Friday, 12 June 2026

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 12 जून रोजी परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव जिल्हयात तर दिनांक 13 जून रोजी बीड, नांदेड, लातूर व धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. दिनांक 12 जून रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना व बीड जिल्हयात तूरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील पाच दिवसात तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील पाच दिवसात कमाल तापमानात 1 ते 2 अं.से. ने वाढ होण्याची शक्यता आहे.

 


हवामान सारांश / चेतावनी :

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसा दिनांक 12 जून रोजी परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव जिल्हयात तर दिनांक 13 जून रोजी बीड, नांदेड, लातूर व धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. दिनांक 12 जून रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना व बीड जिल्हयात तूरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील पाच दिवसात तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील पाच दिवसात कमाल तापमानात 1 ते 2 अं.से. ने वाढ होण्याची शक्यता आहे.

सामान्य सल्ला :

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 12 ते 18 जून 2026 दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त, कमाल तापमान सरासरीएवढे व किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची व दिनांक 19 ते 25 जून 2026 दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त, कमाल तापमान सरासरीएवढे व किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.

संदेश : सध्याचा पाऊस हा पूर्व मौसमी पाऊस असल्यामूळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

 

पीक व्‍यवस्‍थापन

सोयाबीनची पेरणी 45X5 सें.मी. अंतरावर व 2.5 ते 3.0 सें.मी. खोलीवर करता येते. सोयाबीन पेरणीसाठी हेक्टरी 65 किलो बियाणे वापरावे. सोयाबीन बियाण्यास पेरणीपूर्वी कार्बोक्झिन 37.5 % + थायरम 37.5 % (मिश्र घटक) या बुरशीनाशकाची 3 ग्रॅम किंवा ॲझोक्सीस्ट्रोबीन 2.5 टक्के + थायोफॅनेट मिथाईल 11.25 टक्के + थायोमिथॉक्झाम 25 टक्के एफ एस 10 मिली प्रति किलो बियाणे याप्रमाणात बिजप्रक्रिया करावी. बुरशीनाशकाच्या बिजप्रक्रियेनंतर थायामिथोक्झाम 30% एफएस 10 मिली प्रति किलो ग्रॅमची बिजप्रक्रिया करावी. वरील बिजप्रक्रियेनंतर बियाण्यास रायझोबियम जिवाणू खत ( ब्रेडी रायझोबियम) + स्फुरद विरघळविणारे जिवाणू खताची (पी.एस.बी.) 250 ग्रॅम प्रति 10 किलो किंवा 100 मिली/10 किलो ग्रॅम (द्रवरूप असेल तर) याची बिजप्रक्रिया करावी व नंतर बियाणे सावलीमध्ये वाळवून शक्य तेवढ्या लवकर पेरणी करावी. बिजप्रक्रियेसाठी व.ना.म.कृ. वि. परभणी निर्मित द्रवरूप जैविक खताचा (रायझोफॉस) 10 मिली प्रति किलो बियाणे याप्रमाणात वापर करता येतो. सोयाबीन पिकाची पेरणी शक्यतो बी.बी.एफ (रूंद वरंबा सरी) पध्दतीने करावी ज्यामूळे मातीतील ओलावा व जमिनीची सुपिकता टिकून राहण्यास मदत होऊन अधिक उत्पादन मिळते. पेरणीपूर्वी सोयाबीन बियाण्याची तपासून पाहावी, उगवण क्षमता 70 % पेक्षा जास्त असेल तरच बियाणे पेरणीसाठी वापरावे.

खरीप ज्वारीच्या पेरणीसाठी दोन ओळीमध्ये 45 सें.मी., दोन झाडातील अंतर 12.5 सें.मी. ठेवावे व पेरणी 3 ते 4 सें.मी. खोलीवर करता येते. पेरणीसाठी हेक्टरी 7.5 किलो संकरित व 10 किलो सुधारीत वाणांचे बियाणे वापरावे. खरीप ज्वारीच्या पेरणीपूर्वी गंधक 300 मेश 4 ग्रॅम किंवा थायरम 75 टक्के 3 ग्रॅम प्रति किलो बियाणे याप्रमाणात बिजप्रक्रिया करावी. तसेच इमिडाक्लोप्रीड 48 टक्के एफएस 14 मिली किंवा थायमिथॉक्झाम 30 टक्के 10 मिली प्रति किलो बियाण्यास बिजप्रक्रिया करावी. ॲझोटोबॅक्टर व स्फुरद विरघळविणारे जिवाणू (पी.एस.बी) प्रत्येकी 25 ग्रॅम प्रति किलो बियाणे याप्रमाणात बिजप्रक्रिया करावी. 

बाजरीची पेरणी 45X15 सें.मी. अंतरावर करता येते. पेरणी करतांना 4 सें.मी. पेक्षा जास्त खोल पेरू नये. बाजरी पेरणीसाठी हेक्टरी 3 ते 4 किलो बियाणे वापरावे. बाजरी पिकाच्या पेरणीपूर्वी बियाण्यास मेटालॅक्झील 35 % एसडी 6 ग्रॅम प्रति किलो बियाणे याप्रमाणे बिजप्रक्रिया करावी. 250 ग्रॅम ॲझोस्पिरीलम 10 किलो बियाण्यास चोळून पेरणी करावी किंवा शेवटी ॲझोटोबॅक्टर व स्फुरद विरघळविणारे जिवाणू (पीएसबी) प्रत्येकी 250 ग्रॅम प्रति 10 किलो बियाणे याप्रमाणात बियाण्यावर बिजप्रक्रिया करून पेरणी करता येते.

ऊस पिकावर खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरपायरीफॉस 20 % 25 मिली किंवा क्लोरॅट्रानोलीप्रोल 18.5% 4 मिली प्रति 10 लीटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. सुरू ऊसाची पक्की बांधणी केली नसल्यास ती करन घ्यावी व पक्की बांधणी करतांना 100 किलो नत्र, 55 किलो स्फुरद व 55 किलो पालाश प्रति हेक्टरी रासायनिक खतांची मात्रा द्यावी.             

पाण्याची उपलब्धता असल्यास हळद पिकाची लागवड करून घ्यावी. हळद लागवडीपूर्वी बियाण्यास क्विनॉलफॉस 25 टक्के प्रवाही 20 मिली + कार्बेंडेझीम 50 टक्के 10 ग्रॅम किंवा डायमेथोएट 30 टक्के प्रवाही 10 मिली + डायथेन एम-45 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून 100-120 किलो बियाण्यास बिजप्रक्रिया करावी. बियाणे 10 ते 15 मिनिट द्रावणात बूडवून ठेवावे. वनामकृवि, परभणी येथील बायोमिक्स 200 ग्रॅम किंवा 200 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून 100 किलो बियाण्यास बिजप्रक्रिया करावी.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

मृग बहार संत्रा/मोसंबी बाग फुलधारणेच्या अवस्थेत असल्यामूळे बागेत आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. अंबे बहार संत्रा/मोसंबी बागेमध्ये फळवाढीसाठी जिब्रॅलिक ॲसिड 1.5 ग्रॅम + 00:00:50 1 किलो प्रति 100 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.

डाळींब बागेस आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे.

चिकू बागेस आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे.

भाजीपाला

काढणीस तयार आसलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करावी. बी टाकलेल्या गादी वाफ्यावर वेळोवेळी आवश्यकतेनूसार झाऱ्याच्या साहाय्याने पाणी द्यावे. पाण्याची उपलब्धता असल्यास भाजीपाला (वांगी, मिरची, टोमॅटो इत्यादी) पिकाची रोपे तयार करण्यासाठी गादी वाफ्यावर बी टाकावे.

फुलशेती

काढणीस तयार असलेल्या फुलपिकाची काढणी करून घ्यावी. फुल पिकास आवश्यकतेनुसार सुक्ष्म सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. पाण्याची उपलब्धता असल्यास फुल पिकाची रोपे तयार करण्यासाठी गादी वाफ्यावर बी टाकावे.

पशुधन व्यवस्थापन

उन्हाळयातील उष्ण तापमान संपूण अचानक झालेला वातावरणातील बदल, ओलसर व दमट वातावरणामूळे जनावरांमध्ये रोगाचा प्रादूर्भाव वाढण्याची दाट शक्यता असते. त्यासाठी जनावराचे आरोग्य उत्तम व निरोगी ठेवण्यासाठी खालील उपाययोजना कराव्यात : जनावरे बांधणाऱ्या जागी पावसाचे पाणी जमा होणार नाही व गोठा ओलसर होऊ नये याची काळजी घ्यावी. गोठयातील आर्द्रता व दमटपणा कमी होण्यासाठी, गोठयामध्ये मूबलक प्रमाणात खेळती हवा व सूर्यप्रकाश उपलब्ध करावा. पावसाळ्यात दूभत्या जनावराची कास पोटॅशियम पॅरामॅग्नेटच्या पाण्यातील द्रावणाने स्वच्छ धूवून काढावे. पावसाळयात मूख्यत: जनावरे झाडाखाली किंवा उघड्यावर बांधू नयेत. पावसाळयात जनावरांना कोवळा, हिरवा चारा जास्त प्रमाणात देणे टाळावे.

 

सौजन्‍य

मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक21/2026-2027    शुक्रवार, दिनांक – 12.06.2026

No comments:

Post a Comment

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 12 जून रोजी परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव जिल्हयात तर दिनांक 13 जून रोजी बीड, नांदेड, लातूर व धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. दिनांक 12 जून रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना व बीड जिल्हयात तूरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील पाच दिवसात तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील पाच दिवसात कमाल तापमानात 1 ते 2 अं.से. ने वाढ होण्याची शक्यता आहे.

  हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र ,   मुंबई येथून प्राप्त झालेल्या...