हवामान सारांश / चेतावनी :
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई
येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 21 जूलै रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी, हिंगोली व नांदेड जिल्हयात तर दिनांक 22
जूलै रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली व नांदेड जिल्हयात तर दिनांक
23 जूलै रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना व परभणी जिल्हयात तर दिनांक 25 जूलै रोजी
छत्रपती संभाजी नगर जिल्हयात तूरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम
स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 24 जूलै रोजी जालना व छत्रपती संभाजी नगर
जिल्हयात तूरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
मराठवाडयात दिनांक 21 व 22 जूलै रोजी बऱ्याच ठिकाणी तर दिनांक 23 जूलै रोजी काही ठिकाणी
तर दिनांक 24 व 25 जूलै रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
मराठवाडयात पुढील तीन दिवसात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही व त्यानंतर 1
ते 2 अं.से. ने वाढ होण्याची शक्यता आहे.
सामान्य सल्ला :
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस)
मराठवाडयात दिनांक 24 ते 30 जूलै दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी, कमाल तापमान
सरासरीपेक्षा जास्त व किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता
आहे.
मराठवाडयातील जालना जिल्हयातील घनसावंगी तालूक्यातील (पेनेवाडी) : धाराशिव
जिल्हयातील भूम तालूक्यातील (भूम, मानकेश्वर, आम्भी), वाशी तालूक्यातील (तेरखेडा) इत्यादी
महसूल मंडळातील शेतकऱ्यांनी पेरणी करण्यास हरकत नाही तर इतर महसूल मंडळातील शेतकऱ्यांनी
पेरणीची घाई करू नये.
पेरणी न झालेल्या ठिकाणी पेरणी
योग्य पाऊस (75 ते 100 मिमी)
झाला असल्यास सूर्यफुल, तूर, संकरीत बाजरी, सोयाबीन + तूर (4:2), बाजरी + तूर
(3:3), एरंडी, कारळ आणि तिळ ही पिके घ्यावीत.
संदेश : शंखी
गोगलगायीच्या व्यवस्थापनासाठी पाऊस पडल्यानंतर सर्व शेतकऱ्यांनी सामूहिक रित्या
मोहिम राबवून गोगलगायी गोळा करून प्लास्टीकच्या पोत्यात भरून त्यात कोरडे मिठ अथवा
चूना टाकून नष्ट कराव्यात. गोगलगायी
जमा करताना अथवा हाताळणी करताना उघड्या हाताने न करता हातमोजे व तोंडावर मास्क
घालूनच करणे गरजेचे आहे. कापूस पिकामध्ये शंखी गोगलगायीच्या व्यवस्थापनासाठी
दाणेदार मेटाल्डिहाईड 2 किलो प्रति एकर या प्रमाणात शेतात पसरून द्यावे. केळी,
आंबा, द्राक्ष व सिताफळ बागेत शंखी गोगलगायीच्या व्यवस्थापनासाठी झाडाखाली दाणेदार
मेटाल्डिहाईड प्रति झाड 100 ग्रॅम पसरून टाकावे.
वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण
कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि
सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
पाऊस झालेल्या
ठिकाणी उगवून आलेल्या कापूस पिकात विरळणी व तूट भरून काढणे ही कामे करून घ्यावीत.
कापूस पिकात अंतरमशागतीची कामे करून घ्यावीत. कापूस पिकात रसशोषण करणाऱ्या किडींचा प्रादूर्भाव दिसून
येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्काची
किंवा ॲसिटामॅप्रिड 20 % 50 ग्रॅम किंवा फलोनिकॅमिड 50% 60 ग्रॅम प्रति एकर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. कापूस पिकाची लागवड करून
एक महिना झाला असल्यास कोरडवाहू कापसास 36 किलो नत्र प्रति हेक्टरी तर बागायती
कापूस पिकास 60 किलो नत्र प्रति हेक्टरी वरखताची मात्रा द्यावी.
तूर, मूग/उडीद व
भूईमूग पिकात अंतरमशागतीची कामे करून घ्यावीत.
मका पिकात
अंतरमशागतीची कामे करून घ्यावीत. मका पिकात लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत
असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट 5 टक्के 4 ग्रॅम किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली
प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटून पावसाची उघाड बघून
फवारणी करावी. फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी
करावी.
फळबागेचे व्यवस्थापन
नविन लागवड
केलेल्या केळी बागेस 50:50:50 किलो नत्र, स्फुरद व पालाश प्रति झाड द्यावे. केळी बागेत आंतर मशागतीची कामे पूर्ण करून घ्यावी. नविन लागवड केलेल्या केळी झाडांना काठीने आधार द्यावा.
आंबा फळ बागेत
रस शोषण करणाऱ्या किडींच्या व्यवस्थापनासाठी इमिडाक्लोप्रिड 4 ते 5 मिली प्रति 10
लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.
द्राक्ष
बागेतील फुटवे काढावेत. द्राक्ष बागेतील रोगग्रस्त पानाची विरळणी करून घ्यावी.
द्राक्ष बागेमध्ये शेंडा खूडून घ्यावा. द्राक्ष बागेत बागेत अतिरिक्त पाणी साचणार
नाही याची काळजी घ्यावी.
सिताफळ बागेत
अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे.
भाजीपाला
पाऊस झालेल्या
ठिकाणी जमिनीत ओलावा बघून बियाद्वारे लागवड केल्या जाणाऱ्या भाज्या उदा. भेंडी,
कारले, भोपळा, दोडका ईत्यादी भाजीपाला पिकांची लागवड करावी. गादीवाफ्यावर तयार
केलेल्या भाजीपाला पिकांच्या रोपांना 45 दिवस झाले असल्यास पाऊस झालेल्या ठिकाणी
जमिनीत ओलावा बघून भाजीपाला पिकांची (वांगी, मिरची, टोमॅटो इ.) पूर्नलागवड करावी. काढणीस
तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी. भाजीपाला पिकात तण नियंत्रण
करावे.
फुलशेती
पाउस झालेल्या
ठिकाणी जमिनीत ओलावा असल्याची खात्री करून फुल पिकाची पूर्नलागवड करावी. काढणीस
तयार असलेल्या फुलपिकाची काढणी करून घ्यावी. फुल पिकात तण नियंत्रण करावे.
पशुधन व्यवस्थापन
पावसाळ्यात
जनावरांभोवती गोमाशा, डास, गोचिड यांचा वावर वाढतो त्यासाठी पशुवैद्यकाच्या
सल्ल्याने किटकनाशकाची फवारणी करून घ्यावी. जनावरांना पावसाळ्यात उदभवणाऱ्या
आजारांचे पशुवैद्यकाच्या सल्ल्याने लसीकरण करून घ्यावे.विशेष शेळी व मेंढी यांना
पावसाळ्यात आंत्रविषार या आजारापासून प्रतिबंध करण्यासाठी त्या रोगांची लसीकरण
योग्य वेळेतच करून घ्यावे. पावसाळ्यात कोवळा, हिरवा चारा पशुधनास जास्त प्रमाणात
आहारात देणे टाळावे.
सौजन्य
मुख्य प्रकल्प
समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 32/2026-2027 मंगळवार,
दिनांक –
21.07.2026
No comments:
Post a Comment