हवामान सारांश / चेतावनी :
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई
येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक
06 ऑक्टोबर रोजी हिंगोली व नांदेड जिल्हयात तूरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह खूप
हलक्या ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहण्याची तर दिनांक 06 ऑक्टोबर
रोजी दूपारनंतर आकाश अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील पाच
दिवसात कमाल तापमानात हळूहळू 2 ते 3 अं.से. ने वाढ होण्याची तर पुढील चोविस तासात
किमान तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही व त्यानंतर चार दिवसात हळूहळू 2 ते 3
अं.सं. ने वाढ होण्याची शक्यता आहे.
सामान्य सल्ला :
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस)
मराठवाडयात दिनांक 09 ते 15 ऑक्टोबर दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी, कमाल तापमान व
किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे.
संदेश : पिकास,
बागेस, भाजीपाला व फुल पिकास आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. पाण्याच्या
उपलब्धतेनूसार रब्बी हंगामातील पिकांची (रब्बी ज्वारी, करडई, सूर्यफूल व हरभरा)
पेरणी 1 ते 15 ऑक्टोबर पर्यंत करता येते
वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण
कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि
सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
पाण्याची
उपलब्धता असल्यास कापूस पिकास आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. कापूस पिकात रसशोषण करणाऱ्या किडींच्या (मावा, फुलकिडे)
व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी
अर्काची किंवा व्हर्टिसिलीयम लिकॅनी (जैविक बुरशीजन्य किटकनाशक) एक
किलो ग्रॅम किंवा फलोनिकॅमिड
50% 60 ग्रॅम
किंवा डायनेटोफ्यूरॉन 20% 60 ग्रॅम किंवा फिप्रोनिल 5% 600 मिली प्रति एकर फवारणी करावी. कापूस पिकावरील गुलाबी
बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी हेक्टरी 5 गुलाबी बोंडअळीसाठीचे कामगंध सापळे
लावावेत. कापूस पिकातील डोमकळ्या वेचून नष्ट कराव्यात. कापूस पिकात अंतरमशागतीची
कामे करून घ्यावीत.
पाण्याची
उपलब्धता असल्यास तूर पिकास आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. तूर पिकात
अंतरमशागतीची कामे करून पिक तण विरहीत ठेवावे. तुर पिकात पाने गुंडाळणाऱ्या
अळीच्या व्यवस्थापनासाठी 5 % निंबोळी अर्काची
फवारणी करावी.
पाण्याची
उपलब्धता असल्यास भूईमूग पिकास आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. काढणीस तयार
असलेल्या भूईमूग पिकाची काढणी करून घ्यावी.
पाण्याची
उपलब्धता असल्यास मका पिकास आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. मका पिकात
लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन
बेन्झोएट 5 टक्के 4 ग्रॅम किंवा
स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची
आलटून पालटून फवारणी करावी. फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे
खरीप
पिकांची काढणी केल्यानंतर पाण्याची उपलब्धता असल्यास किंवा जमिनीत ओलावा असल्यास
रब्बी ज्वारी पिकाची पेरणी लवकरात लवकर करून घ्यावी. पेरणी 45X15 सेंमी अंतरावर करावी. पेरणीसाठी हेक्टरी 10 किलो बियाणे
वापरावे. परेणीपूर्वी बियाण्यास बिजप्रक्रिया करूनच पेरणी करावी. रब्बी ज्वारीच्या
पेरणीसाठी परभणी सुपर मोती (एसपीव्ही-2407), परभणी मोती (एसपीव्ही-1411), परभणी ज्योती
(सीएसव्ही-18), परभणी शक्ती (पीव्हीके-1009), मालदांडी (एम35-1) इत्यादी वाणांपैकी
निवड करावी.
खरीप
पिकांची काढणी केल्यानंतर पाण्याची उपलब्धता असल्यास किंवा जमिनीत ओलावा असल्यास
रब्बी सुर्यफुलाची पेरणी लवकरात लवकर करून घ्यावी. भारी जमिनीत पेरणी 60X30 सेंमी तर मध्यम जमिनीत 45X30 सेंमी अंतरावर करावी. पेरणीसाठी हेक्टरी 8 ते 10 किलो बियाणे वापरावे.
रब्बी सुर्यफुल पेरणीसाठी एल.एस.एफ.एच-171 या वाणाची निवड करावी.
फळबागेचे व्यवस्थापन
केळी
बागेत खतमात्रा दिली नसल्यास 50 ग्रॅम नत्र प्रति झाड देण्यात यावे. केळी बागेत
अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. केळी बागेत रोगाचा प्रादूर्भाव दिसून
येत असल्यास रोगनाशकाची फवारणी करण्यात यावी. पाण्याची उपलब्धता असल्यास केळी
बागेत आवश्यकतेनूसार पाणी द्यावे.
आंबा
बागेत किडींचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास, बागेत किटकनाशकाची पावसाची उघाड
बघून फवारणी करावी. आंबा बागेत अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. पाण्याची
उपलब्धता असल्यास आंबा बागेत आवश्यकतेनूसार पाणी द्यावे.
द्राक्ष
बागेत ऑक्टोबर छाटणी करून घ्यावी. छाटणी केल्यानंतर द्राक्ष बागेत 1% बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी.
पाण्याची
उपलब्धता असल्यास सिताफळ बागेस आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. पूर्ण वाढलेल्या व
काढणीस तयार असलेल्या सिताफळ फळांची काढणी करावी व प्रतवारी करून बाजारपेठेत
पाठवावी.
भाजीपाला
पाण्याची
उपलब्धता असल्यास भाजीपाला पिकास आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. काढणीस
तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी. भाजीपाला पिकास जमिनीत ओलावा बघून खतामात्रा देण्यात यावी. भाजीपाला पिकात
जमिनीत वापसा असतांना अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. भाजीपाला (मिरची,
वांगे व भेंडी) पिकात रसशोषण करणाऱ्या
किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यस्थापनासाठी पायरीप्रॉक्सीफेन 5% + फेनप्रोपाथ्रीन 15% 10
मीली किंवा डायमेथोएट 30% 13 मीली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
फुलशेती
पाण्याची
उपलब्धता असल्यास फुल पिकास आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. काढणीस तयार
असलेल्या फुलांची काढणी टप्प्याटप्प्याने करावी व प्रतवारी करून बाजारपेठेत
पाठवावी. फुल पिकात अंतरमशागतीची कामे करून पिक तण विरहीत ठेवावे.
चारा पिके
चाऱ्यासाठी
लागवड केलेल्या संकरीत नेपियर पिकाची
पहिली कापणी 65 ते 70 दिवसानी तर नंतरच्या कापण्या 40 ते 45 दिवसानी (7 ते
8 कापण्या) कराव्यात. चारा पिकाची
पेरणी करण्यासाठी पूर्व मशागतीची कामे पूर्ण करून घ्यावीत. पाण्याच्या
उपलब्धतेनूसार रब्बी ज्वारी, बाजरी, मका व ओट पिकाची पेरणी करून घ्यावी.
पशुधन व्यवस्थापन
पशुसाठी
चारा व्यवस्थापन : मराठवाडयाच्या अनेक भागामध्ये कमी पाऊस झाल्यामूळे भविष्यामध्ये
पशुधनासाठी चारा टंचाई भासू शकते. यासाठी असलेल्या पडकातील गवत, द्विदल व तत्सम
पशुची चारा पीके याचे सायलेज (मूरघास) स्वरूपामध्ये जतन, तसेच रब्बी हंगामामध्ये
ज्वारीसारखे पीक घेऊन कडबा उत्पादन करणे, ईतर पीकांचे काड घेऊन त्यावर
युरीया-मोलॅसेस यांची ट्रीटमेंट करून वापरणे. ईत्यादी उपाय अमलात आणण्याची गरज आहे
व त्यासाठी सर्वांनी तयारी केली पाहिजे.
सौजन्य
मुख्य प्रकल्प
समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 54/2026-2027 मंगळवार,
दिनांक –
06.10.2026
No comments:
Post a Comment