Tuesday, 11 August 2026

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 12 ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड जिल्हयात तूरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम तर परभणी, नांदेड व हिंगोली जिल्हयात हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 13 ऑगस्ट रोजी नांदेड व लातूर जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळीवाऱ्यासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 11 ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना जिल्हयात तूरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक 11, 13, 14 व 15 ऑगस्ट रोजी तूरळक ठिकाणी तर दिनांक 12 ऑगस्ट रोजी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

हवामान सारांश / चेतावनी :

सामान्य सल्ला :

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 14 ते 20 ऑगस्ट दरम्यान पाऊस सरासरीएवढा, कमाल तापमान सरासरीएवढे व किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा किंचित जास्त राहण्याची शक्यता आहे.

संदेश : पिकात, बागेत, भाजीपाला व फुल पिकात जमिनीत वापसा असतांना अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. जमिनीत ओलावा पाहून खत व्यवस्थापनाची कामे करून घ्यावीत.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

कापूस पिकात जमिनीत वापसा असतांना अंतरमशागतीची कामे करून घ्यावीत. कापूस पिकात रसशोषण करणाऱ्या किडींचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्काची किंवा ॲसिटामॅप्रिड 20 % 50 ग्रॅम किंवा फलोनिकॅमिड 50% 60 ग्रॅम प्रति एकर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. कापूस पिकाची लागवड करून एक महिना झाला असल्यास कोरडवाहू कापूस पिकास 36 किलो नत्र प्रति हेक्टरी तर बागायती कापूस पिकास 60 किलो नत्र प्रति हेक्टरी वरखताची मात्रा जमिनीत ओलावा असतांना द्यावी.

सूक्ष्म अन्नद्रव्याच्या कमतरतेमूळे तूर पिक पिवळे दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी ईडीटीए चिलेटेड मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट ग्रेड-2 @ 50 ग्रॅम  किंवा 50 मिली + 19:19:19 खत 100 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघुन फवारणी करावी. तूर पिकात जमिनीत वापसा असतांना अंतरमशागतीची कामे करून पिक तण विरहीत ठेवावे.  

मूग/उडीद पिकात मावा किडीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 5 % निंबोळी अर्काची पावसाची उघाड बघून फवारणी करावी.

भुईमूग पिकात जमिनीत वापसा असतांना अंतरमशागतीची कामे करून घ्यावीत. भूईमूग पिकास आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे.

मका पिकात जमिनीत वापसा असतांना अंतरमशागतीची कामे करून घ्यावीत. मका पिकात लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट 5 टक्के  4 ग्रॅम किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

केळी बागेस आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. केळी बागेत अंतरमशागतीची कामे करून बाग तण विरहीत ठेवावी. केळी बागेतील रोगग्रस्त पाने काढून टाकावीत. केळी बागेस लागवड करून तीन महिने झाले असल्यास 50 ग्रॅम नत्र व 50 ग्रॅम पालाश प्रति झाड खतमात्रा द्यावी. केळी बागेत बोधांना माती लावावी.

आंबा बागेस आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. आंबा बागेत अंतरमशागतीची कामे करून बाग तण विरहीत ठेवावी. आंबा फळ बागेत रस शोषण करणाऱ्या किडींच्या व्यवस्थापनासाठी इमिडाक्लोप्रिड 4 ते 5 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.

द्राक्ष बागेस आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. द्राक्ष बागेत अंतरमशागतीची कामे करून बाग तण विरहीत ठेवावी. द्राक्ष बागेतील रोगग्रस्त पानाची विरळणी करून घ्यावी. द्राक्ष बागेत शेंडा खूडून घ्यावा.

सिताफळ बागेस आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. सिताफळ बागेत जमिनीत वापसा असतांना अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे.

भाजीपाला

काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी. भाजीपाला पिकात अंतरमशागतीची कामे करून पिक तण विरहीत ठेवावे. भाजीपाला ‍पिकास आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. जमिनीत ओलावा बघून भाजीपाला पिकास खत मात्रा देण्यात यावी.

फुलशेती

काढणीस तयार असलेल्या फुलपिकाची काढणी करून घ्यावी. फुल पिकात अंतरमशागतीची कामे करून पिक तण विरहीत ठेवावे. फुल ‍पिकास आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे.

पशुधन व्यवस्थापन

पावसाळयात पशुचे खाद्य नियोजन व्यवस्थित ठेवावे व जनावरांचे खाद्य स्वच्छ व कोरडे असावे. शेळ्यांना पशुवैद्यकाच्या सल्ल्याने जंतनाशकाची औषधी देण्यात यावी.

सौजन्‍य

मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 38/2026-2027    मंगळवार, दिनांक – 11.08.2026

No comments:

Post a Comment

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 12 ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड जिल्हयात तूरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम तर परभणी, नांदेड व हिंगोली जिल्हयात हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 13 ऑगस्ट रोजी नांदेड व लातूर जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळीवाऱ्यासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 11 ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना जिल्हयात तूरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक 11, 13, 14 व 15 ऑगस्ट रोजी तूरळक ठिकाणी तर दिनांक 12 ऑगस्ट रोजी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

  हवामान सारांश / चेतावनी : प्...