पेरणीसाठी बीएम-2002-1, बीएम-2003-2, कोपरगाव, बीएम-4, बीपीएमआर-145, फुले सुवर्णा, फुले चेतक, फुले मुग 2, पी.के.व्ही.ए.के.एम 4 इत्यादी वाणांचा वापर करावा तर उडीद  लागवडीसाठी बीडीयु-1, टीएयू-1, फुले राजन, फुले वसू, टीपीयू-4 इत्यादी वाणांचा वापर करावा. आंतरपीक म्हणून मुग/उडीद या पिकांना ‍विशेष महत्व प्राप्त आहे, ते या पिकांच्या कालावधीमुळे, हे दोन्हीही पिके तुर, ज्वारी, कपाशीत आंतरपीक म्हणून घेता येतात.

भुईमूग  पिकाच्या लागवडीसाठी एसबी-11, जेएल-24, एलजीएन-2 (मांजरा), टीएजी-24, टीजी-26, टीएलजी-45, एलजीएन-1, एलजीएन-123  इत्यादी वाणांचा वापर करावा.

मका  पिकाच्या पेरणीसाठी नवज्योत, मांजरा, डीएमएच-107, केएच-9451, एमएचएच, प्रभात, करवीर, जेके-2492, महाराजा, यूवराज इत्यादी वाणांचा वापर करावा.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

नविन केळी बाग लागवडीसाठी ग्रँड नाईन, अर्धापूरी, बसराई (देशावर), श्रीमंती, फुले प्राईड इत्यादी जातींचा वापर करावा.पूर्वी लागवड केलेल्या बागेत आंर मशागतीची कामे पूर्ण करून घ्यावी. लागवडीसाठी शासकीय नोंदणीकृत रोपवाटीकेतूनच रोपांची खरेदी करावी. नविन लागवड केलेल्या केळी झाडांना काठीने आधार द्यावा. केळी बागेस आवश्यकतेनूसार पाणी द्यावे.

नविन आंबा बाग लागवडीसाठी केसर, पायरी, तोतापूरी, निलम, सिंधू, साईसुगंध, वनराज, लंगडा, रत्ना, परभणी भूषण, निरंजन मल्लीका, दशेहरी इत्यादी जातींचा वापर करावा. लागवडीसाठी शासकीय नोंदणीकृत रोपवाटीकेतूनच रोपांची खरेदी करावी. आंबा बागेस आवश्यकतेनूसार पाणी द्यावे.

द्राक्ष बागेतील रोगग्रस्त पाने काढून टाकावीत व रोगनाशकाची फवारणी करावी. द्राक्ष बागेत आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे.

नविन सिताफळ बाग लागवडीसाठी बालानगर, टिपी-7, धारुर-6, अर्कासहान इत्यादी जातींचा वापर करावा. लागवडीसाठी शासकीय नोंदणीकृत रोपवाटीकेतूनच रोपांची खरेदी करावी.

भाजीपाला

पाण्याची उपलब्धता असलेल्या शेतकऱ्यांनी भाजीपाला पिकाची गादी वाफ्यावर रोपे तयार करण्यासाठी बी टाकले नसल्यास टाकून घ्यावे. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची काढणी करून घ्यावी. वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज लक्षात घेता, नविन लागवड केलेल्या व लहान वेलवर्गीय झाडांना काठीने आधार द्यावा.

फुलशेती

पाण्याची उपलब्धता असलेल्या शेतकऱ्यांनी हंगामी फुलपिकांच्या लागवडीसाठी गादीवाफ्श्यावर बी टाकून रोपे तयार करावी. वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज लक्षात घेता, काढणीस तयार असलेल्‍या फुलपिकांची काढणी करून घ्यावी.

पशुधन व्यवस्थापन

तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्यामूळे चेतावनीच्या काळात जनावरे शक्यतो चरावयास बाहेर नेऊ नयेत. जनावरांना उघडयावर सोडू किंवा बांधू नये, निवाऱ्याच्या ठिकाणी बांधावे व पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्यावी. पशुधनास खुले पाणी तलाव किंवा नदीपासून दुर ठेवावे, ट्रॅकटर आणि इतर धातुंच्या शेती अवजारांपासून दूर ठेवावे व पशुधनास झाडाखाली जमा होऊ देऊ नये, तसेच पाऊस चालू होण्याच्या वेळी झाडाच्या आडोश्याला थांबू नये. पशुधनास मुबलक प्रमाणात हिरवा चारा, प्रथिनेयूक्त, खनिज मिश्रण आणि मिठयुक्त खाद्य द्यावे.

सौजन्‍य

मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 18/2026-2027    मंगळवार, दिनांक – 02.06.2026

No comments:

Post a Comment

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 02 जून रोजी छत्रपती संभाजी नगर व जालना जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 50 ते 60 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. दिनांक 02 जून रोजी नांदेड, लातूर व धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 40 ते 50 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. दिनांक 02 जून रोजी परभणी, बीड, हिंगोली जिल्हयात तर दिनांक 03 जून रोजी छत्रपती संभाजी नगर, बीड, लातूर व धाराशिव जिल्हयात तर दिनांक 04 जून रोजी नांदेड, लातूर व धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील पाच दिवसात तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील चोविस तासात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही व त्यानंतर पुढील तिन दिवसात घट होण्याची तर पुढील पाच दिवसात किमान तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही.

  हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या अ...