हवामान सारांश / चेतावनी :
प्रादेशिक
हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार
दिनांक 18 व 19 सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजी नगर, हिंगोली, नांदेड, लातूर
जिल्हयात तर दिनांक 20 सप्टेंबर रोजी परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव
जिल्हयात तर दिनांक 21 सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली
जिल्हयात तर दिनांक 22 सप्टेंबर राजी नांदेड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा
कडकडाट व वाऱ्याचा वेग अधिक
(ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
दिनांक 21 सप्टेंबर रोजी नांदेड, लातूर, धाराशिव जिल्हयात तर दिनांक 22 सप्टेंबर
रोजी लातूर व धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी
वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट व वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 40 ते 50 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता
आहे. मराठवाडयात दिनांक 18, 20 व 22 सप्टेंबर
रोजी काही ठिकाणी तर दिनांक 19 सप्टेंबर रोजी तूरळक ठिकाणी तर दिनांक 21 सप्टेंबर
रोजी बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात
पुढील 24 तासात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही तर त्यानंतर 48 तासात 1 ते
2 अं.से. ने वाढ होउन त्यानंतर 2 ते 4 अं.से. ने घट होण्याची शक्यता आहे. किमान
तापमानात पुढील दोन दिवसात फारशी तफावत जाणवनार नाही व त्यानंतर 2 ते 3 अं.से. ने
वाढ होण्याची शक्यता आहे.
सामान्य सल्ला :
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस)
मराठवाडयात दिनांक 18 ते 24 सप्टेंबर व दिनांक 25 सप्टेंबर ते 01 ऑक्टोबर दरम्यान
पाऊस सरासरीपेक्षा कमी, कमाल तापमान सरासरीएवढे व किमान तापमान सरासरीएवढे ते
सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.
संदेश : पुढील पाच
दिवसात पावसाचा अंदाज लक्षात घेता, काढणीस तयार असलेल्या मूग/उडीद पिकाची काढणी
करून घ्यावी व काढणी केलेल्या मालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. पिकात,
फळबागेत, भाजीपाला व फुल पिकात पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी व साचलेल्या अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा.
वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
शेंगा भरण्याच्या अवस्थेत असलेल्या
सोयाबीन पिकात जमिनीत ओलावा असतांना शेंग वाढीसाठी 1 % 00:52:34 (100 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी) ची सकाळी
किंवा सायंकाळच्या वेळेतच फवारणी करावी. सोयाबीन पिकात पानावरील ठिपके, रायझोक्टोनिया एरियल ब्लाईट,शेंगा करपा आणि इतर बुरशीजन्य
रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास, याच्या व्यवस्थापनासाठी टेब्युकोनॅझोल 10%+
सल्फर 65 % (पूर्वमिश्रित बुरशीनाशक) 500 ग्रॅम किंवा टेब्युकोनॅझोल 25.9 % 250 मिली
किंवा पायरोक्लोस्ट्रोबीन 20 % 150 ते 200 ग्रॅम किंवा पायरोक्लोस्ट्रोबीन 13.3 %+
इपिक्साकोनाझोल 5 टक्के (पूर्वमिश्रित बुरशीनाशक) 300 मिली प्रति एकर पावसाची उघाड
बघून फवारावे. सोयाबीन पिकात पांढऱ्या माशीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास
याच्या व्यवस्थापनासाठी एकरी 10 ते 15 पिवळे चिकट सापळे लावावेत. सोयाबीन पिकात
पिवळा मोझॅक या रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी
पिकातील पिवळा मोझॅक प्रादूर्भाव ग्रस्त झाडे उपटून नष्ट करावीत. सोयाबीन पिकावरील
पिवळा मोझॅकच्या व्यवस्थापनासाठी ॲसिटामिप्रिड 25% + बाइफेन्थ्रीन
25% डब्ल्यू जी 100 ग्रॅम किंवा बीटा साइफ्लुथ्रीन 8.49%
+ इमिडाक्लोप्रीड 19.81% ओडी 140 मिली प्रति
एकर यापैकी एका किटकनाशकाची पावसाची उघाड बघून याप्रमाणे फवारणी करावी व वरील
किटकनाशकासोबत दुसरे कुठलेही औषध मिसळुन फवारू नये. पिकात पाणी साचून राहणार नाही
याची दक्षता घ्यावी व साचलेल्या अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा.
खरीप ज्वारी पिकात लष्करी अळीचा
प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट 5
टक्के 4 ग्रॅम किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी
4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटून पावसाची उघाड
बघुन फवारणी करावी. फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी
करावी. पिकात पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी व साचलेल्या अतिरिक्त
पाण्याचा निचरा करावा.
पिकात पाणी साचून राहणार नाही याची
दक्षता घ्यावी व साचलेल्या अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा.
ऊस पिकात पायरीला (पाकोळी) या किडीचा
प्रादूर्भाव दिसून येत आहे, किडीच्या निरिक्षणासाठी व मोठ्या प्रमाणात प्रौढ जमा करून
नष्ट करण्यासाठी एक प्रकाश सापळा प्रति पाच एकर क्षेत्र या प्रमाणात पिकाच्या उंचीच्या
अर्धा फूट उंचीवर लावून सायंकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत चालू ठेवावा. किडीच्या
व्यवस्थापनासाठी क्लोरोपायरीफॉस 20 टक्के 600 मिली प्रति एकर पावसाची उघाड बघुन फवारावे.
ऊस पिकात पांढरी माशीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी
इमिडाक्लोप्रिड 17.8% 60 मिली किंवा ॲसिफेट 75% 400 ग्रॅम प्रति एकर
याप्रमाणे पावसाची उघाड बघुन फवारणी करावी. आवश्यकता असल्यास दहा दिवसानंतर दुसरी
फवारणी करावी मात्र मित्र किडींची संख्या जास्त असल्यास अनावश्यक दुसरी फवारणी
टाळावी एकाच प्रकारच्या किटकनाशकाची वारंवार फवारणी न करता वेगवेगळया
कार्यपध्दतीच्या किटकनाशकांची आलटून पालटून फवारणी करावी. पिकात पाणी साचून राहणार
नाही याची दक्षता घ्यावी व साचलेल्या अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा.
हळद पिकाची लागवड करून 60 दिवस झाले
असल्यास 25 किलो नत्रासोबत 00:52:34 15.5 किलो प्रति एकरी सूक्ष्म सिंचन पध्दतीने
तीन ते चार वेळा विभागून द्यावे. हळद पिकात करपा रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत
असल्यास, रोगग्रस्त पाने वेळोवेळी गोळा करून शेताबाहेर नष्ट करावीत व शेत स्वच्छ ठेवावे.
याच्या व्यवस्थापनासाठी कार्बेन्डाझीम 50% 400 ग्रॅम किंवा मॅन्कोझेब 75
% 500 ग्रॅम किंवा कॉपर ऑक्सीक्लोराइड 50
% 500 ग्रॅम फवारणी करताना चांगल्या प्रतीचे चिकटवणारे
द्रव्य मिसळावे. प्रादुर्भाव जास्त असल्यास ॲझॉक्सीस्ट्रोबिन 18.2 % + डायफेनोकोनॅझोल 11.4 % 200 मिली
किंवा प्रोपिकोनॅझोल 25 % प्रवाही 200 मिली
किंवा क्लोरोथॅलोनील 75% 500 ग्रॅम प्रति एकर या प्रमाणे
स्टिकर सह फवारणी करावी. हळद पिकात कंदकूज रोगाच्या व्यवस्थापनासाठी,
प्रतिबंधात्मक उपाय म्हणून एकरी 2 ते 2.5 किलो ट्रायकोडर्मा चांगल्या कुजलेल्या शेणखतात
मिसळून जमिनीत द्यावे. कंदकुज रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास खालीलपैकी कोणत्याही
एका बुरशीनाशकाची जमिनीतून आळवणी करावी. कार्बेन्डाझीम 50 %
1 ग्रॅम किंवा मॅन्कोझेब 75% 3 ग्रॅम किंवा कॉपर ऑक्सीक्लोराइड
50 % 5 ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे आळवणी करावी. (आळवणी
करताना जमिनीत योग्य वापसा असावा. आळवणी केल्यानंतर 2 ते 3 दिवस पाणी देऊ नये).
हळद पिकात कंदमाशीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 15
दिवसांच्या अंतराने क्विनालफॉस 25% 20 मिली किंवा डायमिथोएट
30 % 15 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून आलटून-पालटून पावसाची उघाड बघून फवारणी
करावी व क्लोरोपायरीफॉस 50% 50 मिली प्रति 10 लिटर पाणी या
प्रमाणात जमिनीतून आळवणी करावी व प्रतिबंधात्मक उपाय म्हणून महिन्यातून एकदा अळवणी
करावी. (हळद पिकावर केंद्रीय किटकनाशक मंडळातर्फे लेबल क्लेम नसल्यामूळे विद्यापिठ
शिफारशीत संशोधनाचे निष्कर्ष दिले आहेत). उघडे पडलेल्या कंदावर कंदमाशीची मादी अंडी
घालते. त्यामुळे उघडे पडलेले कंद वेळोवेळी मातीने झाकावेत व वेळेवर भरणी करावी. पिकात
पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी व साचलेल्या अतिरिक्त पाण्याचा निचरा
करावा.
फळबागेचे व्यवस्थापन
संत्रा/मोसंबी बागेत फळवाढीसाठी जिब्रॅलिक
ॲसिड 2 ग्रॅम प्रति 100 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. ढगाळ
वातावरण व पावसामूळे बागेत रोगाचा प्रादूर्भाव होऊ नये म्हणून किटकनाशकची व
रोगनाशकाची पावसाची उघाड बघून फवारणी करावी. बागेत पाणी साचून राहणार नाही याची
दक्षता घ्यावी व साचलेल्या अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा.
मृग बहार डाळींब बागेत तेल्या रोगाचा
प्रादूर्भाव होण्याची शक्यता पाहता 1
% बोर्डो मिश्रणाची व याच्या व्यवस्थापनासाठी स्ट्रेप्टोसायक्लीन 2
ग्रॅम किंवा कॉपर ऑक्झी क्लोराइड 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची
उघाड बघून फवारणी करावी. डाळींब बागेत किटकनाशकाची किंवा रोगनाशकाची पावसाची उघाड
बघून फवारणी करावी. बागेत पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी व साचलेल्या
अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा.
चिकू बागेत जमिनीत वापसा असतांना अंतरमशागतीची
कामे करून तण नियंत्रण करावे. बागेत पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी व
साचलेल्या अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा.
भाजीपाला
काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची
काढणी करून घ्यावी. भाजीपाला पिकास जमिनीत ओलावा बघून खतामात्रा देण्यात यावी.
भाजीपाला पिकात जमिनीत वापसा असतांना अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. भाजीपाला
(मिरची, वांगे व भेंडी) पिकात रसशोषण
करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यस्थापनासाठी
पायरीप्रॉक्सीफेन 5% + फेनप्रोपाथ्रीन 15% 10
मीली किंवा डायमेथोएट 30% 13 मीली प्रती 10 लिटर
पाण्यात मिसळून फवारणी करावी. भाजीपाला
पिकात पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी व साचलेल्या अतिरिक्त पाण्याचा
निचरा करावा.
फुलशेती
गणपती व गौरी उत्सवामूळे बाजारपेठेत
फुलांना अधिक मागणी असते. काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी टप्प्याटप्प्याने
करावी व प्रतवारी करून बाजारपेठेत पाठवावी. फुल पिकात जमिनीत वापसा असतांना अंतरमशागतीची
कामे करून पिक तण विरहीत ठेवावे.
पशुधन व्यवस्थापन
कुक्कुट पालन एकदम हवेशीर, शेडची गळती
एकदम कोरडे गारी/लिटर आणि पावसाच्या पाण्याचा शेडच्या परिसरातील योग्य निचरा होईल
याची काळजी घ्यावी तसेच पिण्यास स्वच्छ पाण्याची अहोरात्र व्यवस्था होईल याची
काळजी घ्यावी. शेळ्यांच्या शेडमधील बेडींग/झोपण्यासाठी पसरलेला पेंडा स्वच्छ व
कोरडा राहील याची दक्षता घ्यावी. ह्या काळात नियमीत निर्जंतूकीकरण व परोपजिवी
प्रतिबंधक उपाय करावेत. तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम पावसाची
शक्यता असल्यामूळे, जनावरांना उघडयावर सोडू किंवा बांधू नये. निवा-याच्या ठिकाणी बांधावे व पावसात भिजणार
नाहीत याची काळजी घ्यावी.
सौजन्य
मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक
मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 49/2026-2027 शुक्रवार,
दिनांक –
18.09.2026
No comments:
Post a Comment