Tuesday, 22 September 2026

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 22 सप्टेंबर रोजी नांदेड, लातूर जिल्हयात तर दिनांक 23 सप्टेंबर रोजी धाराशिव, लातूर, नांदेड जिल्हयात तर दिनांक 24 सप्टेंबर रोजी हिंगोली, नांदेड जिल्हयात तर दिनांक 25 सप्टेंबर रोजी नांदेड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट व वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 40 ते 50 कि.मी.) राहून मूसळधार पावसाची शक्यता आहे. दिनांक 22 सप्टेंबर रोजी हिंगोली, धाराशिव जिल्हयात तर दिनांक 24 सप्टेंबर रोजी लातूर, परभणी जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट व वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 40 ते 50 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. दिनांक 22 सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी, बीड जिल्हयात तर दिनांक 23 सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली जिल्हयात तर दिनांक 25 सप्टेंबर रोजी हिंगोली जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट व वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. दिनांक 24 सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजी नगर, बीड, धाराशिव जिल्हयात तर दिनांक 25 सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी जोरदार वारा राहण्याची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक 22 व 23 सप्टेंबर राजी बऱ्याच ठिकाणी तर दिनांक 24 सप्टेंबर रोजी काही ठिकाणी तर दिनांक 25 व 26 सप्टेंबर रोजी तूरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

हवामान सारांश / चेतावनी :

सामान्य सल्ला :

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 25 सप्टेंबर ते 01 ऑक्टोबर दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी, कमाल तापमान सरासरीएवढे व किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.

संदेश : पुढील तीन दिवसात पावसाचा अंदाज लक्षात घेता फवारणीची कामे टाळावीत व स्वच्छ, कोरडे हवामान असतांना फवारणीची कामे करावी. पिकात, बागेत, भाजीपाला व फुल पिकात पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी व साचलेल्या अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

पुढील तीन दिवसात पावसाचा अंदाज लक्षात घेता फवारणीची कामे टाळावीत व स्वच्छ, कोरडे हवामान असतांना फवारणी करावी. पिकात पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी व साचलेल्या अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी हेक्टरी 5 गुलाबी बोंडअळीसाठीचे कामगंध सापळे लावावेत. कापूस पिकात मॅग्नेशियम सल्फेट 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. कापूस पिकात पातेगळ व बोंडगळ दिसून येत असल्यास एनएए 2.5 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. कापूस पिकात अंतरमशागतीची कामे करून घ्यावीत. कापूस पिकात रसशोषण करणाऱ्या किडींच्या (मावा, फुलकिडे) व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्काची किंवा व्हर्टिसिलीयम लिकॅनी (जैविक बुरशीजन्य किटकनाशक) एक किलो ग्रॅम किंवा फलोनिकॅमिड 50% 60 ग्रॅम किंवा डायनेटोफ्यूरॉन 20% 60 ग्रॅम किंवा फिप्रोनिल 5% 600 मिली प्रति एकर पावसाची उघाड बघून फवारणी करावी.

पुढील तीन दिवसात पावसाचा अंदाज लक्षात घेता फवारणीची कामे टाळावीत व स्वच्छ, कोरडे हवामान असतांना फवारणी करावी. पिकात पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी व साचलेल्या अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. तूर पिकात अंतरमशागतीची कामे करून पिक तण विरहीत ठेवावे. तुर पिकात पाने गुंडाळणाऱ्या अळीच्या व्यवस्थापनासाठी 5 % निंबोळी अर्काची पावसाची उघाड बघून फवारणी करावी.

पुढील तीन दिवसात पावसाचा अंदाज लक्षात घेता पिकात पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी व साचलेल्या अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा.

पुढील तीन दिवसात पावसाचा अंदाज लक्षात घेता फवारणीची कामे टाळावीत व स्वच्छ, कोरडे हवामान असतांना फवारणी करावी. पिकात पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी व साचलेल्या अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. मका पिकात लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट 5 टक्के  4 ग्रॅम किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटून पावसाची उघाड बघून व जमिनीत ओलावा पाहून फवारणी करावी. फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी. काढणीस तयार असलेल्या कणसांची काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.

रब्बी ज्वारीची लागवड मध्यम ते भारी पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत करावी. हलकी जमिन शक्यतो टाळावी कारण अशा जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता राहत नाही मग पिकाच्या संवेदनशील काळात पाणी कमी पडते.

रब्बी सूर्यफुलाची लागवड मध्यम ते भारी ओलावा टिकवून ठेवणाऱ्या, उत्तम निचरा असणाऱ्या व जमिनीचा सामू 6.5 ते 8 असणाऱ्या जमिनीत करावी. पाणथळ किंवा आम्लयूक्त जमिन लागवडीसाठी टाळावी.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

पुढील तीन दिवसात पावसाचा अंदाज लक्षात घेता बागेत पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी व साचलेल्या अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. केळी बागेत बोधांना माती लावावी. जोरदार वाऱ्याची शक्यता पाहता, केळी झाडांना काठीने आधार द्यावा.

पुढील तीन दिवसात पावसाचा अंदाज लक्षात घेता बागेत पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी व साचलेल्या अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. आंबा फळ बागेत खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास, याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरोपायरिफॉस 20 मिली प्रति 20 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. जोरदार वाऱ्याची शक्यता पाहता, आंबा झाडांना काठीने आधार द्यावा.

पुढील तीन दिवसात पावसाचा अंदाज लक्षात घेता बागेत पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी व साचलेल्या अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. द्राक्ष बागेत ऑक्टोबर छाटणीची पूर्व तयारी करून घ्यावी.

पुढील तीन दिवसात पावसाचा अंदाज लक्षात घेता बागेत पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी व साचलेल्या अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. जोरदार वाऱ्याची शक्यता पाहता, सिताफळ झाडांना काठीने आधार द्यावा.

भाजीपाला

पुढील तीन दिवसात पावसाचा अंदाज लक्षात घेता पिकात पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी व साचलेल्या अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची लवकरात लवकर काढणी करून घ्यावी. भाजीपाला पिकात अंतरमशागतीची कामे करून पिक तण विरहीत ठेवावे.

फुलशेती

पुढील तीन दिवसात पावसाचा अंदाज लक्षात घेता पिकात पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी व साचलेल्या अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. गणपती उत्सवामूळे बाजारपेठेत फुलांना अधिक मागणी असते. काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी टप्प्याटप्प्याने करावी व प्रतवारी करून बाजारपेठेत पाठवावी. फुल पिकात अंतरमशागतीची कामे करून पिक तण विरहीत ठेवावे.

पशुधन व्यवस्थापन

तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्यामूळे, जनावरांना उघडयावर सोडू किंवा बांधू नये. निवा-याच्‍या ठिकाणी बांधावे व पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्‍यावी. पशुधनास बाह्य परजीवी पासून रक्षण करण्यासाठी जनावरांना खरारा करावा, यामूळे शरीरावरील बाह्य परजिवी गळून पडतात त्वचा चमकदार दिसते. गोठयाच्या कानाकोपऱ्यात शिफारसीत गोचीड नाशकाची फवारणी करावी. फवारणी करत असतांना जनावरे गोठयात नसावीत.

सौजन्‍य

मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक50/2026-2027    मंगळवार, दिनांक – 22.09.2026

No comments:

Post a Comment

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 22 सप्टेंबर रोजी नांदेड, लातूर जिल्हयात तर दिनांक 23 सप्टेंबर रोजी धाराशिव, लातूर, नांदेड जिल्हयात तर दिनांक 24 सप्टेंबर रोजी हिंगोली, नांदेड जिल्हयात तर दिनांक 25 सप्टेंबर रोजी नांदेड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट व वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 40 ते 50 कि.मी.) राहून मूसळधार पावसाची शक्यता आहे. दिनांक 22 सप्टेंबर रोजी हिंगोली, धाराशिव जिल्हयात तर दिनांक 24 सप्टेंबर रोजी लातूर, परभणी जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट व वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 40 ते 50 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. दिनांक 22 सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी, बीड जिल्हयात तर दिनांक 23 सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली जिल्हयात तर दिनांक 25 सप्टेंबर रोजी हिंगोली जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट व वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. दिनांक 24 सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजी नगर, बीड, धाराशिव जिल्हयात तर दिनांक 25 सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी जोरदार वारा राहण्याची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक 22 व 23 सप्टेंबर राजी बऱ्याच ठिकाणी तर दिनांक 24 सप्टेंबर रोजी काही ठिकाणी तर दिनांक 25 व 26 सप्टेंबर रोजी तूरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

  हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र ,   मुंबई येथून प्राप्त झालेल्या...