हवामान सारांश / चेतावनी :
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई
येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 28 जूलै रोजी हिंगोली
व नांदेड जिल्हयात तर दिनांक 29 जूलै रोजी जालना, परभणी, हिंगोली जिल्हयात तर
दिनांक 30 जूलै रोजी छत्रपती संभाजी नगर जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना,
वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून मूसळधार पावसाची शक्यता आहे. दिनांक 28 जूलै रोजी छत्रपती संभाजी नगर,
जालना, परभणी जिल्हयात तर दिनांक 29 जूलै रोजी छत्रपती संभाजी नगर, बीड, लातूर, धाराशिव
जिल्हयात तर दिनांक 30 जूलै रोजी नांदेड, हिंगोली, जालना, परभणी, बीड जिल्हयात तर दिनांक
31 जूलै रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना,
वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 40 ते 50 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. दिनांक 28 जूलै रोजी
बीड, लातूर, धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग
अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक 28
जूलै रोजी बऱ्याच ठिकाणी तर दिनांक 29 व 30 जूलै रोजी बहूतांश ठिकाणी तर दिनांक 31
जूलै रोजी बऱ्याच ठिकाणी तर दिनांक 01 ऑगस्ट रोजी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम
स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील तीन दिवसात कमाल तापमानात 2 ते
3 अं.से. हळूहळू घट होऊन त्यानंतर फारशी तफावत जाणवनार नाही.
सामान्य सल्ला :
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस)
मराठवाडयात दिनांक 31 जूलै ते 06 ऑगस्ट दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी, कमाल
तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा किंचित जास्त व किमान तापमान सरासरीपेक्षा
किंचित जास्त राहण्याची शक्यता आहे.
मराठवाडयातील परभणी जिल्हयातील पूर्णा तालूक्यातील (पूर्णा), पालम तालूक्यातील (रावराजूर,
पालन, बनवस) : नांदेड जिल्हयातील नांदेड तालूक्यातील
(तूप्पा, वसरणी, विष्णूपूरी, लिंबगाव, वाजेगाव), मुखेड तालूक्यातील (जाहूर) लोहा तालूक्यातील
(माळाकोळी, कापसी, सोनखेड, शेवडी), हदगाव तालूक्यातील (निवगा, भरडशेवाळ), देगलूर
तालूक्यातील (देगलूर, खानापूर, मरखेल, माळेगाव), किनवट तालूक्यातील (जलधारा), उमरी
तालूक्यातील (उमरी), नायगाव तालूक्यातील (नायगाव, कुंटुर) : छत्रपती संभाजी नगर
जिल्हयातील छत्रपती संभाजी नगर तालूक्यातील (भवसिंगपूरा), गंगापूर तालूक्यातील
(तूर्काबाद, आसेगाव) इत्यादी महसूल मंडळातील शेतकऱ्यांनी सूर्यफुल,
तूर, संकरीत बाजरी, सोयाबीन + तूर (4:2), बाजरी + तूर (3:3), एरंडी, कारळ आणि तिळ ईत्यादी
पिकांची पेरणी करण्यास हरकत नाही तर इतर महसूल मंडळातील शेतकऱ्यांनी पेरणीची घाई
करू नये.
संदेश : प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून
प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 28 ते 30 जूलै दरम्यान तूरळक ठिकाणी मूसळधार
पावसाचा अंदाज लक्षात घेता, पिकात, फळबागेत, भाजीपाल व फुल पिकात अतिरिक्त पाणी
साचणार नाही याची दक्षता घ्यावी व अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा.
वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण
कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि
सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
पाऊस झालेल्या
ठिकाणी उगवून आलेल्या कापूस पिकात विरळणी व तूट भरून काढणे ही कामे करून घ्यावीत.
कापूस पिकात जमिनीत वापसा असतांना अंतरमशागतीची कामे करून घ्यावीत. कापूस पिकात रसशोषण करणाऱ्या किडींचा प्रादूर्भाव दिसून
येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्काची
किंवा ॲसिटामॅप्रिड 20 % 50 ग्रॅम किंवा फलोनिकॅमिड 50% 60 ग्रॅम प्रति एकर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. दिनांक 28 ते 30 जूलै
दरम्यान तूरळक ठिकाणी मूसळधार पावसाचा अंदाज लक्षात घेता, खत व्यवस्थापनाची कामे
तीन दिवसानंतर कापूस पिकाची लागवड करून एक महिना झाला असल्यास कोरडवाहू कापसास 36
किलो नत्र प्रति हेक्टरी तर बागायती कापूस पिकास 60 किलो नत्र प्रति हेक्टरी
वरखताची मात्रा द्यावी. कापूस पिकात अतिरिक्त पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी
व अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा.
तूर पिकात जमिनीत
वापसा असतांना अंतरमशागतीची कामे करून घ्यावीत. तूर पिकात अतिरिक्त पाणी साचणार
नाही याची दक्षता घ्यावी.
मूग/उडीद पिकात
जमिनीत वापसा असतांना अंतरमशागतीची कामे करून घ्यावीत. मूग/उडीद पिकात अतिरिक्त
पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी व अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा.
भुईमूग पिकात जमिनीत
वापसा असतांना अंतरमशागतीची कामे करून घ्यावीत. भूईमूग पिकात अतिरिक्त पाणी साचणार
नाही याची दक्षता घ्यावी व अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा.
मका पिकात जमिनीत
वापसा असतांना अंतरमशागतीची कामे करून घ्यावीत. मका पिकात लष्करी अळीचा
प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट 5
टक्के 4 ग्रॅम किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी
4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटून पावसाची उघाड
बघून फवारणी करावी. फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी
करावी. मका पिकात अतिरिक्त पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी व अतिरिक्त पाण्याचा
निचरा करावा.
फळबागेचे व्यवस्थापन
दिनांक 28 ते
30 जूलै दरम्यान तूरळक ठिकाणी मूसळधार पावसाचा अंदाज लक्षात घेता, तीन दिवसानंतर नविन
लागवड केलेल्या केळी बागेस 50:50:50 किलो नत्र, स्फुरद व पालाश प्रति झाड द्यावे. केळी बागेत जमिनीत वापसा असतांना आंतर मशागतीची
कामे पूर्ण करून घ्यावी. नविन लागवड केलेल्या केळी झाडांना काठीने
आधार द्यावा. केळी बागेत अतिरिक्त पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी व अतिरिक्त
पाण्याचा निचरा करावा.
आंबा फळ बागेत
रस शोषण करणाऱ्या किडींच्या व्यवस्थापनासाठी इमिडाक्लोप्रिड 4 ते 5 मिली प्रति 10
लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. आंबा बागेत अतिरिक्त पाणी
साचणार नाही याची दक्षता घ्यावी व अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा.
द्राक्ष
बागेतील फुटवे काढावेत. द्राक्ष बागेतील रोगग्रस्त पानाची विरळणी करून घ्यावी.
द्राक्ष बागेमध्ये शेंडा खूडून घ्यावा. द्राक्ष बागेत बागेत अतिरिक्त पाणी साचणार
नाही याची काळजी घ्यावी. द्राक्ष बागेत अतिरिक्त पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी
व अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा.
सिताफळ बागेत जमिनीत
वापसा असतांना अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. सिताफळ बागेत अतिरिक्त
पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी व अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा.
भाजीपाला
पाऊस झालेल्या
ठिकाणी जमिनीत ओलावा बघून बियाद्वारे लागवड केल्या जाणाऱ्या भाज्या उदा. भेंडी,
कारले, भोपळा, दोडका ईत्यादी भाजीपाला पिकांची लागवड करावी. गादीवाफ्यावर तयार
केलेल्या भाजीपाला पिकांच्या रोपांना 45 दिवस झाले असल्यास पाऊस झालेल्या ठिकाणी
जमिनीत ओलावा बघून भाजीपाला पिकांची (वांगी, मिरची, टोमॅटो इ.) पूर्नलागवड करावी. काढणीस
तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी. भाजीपाला पिकात जमिनीत वापसा
असतांना अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. भाजीपाला पिकात अतिरिक्त पाणी
साचणार नाही याची दक्षता घ्यावी व अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा.
फुलशेती
पाउस झालेल्या
ठिकाणी जमिनीत ओलावा असल्याची खात्री करून
फुल पिकाची पूर्नलागवड करावी. काढणीस तयार असलेल्या फुलपिकाची काढणी करून घ्यावी.
फुल पिकात जमिनीत वापसा असतांना अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. फुल
पिकात अतिरिक्त पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी व अतिरिक्त पाण्याचा निचरा
करावा.
पशुधन व्यवस्थापन
पावसाळ्यात
जनावरांभोवती गोमाशा, डास, गोचिड यांचा वावर वाढतो त्यासाठी पशुवैद्यकाच्या
सल्ल्याने किटकनाशकाची फवारणी करून घ्यावी. जनावरांना पावसाळ्यात उदभवणाऱ्या
आजारांचे पशुवैद्यकाच्या सल्ल्याने लसीकरण करून घ्यावे.विशेष शेळी व मेंढी यांना
पावसाळ्यात आंत्रविषार या आजारापासून प्रतिबंध करण्यासाठी त्या रोगांची लसीकरण
योग्य वेळेतच करून घ्यावे. पावसाळ्यात कोवळा, हिरवा चारा पशुधनास जास्त प्रमाणात
आहारात देणे टाळावे.
सौजन्य
मुख्य प्रकल्प
समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 34/2026-2027 मंगळवार,
दिनांक –
28.07.2026
No comments:
Post a Comment