हवामान सारांश / चेतावनी :
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई
येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 15 सप्टेंबर रोजी जालना, बीड जिल्हयात
तूरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक
15 ते 19 सप्टेंबर दरम्यान छत्रपती संभाजी नगर जिल्हयात तूरळक ठिकाणी हलक्या
स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 15 सप्टेंबर रोजी नांदेड, धाराशिव जिल्हयात
तर दिनांक 16 सप्टेंबर रोजी जालना, बीड, धाराशिव जिल्हयात तर दिनांक 17 ते 19
दरम्यान बीड जिल्हयात तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक
15 ते 19 सप्टेंबर दरम्यान परभणी, हिंगोली, लातूर जिल्हयात तर दिनांक 17 ते 19 सप्टेंबर
दरम्यान जालना, धाराशिव, नांदेड जिल्हयात हवामान कोरड राहण्याची शक्यता आहे. मराठवाडयात
पुढील पाच दिवसात कमाल तापमानात 3 ते 5 अं.से. ने वाढ होण्याची तर पुढील दोन
दिवसात किमान तापमानात 1 ते 3 अं.से. ने वाढ होऊन त्यानंतर फारशी तफावत जाणवनार
नाही.
सामान्य सल्ला :
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस)
मराठवाडयात दिनांक 18 ते 24 सप्टेंबर दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी, कमाल तापमान
सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा जास्त व किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता
आहे.
संदेश : पिकास,
बागेस, भाजीपाला व फुल पिकास पाण्याचा ताण बसत असल्यास आवश्यकतेनूसार सकाळी किंवा
सायंकाळच्या वेळेतच सूक्ष्म सिंचन पध्दतीने हलके पाणी व्यवस्थापन करावे. शेंगा
भरण्याच्या अवस्थेत असलेल्या सोयाबीन पिकात जमिनीत ओलावा असतांना शेंग वाढीसाठी 1 % 00:52:34 (100 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी) ची सकाळी किंवा
सायंकाळच्या वेळेतच फवारणी करावी.
वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण
कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि
सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
आवश्यकतेनूसार कापूस पिकात सकाळी
किंवा सायंकाळच्या वेळेत सूक्ष्म सिंचन पध्दतीने हलके पाणी व्यवस्थापन करावे.
कापूस पिकात अंतरमशागतीची कामे करून घ्यावीत. कापूस पिकात रसशोषण करणाऱ्या किडींच्या (मावा, फुलकिडे)
व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी
अर्काची किंवा व्हर्टिसिलीयम लिकॅनी (जैविक बुरशीजन्य किटकनाशक) एक
किलो ग्रॅम किंवा फलोनिकॅमिड
50% 60 ग्रॅम
किंवा डायनेटोफ्यूरॉन 20% 60 ग्रॅम किंवा फिप्रोनिल 5% 600 मिली प्रति एकर पावसाची उघाड बघून व जमिनीत ओलावा पाहून फवारणी
करावी. कापूस पिकावरील
गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी हेक्टरी 5 गुलाबी बोंडअळीसाठीचे कामगंध सापळे
लावावेत.
आवश्यकतेनूसार तूर पिकात सकाळी
किंवा सायंकाळच्या वेळेत सूक्ष्म सिंचन पध्दतीने हलके पाणी व्यवस्थापन करावे. तूर
पिकात अंतरमशागतीची कामे करून पिक तण विरहीत ठेवावे. तुर पिकात पाने गुंडाळणाऱ्या
अळीच्या व्यवस्थापनासाठी 5 % निंबोळी अर्काची
पावसाची उघाड बघून फवारणी करावी.
काढणीस तयार असलेल्या मूग/उडीद
पिकाची काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.
आवश्यकतेनूसार भूईमूग पिकात
सकाळी किंवा सायंकाळच्या वेळेत सूक्ष्म सिंचन पध्दतीने हलके पाणी व्यवस्थापन
करावे.
आवश्यकतेनूसार मका पिकात सकाळी
किंवा सायंकाळच्या वेळेत सूक्ष्म सिंचन पध्दतीने हलके पाणी व्यवस्थापन करावे. मका
पिकात लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी
इमामेक्टीन बेन्झोएट 5 टक्के 4 ग्रॅम
किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वरील
किटकनाशकांची आलटून पालटून पावसाची उघाड बघून व जमिनीत ओलावा पाहून फवारणी करावी.
फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी. काढणीस तयार
असलेल्या कणसांची काढणी करून घ्यावी.
फळबागेचे व्यवस्थापन
केळी बागेस पाण्याचा ताण बसत
असल्यास उपलब्ध पाण्यानूसार सकाळी किंवा सायंकाळच्या वेळेस मोकळे किंवा सूक्ष्म
सिंचन पध्दतीने पाणी व्यवस्थापन करावे. केळी बागेत अंतरमशागतीची कामे करून बाग तण
विरहीत ठेवावी. केळी बागेत बोधांना माती लावावी.
आंबा बागेस सकाळी किंवा
सायंकाळच्या वेळेस हलके पाणी व्यवस्थापन करावे. आंबा बागेत अंतरमशागतीची कामे करून
बाग तण विरहीत ठेवावी. आंबा फळ बागेत खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास,
याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरोपायरिफॉस 20 मिली प्रति 20 लिटर पाण्यात मिसळून पावसाची
उघाड बघून फवारणी करावी.
द्राक्ष बागेत अंतरमशागतीची कामे
करून बाग तण विरहीत ठेवावी. द्राक्ष बागेत ऑक्टोबर छाटणीची पूर्व तयारी करून
घ्यावी.
सिताफळ बागेस आवश्यकतेनूसार
सकाळी किंवा सायंकाळच्या वेळेस हलके पाणी व्यवस्थापन करावे. सिताफळ बागेत
अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे.
भाजीपाला
काढणीस तयार असलेल्या भाजीपाला
पिकांची काढणी करून घ्यावी. भाजीपाला पिकात अंतरमशागतीची कामे करून पिक तण विरहीत
ठेवावे. भाजीपाला पिकास आवश्यकतेनूसार सकाळी किंवा सायंकाळच्या वेळेस हलके पाणी
व्यवस्थापन करावे. जमिनीत ओलावा पाहून भाजीपाला पिकास खतमात्रा देण्यात यावी.
भाजीपाला (मिरची, वांगे व भेंडी) पिकात
रसशोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यस्थापनासाठी
पायरीप्रॉक्सीफेन 5% + फेनप्रोपाथ्रीन
15% 10 मीली किंवा डायमेथोएट 30% 13 मीली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी
करावी.
फुलशेती
गणपती व गौरी उत्सवामूळे
बाजारपेठेत फुलांना अधिक मागणी असते. काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी
टप्प्याटप्प्याने करावी व प्रतवारी करून बाजारपेठेत पाठवावी. फुल पिकात
अंतरमशागतीची कामे करून पिक तण विरहीत ठेवावे. फुल पिकास आवश्यकतेनूसार सकाळी
किंवा सायंकाळच्या वेळेस हलके पाणी व्यवस्थापन करावे.
पशुधन व्यवस्थापन
पशुधनास बाह्य परजीवी पासून
रक्षण करण्यासाठी जनावरांना खरारा करावा, यामूळे शरीरावरील बाह्य परजिवी गळून
पडतात त्वचा चमकदार दिसते. गोठयाच्या कानाकोपऱ्यात शिफारसीत गोचीड नाशकाची फवारणी
करावी. फवारणी करत असतांना जनावरे गोठयात नसावीत.
सौजन्य
मुख्य प्रकल्प
समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 48/2026-2027 मंगळवार,
दिनांक –
15.09.2026
No comments:
Post a Comment