Friday, 7 August 2026

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 08 ऑगस्ट रोजी जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर जिल्हयात तर दिनांक 09 ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. दिनांक 07 ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर जिल्हयात तर दिनांक 08 ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजी नगर, बीड, धाराशिव जिल्हयात तर दिनांक 09 ऑगस्ट रोजी परभणी, हिंगोली, नांदेड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक 07 ऑगस्ट रोजी काही ठिकाणी तर दिनांक 08 व 09 ऑगस्ट रोजी बऱ्याच ठिकाणी तर दिनांक 10 व 11 ऑगस्ट रोजी तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील 24 तासात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही व त्यानंतर हळूहळू 1 ते 2 अं.से. ने वाढ होण्याची शक्यता आहे.

 


हवामान सारांश / चेतावनी :

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसा दिनांक 08 ऑगस्ट रोजी जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर जिल्हयात तर दिनांक 09 ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. दिनांक 07 ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर जिल्हयात तर दिनांक 08 ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजी नगर, बीड, धाराशिव जिल्हयात तर दिनांक 09 ऑगस्ट रोजी परभणी, हिंगोली, नांदेड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक 07 ऑगस्ट रोजी काही ठिकाणी तर दिनांक 08 व 09 ऑगस्ट रोजी बऱ्याच ठिकाणी तर दिनांक 10 व 11 ऑगस्ट रोजी तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील 24 तासात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही व त्यानंतर हळूहळू 1 ते 2 अं.से. ने वाढ होण्याची शक्यता आहे.

सामान्य सल्ला :

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 07 ते 13 ऑगस्ट 2026 दरम्यान पाऊस सरासरीएवढा, कमाल तापमान सरासरीएवढे व किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा किंचित जास्त तर दिनांक 14 ते 20 ऑगस्ट दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त, कमाल तापमान सरासरीएवढे व किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा किंचित जास्त राहण्याची शक्यता आहे.

संदेश : पिकात, बागेत, भाजीपाला व फुल पिकात जमिनीत वापसा असतांना अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

 

पीक व्‍यवस्‍थापन

सोयाबीन पिकात पाने खाणाऱ्या अळीचा व खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास, याच्या व्यवस्थापनासाठी प्रोफेनोफॉस 50%  400 मिली किंवा इथिऑन 50% 600मिली किंवा थायामिथॉक्झाम 12.6% + लॅम्बडा सायहॅलोथ्रीन 9.5% (पूर्वमिश्रित किटकनाशक) 50 मिली किंवा प्रादूर्भाव खूप जास्त असल्यास क्लोरँट्रानिलीप्रोल 18.5% 60 मिली प्रति एकर यापैकी कुठलेही एक किटकनाशक पावसाची उघाड बघून फवारणी करावी. सूक्ष्म अन्नद्रव्याच्या कमतरतेमूळे सोयाबीन पिक पिवळे दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी ईडीटीए चिलेटेड मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट ग्रेड-2 50 ग्रॅम  किंवा 50 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघुन फवारणी करावी. सोयाबीन पिकात पिवळा मोझॅक या रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी पिकातील पिवळा मोझॅक प्रादूर्भाव ग्रस्त झाडे उपटून नष्ट करावीत. सोयाबीन पिकावरील पिवळा मोझॅकच्या व्यवस्थापनासाठी थायमिथोक्झाम 12.6% + लॅम्बडा सिहॅलोथ्रीन 9.6% झेड सी 50 मिली किंवा ‍ॲसिटामिप्रिड 25% + बाइफेन्थ्रीन 25% डब्ल्यू जी 100 ग्रॅम किंवा बीटा साइफ्लुथ्रीन 8.49% + इमिडाक्लोप्रीड 19.81% ओडी 140 मिली प्रति एकर यापैकी एका किटकनाशकाची पावसाची उघाड बघून याप्रमाणे फवारणी करावी. जमिनीत वापसा जमिनीत सोयाबीन पिकात अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे.

खरीप ज्वारी पिकाची पेरणी करून 30 दिवस झाले असल्यास 40 किलो नत्र प्रति हेक्टर खतमात्रा द्यावी. खरीप ज्वारी पिकात लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट 5 टक्के  4 ग्रॅम किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटून पावसाची उघाड बघुन फवारणी करावी. फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी. खरीप ज्वारी पिकात जमिनीत वापसा असतांना अंतरमशागतीची कामे करून पिक तण विरहीत ठेवावे.

बाजरी पिकात जमिनीत वापसा असतांना अंतरमशागतीची कामे करून पिक तण विरहीत ठेवावे.

सध्याच्या ढगाळ वातावरणामूळे ऊस पिकात पायरीला (पाकोळी) या किडीचा प्रादूर्भाव दिसून येत आहे, किडीच्या निरिक्षणासाठी व मोठ्या प्रमाणात प्रौढ जमा करून नष्ट करण्यासाठी एक प्रकाश सापळा प्रति पाच एकर क्षेत्र या प्रमाणात पिकाच्या उंचीच्या अर्धा फूट उंचीवर लावून सायंकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत चालू ठेवावा. किडीच्या व्यवस्थापनासाठी मेटाराझीयम ॲनोसोप्ली या जैविक बुरशीची 40 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. वनस्पतीजन्य कीटकनाशकामध्ये 5 टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी तसेच रासायनिक व्यवस्थापनकरिता क्लोरोपायरीफॉस 20 टक्के 600 मिली किंवा मोनोक्रोटोफॉस 36 टक्के 200 मिली प्रति एकर पावसाची उघाड बघुन फवारावे.

जमिनीत वापसा असतांना हळद पिकात अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. हळद पिकाची लागवड करून 30 दिवस झाले असल्यास हळद पिकास 25 किलो नत्र प्रति हेक्टरी सूक्ष्म सिंचन पध्दतीने तीन ते चार वेळा विभागून द्यावे. हळद पिकाची लागवड करून 60 दिवस झाले असल्यास 25 किलो नत्रासोबत 00:52:34 15.5 किलो प्रति एकरी सूक्ष्म सिंचन पध्दतीने तीन ते चार वेळा विभागून द्यावे. हळद पिकात कंदमाशीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 15 दिवसांच्या अंतराने क्विनालफॉस 25% 20 मिली किंवा डायमिथोएट 30 % 10  मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून आलटून-पालटून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. (हळद पिकावर केंद्रीय किटकनाशक मंडळातर्फे लेबल क्लेम नसल्यामूळे विद्यापिठ शिफारशीत संशोधनाचे निष्कर्ष दिले आहेत).

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

संत्रा/मोसंबी बाग फुलधारणा व फळधारणेच्या अवव्थेत असल्यामूळे बागेस पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. सध्याच्या ढगाळ वातावरणामूळे संत्रा/मोसंबी बागेत किडीचा प्रादूर्भाव होऊ नये म्हणून, बागेत किटकनाशकाची व रोगनाशकाची पावसाची उघाड बघून फवारणी करावी. संत्रा/मोसंबी बागेत जमिनीत वापसा असतांना अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे.

मृग बहार डाळींब बागेत तेल्या रोगाचा प्रादूर्भाव होण्याची शक्यता पाहता 1 % बोर्डो मिश्रणाची व याच्या व्यवस्थापनासाठी स्ट्रेप्टोसायक्लीन 2 ग्रॅम किंवा कॉपर ऑक्झी क्लोराइड 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. डाळींब बागेत जमिनीत वापसा असतांना अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे.

चिकू बागेत जमिनीत वापसा असतांना अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे.

भाजीपाला

काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी. भाजीपाला पिकास जमिनीत ओलावा बघून खतामात्रा देण्यात यावी. भाजीपाला पिकास आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. भाजीपाला पिकात जमिनीत वापसा असतांना अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे.

फुलशेती

काढणीस तयार असलेल्या फुलपिकाची काढणी करून घ्यावी. फुल पिकास आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. फुल पिकात जमिनीत वापसा असतांना अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे.

पशुधन व्यवस्थापन

पावसाळ्यात जनावरांभोवती गोमाशा, डास, गोचिड यांचा वावर वाढतो त्यासाठी पशुवैद्यकाच्या सल्ल्याने किटकनाशकाची फवारणी करून घ्यावी. जनावरांना पावसाळ्यात उदभवणाऱ्या आजारांचे पशुवैद्यकाच्या सल्ल्याने लसीकरण करून घ्यावे. विशेष शेळी व मेंढी यांना पावसाळ्यात आंत्रविषार या आजारापासून प्रतिबंध करण्यासाठी त्या रोगांची लसीकरण योग्य वेळेतच करून घ्यावे. पावसाळ्यात कोवळा, हिरवा चारा पशुधनास जास्त प्रमाणात आहारात देणे टाळावे.

                                           सौजन्‍य

मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक37/2026-2027    शुक्रवार, दिनांक – 07.08.2026

 

1 comment:

  1. शेतकऱ्यांसाठी उपयुक्त माहिती. पीक व्यवस्थापनासाठी याचा फायदा होतो.

    ReplyDelete

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 08 ऑगस्ट रोजी जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर जिल्हयात तर दिनांक 09 ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. दिनांक 07 ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर जिल्हयात तर दिनांक 08 ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजी नगर, बीड, धाराशिव जिल्हयात तर दिनांक 09 ऑगस्ट रोजी परभणी, हिंगोली, नांदेड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक 07 ऑगस्ट रोजी काही ठिकाणी तर दिनांक 08 व 09 ऑगस्ट रोजी बऱ्याच ठिकाणी तर दिनांक 10 व 11 ऑगस्ट रोजी तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील 24 तासात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही व त्यानंतर हळूहळू 1 ते 2 अं.से. ने वाढ होण्याची शक्यता आहे.

  हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र ,   मुंबई येथून प्राप्त झालेल्या...