Friday, 31 July 2026

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 31 जूलै रोजी छत्रपती संभाजी नगर जिल्हयात काही ठिकाणी वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 50 - 60 ते 70 कि.मी.) राहून मूसळधार ते खूप मुसळधार पावसाची शक्यता आहे. दिनांक 31 जूलै रोजी जालना, बीड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 40 ते 50 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. दिनांक 31 जूलै रोजी परभणी, हिंगोली, नांदेड जिल्हयात तूरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. दिनांक 01 ऑगस्ट रोजी बीड, लातूर, धाराशिव जिल्हयात तर दिनांक 02 व 04 ऑगस्ट रोजी परभणी, हिंगोली, नांदेड जिल्हयात तूरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक 31 जूलै रोजी बऱ्याच ठिकाणी तर दिनांक 01 ऑगस्ट रोजी काही ठिकाणी तर दिनांक 02 ते 04 ऑगस्ट दरम्यान तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचया पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील 24 ते 48 तासात तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही व त्यानंतर 2 ते 3 अं.से. ने वाढ होण्याची शक्यता आहे.

 


हवामान सारांश / चेतावनी :

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसा दिनांक 31 जूलै रोजी छत्रपती संभाजी नगर जिल्हयात काही ठिकाणी वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 50 - 60 ते 70 कि.मी.) राहून मूसळधार ते खूप मुसळधार पावसाची शक्यता आहे. दिनांक 31 जूलै रोजी जालना, बीड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 40 ते 50 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. दिनांक 31 जूलै रोजी परभणी, हिंगोली, नांदेड जिल्हयात तूरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. दिनांक 01 ऑगस्ट रोजी बीड, लातूर, धाराशिव जिल्हयात तर दिनांक 02 व 04 ऑगस्ट रोजी परभणी, हिंगोली, नांदेड जिल्हयात तूरळक ठिकाणी  विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक 31 जूलै रोजी बऱ्याच ठिकाणी तर दिनांक 01 ऑगस्ट रोजी काही ठिकाणी तर दिनांक 02 ते 04 ऑगस्ट दरम्यान तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचया पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील 24 ते 48 तासात तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही व त्यानंतर 2 ते 3 अं.से. ने वाढ होण्याची शक्यता आहे.

सामान्य सल्ला :

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 31 जूलै ते 06 ऑगस्ट 2026 दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त, कमाल तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा जासत तर दिनांक 07 ते 13 ऑगस्ट दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी, कमाल तापमान सरासरीपेक्षा जास्त व किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.

पेरणी न झालेल्या ठिकाणी पेरणी योग्य पाऊस (75 ते 100 मिमी) झाला असल्यास सूर्यफुल, तूर, संकरीत बाजरी, सोयाबीन + तूर (4:2), बाजरी + तूर (3:3), एरंडी, कारळ आणि तिळ ईत्यादी पिकांची पेरणी करून घ्यावी.

संदेश : पिकात, बागेत, भाजीपाला व फुल पिकात पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी व साचलेल्या  अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

 

पीक व्‍यवस्‍थापन

सोयाबीन पिकात पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी व साचलेल्या  अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. सोयाबीन पिकात पाने खाणाऱ्या अळीचा व खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास, याच्या व्यवस्थापनासाठी प्रोफेनोफॉस 50%  400 मिली किंवा इथिऑन 50% 600मिली किंवा थायामिथॉक्झाम 12.6% + लॅम्बडा सायहॅलोथ्रीन 9.5% (पूर्वमिश्रित किटकनाशक) 50 मिली किंवा प्रादूर्भाव खूप जास्त असल्यास क्लोरँट्रानिलीप्रोल 18.5% 60 मिली प्रति एकर यापैकी कुठलेही एक किटकनाशक पावसाची उघाड बघून फवारणी करावी. सूक्ष्म अन्नद्रव्याच्या कमतरतेमूळे सोयाबीन पिक पिवळे दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी ईडीटीए चिलेटेड मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट ग्रेड-2 50 ग्रॅम  किंवा 50 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघुन फवारणी करावी. सोयाबीन पिकात पिवळा मोझॅक या रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी पिकातील पिवळा मोझॅक प्रादूर्भाव ग्रस्त झाडे उपटून नष्ट करावीत. सोयाबीन पिकावरील पिवळा मोझॅकच्या व्यवस्थापनासाठी थायमिथोक्झाम 12.6% + लॅम्बडा सिहॅलोथ्रीन 9.6% झेड सी 50 मिली किंवा ‍ॲसिटामिप्रिड 25% + बाइफेन्थ्रीन 25% डब्ल्यू जी 100 ग्रॅम किंवा बीटा साइफ्लुथ्रीन 8.49% + इमिडाक्लोप्रीड 19.81% ओडी 140 मिली प्रति एकर यापैकी एका किटकनाशकाची पावसाची उघाड बघून याप्रमाणे फवारणी करावी. सोयाबीन पिक पेरणी करून 20 ते 28 दिवसाच्या कालावधीत असतांनाच तणांच्या व्यवस्थापनासाठी सोडियम अॅसिफ्लुओर्फेन + क्लोडिनाफॉप-प्रोपार्जिल किंवा फोमेसाफेन + क्विझालोफॉप-इथिल किंवा फ्ल्युअॅझीफॉप-पी-ब्युटिल 11.1% w/w + फोमेसाफेन 11.1% w/w एसएल, किंवा  फोमेसाफेन 12.5% + क्विझालोफॉप-इथिल 4.68% ईसी. 400 मिली प्रति 200 लिटर पाणी याप्रमाणे प्रति एकर पावसाची उघाड बघून फवारणी करावी.

खरीप ज्वारी पिकात पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी व साचलेल्या  अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. खरीप ज्वारी पिकात लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट 5 टक्के  4 ग्रॅम किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटून पावसाची उघाड बघुन फवारणी करावी. फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी.

बाजरी पिकात पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी व साचलेल्या  अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. बाजरी पिकात जमिनीत वापसा असतांना हलकी कोळपणी करावी.  

ऊस पिकात पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी व साचलेल्या  अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. सध्याच्या ढगाळ वातावरणामूळे ऊस पिकात पायरीला (पाकोळी) या किडीचा प्रादूर्भाव दिसून येत आहे, किडीच्या निरिक्षणासाठी व मोठ्या प्रमाणात प्रौढ जमा करून नष्ट करण्यासाठी एक प्रकाश सापळा प्रति पाच एकर क्षेत्र या प्रमाणात पिकाच्या उंचीच्या अर्धा फूट उंचीवर लावून सायंकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत चालू ठेवावा. किडीच्या व्यवस्थापनासाठी मेटाराझीयम ॲनोसोप्ली या जैविक बुरशीची 40 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. वनस्पतीजन्य कीटकनाशकामध्ये 5 टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी तसेच रासायनिक व्यवस्थापनकरिता क्लोरोपायरीफॉस 20 टक्के 600 मिली किंवा मोनोक्रोटोफॉस 36 टक्के 200 मिली प्रति एकर पावसाची उघाड बघुन फवारावे.

हळद पिकात पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी व साचलेल्या  अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. हळद पिकात कंदमाशीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 15 दिवसांच्या अंतराने क्विनालफॉस 25% 20 मिली किंवा डायमिथोएट 30 % 10  मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून आलटून-पालटून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. (हळद पिकावर केंद्रीय किटकनाशक मंडळातर्फे लेबल क्लेम नसल्यामूळे विद्यापिठ शिफारशीत संशोधनाचे निष्कर्ष दिले आहेत).

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

संत्रा/मोसंबी बागेत पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी व साचलेल्या  अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. सध्याच्या ढगाळ वातावरणामूळे संत्रा/मोसंबी बागेत किडीचा प्रादूर्भाव होऊ नये म्हणून, बागेत किटकनाशकाची व रोगनाशकाची पावसाची उघाड बघून फवारणी करावी. मृग बहार संत्रा/मोसंबी बागेत 19:19:19 खताची 15 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.

डाळींब बागेत पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी व साचलेल्या  अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. मृग बहार डाळींब बागेत तेल्या रोगाचा प्रादूर्भाव होण्याची शक्यता पाहता 1 % बोर्डो मिश्रणाची व 13:00:45 1 % ची पावसाची उघाड बघून फवारणी करावी.

चिकू बागेत पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी व साचलेल्या  अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा.

भाजीपाला

भाजीपाला पिकात पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी व साचलेल्या अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. पाऊस झालेल्या ठिकाणी जमिनीत ओलावा बघून बियाद्वारे लागवड केल्या जाणाऱ्या भाज्या उदा. भेंडी, कारले, भोपळा, दोडका ईत्यादी भाजीपाला पिकांची लागवड करावी. गादीवाफ्यावर तयार केलेल्या भाजीपाला पिकांच्या रोपांना 45 दिवस झाले असल्यास पाऊस झालेल्या ठिकाणी जमिनीत ओलावा बघून भाजीपाला पिकांची (वांगी, मिरची, टोमॅटो इ.) पूर्नलागवड करावी. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी. भाजीपाला पिकास जमिनीत ओलावा बघून खतामात्रा देण्यात यावी.

फुलशेती

फुल पिकात पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी व साचलेल्या  अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. पाउस झालेल्या ठिकाणी  जमिनीत ओलावा असल्याची खात्री करून फुल पिकाची पूर्नलागवड करावी. काढणीस तयार असलेल्या फुलपिकाची काढणी करून घ्यावी.

पशुधन व्यवस्थापन

पावसाळ्यात जनावरांभोवती गोमाशा, डास, गोचिड यांचा वावर वाढतो त्यासाठी पशुवैद्यकाच्या सल्ल्याने किटकनाशकाची फवारणी करून घ्यावी. जनावरांना पावसाळ्यात उदभवणाऱ्या आजारांचे पशुवैद्यकाच्या सल्ल्याने लसीकरण करून घ्यावे. विशेष शेळी व मेंढी यांना पावसाळ्यात आंत्रविषार या आजारापासून प्रतिबंध करण्यासाठी त्या रोगांची लसीकरण योग्य वेळेतच करून घ्यावे. पावसाळ्यात कोवळा, हिरवा चारा पशुधनास जास्त प्रमाणात आहारात देणे टाळावे.

                                           सौजन्‍य

मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक35/2026-2027    शुक्रवार, दिनांक – 31.07.2026

 


No comments:

Post a Comment

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 31 जूलै रोजी छत्रपती संभाजी नगर जिल्हयात काही ठिकाणी वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 50 - 60 ते 70 कि.मी.) राहून मूसळधार ते खूप मुसळधार पावसाची शक्यता आहे. दिनांक 31 जूलै रोजी जालना, बीड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 40 ते 50 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. दिनांक 31 जूलै रोजी परभणी, हिंगोली, नांदेड जिल्हयात तूरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. दिनांक 01 ऑगस्ट रोजी बीड, लातूर, धाराशिव जिल्हयात तर दिनांक 02 व 04 ऑगस्ट रोजी परभणी, हिंगोली, नांदेड जिल्हयात तूरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक 31 जूलै रोजी बऱ्याच ठिकाणी तर दिनांक 01 ऑगस्ट रोजी काही ठिकाणी तर दिनांक 02 ते 04 ऑगस्ट दरम्यान तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचया पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील 24 ते 48 तासात तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही व त्यानंतर 2 ते 3 अं.से. ने वाढ होण्याची शक्यता आहे.

  हवामान सारांश / चेतावनी : प्...